साग़रसाहेबांची आणि माझी पहिली भेट ९८-९९ मध्ये कधीतरी झाली. त्या भेटीबद्दल विशेषकाही सांगण्यासारखे नाही. एवढेच जाणवले की हा शायर अतिशय साधा असावा. पुढे अनेक मुशायरांमधे वरवर भेटत राहिलो. एवढे आठवते की भरतनाट्यमंदिरात विनय वाईकर आले होते. अर्थातच साग़रसाहेब पुण्यातल्या उर्दू गझलकारांमध्ये मोठे नाव असल्याने उपस्थित होतेच. साग़रसाहेबांनी स्वतःचा परिचय एक छोटा शायर म्हणून गंमतीत केल्याचे चांगले स्मरते. कार्यक्रमानंतर आम्ही ब-यापैकी गप्पा केल्या. आता नक्की आठवत नाही की त्यांच्या मीरा का दातार दर्ग्यामागील पानाच्या दुकानापर्यंत माझी मजल कशी पोहोचली. दुकानाच्या समोर एक होटेल होते (दोनेक वर्षांपूर्वी तरी होतेच). तिथे बसून चहा पीत गझल ऐकणे-ऐकवणे हा माझा बहुतेक रविवारचा उद्योग असायचा. अनेकदा सोबत एक कव्वाल (ज्यांचे नाव लक्षात नाही), आणि एखादवेळेस एक शिष्य इक्बाल हमीद असायचे. हनीफ़ सागरांच्या राहणीत आणि कवितेत मला एक समान धागा जाणवला, ज्याचा प्रभाव आजतागायत माझ्यावर आणि माझ्या कवितेवर मला जाणवत आहे. निखळ साधेपणा एवढेच म्हणू शकतो. सुरेश्चंद्र नाडकर्णींकडून मला समजले की साहिरने त्यांना मासूम शायर असे भर मुशाय-यात गौरवले होते. त्यांचा मला अतिशय आवडणारा (आणि मीरची आठवण करून देणारा) एक शेर असा आहे:
हमको प्यारी है आबरू ग़मकी
हम तो, चुपकेसे रो लिये साहब
त्याच गझलेतील पुढील शेर असे आहेतः
द्स्तके दे रहा हूं सदियोसे
दिलका दरवाजा तो खोलिए साहब
सारे ग़म आप भूल जायेंगे
दो घडी हमसे बोलिये साहब
ह्या लेखाचा उद्देश्य साग़रसाहेबांच्या गझलांचा परिचय तर आहेच पण सोबत मला माझ्या काही भावना शेअर करता येत आहेत त्याचाही आनंद आहे. त्यांचा त्यांच्या हयातीत एकमेव संग्रह आला (शेवटच्या काही वर्षात).
सगळ्यांनीच वाचावा असाच आहे. पुस्तक फार उशीरा निघाले तेव्हा ते नाराज होते.
त्यांना विचारले की पुस्तकाचे नाव काय ठेवावे. ते म्हटले: ये मैं हूं.
जौ़कच्या तस्वीरका क्या देखना मधील सूक्ष्मता इथे कळून आल्याचे दिसते.
मैं अपनी ही तस्वीरको यूं देख रहा हूं
जैसे किसी बिछडे हुए साथीसे मिला हूं
त्यात एक शेर आहे:
ये होगा, के कुछ और नये जख्म़ मिलेंगे
क्या सोचके जीनेकी दुआ मांग रहा हू
त्यांच्या बहुतेक शेरांचे वैशिष्ट्य सोपेपणा, विचारांतील सफाई. अनेकदा त्यातील अनुभूती आपल्यापर्यंत पोहचावी इतकी उत्कटता.
हमारा दर्द न बांटो मगर गुजा़रिश है
हमारे दर्द को महसूस कर लिया जाए
ये बात अपनी तबीयत की बात होती है
किसी की बात का कितना असर लिया जाए
शऊरे-वक्त़ अगर नापना हो ऐ साग़र
खु़द अपने आप को पैमाना कर लिया जाए
शऊरे-वक्त़ = समय का ज्ञान
हा एक अप्रतिम शेर, जणू काही सगळी शिष्टता आपण मीरकडून घेतली आहे.
मस्लहत डाल दिया करती है लबपर ताले
आप इज़हारे-हकी़क़त भी नही कर सकते
मस्लहत = भले बुरे की सोच
वर दिलेल्या शेरांवरून असा समज होऊ शकतो की साग़रसाहब मर्यादित विषयांवर लिहीत असावेत.
दोन सामाजिक शेर उदाहरणदाखल देत आहे:
जिनको मां बापने फा़को़के सिवा कुछ न दिया
ऐसे बच्चे तो शरारत भी नही कर सकते
लहान वयात घराची जवाबदारी पडणा-या मुलांचे बालपण हरवते म्हणतात ते असेच काही असावे.
