मुळ्याची कोशिंबीर

Submitted by तृप्ती आवटी on 22 May, 2014 - 17:23
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ मुळा, दीड टे स्पून मोहरी, मीठ, साखर, १ टे स्पून लिंबाचा रस, बारीक चिरलेली कोथिंबीर

क्रमवार पाककृती: 

मुळा किसून त्यात मोहरीखेरीज इतर साहित्य नीट मिसळून घ्यावे. मोहरीची खलबत्यात अथवा मिक्सरमध्ये बारीक पूड करून घ्यावी. खलबत्ता वापरल्यास पूड वाटीत घेऊन चमच्याने भरपूर घोटून घ्यावी. मिक्सर वापरल्यास मिक्सरमध्येच थोडी जास्त वेळ फिरवावी. घोटलेली मोहरीची पूड मुळ्याच्या मिश्रणात घालून नीट हलवून घ्यावे. कोशिंबीर तयार आहे.

वाढणी/प्रमाण: 
एक घास खाऊन धारातिर्थी न पडलेले सर्व नग आणखी एक-एक घास खाऊ शकतात
अधिक टिपा: 

बचेंगे तो और भी लडेंगे |

माहितीचा स्रोत: 
मुळे
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पास... मुळ्याच्या वासानेच धारातिर्थी पडायला होतं. खाणं दूरच.
(मुळ्यांनी 'आमची कोशिंबीर अशी करायची' असं सांगून रेसिपी दिली का? Wink )

मस्त! लिंबाच्या रसाने स्वाद खुलतो मुळ्याचा. मोहरी घालून पाहीन आता.
माझ्या एक काकी मुळ्याचे चौकोनी तुकडे करून, पाण्यात घालून एक उकळी आणत, मग ते अलगद काढून लिंबाचा रस व गार केलेली फोडणी घालत वरनं.

करुन बघण्यात येईल. ह्यात दही+खोबरं+मिरची घातली तर काकडीच्या नाकार्ड्या सारखं मुळ्याचं नाकार्ड म्हणून खपेल.

मलाही आवडतो मुळा

यात लिंबाऐवजी अधमुरे दही उत्तम लागते.

मुळ्याचे फायदे

मुळ्याचे लसूण घातलेले स्टफ पराठे ही उत्तम होतात.

उग्र वासाची हळूहळू सवय होते (विशेषत: साबा साबू नेहमी खात असल्यास व एकत्र रहात असल्यास काय बिषाद तुमची सवय न करून घ्यायची!!)

हायला दोन दोन पंजंट गोष्टी मिळून किती झिणझिणेल!!!

पण आपल्याला ब्वा आवडतो मुळा. त्यामुळे करून बघणेत येईल.

गाता गळा आणि शिजता मुळा म्हणतात ते काय उगीच नाही.

Lol
मी घरात मुळा शिजवतील त्या दिवशी जेवतच नाही. पण कच्च्या मुळ्याची थोड्या प्रमाणात कोशिंबीर खाऊ शकते.

मुळा व मोहोरीचे एकत्र कॉम्बो म्हणजे आधीच मर्कट तशात मद्य प्याला टाईपचे होणार की काय!! धीर एकवटून रेसिपी ट्राय करण्यात येईल.

>>>गाता गळा आणि शिजता मुळा
का ? दोन्हीही जास्त काळ लपून राहू शकत नहीत म्हणुन का? Proud

मुळ्याचा चटका चांगला लागतो की..
तसंच उत्तरेत रामलड्डू वर किसलेला कोवळा मुळा घालुन देतात तोपण मस्त लागतो Happy

वरील प्रकारची कोशिंबीर एकदम फणकारत असेल.

मी आपली किसलेला मुळा, दही, दाण्याचं कूट, मीठ आणि कोथिंबीर घातलेली खाते. त्यात मिरची सुद्धा घालत नाही.

मुळ्याचा वास ज्यांना आवडत नाही ते पिवळी मुगाची डाळ (भिजवलेली) घालून कोशिंबिर करून पहा. अजिबात वास येत नाहे मुळ्याचा. चांगली लागते.

वरची रेसेपी मुळेसिझनात करून पहाता यील. पण उग्र होईल असे वातते.

इथल्या मुळ्यांना ना वास, ना चव! किसून कोशींबीरीत घातले तर काकडी म्हणून सुद्धा खपून जातील कदाचित Happy
आता या रेसिपीने करुन पाहीन. मला फार आवडतात मुळ्याचे प्रकार

किसलेल्या मुळ्याचं पाणी पिळून जर ही कोशिंबीर अधमुरं दही घालून केली तर मस्तं लागते! कळत पण नाही की मुळ्याची आहे ती. अगदी किसलेलं खोबरंच वाटतं ते! पाणी आवडत असेल तर नंतर आमटीत टाकता येतें.

लाल मुळे मस्त लागतात...ज्यांना पांढर्या मुळ्याची अ‍ॅलर्जी आहे त्यांनी लाल मुळे ट्राय करायला हरकत नाही....

बचेंगे तो और भी लडेंगे |
शिजता मुळा
मुळा व मोहोरीचे एकत्र कॉम्बो म्हणजे आधीच मर्कट तशात मद्य प्याला टाईप >>> Biggrin

रेसिपीला पास. मुळा किसून पीठ पेरुन भाजी, पराठे त्यातल्यात्यात ओके. नाहीतर मग नुसताच गोल चकत्या कापून सॅलड. एकंदरित कमीच आणला जातो. मुळ्यापेक्षा दुधी बरा, हलवा तरी करता येतो Wink

आमच्याकडे आवडीने खातात मुळ्याची कोशिंबीर …पण कृती अशी :

मुळा खिसुन + दही + दाण्याचं कूट + कोथिंबीर + मीठ + साखर + मोहरी-जिरे-हिंग फोडणी

असं सगळं कालवलं की झालं Happy

अगदी फारच वाटल तर मुळा खिसल्यावर त्यातला पाणी काढून टाकायच… पण ज्यांना आवडतो त्यांना काही प्रश्नच नाही

आज आम्ही जिथे उतरलो आहोत तिथे मुळ्याची भाजी होती लंचला तेव्हा ह्या बाफ ची आठवन आली. मला हसू का येते आहे ते त्या शेफ ला कळेना.

गाता गळा आणि शिजता मुळा >>>> Biggrin

आम्ही कालच करून खाल्ली ही कोशिंबीर. जीवात धुगधुगी आहे तोवर सांगून घेतेय, भार्री उग्र झणझणाटी लागते. मुळा आणि फेसलेली मोहरीचे हार्ड कोअर फॅन्स असाल तरच खा. एरवी बदल्यापुरती राखून ठेवा पाककृती Wink

मुमो काँबो थोडं वसाबी सारखं लागेल असं वाटतंय..म्हणून आम्चा पास. Wink

ही रेस्पि खाऊन गात्या गळ्ञा(वाल्यां)चं़ काय होईल देव जाणे.

Pages