नुकताच फेसबुकवर एक व्हिडिओ पाहिला: < विषयाच्या संवेदनशीलतेमुळे व्हिडिओची लींक काढुन टाकते आहे. कुणालाही घाबरवण्याचा हेतु नव्हता. सॉरी !!! >
स्त्री काय किंवा पुरुष काय, कोणाचेही मन हेलावेल असा व्हिडिओ बघुन मनाचा थरकाप झाला. लहान मुलांवर कोणी असे अत्याचार करु शकेल असं मन मानायला तयारच नव्हतं.
त्या व्हिडिओच्या कमेंट्स पाहिल्या. एखादी अनाथाश्रामतली घटना असेल, भारतातला व्हिडिओ नाहीये अशी काहीतरी मनाची समजुत घालुन कामावर लक्ष केंद्रीत केलं.
पण आज (थोड्या वेळापुर्वी) साम टिव्हीवर 'पुण्याची पुतना मावशी' या विशेष बातमीपत्रात पुन्हा तेच पाहिलं आणि राहावंलं नाही. पुण्यात ज्याला सांभाळण्यासाठी कामावर ठेवले त्या बाळाला (केवळ काही महिन्यांच्या/ वर्षाच्या) वाट्टेल तसे उचलुन आदळतांना/ त्या बाळाला मारझोड करतांना पाहिले. हाही प्रकार त्या घरात लावलेल्या सीसीटिव्ही कॅमेरात शूट झाल्यामुळे त्या बाळाच्या आईला कळला.
खरंच आपण कुठे चाललो आहोत असं वाटलं. अश्या बातम्या बघुन कोणत्या आईला आपलं बाळ कोणाकडे सांभाळायला द्यायची हिंमत होईल? असे अजुनही कितीतरी अत्याचार होत असतील आणि केवळ सीसीटिव्ही कॅमेरा नसल्याने कोणाच्या लक्षातही येत नसेल.
जी गोष्ट बाळांबाबत तिच गोष्ट आजारी/ बेडरीडन ज्ये. नागरीकांसोबतही घडत असेल असं मनात येऊन गेलं.
कोणाशीतरी बोलावंसं वाटतंय म्हणुन इथे लिहिलंय. नाही आवडलं तर इग्नोर करा.
अन बर्का इब्लिसा अन बेफिकीरा,
अन बर्का इब्लिसा अन बेफिकीरा, बायकान्च्या या प्रश्नात पुरुषान्नी नाक खुपसावेच कशाला असेही म्हण्तो ना मी! डोळा मारा
<<
हाण्ण तिच्यामारी!
लिंबाजीराव, त्या बीपीच्या धाग्यावर पन पर्तिसाद लिवा हो.
सगळ्या पोष्टी वाचल्या नाहीत.
सगळ्या पोष्टी वाचल्या नाहीत. पण लहान असताना आजी नेह्मी म्हणायची तू पाळणाघरच चालव.लोअकांचदिव्साअघेउन दिवसभर खेळवतेस. खरच विचार करायला हरकत नाही. कमीतकमी बाकीक्लोकांचे प्रॉबलेम तरीसुटतीळ्ल
आता त्यासाठी कोणी बॅकसीट
आता त्यासाठी कोणी बॅकसीट घ्यावी, कोणाला सासुसासर्यांचा सपोर्ट आहे, कोणी पाळणाघरात ठेवावे, कोणी घरी आया ठेवावी हे सगळे व्यक्तीसापेक्ष आहे.<<<
स्वाती आंबोळेंना दिलेल्या एक प्रतिसादात मी अतिशय स्पष्टपणे लिहिलेलं आहे की हा निर्णय जोडप्याने एकमताने घेतला तर तुमचे आमचे काय गेले? तेच तेच का परत लिहावे लागत आहे? निदान लोकांना हे तरी समजायला पाहिजे की आपल्या बाजूने कोण बोलतंय आणि विरुद्ध कोण बोलतंय!
>>>> अन बर्का इब्लिसा अन
>>>> अन बर्का इब्लिसा अन बेफिकीरा, बायकान्च्या या प्रश्नात पुरुषान्नी नाक खुपसावेच कशाला असेही म्हण्तो ना मी! डोळा मारा
कामवाल्या त्या बायाच, सासवा त्याही बायाच, अन सुना त्यादेखिल बायाच, फार फार तर अत्याधुनिक सुशिक्षीत ललना हव तर त्या कसल्याश्या कन्या म्हणूयात. मग त्यान्च्या वादात आपण का पडाव? नै का? >>>>
पुरुशांनी आपल्याला स्वतःला सांभाळून घेण्यासाठी, लाडावून घेण्यासाठी कुटुंबव्यवस्था निर्माण केली हे मी या माबोवरच वाचल. या सगळ्या वादग्रस्त बाया शेवटी ईतके वाद घालून सांभाळणार कोणाला तर वंशाच्या दिव्याला..!!
अग मग आपटू दे ना एखाद्या दिव्याला बीन बॅगेवर नाहितर पलंगावर...त्यांना हा प्रश्न बायकी वाटतोय, त्यांचा त्याच्याशी काहिच संबंध नाहिये असं वाटतय...मग का आपण बायकाच वाद घालतोय यावर...???
