आयपीएल चे सातवे पर्व सुरू झाले आहे .... भारतात होणार, दुबईत होणार, बान्ग्लादेशात होणार की श्रीलंकेत होणार, मुंबई, राजस्थान खेळणार की नाही वगैरे चर्चांना आता पूर्णविराम मिळालाय..... पहील्या टप्प्यासाठी संघ दुबईत जाउन पोहोचायला देखील लागलेत..... मिडीयामध्ये अजुन फारशी हवा नसली (इलेक्शन इफेक्ट) तरी सेट मॅक्सवर काउंटडाऊन कधीचा सुरु झालाय... सहभागी संघ आपापले नवीन कर्णधार जाहिर करु लागलेत... खेळाडूंनी आयपीएल स्पेशल ट्वीट्सचा धडाका लावलाय....अश्यात भारतीय संघाने अनपेक्षितरीत्या २०-२० विश्वचषकाचे उपविजेतेपद पटकावल्यामुळे भारतीय चाहते जरा सुखावलेले आहेत..... सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच
माझा आवडता द्रवीड यंदा पहील्यांदाच आयपीएल खेळणार नसल्यामुळे गेल्या सहा स्पर्धेतला उत्साह आता कदाचित नसेल.... पण तरीही राजस्थानच्या डगाआउट मधली त्याची उपस्थिती सुखावणारी असेलच!
असो.... हा धागा आयपीएल-७ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया
फॅन्टसी लीग: (सौजन्य: उदयन)
नाव : aapali maayboli (english)
पासवर्ड : 12345 (english)
तुम्ही यायचा विचार करत आहेत
तुम्ही यायचा विचार करत आहेत का ?![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
<< मला शामी, कोहली, हेहि
<< मला शामी, कोहली, हेहि धोनीबरोबर असतील असे वाटते>> झक्कीजी, मला शामी, कोहलीचं माहित नाही पण 'सर जडेजा' मात्र नक्कीच असतील धोनीबरोबर !![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मॅक्स गेला.....स्वस्तात मी
मॅक्स गेला.....स्वस्तात![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मी कॅप्टन केलाच नाही![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
स्थितप्रज्ञाची लक्षणं कोणती?
स्थितप्रज्ञाची लक्षणं कोणती? सुनील नरैन ! त्याला सिक्सर मारा, खुन्नस नाही कीं चेहरा पडणं नाही; विकेट घेतली,'त्यांत काय झालं ?' हे चेहर्यावर भाव; हॅट्रीक घेतो, इतर जण धांवून टाळी द्यायला येतात, तर हा निर्विकारपणे ' हवीच का टाळी, बरं घ्या आणि फुटा ' !
काय लागोपाठ तीन तर्हेचे तीन अफलातून चेंडू , एकाच अॅक्शन मधे !! मानलं !!!!
पंजाबने समोर ठेवलेल्या माफक
पंजाबने समोर ठेवलेल्या माफक १३२च्या लक्ष्याकडे वाटचाल करताना केकेआर १९-२ ! << गंभीरचा फॉर्म ही गोष्ट केकेआरसाठीं अधिकाधिक गंभीर होत चाललीय >> आजही गंभीरला खातं उघडायलाही वेळ लागत होता. आयपीएलमधील सगळ्यात लांब सिक्सरलाही मिळाल्या नसतील एवढ्या टाळ्या त्याच्या पहिल्या व एकमेव धांवेला मिळाल्या !! लगेचच मिड-ऑनच्या हातात झेल देवून तो तंबूत परतला !! खरंच, फॉर्म व आत्मविश्वास गेल्यावर एवढ्या चांगल्या फलंदाजाचीही काय दयनीय अवस्था होते !!
पहील्याच बाँल वर बोलर ला कँच
पहील्याच बाँल वर बोलर ला कँच दिलेली पण पकडली नाही![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
MI सक्स बिगटाईम.
MI सक्स बिगटाईम.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मुंबई गई !!!! पीटरसन शारिरीक
मुंबई गई !!!!
पीटरसन शारिरीक दृष्ट्या तंदुरुस्त व आक्रमक मानसिकतेत दिसतो; दुसर्याच षटकात [ रोहित शर्माच्या] १५ धांवा घेवून त्याने इथें आपली हजेरी लावलीय. इंग्लंडच्या संघात पुन्हा स्थान मिळवण्याच्या ईर्षेनेच तो ही आयपीएल खेळणार हें निश्चित !
मुंबई सलग ४ पराभव .....
मुंबई सलग ४ पराभव ..... ???????????????????????????????????
