आमच्या घरात पेपर वाचून झाल्यावर जागेवर ठेवण्यावरून नेहमी वादावादी होते. एके दिवशी नेटवर हा बॉक्स पाहिला. लगेच पसरलेले पेपर गोळा करून ५-६ बॉक्सेस बनवले. आता ह्यांचा उपयोग रद्दी, लेकाने गोळा केलेला त्याचा खजिना, खेळणी, लॉन्डी बॅग अश्या वाटेल त्या गोष्टी ठेवण्यासाठी होतो आहे.
साहित्य :-
वर्तमानपत्र
गोंद
बोन फोल्डर किंवा स्टिलची पट्टी
प्रथम वर्तमानपत्राची सगळी पानं वेगवेगळी करा. एक पान घेऊन त्याच्या ३ दा अशाप्रकारे घड्या घाला की साधारण १ १/२ - २ " ची पट्टी तयार होईल. प्रत्येक घडी घालतांना त्या घडीवरून बोन फोल्डर किंवा स्टिलची पट्टी जोर लावून फिरवा. ह्याने घडी नीट बसेल. ही पायरी पुढच्या कृतीसाठी आवश्यक आहे. मी अश्या १८ पट्ट्या वापरल्या आहेत. आकार लहान किंवा मोठा हवा असेल त्याप्रमाणे कमी किंवा जास्त पट्ट्या लागतील.
चार पट्ट्या घेऊन त्या एकमिकांत खाली दाखवल्याप्रमाणे विणा.
दोन पट्ट्या जिथे एकावर एक येतील तिथे-तिथे गोंद लावा.
नंतर दोन्ही बाजूंना आणखी २-२ पट्ट्या विणून घ्या.
परत दोन्ही बाजूंना आणखी २-२ पट्ट्या विणून घ्या. खाली अशी चटई तयार होईल.
आता चारही बाजूंच्या मोकळ्या पट्ट्या फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे आत दुमडून बोन फोल्डरने घड्या घाला.
खाली जशी चटई विणली तशीच आता चार उभ्या बाजूंना विणायची आहे. थोडं कठिण आहे. पण करून पहिल्यावर जमेल.
आता तयार बॉक्सला वरून रंगीत कागद, रिबीन, लेस, कपडाची पट्टी लावून सजवा. यामुळे त्याला आणखी मजबुती येईल.
रिकामपणाचे उद्योग १ - छोटुली गिफ्ट पर्स http://www.maayboli.com/node/35183
रिकामपणाचे उद्योग - २ सरप्राईज बॉक्स http://www.maayboli.com/node/35668
रिकामपणाचे उद्योग - ४ पेपर ज्वेलरी (मॅगझीन मधिल पाने वापरुन) http://www.maayboli.com/node/35779
नियतकाल
विशाल कुलकर्णी, तुमच्याकडेही
विशाल कुलकर्णी,

तुमच्याकडेही आमच्यासारखीच परिस्थिती आहे तर. मग हा खोका बनवुन बायकोला खुष करा.
दक्षिणा,
कसच क्स्च..........
पण ही माझी कल्पना नाहीये. नेटवर फोटो पाहिला होता.
रुणुझुणू,
एकदा करून बघ..एकदम सोप्पा आहे.
. . . रंगीत
.
.
.
रंगीत तालीम.................
उदयन रंगित तालीम ऑफिसमधेच
उदयन रंगित तालीम ऑफिसमधेच केलेली दिसतेय

खोके मस्तच आहे
उदयन, वा वा क्या बात है ! ४
उदयन,
वा वा क्या बात है ! ४ बाय ४ पट्ट्यांचा छान जमलाय.
चला, आता ज्यांनी करून बघणार म्हणलय त्यांनी फोटो टाका बरं.
काम नव्हते आज...........मग
काम नव्हते आज...........मग टिपी काही तरी करायचा होता
मस्त दिसतोय. पण करायला कठीण
मस्त दिसतोय. पण करायला कठीण वाटतोय.
मस्तच आहे हा बॉक्स..
मस्तच आहे हा बॉक्स..
फुलपाखरू, करुन बघा, सोप्पा
फुलपाखरू,
करुन बघा, सोप्पा आहे. उदयन ह्यांनी पण केलेला पहा.
भारी आयडिया........ चांगलीच
भारी आयडिया........ चांगलीच इनोव्हेटिव्ह........
मी केलेला बॉक्स - हा छोटा
मी केलेला बॉक्स -
हा छोटा एवढा खास नाही झालायं
-

प्राजक्ता, अगं छान झालाय की.
प्राजक्ता,
अगं छान झालाय की. आतली चटई मस्त झालीये. फक्त उभ्या पट्ट्या घट्ट ताणून विणायला हव्या होत्या म्हणजे उभी बाजू नीट ताठ राहिली असती.
रचनाशिल्प , खूप मस्त. too
रचनाशिल्प , खूप मस्त. too creative... thanks for sharing the steps.... नक्कि करुन बघणार ...
रचनाशिल्प, वरच्या पट्ट्या
रचनाशिल्प,
वरच्या पट्ट्या विणतानाचा तुम्हाला जमेल तेव्हा फोटोज टाकणार का प्लीज ?
मस्त..करुन पाहिला पाहिजे..
मस्त..करुन पाहिला पाहिजे..
रचना मुंबईत ये आणि क्लास घे
रचना मुंबईत ये आणि क्लास घे ग. मी लेकाला घेऊन येते क्लासला,
Pages