लिंबूटिंबूंनी ते विधान
लिंबूटिंबूंनी ते विधान गंभीरपणे केले आहे असे वाटणार्यांना मानाचा मुजरा! कृपया एवढा स्वीकाराच!
हा धागा मनोरंजन किंवा बाल
हा धागा मनोरंजन किंवा बाल विभागात आहे असे समजून बाष्कळ विधाने करणारे जहांपनाह तुस्सि ग्रेट हो...तोहफा कबुल करो....!!!!
इब्लिस याम्चा कामवालीसाठी
इब्लिस याम्चा कामवालीसाठी मोठा मोबदला(अंदाजे २००००+ भरयीय रुपये) द्यायची तयारी आहे का? हया प्रश्नाचे उत्तर कोणी देइल का?
मला वाटतय लोक १०००० च्या पुधे पैसे द्ययला नाही म्हणतील.(हा अंदाजच)
...
वेल ह्याचे कुथलेच मुद्दे मला तरी सरमिळ वाटले नाहीत.एक आजच्या कालातील भरतात राहनारी (स्त्रीवादाच्या कुठलाही आदर्शवादी कल्पना डोक्यात नसलेली)practical विचार करणारी ,मध्यमवर्गीय बाई जो विचार करु शकते तो त्यांनी मांडलेला आहे.
....
बाकी माझा स्पष्ट मत आहे की, स्त्री पुरुष दोघांनीही झेपत असेल तर लग्न करा /करीअर करा/मुले जन्माला घाला. म्हातार्या आइवदील, सासु सासर्र्यांना छळु नका.
..
वेल, तू सुचवले होतेस, तो
वेल, तू सुचवले होतेस, तो सल्ला नव्हता हे मान्य आहे. मी शब्द चुकीचा वापरला. सॉरी
इब्लिस, तुमचेही बरोबर आहे ! पेशन्स आणि आवड नसतानाही गरज म्हणून नोकरी करणारे कित्येक लोकं ह्या जगात आहेत म्हणून तर 'पाट्या टाकणे' असा वाक्प्रचार रुढ झाला. पण तरीही रोजगाराची संधी सुचवताना ( किंवा सल्ला देताना ) 'आवड आणि कल' हेच निकष आधी विचारात घ्यायला हवेत असे माझे मत आहे.
मी मोबदला देतो आहे ना? मग मी जन्माला घातलेली मुलं सांभाळायला मला उत्कृष्ट सेवा सुविधा मिळायलाच हव्यात! ही विचारप्रणाली अत्यंत भावली. >>> मोबदला कमी घेत असाल / घेत नसाल तर कशीही सेवा द्यावी असा अर्था माझ्या पोस्टमधून निघत असेल तर क्षमस्व. तसे अजिबातच म्हणायचे नव्हते !
माझा मुद्दा अकुने दुसर्या धाग्यावर अतिशय चांगल्या पद्धतीने मांडला आहे.
>>> उत्तम गुणवत्तेच्या पाळणाघरांची मागणी व संख्या जशी वाढेल तसे लो बजेट पाळणाघरांनाही किमान सोयी सुविधा तसेच रास्त सेवा देण्याचे प्रेशर निर्माण होईल. प्रोफेशनल लेवलने चालणार्या पाळणाघरांचे संचालक संघटन करून सरकारवर पाळणाघरांचे प्रमाणीकरण करण्यासाठी जागरूक पालकांच्या मदतीने दबाव आणू शकतात.
आय एस ओ प्रमाणीकरण येथेही करता येऊ शकते. <<<< हा तो मुद्दा. पाळणाघराचा व्यवसाय करताना पाळायच्या किमान प्रमाण गोष्टी पाळल्या गेल्या पाहिजेत हे अनिवार्य असायला हवे.
बालसंगोपनाचा व्यवसाय कमिटमेंट म्हणून घेतल्यावर काही बेसिक गोष्टी पाळल्या जायला हव्यात ( स्वच्छता आणि मुलांची सुरक्षितता ) हा मुद्दा आधीच्या पोस्टमध्ये मीही लिहिला होता.
सुपर्ब्ली फील्डेड! हॅट्स ऑफ
सुपर्ब्ली फील्डेड!
हॅट्स ऑफ
जस्ट आलेले ताजे व्हॉट्सॅप
जस्ट आलेले ताजे व्हॉट्सॅप फॉर्वर्डः
>>
नाशिक - रक्तबंबाळ अवस्थेतील गुन्हेगार, छिन्नविछिन्न मृतदेह, वाहनांखाली चिरडले गेलेले नागरिक, अपघातानंतर तडफडत असलेल्या व्यक्ती हे आणि अशा बीभत्स फोटोंना शेअर करून ‘व्हॉट्सअॅप’वर मरण ‘एन्जॉय’ करणा-या संवेदनाहीन युर्जसला यापुढे पोलिसी कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
तीन ते सात वर्षांपर्यंत कारावास माहिती व तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम 65 व 66 नुसार कोणत्याही व्यक्तीचे रक्तबंबाळ अवस्थेतील वा बीभत्स फोटो एकमेकांना पाठविण्यास मज्जाव करण्यात आला आहे. असे फोटो काढणारे
व ते पाठविणारे अशा दोघांवरही कायदेशीर कारवाई होऊ शकते. हे गुन्हे सिध्द झाल्यास संबंधिताला तीन ते सात वर्षांपर्यंत कारवासाची शिक्षादेखील होऊ शकते.
