आयपीएल चे सातवे पर्व सुरू झाले आहे .... भारतात होणार, दुबईत होणार, बान्ग्लादेशात होणार की श्रीलंकेत होणार, मुंबई, राजस्थान खेळणार की नाही वगैरे चर्चांना आता पूर्णविराम मिळालाय..... पहील्या टप्प्यासाठी संघ दुबईत जाउन पोहोचायला देखील लागलेत..... मिडीयामध्ये अजुन फारशी हवा नसली (इलेक्शन इफेक्ट) तरी सेट मॅक्सवर काउंटडाऊन कधीचा सुरु झालाय... सहभागी संघ आपापले नवीन कर्णधार जाहिर करु लागलेत... खेळाडूंनी आयपीएल स्पेशल ट्वीट्सचा धडाका लावलाय....अश्यात भारतीय संघाने अनपेक्षितरीत्या २०-२० विश्वचषकाचे उपविजेतेपद पटकावल्यामुळे भारतीय चाहते जरा सुखावलेले आहेत..... सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच
माझा आवडता द्रवीड यंदा पहील्यांदाच आयपीएल खेळणार नसल्यामुळे गेल्या सहा स्पर्धेतला उत्साह आता कदाचित नसेल.... पण तरीही राजस्थानच्या डगाआउट मधली त्याची उपस्थिती सुखावणारी असेलच!
असो.... हा धागा आयपीएल-७ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया
फॅन्टसी लीग: (सौजन्य: उदयन)
नाव : aapali maayboli (english)
पासवर्ड : 12345 (english)
"खास करून राजस्थान आपल्या
"खास करून राजस्थान आपल्या होमपीच वर खेळण्यास फार उत्सुक असेल." - हे यंदा कसं जमणार कुणास ठाऊक. कारण यंदा राजस्थान चं होम पीच जयपूर नसून अहमदाबाद आहे. अहमदाबाद traditionally बॅटिंग विकेट आहे.
<< हे यंदा कसं जमणार कुणास
<< हे यंदा कसं जमणार कुणास ठाऊक...... अहमदाबाद traditionally बॅटिंग विकेट आहे.>> अहो, अहमदाबाद असेल तर उलट जमलंच म्हणून समजा ! सब बदलाव तो वहांसेही शुरू होनेवाला है, अशी हवा तरी आहे !!!!
"सब बदलाव तो वहांसेही शुरू
"सब बदलाव तो वहांसेही शुरू होनेवाला है, अशी हवा तरी आहे !!!! "
वाह भाऊ, अब की बार ...
केकेआर -१५० . गंभीरचा फॉर्म
केकेआर -१५० . गंभीरचा फॉर्म ही गोष्ट केकेआरसाठीं अधिकाधिक गंभीर होत चाललीय !! आरसीबी चा वरूण अधिकाधिक प्रभावी ठरत चाललाय !
A comment from
A comment from Cricinfo:
Newton's third law: For every Maxwell, there is an equal and opposite Gambhir
विकेट हव्या होत्या, पण
विकेट हव्या होत्या, पण कलकत्तावाले अजून युवराजला देखील बाद नाही करू शकत आहेत, अन्यथा बँगलोरची बँटींग लाईन तळापर्यंत नाहीये. नरीनलाही विकेट घेण्यात अपयश आले की थोड्यावेळाने कोहली औपचारीकता पुर्ण करायला घेईल.
कोरबो लडबो जीतबो २ रन्स ने
कोरबो लडबो जीतबो
२ रन्स ने जिंकले
काय कँच पकडली लियन ने जबरदस्त
कॅचेस विन मॅचेस.. क्लासिकल
कॅचेस विन मॅचेस.. क्लासिकल कॅच ..
पण एक प्रश्न - जर तो लिन बसण्याऐवजी आधीच उभा राहिला असता तर अशी एअरोबिक कोलांटीउडी मारावी लागली असती का, योग्य त्या हाईटवर तो बॉल होता का?
नरेन ट्रंपकार्ड्ला जरी आधीच
नरेन ट्रंपकार्ड्ला जरी आधीच संपवावे लागले असले तरी जाताजाता समोरच्याचे ट्रंपकार्ड उडवून गेला.
भाई तो रामसे चित्रपटातील गेल नावाचा शैतान कधी जागृत होणार आहे?
