सायकल राईड - ३

Submitted by केदार on 23 April, 2014 - 02:53
ठिकाण/पत्ता: 
बोपदेव घाट किंवा लोनावळा

अखिल मायबोली विना पेट्रोल / डिझेल वाहन प्रसारक मंडळ घेऊन येत आहे तिसरी राईड.

तर ठरवा कुठे जायचे ते.

पर्याय १. बोपदेव घाट
पर्याय २. लोनावळ्या जवळपास

साधारण ५० + किमी जाऊन येऊन करू. लोनावळ्याकडे जायला मला आणि अमितला आवडेल, पण ती राईड मग १००+ होईल. वाटल्यास अलिकडूनही वापस येता येईल.

ज्यांनी मला विचारले त्यांना रविवारच जमणार आहे. त्यामूळे रविवारी ठरवत आहे.

माहितीचा स्रोत: 
बसका राव? थोडीफार माहिती आम्हालाही आहे. :)
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, April 26, 2014 - 20:00 to रविवार, April 27, 2014 - 02:00
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चढावर जर ३-५ ने चालवली, जास्त वेट्स पडतात" हा सगळा प्रकार काय आहे? >> सायकल गिअर्स १०१ मध्ये लिहिलेल्याचे उलटे

मनोज. मायबोलीवर स्वागत Happy

मग कर्नाटका ते पुणे राईड पण कर. आम्ही सर्व वाटल्यास महा. बॉर्डरवर येऊन तुझ्या सोबत पुण्यात येऊ.>>
माझा एक मित्र आहे IITB चा त्याने बंगळुर ते मुंबइ सायकल वर केलय, तो खुप लांब-लांबच्या राइडस करतो, मी प्रयत्न करुनही अजुन ११० किमि च्या पुढे नाही जाउ शकलो Uhoh
बाकि तुम्हाला जर सायकलिंगसाठी प्रेरणा (inspiration) हवी असेल तर खालिल रिक्षात बसाच...
ह्या दोघींना 'अफलातुन' 'अचाट' वगैरे शब्द सुद्धा कमी पडतील..

https://www.facebook.com/cyclingsilk

http://www.cyclingsilk.com/blog/

रणगाडा . Happy Happy

हो पण रनगाड्यावर किमान १०० किमी मारल्यावरच हायब्रीड घेइन म्हणतो. तेही लवकरच

पिंगू - ओएलेक्स पे बेच डाल..

माबोकर मुंबईकर भारी रडे सायकल चालवण्याच्या बाबतीत. कोण्णी कोण्णी सायकली चालवायला येत नाही.

लोक किती हौशी असतात पहा. परवाच एका डोंगरावर जाणे झाले असता एक बाई गुडघे मजबुत व्हावे म्हणुन काय करु असे कोणालातरी विचारत होती. कारण विचारल्यावर उत्तर आले की ती व तिचा नवरा १० दिवसासाठी पोलंडला कुठेतरी भरपुर सायकलिंग करायला जाणार होते म्हणुन गुडघ्यांचा व्यायाम चालु होता. असतात बाबा असे लोक, खास सायकल ट्रिपसाठी परदेशात जाणारे. बहुतेक फार मस्त जागा असेल ती.

Pages