Submitted by pltambe@yahoo.co.in on 20 April, 2014 - 23:17
चटकदार डांगर
साहित्य : एक वाटी उडदाची डाळ,अर्धी वाटी चणा (हरभरा) डाळ,अर्धी वाटी धने,दोन चमचे जिरे,८ – १० सुक्या लाल मिरच्या, चवीनुसार मीठ व छोटा चमचा हळद व हिंग.
कृती : प्रथम गॅसवर एका कढईत उडदाची डाळ,चणा डाळ ,धने व जिरे स्वतंत्रपणे खरपूस भानून घ्या,थोड्या तेलावर सुक्या लाल मिरच्याही भाजून घ्या व हे सर्व भाजकलेले पदार्थ हळद,हिंग व मीठ घालून मिक्सरमधून बारीक दळून घेऊन थंड झाल्यावर चालून घ्यावे व एका घट्ट झाकणाच्या काचेच्या बरणीत अथवा स्टीलच्या डब्यात भरून ठेवा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सर, सुप्रभात! सुटलाच आहात
सर,
सुप्रभात! सुटलाच आहात सर!
कोकणात कुळीथाचे पिठ वापरतात.
कोकणात कुळीथाचे पिठ वापरतात.
आता हे डब्यात भरलेले पीठ
आता हे डब्यात भरलेले पीठ खायचे कसे?
पाकॄ अर्धवटच आलीय.
मस्त... दह्यात कालवुन वरुन
मस्त... दह्यात कालवुन वरुन हिंग मोहरी ची फोडणी घालुन छान लागते..
मी आवडत्या दहात सेव करून
मी आवडत्या दहात सेव करून ठेवलीये.. सवड मिळाली की करीन ..
तुमच्या रेसिपीज , लहानपणी आई , आजी ने केलेल्या पदार्थांशी खूपच मिळत्या जुळत्या आहेत..
अगदी वाचतानासुद्धा चव आपसूकच येते जिभेवर..
आता हे डब्यात भरलेले पीठ
आता हे डब्यात भरलेले पीठ खायचे कसे?
पाकॄ अर्धवटच आलीय. >>> यामध्ये कांदा , कोथिंबिर. तिखट , मिठ , पाणी घालुन घट्ट पिठ भिजवायचे ....झाले तयार ..भाकरि , चपाति,, खिचडी बरोबर मस्त लागते..
सृष्टीसाठी : येथे फक्त हे
सृष्टीसाठी : येथे फक्त हे डांगराचे पीठ / भाजणी काशी करतात एव्हढेच दिले आहे. हे पीठ / भाजणी वर्षभरही छान टिकते व ऐनवेळी झटपट तोंडीलावणे म्हणून केवळ १५ मिनिटात बनवता येते. डांगराचे पिठाचे/भाजणीचे तोंडीलावणे कसे करावे ह्याची सचित्र पाक-कृतीसुद्धा मी आजच स्वतंत्रपणे नवीन धाग्यावर दिलेली आहे ती पहावी.
तुमच्या रेसिपीज , लहानपणी आई
तुमच्या रेसिपीज , लहानपणी आई , आजी ने केलेल्या पदार्थांशी खूपच मिळत्या जुळत्या आहेत.. अगदी अगदी....
मला अजुन एक लिहावस वाटतय.. तांबे काकु कीत्ती लकी आहेत..:) :
माझ्या पत्नीला नाही ना तसे
माझ्या पत्नीला नाही ना तसे वाटत !
एक मात्र कबुल करावेच लागेल की मला माझ्या पाक-कृती सह प्रत्येक छंदात (वेडेपणाचा असला तरी) आयुष्यभर तिने मोलाचे सहकार्य दिले आहे व त्याबद्दल मी तिचा सदैव ऋणी आहे.
सृष्टीसाठी : >> काका ते
सृष्टीसाठी : >> काका ते सातीने विचारले होते मि उत्तर दिले... असो
एक मात्र कबुल करावेच लागेल की
एक मात्र कबुल करावेच लागेल की मला माझ्या पाक-कृती सह प्रत्येक छंदात (वेडेपणाचा असला तरी) आयुष्यभर तिने मोलाचे सहकार्य दिले आहे व त्याबद्दल मी तिचा सदैव ऋणी आहे. .... व्वा क्या बात है!