हम उजालोंके पयम्बर तो नही है लेकिन
क्या चराग़ोंकी हिफा़ज़त भी नही कर सकते
वर अतिशय गहन विषय छेडला आहे. जगाकडे बारकाईने पहाताना कुठल्याही संवदेनशील माणसाला वारंवार असे वाटत नसेल तर नवल.
त्यांचे मला आवडणारे निवडक शेर देत आहे:
तआर्रुफ खा़र बन कर चुभ रहा है
ये कांटा खींचकर एहसान कर दे
तआर्रुफ = पहचान
कहा आसान है गिरकर निकलना
अदावत का कुआं गहरा बहोत है
अदावत = दुश्मनी
मुमकिन है दिलके साथ ख़यालात भी मिले
पहले मेरे क़दमसे क़दम तो मिलाइये
आ, कभी मेरा आइना बनकर
भूल बैठा हूं अपना चेहरा मैं
तुझे भूलूं तो शायद कह सकूंगा
मेरे ग़मका मदावा हो गया है
मदावा = इलाज
हम तो अपनी सादगीमें मस्त हैं
आप तो हर फ़नमें माहिर बन गये
सारे ग़म छोड दो घरसे बाहर
पांव जब शामको घरमें रक्खो़
हवाओंसे करते है अठखेलियां
ये पत्ते भी क्या गुल खिलाने लगे
क्या दिखाते हो आस जीनेकी
ज़र्द पत्ता हरा नही होता
एक सच्चाईके सिवा साग़र
दास्तानोंमें क्या नही होता
वसवसे फा़सला बढाते है
मैकदा दो क़दम नही होता
वसवसे = संभ्रम
अम्न कायम हो इसलिये साग़र
होती रहती है शोरिशे कितनी
त्यांचा ह्युमर बढिया होता, हे लक्षात आलेच असेल.
त्यांच्या एका गझलेने मला अगदी वेडे केले. त्यात ही विशेषकरून एका शेराने (तिसरा).
कौन उसके ग़मका अंदाजा़ करे
जो अंधेरे ओढकर रोया करे
भूक ही दुनियामें वो बाजा़र है
आदमी खुदका जहां सौदा करे
मौत इक दिन, साथ उसके आयेगी
साथमें जीनेका जो वादा करे
जिसको हो अपना मरज़ दिलसे अजी़ज़
कौन उस बीमारको अच्छा करे
अजून बरेच शेर आहे. त्याअगोदर एक किस्सा सांगतो. एका मुशाय-याला गेलो होतो त्यांच्यासोबत.
ते प्रमुख कवी असल्याने सगळ्यात शेवटी त्यांच्या गझला होत्या.
नेहमीप्रमाणे कार्यक्रम वेळेत सुरु झाला नाही. कार्यक्रमाला एक आमदार (बहुतेक उल्हासदादा पवार), जे गझलेचे आणि साग़रसाहेबांचे चाहते होते. इतका उशीर झाला की साग़रसाहेब माइक हातात आल्यावर म्हटले अगोदरच खूप उशीर झालाय मी एक गझल ऐकवून थांबतो. आमदार म्हटले की उशीर झालाय तर काय. मग कार्यक्रम ख-या अर्थाने रंगला. अनेक लोकांनी न सही लब ना खोलिये साहब, अपनी आखोसे बोलिये साहब
ची फर्माइश केली. येताना उशीर झाला असल्याने संगीता जोशी आणि अभिजीत जोशींनी आम्हाला साग़रसाहेबांच्या घरी सोडले.