संदीप दिवाण, पोलिस उपायुक, नाशिक
<<
वर कुणीतरी पुन्हा त्या फेसबुक पेजची लिंक दिलेली दिसली, म्हणून हे इथे डकवले.
त्या अमेरिकास्थित यूजरने, वा अडचणीचे वाटत असल्यास मा. अॅडमिन यांनी योग्य कारवाई करून ती लिंक उडवावी ही विनंती.
अगो तुझे वरच्या पोस्टमधले
अगो तुझे वरच्या पोस्टमधले मुद्दे http://www.maayboli.com/node/46301 इथे पेस्ट करणार का? एकाच ठिकाणी सगळ्याचे संकलन होईल.
<<मला तर हेही सुचवायचे होते की शिकवण्या किंवा इतर काही बिझनेस पेक्षा तुमच्याकडे एखादी किंवा दोन खोल्या जर जास्त असतील तर पाळणाघर सुरू करावे आणि आपल्याला पाळणाघरात ज्या सोयी सुविधांची अपेक्षा आहे त्या आपणच इतरांना द्याव्यात.>>
ह्याकडे one of the options म्हणून पाहू शकतो एवढेच मी म्हणते आहे. मुळात मी असं कुठे म्हणतेय प्रत्येक बाईने किंवा कुटुंबाने मी म्हणते तेच केले पाहिजे? पंधरा वीस जणींपैकी एकीने जरी हा ऑप्शन ट्राय करायचे ठरवले तर अनेक पाळणाघरे मिळतील. त्यातून जर ती स्त्री सुशिक्षित आणी सुसंस्कृत असेल तर त्या ऑप्शनचा फायदा घेणार्यांना अधिक फायदा मिळेल. पाळणाघर चालवणे इतके कमीपणाचे का वाटावे? त्याच पाळणाघराकडून आपण मोठ्या मोठ्या अपेक्षा ठेवतो ना?
आणि मुद्द्यांची सरमिसळ तर होणारच. मुलांचे संगोपन - सुरक्षितता, आई वडिलांचे करियर, नाती ह्या सगळ्या एकमेकांशी सरमिसळ झालेल्याच गोष्टी आहेत. त्या वेगवेगळ्या काढता येतात का? मुलांची सुरक्षितता हा पैलू जर वेगळाच काढयचा तर मग आई वडिलांच्या वागण्यालाही नियम निकष हवेत कायदे हवेत. कारण अनेक ठिकाणी मुले आई वडिलांसोबतही सुरक्षित नसतात.
अॅव्हेलेबल रिसोर्सेसचा वापर करताना आई वडीलांनी करियर करावी किंवा मॉल मध्ये फिरायला जावे, काहीच संबंध नाहीये आणी मी तो लावतही नाहीये आणि असंही म्हणत नाहीये की आई वडिलांनी स्वतःकरता वेळ काढू नये.
माझा मुद्दा मुळात असंवेदनशीलतेबद्दलच आहे. अनेक ठिकाणी स्वतःच्या प्रायोरिटिजमध्ये आई वडिल असंवेदनशील झालेले दिसतात. त्याबद्दल मी बोलते आहे. आईवडिलांमध्येच संवेदनशीलता यावी हा माझा पहिला मुद्दा आहे. आई वडिलच मुळात असंवेदनशील असतील तर इतरांवर टिका करण्यात काय अर्थ आहे? केवळ आम्ही पैसे भरतो म्हणून मला बेस्टच मिळालं पाहिजे हा अॅटिट्युड ठेवताना मी निवडलय ते बेस्ट आहे का नाही हे कोणी तपासायचं?
काही वर्षापूर्वी एक बातमी आली होती पहिल्या मजल्यावरच्या पाळणाघराच्या गॅलरीच्या गजातून एक लहान मूल खाली पडले. आणि त्या पाळणाघर संचालिकेविरुद्ध गुन्हा दाखल केला. पाळणाघर संचालिकेची चूक नव्हती असे माझे म्हणणे अजिबात नाही पण आईवडिलांनी पुरेशी चौकशी पुरेशी तपासणी केली होती का? ह्यात आईवडिलांचा दोष नाही का? ते लांब लांब गज आईवडिलांच्या नजररेतून का निसटले? आता इथे आपण कायदा झाला पाहिजे असं म्हणूया पण किती जण ते कायदे पाळणार? किती जण ते कायदे पाळले जाणार का म्हणून तपासणी करणार. हे सगळे हवे तर त्या पाळणाघरांच्या फी वाढणार मग ज्यांना परवडत नाही ते अशा पाळणाघरा ऐवजी साधी पाळणाघरे निवडणार आणि मग पुन्हा काही अनवॉन्टेड इन्सिडन्ट झाले की सिस्टीमला कायद्यांना दोष द्यायला सगळे मोकळे.