अरे तो स्लीप झालेला म्हणुन
अरे तो स्लीप झालेला म्हणुन खाली होता त्यात ही त्याने ऐन मेक्यृ
मोक्याला उठला
हो रे, ते नंतर समजले... शंका
हो रे, ते नंतर समजले... शंका मिटली
कालचा लिन ने घेतलेला कॅच
कालचा लिन ने घेतलेला कॅच अशक्य भारी होता. तो बाहेर उलटा वाकून सुद्धा बाउंड्रीच्या आत कसा काय पडू शकला कुणास ठाउक. टेरिफिक.
सुद्धा बाउंड्रीच्या आत कसा
सुद्धा बाउंड्रीच्या आत कसा काय पडू शकला कुणास ठाउक >>> कारण तो योगा करतो. रामदेव बाबांचा भक्त आहे.
युवी / एबी ने घालवली मॅच.
जिमनॅस्टीक्स... बाकी काहीही
जिमनॅस्टीक्स... बाकी काहीही नाही.. कालचा तो कॅच अशक्यच होता..
कालचा तो कॅच अशक्यच होता.. >>
कालचा तो कॅच अशक्यच होता.. >> +१
अॅक्च्युली तो धावत असताना
अॅक्च्युली तो धावत असताना स्लिप झाला सरळ आडवाच झालेला परंतु तो त्या जागी वेळे अगोदर पोहचल्याने आणि चेंडु वर नजर कायम असल्याने त्याला बसायला आणि नंतर उडी मारायला वेळ मिळाला. ( जो अत्यल्प असुन सुध्दा त्याने मोक्याच्या क्षणी उडी घेतली )
खाली बसलेला असल्याने त्याने मागे उडी घेउन सुध्दा तिथल्या तिथे तो उडी मारली
मुंबई ची बॅटिंग!!
मुंबई ची बॅटिंग!!
Finally Anderson 1 down ,
Finally Anderson 1 down , cool move.
हसीच्या बॅटला व मुंबईच्या
हसीच्या बॅटला व मुंबईच्या गोलंदाजीला कांहीं धार चढत नाहीय ! 'साहेब' वाढदिवस साध्या तर्हेने साजरा करून काल सामन्याला हजर होते; पण मुंबई कांहीं अजून गुण-तक्त्यातले गुण वाढवायच्या मूडमधे दिसत नाही !!
मुंबई टीम बोअर आहे !
मुंबई टीम बोअर आहे !
कुणावरही पैसे लावले आहेत त्यांनी. मिचेल जॉन्सन नसला असता तरी मॅक्सवेल आणि स्मिथला ठेवायला हवे होते. त्या बदली हसी काय आणि? अंबानी काकू रोज रडत असतील आता. मागच्या वर्षीही मॅक्सवेलहा मिलयन्स मध्येच खरेदी केला होता ना? म्हणजे तुम्हाला व्हॅल्यू माहिती असताना जर तुम्ही सोडत असताल तर ओव्हर कॉन्फिडंस दाखवला. त्याचा परिणाम.
सनरायझर्स, चॅलेंजर्स किंवा पंजाब ह्या वेळी जिंकावेत असे मला वाटते. पैकी सनरायझर्स आणि चॅलेंजर्स चाचपडत आहेत अजून. ह्या तिन्ही प्ले ऑफ मध्ये असाव्यात. चौथी बहुदा धोणी'ज फ्युचर टीम इंडिया
जे जे लोकं चेन्नाई मधून खेळतात ते टीम इंडियात बाय डिफॉल्ट भरती होतात. मला कधीकधी वाटतं तो परदेशी खेळाडूंनाही भारतीय नागरिकत्व घेण्याचे सल्ले देत असणार, म्हणजे ती लोकं ११ मध्ये
<< मला कधीकधी वाटतं तो परदेशी
<< मला कधीकधी वाटतं तो परदेशी खेळाडूंनाही भारतीय नागरिकत्व घेण्याचे सल्ले देत असणार, म्हणजे ती लोकं ११ मध्ये >> सध्यां भारतातल्या क्रिकेटची श्रीमंती पाहिली तर हा दरवाजा उघडल्यावर धोनी हा एकटाच मूळ भारतीय आपल्या संघात राहील, व तोही कप्तान आहे म्हणून !!!