अजून काही शेर देतो:
आवारा बना देंगे ये आवारा ख़यालात
इन खा़ना बदाशोंको बसा सोच समझकर
खा़ना बदोश = भटके हुए
हर वक्त तो हालात मुवाकिफ़ नही होते
अपनोंको हमेशा कभी परखा नही जाता
ठिठरी हुई तहजी़बकी लाशोंको जला दो
मिटते हुए खंडरोंको संवारा नही जाता
अंदाजे-बयां असावा तर असा:
पहली द्स्तक है, न खोलो अभी दरवाजे को
बेवफा दुनियाको कुछ देर खडी रहने दो
मुफसिली और वादा किसी यारका
खोटा सिक्का मिले जैसे खैरातमें
जि़क्र दुनिया का था आपको क्या हुआ
आप गुम हो गये किन ख़यालात में
जब एतमाद खत्म हुआ दो दिलोंके बीच
शकने जरासी बातको दीवार कर दिया
एतमाद = विश्वास
फि़क्र हो, ग़म हो, मुसीबत हो, के दिनभरकी थकन
छोटे बच्चे की हसी सबको भुला देती है
आप आते तो और क्या होता
कुछ कहा होता, कुछ सुना होता
अपने फ़नपारे बेचता हूं मैं
कौन मेरी दुकानपर रुकता
सारे दरवाजे़ बंद थे साग़र
मैं भला किस मकानपर रुकता
तुमको प्यारी खुशी, मुझको प्यारा है ग़म
अपना-अपना है, हुस्ने-नज़र दोस्तो
अजून एक किस्सा आहे. थोडक्यात सांगतो. मी त्यांच्या घरी पोहोचलो. घरी चहा घेऊन मग दुकानावर गेलो. काही कारणाने मी पहिल्यांदाच त्यांना चिडलेले पाहिले. माझ्यासमोर त्यांनी त्यांच्या लहान मुलाला (तोही चाळीसीतला असावा) रागावले. नंतर फार बोलत नव्हते. मी विचारले काहीतरी ऐकवा. ते म्हटले तूच ऐकव. मी ऐकवले. परत म्हटले ऐकवा. त्यांनी मला कबीर आणि सज्जन (कबीराचा मुलगा) ह्यांचे दोहे ऐकवले. जाताना परत म्हटलं आतातरी ऐकवा. मग त्यांनी जांनिसार अख्तरचा एक शेर ऐकवला. माझ्या जे यायचे होते ते लक्षात आले.
बरेच शेर देता येतील. विस्तारभयाने मोजकेच शेर देतोयः
जानके मोल ख़रीदा हमने
दिलके सौदेमें ख़सारा कब था
ख़सारा = नुकसान
भूल जाओ न खुशीमें ग़मको
शाम को याद सहरमें रक्खो
अर्से-नौ भाग रहा है साग़र
आसमां सर पे गिरा हो जैसे
अर्से-नौ = नवयुग
अगदी ते जाण्याच्या आठवड्याआधी आमची शेवटची भेट झाली.
शेवट त्यांच्याच एका समर्पक शेराने करतो.
किस जावियेसे आपने देखा ख़बर नही
साग़र से मैं मिला हूं, मेरे साथ आइये
साग़र से मै़ मिलाउं, मेरे साथ
साग़र से मै़ मिलाउं, मेरे साथ आइये<<< _/\_
अजून ऐकवा ना काही ...ऐकतच बसावं वाटतंय !
>> हमको प्यारी है आबरू
>> हमको प्यारी है आबरू ग़मकी
वा!
धन्यवाद, समीर.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर ,आवडले
सुंदर ,आवडले
सगळ्यांचे मनापासून
सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.
काही टायपोज होते, सुधारलेत. हे लक्षात आणून दिल्याबद्दल अनंतचे आभार.
अनेक दिवसांनी ये मैं हूं वाचताना बरेच चांगले शेर द्यायचे राहून गेले असे वाटत आहे.
अजून काही शेर टाकले आहेत.
धन्यवाद.
एका सुन्दर परिचयाबद्दल
एका सुन्दर परिचयाबद्दल धन्यवाद समीर. पुनःपुन्हा वाचनीय लिखाण. ये मै हूं मिळवेन आता![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त परीचय करून दिल्याबद्द्ल
मस्त परीचय करून दिल्याबद्द्ल धन्यवाद समीर.
शेरांमधला साधेपणा फार आवडला
हा लेख कसा काय वाचायचा राहिला
हा लेख कसा काय वाचायचा राहिला माहीत नाही.
उत्तम परिचय, जितके श्रेष्ठ शेर आहेत तितक्याच श्रेष्ठ भावुकपणे परिचय केलेला आहे. व्वा समीर!
एका दमात वाचता येत नहीयेत हे
एका दमात वाचता येत नहीयेत हे अफलातून शेर .
परिचय जबरी ,
धन्यवाद !
धन्यवाद मित्रांनो. आपले
धन्यवाद मित्रांनो.
आपले प्रतिसाद पाहून फार आनंद झाला.
सुंदर वाचनानुभव. आपलेपणाच्या
सुंदर वाचनानुभव. आपलेपणाच्या भावनेतून अधिकच निखरलेला परिचय .धन्यवाद समीर.
अप्रतिम परिचय समीर... अत्यंत
अप्रतिम परिचय समीर...
अत्यंत सरल साधे शेर असूनही दिलखेचक आहेत.
मस्त वाचनानुभव .धन्यवाद.
कैलासराव +१ पुन्हा वाचत आहे.
कैलासराव +१
पुन्हा वाचत आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फार सुंदर परिचय समीरजी .
फार सुंदर परिचय समीरजी .
अनेक शेर पुन्हा पुन्हा मनात घोळतायत .![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद .
मनापासून सगळ्यांचे आभार.
मनापासून सगळ्यांचे आभार.