Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 20 January, 2014 - 22:13
गझलेतील प्रत्येक शेर दणकेबाज किंवा उत्तम होतोच असे नाही... मात्र बर्याचदा गझलेतला एखादा किंवा दुसरा शेर मनात रुंजी घालून रहातो. असे हासिल-ए-गझल शेर त्या गझलकाराच्या नावासहित इथे शेअर करु या. किंवा कित्येकदा आपण एखादा शेर लिहून जातो..पुढे त्याची गझल होत नाही असे फुटकळ शेर इथे शेअर करु या.
सर्व शेर प्रतिसादात लिहावेत ही विनंती.
--डॉ.कैलास गायकवाड.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गाली गुलाब दोन्ही मी फूल काय
गाली गुलाब दोन्ही मी फूल काय द्यावे . .<<< वा, मस्त ओळ आहे.
स्वप्नांना पण तुटण्याचा
स्वप्नांना पण तुटण्याचा अधिकार’ असावा ,
व्हावा वार ‘एकवार’ पण ‘हळुवार’ असावा ...!”
अलका डी भोसले ( स्वप्न वेडी )
मी गझल रंग ची नियमित श्रोता
मी गझल रंग ची नियमित श्रोता आहे .आणि सुरेश भटांच्या गझलांची दिवानी ..गझल रंग चे अण्णा ( शाहीर सुरेशकुमार वैराळकर ) हे माझे गझल वेड पाहून प्रतेक कार्यक्रमाची माझी चीअर रिझर्व्ह करून ठेवतात ...गझलांनी अक्षरशः मला वेड लावलं आहे ...अजून मी स्वत : मात्रात बसणारी गझल केली नाही पण ते खूप अवघड असत याची जाणीव आहे मला ...गझल करणाऱ्या व्यक्तीने प्रथम खूप चांगल्या कविता कारण गरजेच आहे त्यामुळे सध्या fb वर कविता करते ...आणि आता मायबोलिकर बनून आपल्यात सामील आहे ...!
मात्रात बसणारी गझल केली नाही
मात्रात बसणारी गझल केली नाही पण ते खूप अवघड असत<<<अलकाजी तसं काही नसतं !! आणि हेही खरच की केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहिजे !!!
गझल करणाऱ्या व्यक्तीने प्रथम खूप चांगल्या कविता कारण गरजेच आहे<<< लो़क मानतात पण मला वाटते की हे अपरिहार्य नसेल म्हणून
असो
तुम्हाला आणि तुमच्या गझलेला शुभेच्छा
............................
............................
काही नवे शेर व्यर्थ घालवू नका
काही नवे शेर
व्यर्थ घालवू नका संपदा मला जगविण्यासाठी
इच्छा मेल्यावर काहीही उपाय चालत नसतो
कोण जाणे कोणत्या भाषेत मी रेखाटतो
एकदाही जात नाही ह्या मनीचे त्या मनी
सिद्धी आणि प्रसिद्धी मोठ्या कजाग सवती
दोघीही पाहिजेत म्हणजे फरफट निश्चित
प्रयाणाचा दिवस जाहीर कर निश्चिंत हो
तुझ्यादेखत तुझ्या सार्या खुणा आम्ही पुसू
आणखी खोदायचे आता तरी सोडून दे तू
जेवढे पाणी हवे त्याहून जास्ती घाम गेला
-विजय दिनकर पाटील
-----------------------------------------------------
ब्लॉगवर पूर्वप्रकाशित http://bocharewaare.blogspot.in
कोण जाणे कोणत्या भाषेत मी
कोण जाणे कोणत्या भाषेत मी रेखाटतो
एकदाही जात नाही ह्या मनीचे त्या मनी
सिद्धी आणि प्रसिद्धी मोठ्या कजाग सवती
दोघीही पाहिजेत म्हणजे फरफट निश्चित
प्रयाणाचा दिवस जाहीर कर निश्चिंत हो
तुझ्यादेखत तुझ्या सार्या खुणा आम्ही पुसू
आणखी खोदायचे आता तरी सोडून दे तू
जेवढे पाणी हवे त्याहून जास्ती घाम गेला<<<
व्वा व्वा!