त्या व्हिडियोतल्या बाईने ज्या बाईची निवड बेबी सीटर म्हणून केली आहे त्या पालकांनी त्या बाईला कामावर ठेवताना काय संवेदनशीलता दाखवली असेल?
मी हेच म्हणते आहे की लहान मुलांना सांभाळायला उत्तम सपोर्ट सिस्टिम घरात/ घराबाहेर आणि समाजात असावी. घराबाहेर असणे हे ज्या आई वडिलांकरता जास्त सोयीचे असू शकते त्यांना ती तशी मिळाली तर चांगलेच पण मिळत नसेल तर त्याकरता बाळाची सुरक्षितता धोक्यात घालण्याचा अधिकार आई वडिलांनाही नाहीये. आणि तशी वेळ येणार असेल तर वेळ पडल्यास शेवटचा ऑप्शन म्हणून एकाने आपल्या करियरला / नोकरीला थोडा वेळ बाजूला ठेवण्याचा विचार करावा.
जर आपल्या देशात तसे कायदे नाहीत तशा फॅसिलिटि नाहीत तर आपणच त्या फॅसिलिटि तयार करण्यात भाग का घेऊ नये? (अर्थात आवड असल्यासच. पण मी कधी हा विचार केलाय का मला ह्याची आवड आहे का नाही? आपणच त्या फॅसिलिटि तयार करण्यात भाग घेण्यात काय चुकीचे आहे? हे असे झाले - माझ्या गावात चांगले डॉक्टर नाहीत तर इतरांनी डॉक्टर बनावे, किंवा बाहेरून डॉ इथे यावेत. मी डॉ ला पैसे द्यायला तयार आहे पण मी माझ्या मुलाला आवड असली तरी डॉक्टर करणार नाही कारण मला हे माहितच नाही माझ्या मुलाला डॉक्टर व्हायचे आहे की नाही, आणि माहित असले तरी शिवाय डॉक्टर झाल्यावर रोग्यांच्या मध्ये राहावे लागते. फॅमिली लाईफची बर्याचशा प्रमाणात वाट लागते. वयाच्या सत्तावीस अठ्ठावीसाव्या वर्षापर्यंत फॅमिलीला सपोर्ट करण्याइतके इनकम नसते.. म्हणून शिवाजी बाजूच्या घरात जन्माला यावे माझ्या नाही.
ईब्लिस...असं खरच होइल का?
ईब्लिस...असं खरच होइल का?
मला एकदा पाण्यात बुडून मेलेल्या व्यक्तिचा भयाण फोटो कुणितरी पाठवला होता. डिलिट करण्यासठी फोन ला हात लावयची पण भिती वाटत होती. व्हॉट्सअॅप वरुन काढला तरी क्लीप्बोर्ड वर राहून गेला. आणि कधितरी अचानक समोर यायचा. भयंकर...
इब्लिस महोदयांना
इब्लिस महोदयांना अनुमोदन.....बरे झाले कायद्याचा बडगा आला अशा फोटोंविरुद्ध तो
माझा मुद्दा मुळात
माझा मुद्दा मुळात असंवेदनशीलतेबद्दलच आहे. अनेक ठिकाणी स्वतःच्या प्रायोरिटिजमध्ये आई वडिल असंवेदनशील झालेले दिसतात. त्याबद्दल मी बोलते आहे. आईवडिलांमध्येच संवेदनशीलता यावी हा माझा पहिला मुद्दा आहे. आई वडिलच मुळात असंवेदनशील असतील तर इतरांवर टिका करण्यात काय अर्थ आहे? केवळ आम्ही पैसे भरतो म्हणून मला बेस्टच मिळालं पाहिजे हा अॅटिट्युड ठेवताना मी निवडलय ते बेस्ट आहे का नाही हे कोणी तपासायचं? >>>>>> वर बर्याच जणांनी लिहिलय की तुमच्या पोस्ट्स वेल इंटेनशन्ड आहेत आणि तसंही मलाही वाटतय पण फक्त दर वेळी तुम्ही जनरलाईज करता हे जाणवल्याशिवाय राहत नाही. आता ह्या वरच्या पॅरॅग्रॅफ मध्येच बघा. मुळातच आई-वडिल ह्यांनी नोकरीला प्राधान्य देत मुलांना पाळणाघरात ठेवले म्हणजे ते असंवेदानशील आहेत हा निष्कर्ष काढलात. तुम्हाला आश्चर्य वाटतय की इतर लोकं तुमच्या "मुलांकरता जे काही सरवात चांगलं आहे ते निवडा" ह्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करत कोणीतरी नोकरी सोडून घरी बसणे ह्या मुद्द्याला धरुन का उत्तरं देत आहेत पण तसं होतय त्यामागचे कारण तुमचे मुलांकरता चांगले म्हणजे आई-वडिलांनी नोकरीबाबत केलेली तडजोड हे जनरलायजेशन आहे.
बरीच लोकं स्वतःची इच्छा म्हणून, स्वतःला मुलांचे बालपण अगदी भरपूर उपभोगता यावं म्हणून नोकरी वगैरे सोडतात पण मुलं घरी असलीकीच नीट त्यांचे पालनपोषण होऊ शकते हा विचार फक्त पुर्वीपासूनच्या सोशल कंडिशनिंगचा परिणाम आहे. हे कंडिशनिंग इतकं स्ट्राँग आहे की पुरुष तर पुरुष पण स्वतः बायकांना सुद्धा मुलांना पाळणाघरात ठेवायचं म्हंटलं की गिल्टी फिलींग येतं.