मुंबई टीम ने जे बदलाव केलेले
मुंबई टीम ने जे बदलाव केलेले आहे ते फसले आहेत हे मान्य करायला हवेत त्यांनी
रोहित , पोलार्ड यांचा फॉर्म संपला आहे. एकटा अंबाती रायडु आणि अँडरसन काय करणार आहेत ?
--
एके ठिकाणी वाचलेले की युवराज ने दणक्यात आयपीएल मधे खेळुन सगळ्या टिकाकारांच्या तोंडावर उत्तर मारले आहे किती हास्यस्पद आहे. भारतासाठी खेळला नाही तेव्हा त्याचा फॉर्म गायब होता आणि इथे आयपीएल मधे उतरल्याबरोबर लगेच फॉर्म आला ते ही नवख्या खेळपट्टीवर ज्यात तो पहिल्यांदाच खेळत होता. पैसे दिसल्यावर फॉर्म बरा येतो लगेच ?
रोहित , पोलार्ड यांचा फॉर्म
रोहित , पोलार्ड यांचा फॉर्म संपला आहे. एकटा अंबाती रायडु आणि अँडरसन काय करणार आहेत ?
>>>>>>>>>>
पोलार्ड हा कधीच पुर्ण स्पर्धा फॉर्ममध्ये आहे असे नसते, तो तसल्या टाईपचा प्लेअरच नाही.
रोहीतचा फॉर्म संपला कसे बोलू शकतो, तुर्तास गंडलाय आणि हे भारी पडतेय. पण चौदा सामन्यांच्या मालिकेत तो कुठेतरी गवसेलच, फक्त मुंबईला त्याचा काय किती फायदा होतो देव जाणे.
हसीच्या वयाला पाहता त्याला परत फॉर्ममध्ये येणे भारी आहे. मागच्यावेळी पाँटींग आणि सचिनही असेच होते, त्या आधी पहिल्या सीजनमध्ये बहुधा तो जयसुर्या पण मुंबईमधूनच होता ना, तसेच शॉन पोलोक वगैरे.. मुंबईला ज्येष्ठ नागरीक का आवडतात देव जाणे.
खरेच मॅक्सवेलला काढून पस्तावलेत. स्मिथला काढणेही चूकच होती.
हरभजन, ओझा, रायडू, तारे, झहीर हे कुठल्याही अँगलने मॅचविनर नसलेले खेळाडू पुन्हा संघात आहेत, हे नसून इतर कोणीही असते तरी फारसा फरक पडला नसता.
च्याईला मी का मुंबईकर आहे, त्रास देणार आहे हि आयपीएल यंदा.. सचिनला बोलवा परत, निदान त्याला खेळताना बघण्याचेच सुख ..
बेंगलोर १/२ मग ५/४, आणि आता
बेंगलोर १/२ मग ५/४, आणि आता १७/५ .. कोहली मात्र आहे बाकी..
कत्तल !
कत्तल !
६२-८ हे भगवान
६२-८
हे भगवान ......................
या मॅच मधुन काहीच पॉईंट
या मॅच मधुन काहीच पॉईंट मिळनार नाही
७० वर ऑल आउट
७० वर ऑल आउट
झकास! टिपिकल राजस्थान!! पीच,
झकास! टिपिकल राजस्थान!!
पीच, मॅच, गेम सिच्युएशन प्रमाणे टीम निवडायची आणी प्लेयर्स वर विश्वास दाखवून त्यांना परफॉर्म करण्याची संधी द्यायची.
भाऊ, मला शामी, कोहली, हेहि
भाऊ,
मला शामी, कोहली, हेहि धोनीबरोबर असतील असे वाटते. बाकी इतर, कदाचित परदेशी खेळाडूंपेक्षा स्वस्त मिळाले तरच येतील.
आज अमेरिकन बेसबॉलमधे तर अमेरिकनांपेक्षा परदेशी (जपानी नि दक्षिण व मध्य अमेरिकेतले) जास्त आहेत. चक्क भाषेचे वांदे, मॅनेजरला खेळाडूंशी बोलायला दुभाषी लागतात. भारतात निदान सगळ्यांना उत्तम इंग्रजी येते.
जसे अमेरिकेत सगळ्या देशातले लोक येतात तसे भारतातहि येऊ लागतील. तेंव्हा मग काही फरक उरणार नाही.
Pages