ओव्हर कॉन्फिडन्स ... ?
पीटरसन चांगला खेळला ..
<<ओव्हर कॉन्फिडन्स ... ? >>
<<ओव्हर कॉन्फिडन्स ... ? >> माझा एक मित्र नेहमी नापास व्हायचा व ' साला ओव्हर कॉन्फिडन्समुळे घोटाळा झाला ' म्हणायचा, त्याची आठवण झाली !
हो कारण यंदा त्यांनी ऐन
हो कारण यंदा त्यांनी ऐन मोक्याचे खेळाडु बाहेर केले आणि भज्जी , रोहित रायडु मलिंगा यासारखे खेळाडु ठेउन त्यांनी स्मिथ, मॅक्सवेल, जोन्सन सारखे खेळाडु बाहेर काढले...
जॉन्सन ने अॅशेस आणि आफ्रिका दौरा गाजवला होता तरी त्याला ठेवला नाही या घेतला नाही हे अकालनिय आहे.
बहुतेक त्यांना वाटले असेल की मलिंगा एकटा १० पैकी ७-८ विकेट काढेल बाकिच्या भज्जी वगैरे घेतील.. समोरच्याला कमी धावात गुंडाळले तर रोहीत रायडु हे लक्ष्य आरामात पार करतील
<< स्मिथ, मॅक्सवेल, जोन्सन
<< स्मिथ, मॅक्सवेल, जोन्सन सारखे खेळाडु बाहेर काढले... >> म्हणजे यंदा त्याना परिक्षेला नुसती नांवालाच हजेरी लावायची होती, असंच असेल; मग आपणच कां उगीचच गळा काढायचा त्यांच्यासाठी !!
आणि हो, त्या शिखर धवनचंही काय चाललंय ? आजही हजेरी लावून तंबूत परत !!! "बेस कँप'वरच असा लटपटायला लागला तर शिखर कसा गांठणार तो !!!![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे
स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे सध्याचे दोन फलंदाज १.मॅक्सवेल २. स्मिथ. दोन्ही मागच्या वेळचे मुंबई ईंडियन्स आणि मुंबईची नेमकी बॅटींग गटांगळ्या खातेय, ते देखील त्यांच्या जागी आलेले हसी आणि अॅंडरसनच निष्प्रभ ठरत आहेत.
असो,
पुढच्या वेळी त्या ऑस्ट्रेलियन बिग बॅश प्लेअर बेन डक ला हसीच्या जागी खेळवतील अशी आशा.
अवांतर - रात्रीचा सामना - चेन्नई विरुद्ध हैदराबाद - हा धोनी मॅच फिक्सिंग किंवा स्पॉट फिक्सिंग करतो का? आज फारशी गरज नसताना पुढे आला. येऊन आरामात खेळायला लागला. १५ ओवर १२४-२ अशी स्थिती, ८ विकेट हातात असताना ५ ओवरमध्ये फक्त २२ धावा हव्यात, असा सामना शेवटच्या षटकात ४ चेंडू ४ धावा पर्यंत घेऊन गेला.
Ashwin: "Guess everyone has
Ashwin: "Guess everyone has forgot what really went at the auction. MI did BID for Smith, Maxwell. Once they couldn't afford, they bowed out. It's not as if they sat and let them go. When those who left the team performs and the team doesn't do well, people lashes out. What about Johnson? Tiwary didn't do too well when RCB got him from MI. Then, they ridiculed RCB for paying huge sums. How fickle minded we are! How easily we arrive at conclusions! "
हे असे http://www.espncricinfo.com/indian-premier-league-2014/engine/match/7293...
इथे वाचले.
मी स्वतः या सर्व बाबतीत अनभिज्ञ आहे, पण एक वेगळे मत वाचले म्हणून लिहीले. हा आश्विन कोण माहित नाही?
१५ ओवर १२४-२ ....... ४ धावा
१५ ओवर १२४-२ ....... ४ धावा पर्यंत घेऊन गेला.
अगदी सिनेमा स्टाईल, शेवटपर्यंत उगीचच लांबवत रहायचे, लवकर संपवली मॅच तर लोकांचे पैसे वसूल होणार नाहीत. नि दोन ओव्हरमधल्या जाहिराती नाही दाखवल्या तर टीव्हीवाल्यांचे नुकसान. तेंव्हा बर्याच लोकांनी मिळून हे सर्व कारस्थान केलेले आहे, धोनी बिचारा सांगेल तसे करणार! नाहीतर टांग तोडून ठेवली तर खेळणार कसा पुनः??