व्हिडीओ शेअर करण्याविषयी :
व्हिडीओ शेअर करण्याविषयी : सोशल मिडीयावर एकंदरीतच कसे वागावे याचे भान असले पाहीजे. संवेदनाशील कंटेंट शेअर केल्यास आणि तो मला पाहणे अवघड जात असल्यास मी फेसबूकवर निषेध व्यक्त करून रिपोर्ट करू शकते. मला नक्की प्रमाण माहीत नाही, पण एकाहून अधिक रिपोर्ट गेल्यास फेसबूक टिम त्या सदस्याच्या अकाऊंटवर एक वॉर्नींग मेसेज पाठवते. तिसर्या वार्निंगनंतर तुमचे सदस्यत्व रद्द होते.
बर्याच वृत्तपत्रां मध्येही हल्ली खप वाढवण्यासाठी आणि अटेंशन मिळवण्यासाठी असे संवेदनाशील फोटोज बातमीसोबत छापलेले असतात. जर कायदा आला आणि अंमलात आणला गेला तर ज्यांना हे संवेदनाशील कंटेंट पाहायचे नाही त्यांना यापासून सुटका मिळेल. आणि ते शेअर करण्याच्या बेजबाबदार वर्तनालाही आळा बसेल.
वल्लरी या धाग्यावर शेअर केलेल्या व्हिडीओ विषयी म्हणत असशील तर ती त्या बाळाची मनोरूग्ण आई होती अशी माहीती वाचल्यासारखी आठवतेय.
आणि पुण्यातील बातमीविषयी म्हणत असशील तर त्या ब्युरोमधून ती आया आली होती आणि बाळाच्या वडीलांच्या मुलाखतीनुसार तिचे वर्तन नेहमी अतिशय चांगले होते. ते रोज आल्यावर पूर्ण फूटेज चेक करत. व्हिडीओच्या व त्याआधीच्या एक दोन दिवस तसे आढळले.
प्रायोरिटी देण्याबाबत : कुठलाही निर्णय घेताना तुमच्याकडे पॉसिबीलीटीज आणि त्यानुसार फायदे तोटे असतात. आपल्याला त्यातल्या त्यात त्या क्षणी कसल महत्व वाटते, त्या निर्णयाचा आपल्यावर, आपल्या कुटुंबियांवर आणि एकंदरीत भविष्यावर काय व किती दूरगामी परीणाम होऊ शकतो, आपण कुठल्या गोष्टींबाबत काय आणि किती तडजोड करू शकतो हे आपल्या जोडीदारासोबत आणि शक्य असल्यास गरज वाटल्यास घरातील ज्येष्ठांसोबत सल्लामसलत करून पुढील निर्णय घेणे व त्यानुसार मग तो शेवटपर्यंत पाळणे महत्वाचे. मुलाचे संगोपन की नोकरी या गोष्टींमध्ये प्रायोरिटी स्पष्ट असली तरी या दोन गोष्टी स्वतंत्र गरजा असतात हे मान्य करणेही तितकेच महत्वाचे.
त्यासाठी बर्याच स्त्रीयांची घालमेल होते व ती अपरिहार्य असते. त्यातल्या त्यात आपल्याला शक्य तेवढी तडजोड दोन्ही जोडीदार करतातच. आता राहीला प्रश्न नोकरी करणार्या दांपत्याच्या अपत्याला सांभाळण्यासाठी उपलब्ध असलेल्या पर्यायांचा, तर त्यात जवळ असणे, आजूबाजूची वस्ती, स्वच्छता, सुरक्षितता आणि बालकाच्या एकंदरीतच शारीरीक मानसिक आणि व्यक्तीमत्वावर तिथल्या वातावरणाचे होणारे परीणाम याबाबत तडजोड मुळीच नको.
पाळणाघर असो, घराचा शाळेचा परीसर असो, शाळेत ने आण करणारी वाहतूक सुविधा असो बालकाची सुरक्षितता वारंवार तपासून पाहणे, त्यात जरा जरी शंका आल्यास त्या शंकेची सत्यासत्यता पडताळून पाहणे इतकी सतर्कता तर प्रत्येक पालकांनी दाखवायला हवी.
बाकी सविस्तर नवीन धाग्यावर मांडले आहेच.
ईब्लिस, लिंटी वगैरे, तुमचे
ईब्लिस, लिंटी वगैरे, तुमचे विचार भयानक आहेत.
<< पण, अमेरिकास्थित लोकांनी
<<
पण, अमेरिकास्थित लोकांनी कळकळीने दिलेल्या चांगल्या व अगदी आयडियल सूचना वाचल्यानंतर, अशा सुविधा तयार करून वापरायच्या असतील, तर भारतातील लोकांनी किती पैसे मोजायची तयारी ठेवली पाहिजे? हा हिशोब डोक्यात आल्याशिवाय राहिला नाही. म्हणून हा टंकनप्रपंच करतो आहे.