अजून येऊदेत!
कणखरजी पाचही नवीन शेर खूप
कणखरजी पाचही नवीन शेर खूप आवडले
धन्यवाद बेफि आणि वैभव!
धन्यवाद बेफि आणि वैभव!
विजयजी, सगळेच शेर
विजयजी, सगळेच शेर भारी
धन्यवाद सर
सुंदर शेर कणखरजी.
सुंदर शेर कणखरजी.
जयदीप व कैलासराव आभार. नवा
जयदीप व कैलासराव आभार.
नवा शेर
थांबायचे कोणी कुणासाठी कशाला
आपापला उद्योग प्रत्येकास आहे
-------------------------------------------------------
पूर्वप्रकाशित http://bocharewaare.blogspot.in/2014/04/blog-post_7028.html
थोडे हळूच बोला भिंतीस कान
थोडे हळूच बोला भिंतीस कान आहे
थोडे जपून डोला कुलपास छिद्र आहे
पुष्पे काही देउन हाती कौतुक
पुष्पे काही देउन हाती कौतुक केले त्यांनी माझे
टोचत होते काटे काही भान न सुटले तरिही माझे
सोडुया आता सुखांचा नाद
सोडुया आता सुखांचा नाद आपण
वेदनेवर चांगले संस्कार करुया .
नि:शब्द (देव)
चैनीत साथ देण्या कोठून कोण
चैनीत साथ देण्या कोठून कोण जमती
दुःखात सोबतीला वाली कुणी न उरती
>वेदनेवर चांगले संस्कार करुया
>वेदनेवर चांगले संस्कार करुया .
वा ! कल्पना चांगली आहे.
वाह..सुंदर
वाह..सुंदर धागा..कैलाससर..
थांबव आता डोळ्यामधल्या तरल मिठाला..
संसाराची भाजी अवघी खारट झाली..!
-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
सगळेच शेर आवडलेत विदिपा ...
सगळेच शेर आवडलेत विदिपा ...:)
अनोळखी होऊन तुला मी हल्ली
अनोळखी होऊन तुला मी हल्ली वाचत असतो
तू नावडण्याची कुठलीही सबब सापडत नाही
- नचिकेत जोशी
व्वा
व्वा
नवा शेर कधी ठरवतो थांबू आपण
नवा शेर
कधी ठरवतो थांबू आपण थांबुन पाहू
कुठे कुठे थांबावे ठाकुन यक्षप्रश्न हा
समीर चव्हाण
मस्त शेर समीर एक नवा
मस्त शेर समीर
एक नवा शेर
जायचे आहे उभे राहून जर
कोणताही क्लास का चालू नये
विजय दिनकर पाटील
जायचे आहे उभे राहून
जायचे आहे उभे राहून जर
कोणताही क्लास का चालू नये>>>क्या बात है .....
भूतकाळाला उजाळे देत
भूतकाळाला उजाळे देत असता
वर्तमानालाच चटके बसत गेले
--सुशांत
विजय आणि सुशांतः दोन्ही शेर
विजय आणि सुशांतः दोन्ही शेर आवडले.
आयुष्याला असे पाहिले तसे
आयुष्याला असे पाहिले तसे पाहिले
बोलतोस तू आयुष्याने जसे पाहिले
आयुष्याला फुरसत नव्हती नावालाही
आयुष्याने कोणाला फारसे पाहिले
आयुष्याला फुरसत नव्हती
आयुष्याला फुरसत नव्हती नावालाही
आयुष्याने कोणाला फारसे पाहिले<<< सुंदर!
मने गुंतवू ठरावीकश्या
मने गुंतवू ठरावीकश्या मुदतीसाठी
वर्षानंतर व्याजाचा दर बदलत नसतो
-सुप्रिया.
मने गुंतवू ठरावीकश्या
मने गुंतवू ठरावीकश्या मुदतीसाठी
वर्षानंतर व्याजाचा दर बदलत नसतो<<< व्वा
Pages