पण एक वेगळे मत वाचले म्हणून
पण एक वेगळे मत वाचले म्हणून लिहीले.
>>>>>>>>>>
वेगळे मत वगैरे काही नसते हो, या लोकांना ईंग्लिश येते म्हणून फाडत असतात.
<< पण एक वेगळे मत वाचले
<< पण एक वेगळे मत वाचले म्हणून लिहीले. हा आश्विन कोण माहित नाही? >> झक्कीजी,माझे एक क्रिकेटचे खरेखुरे जाणकार मित्र म्हणतात कीं क्रिकेट हा एकच खेळ असा आहे कीं ज्यावर कुणीही, कितीही वेळ बोलूं शकतो व हेंच क्रिकेटच्या लोकप्रियतेचं कारण आहे [ त्यांचा रोंख माझ्या क्रिकेट बडबडीवरच असतो, हें सांगणं नकोच !]. आतां तर त्यांत खेळाडूंवर लागलेल्या बोली, त्यांची वार्षिक मिळकत इ.इ.चीही भर पडतेच आहे. तेंव्हा, कुणीतरी अश्विन कांहींतरी बोलणार, पौषही पचकणार , माघही तोंडसुख घेणार.... हें आलंच. आपण जें बघतों त्यावर प्रामाणिकपणे आपल्याला काय वाटतं तें बोलावं ,हें उत्तम. कारण आपण बघतो म्हणून तर हा पैशाचा खेळ चाललाय ना !!![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
काल धोनीची मॅच उगीचच ताणली जात होती असं मलाही जाणवलं. पण यावरही कुणी अश्विन, माघ म्हणूं शकतोच कीं, " लागोपाठ विकेट गेल्या होत्या, गोलंदाजीला धार चढली होती, आणखी एखादी विकेट असती अन मॅच हातची गेली असती तर धोनीलाचा दोष दिला गेला असता..." वगैरे ..वगैरे. हें चालायचंच !!!![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मुंबईला ज्येष्ठ नागरीक का
मुंबईला ज्येष्ठ नागरीक का आवडतात देव जाणे. >>> मुंबईला नाही रिलायन्सला... खात्री करायची असेल तर RCPला भेट देऊन ये... त्यांना तरुणांची किम्मत नसते.
१९९
१९९
200
200
मुंबईचे डग आउटच मस्त आहे.
मुंबईचे डग आउटच मस्त आहे. सचिन, पाँटिंग अण्णा, कुंबळेभाऊ, जॉन्टीराव असे एकेकाळचे भारी हीरे आहेत. थिंक टँक भारी असून मैदान गाजवता येत नाही हे त्यांना कळाले असावे आता, सेनापती महत्वाचा असतो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझ्यामते पोलार्डला आणि हसीला पुढच्या मॅच मध्ये घेऊ नये. त्या बदल्यात त्यांनी बेन डंक आणि क्रिशमार सँटोकीला घ्यावे. नाहीतरी बॅटिंग बोंबललेली आहेच.
<< थिंक टँक भारी असून मैदान
<< थिंक टँक भारी असून मैदान गाजवता येत नाही हे त्यांना कळाले असावे आता, सेनापती महत्वाचा असतो. >> हें बरं आहे ! मागें द्रविडच्या बाबतींत मीं हेंच म्हटलं तर मला माझे शब्द मागें घ्यावे लागले![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
होते !!
डग आउट वाल्यांनी मैदानात
डग आउट वाल्यांनी मैदानात उतरावे आता![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
शॉन पोलक आणि कुंबळे एक हाती मॅच अजुन देखील फिरवु शकतात ...
जाँन्टी अजुन देखील पॉईंट ला उभा राहुन ४० नाही पण २०-३० रन्स तरी रोखुन धरण्याचा उत्साह दाखवेलच
सचिन पाँटींग मॅक्स्वेल सारखे २०० च्या सरासरीने नाही पण किमान पहिल्या १० ओव्हर मधे ८० रन्स तरी करुन देईल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
<< डग आउट वाल्यांनी मैदानात
<< डग आउट वाल्यांनी मैदानात उतरावे आता >> काय गंमत आहे ! 'डग आऊट'वाले मैदानात होते तेंव्हा त्यानी 'डग आऊट'मधे जावं आतां, म्हणून त्यांचा पिच्छा पुरवला गेला होता ! ".. कालचा गोंधळ बरा होता", असं कायसं म्हणतात, तसंच झालं हें !!![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
'डग आऊट'वाले मैदानात होते
'डग आऊट'वाले मैदानात होते तेंव्हा त्यानी 'डग आऊट'मधे जावं आतां, म्हणून त्यांचा पिच्छा पुरवला गेला होता ! >>>
भाउ .. जे खेळत होते त्यांना खरेदी केलेच नाही .. आणि ज्यांच्या प्रेमात राहुन टिम मधे ठेवले ते खेळत नाही..![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
अश्या वेळेला जे आहेत त्यांच्या पेक्षा डगआउट वाले चांगले
क्रिकेट हा एकच खेळ असा आहे
क्रिकेट हा एकच खेळ असा आहे कीं ज्यावर कुणीही, कितीही वेळ बोलूं शकतो व हेंच क्रिकेटच्या लोकप्रियतेचं कारण आहे
बरोबर आहे.