>>
इब्लिस, सुचना नसून तथ्य आहे म्हणून लिहिले. तुम्हाला अमेरिकास्थितांबद्दल प्रॉब्लेम आहे का? व्हिसा वगरे रिजेक्ट झाला होता का?
>> ईब्लिस: वर कुणीतरी पुन्हा
>> ईब्लिस: वर कुणीतरी पुन्हा त्या फेसबुक पेजची लिंक दिलेली दिसली, म्हणून हे इथे डकवले.
त्या अमेरिकास्थित यूजरने, वा अडचणीचे वाटत असल्यास मा. अॅडमिन यांनी योग्य कारवाई करून ती लिंक उडवावी ही विनंती.
त्या लिंकमधला व्हिडीओ हा 'रक्तबंबाळ अवस्थेतील गुन्हेगार, छिन्नविछिन्न मृतदेह, वाहनांखाली चिरडले गेलेले नागरिक, अपघातानंतर तडफडत असलेल्या व्यक्ती' या कॅटॅगरीत येत नाही. तसेच मला वाटत नाही की माबो वर कुणीही हा व्हिडीओ एंजॉय करु शकेल.
नानबा, विचार भयानक आहेत
नानबा,
विचार भयानक आहेत म्हणजे काय?
*
सुलु,
प्रश्न व्यवस्थित विचारला होता. की अशी सुविधा निर्माण करायची तर किती खर्च करायची तयारी ठेवली पाहिजे. उत्तर येत नसेल तर प्रॉब्लेम तुमचा आहे. माझा नाही. मी माझ्या परिने उत्तर शोधून तिथेच लिहिले आहे.
अन हो, अमेरिकन सरकारने व्हिसा देण्यासाठी तुमची नेमणूक केल्याबद्दल अभिनंदन
*
नेत्रेश,
विकृत गोष्टी पहाव्या लागण्याचे माझे प्रोफेशन आहे. तुम्ही डकवलेल्या लिंकेने मला काडीचा फरक पडत नाही. लीगॅलिटीज मधे माबोला त्रास होऊ नये अशी इच्छा आहे, इतकेच.
>>माझा मुद्दा मुळात
>>माझा मुद्दा मुळात असंवेदनशीलतेबद्दलच आहे. अनेक ठिकाणी स्वतःच्या प्रायोरिटिजमध्ये आई वडिल असंवेदनशील झालेले दिसतात. त्याबद्दल मी बोलते आहे. >>
वेल, मुळात पालक असेंवेदनशील हे गृहितकच पटत नाही. म्हणजे अपवादात्मक परीस्थिती सोडल्यास पालक जे काही उपलब्ध पर्याय आहेत त्यातून त्यातल्या त्यात चांगला पर्याय स्विकारतात. तू वर जे गॅलरीचे उदाहरण दिले आहेस त्याच कारणासाठी माझा प्रमाणीकरणासाठी आग्रह आहे. घरगुती पाळणाघरात बरेचदा तिथल्या मावशी प्रेमाने मुलांचे करतात तरीही अनावधानाने, अज्ञानातून तू म्हटल्याप्रमाणे अपघात घडू शकतात. गॅलरीला गज आहेत पण त्यातले अंतर जास्त होते. आईवडिलांनी त्या कडे लक्ष द्यायला हवे हा एक दृष्टीकोन, लहान मूल अशा ठिकाणी मोठ्यामाणसांच्या देखरेखीशिवाय होते हा दुसरा दृष्टीकोन. पण गॅलरी असेल तर तिला अमुक प्रकारची ग्रील हवी हा मुद्दा उरतोच- ज्या मुळे ही घटना टळली असती. साधे सुरक्षिततेचे, स्वच्छतेचे नियम असतील तर ते पालक आणि चालक या दोघांनाही सोईचे जाईल. नियमच नाही म्हटल्यावर जे उपलब्ध आहे ते नाईलाजाने स्विकारल्याशिवाय पालकांकडेही बरेचदा दुसरा पर्याय उरत नाही.
