Submitted by केदार on 30 April, 2014 - 01:38
ठिकाण/पत्ता:
खेड शिवापूर ते शिरवळ दरम्यान कुठेतरी, जिथे मस्त नाश्ता मिळेल अश्या ठिकाणी !
सेल्फ प्रॉपेलर्स घेऊन येत आहेत आणखी एक राईड !
मागच्या राईड मध्ये ठरवल्याप्रमाणे शिरवळला जाता येईल. पण शिरवळ ते माझे घर राउंड ट्रीप १३५ किमी आहे. भर उन्हात सायकल चालवतना खूप थकवा जाणवतो हे मागच्या आठवड्यात आपण अनुभवले त्यामुळे त्याकडे ही दुर्लक्ष करता येत नाही. कमीतकमी खेड शिवापूरपर्यंत जाऊ. तिथे मावळ प्रसिद्ध कैलास भेळ आहे.
साधारण ११ च्या आत घरी परतायचेच असे ठरवून पुढे अंदाज घेऊन कुठून परतायचे ते ठरवू. रूट मध्ये कात्रज चढण आणि बोगदा आहे त्यामुळे सायकलला लाईट आवश्यक!
वेळ ५ वाजता दिली आहे. जर ५ / ५:३० वाजता सर्व निघालो तर नक्कीच पुढेही जाता येईल.
ज्यांना पूर्ण राईड जमणार नाही त्यांनीही जिथपर्यंत होईल तिथपर्यंत येता येईल.
मला शनिवार आणि रविवार दोन्ही जमणार आहेत. जे येत आहेत त्यांनी वाराची पंसती कळवावी म्हणजे कुठला तरी एक वार नक्की करता येईल.
माहितीचा स्रोत:
शाळेत शिकवलेला भुगोल
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शनिवार, May 3, 2014 - 19:30 to रविवार, May 4, 2014 - 01:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आर्र मी नेमकी ही राईड मुकणार
आर्र मी नेमकी ही राईड मुकणार आहे..
सध्या परिक्षेनिमित्त नवी मुंबैत आहे..
माहितीचा स्रोत मस्तं
माहितीचा स्रोत मस्तं आहे.
शुभेच्छा!
आमच्या वेळेस या माहितीचा
आमच्या वेळेस या माहितीचा स्त्रोत "बॉबी" सिनेमा होता! त्यात त्या नटनटीला टेम्पोत बसायला लावुन वगैरे जो प्रसंग आहे ते हॉटेल खेडशिवापुरमधिल होते. ते बघायला सायकलवरुन गेल्याचे आठवते.
त्या खलनायचा तो डॉयलॉग पण प्रसिद्ध होता "अमकातमका नाम है मेरा".... रणजित का? डिम्पल अन ऋषिकपुर नायकनायिका होते का? असो.
सर्वान्ना शुभेच्छा!
कार्यक्रमाला माहितीचा स्त्रोत
कार्यक्रमाला माहितीचा स्त्रोत फिल्ड असायची गरज का आहे? (रेसिपी वगैरेला ठिक )
मी १-३ तार्खेला नहिये.
मी १-३ तार्खेला नहिये. रविवारि असती राइड तर जमल असत.
अर्रे, जोरदार चालू आहेत
अर्रे, जोरदार चालू आहेत राईड्स तुम्हा लोकांच्या. मस्त एकदम. शुभेच्छा
सहावी सातवीतल्या मुलांना जमेल
सहावी सातवीतल्या मुलांना जमेल असे काही सायकलिंग कार्यक्रम ठरवणार आहे का पुढे कधीतरी ?राहाण्याचे ठिकाण मार्केटयाड जवळ बिबवेवाडी बायपास रस्ता .
अमित रविवारचा बदल केला आहे
अमित रविवारचा बदल केला आहे आता.
SRD फक्त लहान मुलांकरता एखादी राईड ठेवणे अवघड आहे कारण ही मुलं पुण्यात सगळीकडे विखूरली आहेत (माबोकरांची) मग सायकल रिक्षात / गाडीत आणावी लागेल. मोठ्या माणसांनी चालविणे अपेक्षित असल्यामुळे ते येतात. पण तरिही विचार करायला हरकत नाही.
केदार धन्यवाद. रविवारी भेटू
केदार धन्यवाद. रविवारी भेटू नक्की
जोरात चालल्या आहेत सायकल
जोरात चालल्या आहेत सायकल राईड्स केदार! मस्त
रविवारी मी आहे , मी
रविवारी मी आहे , मी वारजेवरुन जॉईन केल्यावर अंतरही कमी बसेल.सकाळी लवकरच निघू ५ ओके आहे.
रणगाड्यावरुन कात्रज घाट चढताना घाम निघणार नक्की.
रविवार माझं tentative...
रविवार माझं tentative... शनिवारी रात्री सांगतो..
मायबोलीकरांनी रविवारी दिनांक
मायबोलीकरांनी रविवारी दिनांक ११मे रोजी केलेली सायकल भ्रमंती चा मार्ग खालीलप्रमाणे:
वारजे flyover --> बायपास मार्गे कात्रज बोगदा --> खेद शिवापूर टोलनका --> कोंढाणपूर मार्गे सिंहगड घाट --> डोणजे --> खडकवासला --> वारजे
डावीकडून - अमित, मनोज, किरण, रोहित
दमलेला रोहित
गड सर झाला
गरम भाजी आणि ताक-दही वर मायबोलीकरांनी हल्ला बोल केला. दही ताक एका घोटात संपल. भाजीच्या ५-६ व्या प्लेट चा कसाबसा हा फोटो मिळाला
mast
mast
अरे वा! मस्त फोटो.... आणि ही
अरे वा! मस्त फोटो....
आणि ही पाचवी सायकल फेरी होती म्हणायची....
amhala yeta yeil ashi ekhadi
amhala yeta yeil ashi ekhadi ride houn jau de na....mandilino.....
ह्या रविवारी पुन्हा एक राईड
ह्या रविवारी पुन्हा एक राईड ठरवण्यात आलेली आहे. तेव्हा व्हा तयार..
हार्पेन ४थी राईड झाली नाही.
हार्पेन ४थी राईड झाली नाही. म्हणून इथेच पोस्ट केल़.
@mrp राईडचा बाफ काढला की चर्चा होते नी जसे लोक जमतील त्याप्रमाणे राईड ठरवतो. तेव्हा चर्चेत नक्की सामील व्हा
माझ्याकडे आणखी काही फोटो आहेत
माझ्याकडे आणखी काही फोटो आहेत तेही पोस्ट करतो .
या रविवारी खंबाटकी गाठूच.
(No subject)