त्याचबरोबर हेहि खरे की आपली मते भराभरा बदलता येतात नि त्याला काहीपण नक्की कारण असण्याची आवश्यकता नसते. म्हणूनच.
मागें द्रविडच्या बाबतींत मीं हेंच म्हटलं तर मला माझे शब्द मागें घ्यावे लागले
होते !!
असे झाले.
याला अपवाद - इथले भारतीय लोक ज्यांना पूर्वी क्रिकेटबद्दल एव्हढेच माहित होते की भारत सारखा हरतो, त्यांची मते मात्र अजूनहि पक्की आहेत - की भारताच्या खेळाडूंना हसायचे, भारत हरणारच म्हणायचे. कारण इथल्या परिस्थितीमुळे १९७० नंतर वीस पंचवीस वर्षे क्रिकेटबद्दल काहीच बातमी नसे. नि नंतर माहिती करून घेण्याचे कष्ट घेतले नाहीत. ते फक्त नेहेमी एकच मत व्यक्त करतात - भारत हरणार, भारताच्या गोलंदाजांना चोपून काढणार, भारताच्या फलंदाजांचे पाय लटपटतात, सगळे मॅच फिक्सिंग आहे वगैरे वगैरे. गावास्कर, कपिलदेव, द्रवीड, लक्ष्मण, कुंबळे इतकेच काय तेंडूलकर ला सुद्धा हसायला कमी करणार नाहीत!
मला क्रिकेटबद्दल आजकाल काही कळत नाही, पण आवड तितकीच आहे. नि आता विलो क्रिकेट घेतल्यावर जमेल तेंव्हा सतत क्रिकेटच बघत बसतो, नाहीतर इथे लिहितो.
<< ते फक्त नेहेमी एकच मत
<< ते फक्त नेहेमी एकच मत व्यक्त करतात - भारत हरणार, भारताच्या गोलंदाजांना चोपून काढणार,....... गावास्कर, कपिलदेव, द्रवीड, लक्ष्मण, कुंबळे इतकेच काय तेंडूलकर ला सुद्धा हसायला कमी करणार नाहीत!>> झक्कीजी, ही तिथल्याच लोकांची मक्तेदारी नसून इथंही ह्या वर्गात मोडणारे बरेच जण आहेत !
क्रिकेट हा खरच बोलायचा विषय
क्रिकेट हा खरच बोलायचा विषय आहे. मागे एकाने मला 'अरे काय आमच्या वेळी ईंडिया ची टीम होती... गावसकर, वेंगसरकर, कपीलदेव, मांजरेकर, तेंडुलकर, कुंबळे, द्रवीड अशी २-३ पिढ्यांमधल्या खेळाडूंची यादी ऐकवली होती.
असो. मला वाटतं की जसं कॉर्पोरेट कल्चर असतं आणी त्याचा परिणाम / प्रतिबिंब काम करणार्यांच्या कामात, स्वतःला कॅरी करण्यात दिसतं, तसच, एक टीम कल्चर असतं आणी ते टीमच्या मैदानातल्या खेळात, वागणूकीत दिसतं. ह्याच संघातून खेळणारे खेळाडू दुसर्या संघात गेले की तसच परफॉर्म नाही करत (उदा. हसी, युसूफ पठाण, किंवा राजस्थान कडून खेळतानाचा वॉटसन आणी ऑसी संघाकडून खेळतानाचा वॉटसन).
आजच्या मॅच विषयी काही अंदाज??
अंदाज काय वाट लागली पण !
अंदाज काय वाट लागली पण ! पहिली ओव्हर २० अन नंतर ३ आउट.
ABD ला युवराज च्या आधी
ABD ला युवराज च्या आधी पाठवण्याची चाल (?) सुचल्याबद्दल आणी ती केल्याबद्दल RCB च्या थिंक टँक चं कौतुक!
हे टंकता टंकता पटेल गेला आणी ४ आऊट.
Pages