इब्लिस,
तुम्ही खर्चाविषयी विचारलेत. लिव इन नॅनी/दिवसभरासाठी नॅनी हा पर्याय अमेरीकेतही उच्च उत्पन्न गटातील पालकांनाच परवडतो. आमचे गाव लहान आहे आणि गरीबही आहे(२०% लोकं फूड इंसिक्युअर). घरगुती पाळणाघर, चर्चचे पाळणाघर,फ्रांचाईज पाळणाघर हे पर्याय आहेत. बरेचजण घरगुती पाळणाघर हा पर्याय घेतात. या सगळ्याच पाळाणाघरांना साधे स्वच्छतेचे, सुरक्षिततेचे नियम आहेत. यासाठी पैसे जास्त लागतात का? तर नाही. एका पाळणाघरात उपलब्ध जागेनुसार, मनुष्यबळानुसार किती मुले, त्यात जास्तीतजास्त किती मुले एक वर्षाच्या आतली, मुले बाहेर आवारात खेळत असताना कुणीतरी त्यांच्या सोबत असणे, जीना असेल तर त्याला गेट, वापरात नसलेली इलेक्ट्रीक आउटलेट कव्हर केलेली, वगैरे चाईल्ड प्रुफ सोई असे साधे नियम पाळल्याने खर्च वाढत नाही. तसेही भारतात दर काही कमी नाहियेत. पण प्रमाणिकरण नसल्याने जे मिळेल ते पर्याय नाइलाजाने स्विकारावे लागतात. त्यात खरेतर मर्यादित उत्पन्न असलेल्यांनाच जास्त त्रास होतो. सुस्पष्ट नियमावाली सगळ्यांनाच असेल तर त्याप्रंमाणे सुरक्षित पाळ्णाघरे उपलब्ध होतील. अगदी वरवर चकाचक पाळणाघर देखील सुरक्षित असेलच असे नाही. गेल्या महिन्यात आमच्या इथल्या फ्रांचाईज पाळणाघराला प्रोबेशन नोटिस मिळाली. ज्या नियमांची पूर्तता झाली नाही ते पूर्ण करायला मुदत दिली गेली, पालकांना व्यवस्थित माहिती दिली गेली. त्यात डायपर बदलल्यावर हात स्वच्छ न धुणे पासून मुलांना स्कूलबस स्टॉपवर एकटे उभे राहू देणे पर्यंत बरेच नियमभंग होते. माझ्या सबडिविजनमधे ३ घरगुती पाळणाघरे आहेत. सर्व नियम पाळून चालवली जातात. मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आणि हेल्थकेअर ही उत्पन्नाचे स्त्रोत. साहाजिकच शिफ्टच्या नोकर्या असल्याने इथे तीन शिफ्टमधेही बरीच पाळाणाघरे चालतात. तासावारी काम करणार्या या लोकांना एकाने नोकरी सोडायची चैन परवडणारी नाही. अशावेळी सर्व नियम पाळून आजीबाईंनी चालवलेले सुरक्षित, साधे, घरगुती पाळणाघर पालकांना दिलासा देते.
स्वाती२ - मान्य..
स्वाती२ - मान्य..
स्वाती२, पोस्ट
स्वाती२, पोस्ट आवडली.
पाश्चात्य देशांत औद्योगिकरणाबरोबरच पूर्णवेळ नोकरी करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना सांभाळण्यासाठी सोयी सुविधा निर्माण झाल्या व यथावकाश तिथे प्रमाणीकरणही झाले. अशाच प्रमाणित सोयी, सुरक्षित वातावरण व मुलांच्या हिताकडे लक्ष देणारी पाळणाघरे भारतातही मोठ्या प्रमाणात चालू झाल्यास पालक व पाल्यांना तो चांगला दिलासा ठरेल.
इब्लिसांनी नॅनी मोबदल्याबद्दल
इब्लिसांनी नॅनी मोबदल्याबद्दल विचारलं पण त्यांनीच त्यांच्या पोस्टमध्ये आकडा दिलाय की ($२७००,२८०० वगैरे) आणि साधारण तेवढाच खर्च आहे. लिव्ह इन, लिव्ह आऊट प्रमाणे हा आकडा बदलू शकते. २५००-३००० महिन्याचे हा लिव्ह इन आकडा आहे.
स्वाती२, तुम्ही किती छान
स्वाती२, तुम्ही किती छान लिहिता - अतिशय संयत आणि सकारात्मक. तुम्ही म्हणालात तसे - काही अपवाद सोडता, पालक समोर असलेल्या पर्यायामधुन चांगल्यातला चांगला पर्याय निवडतात. साधारणपणे जाणुनबुजुन कोणी पालक मुलांना असुरक्शीत वातावरणात ठेवत नाही. सुरुवातीला काही गोश्टी लक्शात आल्या नाहीत तरी जेव्हा त्यांना अशा गोश्टी समजतात तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्श न करता नक्कीच काहितरी उपाय करत असतील किंवा आपल्या निर्णयाचा फेरविचार करत असतील.
हा, पण ही सर्व चर्चा वाचुन/video बघुन पालकांना मुलांचे पाळणाघर्/आया निवडताना काय निकश लावावे ह्या बद्दल नक्किच मार्गदर्शन होईल. आणि पालकांमधे या बाबतीत जागरुतता आली की "जशी मागणी तसा पुरवठा" याप्रमाणे पाळणाघरे/आया सुद्धा नियम पाळायला आणि प्रशिक्शण घ्यायला बान्धिल होतील. हा सर्व बदल व्हायला वेळ नक्किच लागेल, पण हळुहळु सुरुवात होतीये हेही चांगलेच आहे.
स्वाती२, तुम्ही किती छान
स्वाती२, तुम्ही किती छान लिहिता - अतिशय संयत आणि सकारात्मक. <<<
+100
स्वाती२, तुम्ही किती छान
स्वाती२, तुम्ही किती छान लिहिता - अतिशय संयत आणि सकारात्मक
>>>
+11111111111111111111
Always
मुळात पाळणाघरात सुरक्षेबद्दल,
मुळात पाळणाघरात सुरक्षेबद्दल, स्वच्छता, वर्तनाबद्दल काय निकष आहेत, असावेत ह्याबद्दल कितीतरी नव-पालकांना माहित नसते आणि माहिती करून घ्यायची इच्छाही नसते असेही माझ्या पाहण्यात आले आहे. आणि हे पालकही सुशिक्षित वर्गातले, इंटरनेट जमान्यातले आहेत.
त्यांच्याकडे घरातही चाइल्ड फ्रेंडली फर्निचर, दरवाजे, इलेक्ट्रिक पॉइन्ट्स कव्हर करणे, बाल्कनीचे गज किंवा खिडक्यांची ग्रील्स सुरक्षित असणे, न गंजलेली फिक्सचर्स असणे इत्यादी इत्यादी अनेक गोष्टींची काळजी घेतली जात नाही. त्यांना स्वतःलाही आपल्या मुलासाठी अशी सुरक्षा अपेक्षित नसते. 'मूल पडलं - धडपडलं तर पडू देत, पडत पडत, आपटतच ते शिकणार' असे म्हणत संभाव्य धोक्यांकडे दुर्लक्ष करायची मानसिकता दिसते. मुलांच्या हाताला येईल अशा ठिकाणी टूलबॉक्स, कात्र्या, विळ्या, इलेक्ट्रिक उपकरणे इ. इ. ठेवणे - घरात फर्निचरचे कोपरे किंवा मटेरियल धारदार / इजा होणारे असणे, गंजलेल्या - टोकदार गोष्टी मुलांच्या हाती येतील अशा तर्हेने अवतीभवती असणे, मुलांचा घरात - घराबाहेर कोणाच्याही देखरेखीविना वावर, बिल्डिंगमधल्या लिफ्टमध्ये लहान मुलांनी खेळणे, बाल्कनी / टेरेस इ. रेलिंग्जवरून खाली वाकणे, सोसायटी / इमारतीच्या गेटमधून बाहेर सुसाट सुटणे, पार्किंग लॉटमधील वाहनांशी विनादेखरेख खेळणे, फ्यूज बॉक्स - वायरी इत्यादींच्या जवळपास विनादेखरेख खेळणे इ. इ. गोष्टींची भली मोठी यादी होईल. जर त्यांना या गोष्टीची जाणीव करून दिली तर 'आम्ही अशाच प्रकारे वाढलो, आम्हाला काही नाही झाले, आमची मुलेही अशीच वाढतील' असाही दृष्टिकोन असतो. आता हे गुड पेरन्टिंग आहे की बॅड पेरन्टिंग ह्याबद्दल मी सांगू शकत नाही.
तर अशा मुलांना जर पाळणाघरात किंवा अन्य ठिकाणी ठेवायचे झाले तर तिथे ते ठिकाण / माणसे निवडताना काय निकष ठेवले पाहिजेत याबद्दल अवेअरनेस नसेल तर तो आणला जाणेही महत्त्वाचे आहे.
(अशा प्रकारच्या व्हिडिओज दाखवून किंवा शेअर करून तो अवेअरनेस येत नाही, फक्त भीती वाढीस लागते हे मा वै म)
विषय निघाला म्हणून... मूल
विषय निघाला म्हणून... मूल रांगतं की चालतं झालं की अमेरिकेत (इतर देशातलं माहित नाही म्हणून फक्त तिथे) घर चाइल्ड प्रूफ करून घेतात. त्याच्या ठराविक गाइडलाइन्स असतात. ते जर कुणी इथे कारणांसहीत टाकलं तर निदान काय काय पद्धतीने काळजी घ्यायला हवी हे अनेक पालकांना समजेल.
पाळणाघराशी संबंधित नाही पण
पाळणाघराशी संबंधित नाही पण सुरक्षितते वरून विषय निघाला म्हणून सांगते, दिवाळीत फटाके उडविताना १०/ १२ वर्षाची आडनिड्या वयातली मुले त्यांच्या आईवडिलांच्या देखरेखी शिवाय काय वाट्टेल ते साहसी उद्योग करत असतात. बघूनही थरकाप होतो जिवाचा. फटाके म्हणजे सा़क्षात आगीशी खेळ पण काही पालक बिनधास्त असतात.
भारतात लहान मुलांच्या
भारतात लहान मुलांच्या सुरक्षिततेचे सर्व निकष मध्यमवर्गीयांना देखिल पाळणे जवळ जवळ अशक्य आहे. एकच उदा. बघा. इथल्या पुण्यामुंबईच्या उच्च मध्यमवर्गीय पालकांना तरी ते १०० % पाळणे शक्य आहे का ?
पाच वर्षाच्या आतला मुलाला दुचाकीवरून मागे अथवा पुढे बसवून गर्दीतून घेऊन जाऊ नये. ( मलातरी हे अतिशय असुरक्षित वाटते )
उच्च मध्यमवर्गीयांना तरी जमेल का हे ? दुचाकी एवेजी रीक्षा / बस असे पर्याय आहेत तरी मुले , अगदी लहान बाळे सुद्धा दुचाकीवर दिसतातच.
अमेरिकेत मूल कारमधे बॅक सीट वर आणि बेबीकार सीट मधेच बसलेले लागते. इथे बाईक चे काय नियम आहेत कल्पना नाही पण बाईक वर कधीही मूल पाहिले नाही.
Pages