सखे तुझ्या केसांमधले

Submitted by मिल्या on 14 April, 2014 - 07:02

सखे तुझ्या केसांमधले गजरे दरवळतात किती
जीभ, कान, डोळे माझे नाकावर जळतात किती

पर्वत बघुनी कळते का, उन्हे त्यास छळतात किती
असंख्य डोळ्यांतुन त्याच्या अश्रू ओघळतात किती

घातलेस तू माझ्यावर जगावेगळे घाव असे
खपल्या धरल्यावर सुद्धा जखमा भळभळतात किती

प्रवासात आयुष्याच्या, पदोपदी हे जाणवते
मी सरळच चालत असतो पण रस्ते वळतात किती

तुझ्यासारखा गाव तुझा, आहे पवित्र अन् निर्मळ
झरे सोड डबकीसुद्धा, इथली खळखळतात किती

एक असा क्षण येतो की, स्तब्ध किनारा होते मन
शब्दांच्या उत्कट लाटा, येउन आदळतात किती

दारावर येते जेव्हा, मोहमयी ही झुळुक तुझी
भले भले निश्चय माझे, तेव्हा डळमळतात किती?

कधी ओळ सुचतेच अशी की देजावू वाटावे
एका ओळीमध्येही कविता आढळतात किती?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक असा क्षण येतो की, स्तब्ध किनारा होते मन
शब्दांच्या उत्कट लाटा, येउन आदळतात किती

दारावर येते जेव्हा, मोहमयी ही झुळुक तुझी
भले भले निश्चय माझे, तेव्हा डळमळतात किती?

कधी ओळ सुचतेच अशी की देजावू वाटावे
एका ओळीमध्येही कविता आढळतात किती?<<< वा वा!

तुझ्यासारखा गाव तुझा, आहे पवित्र अन् निर्मळ
झरे सोड डबकीसुद्धा, इथली खळखळतात किती>>>> हे खूपच आवडले, सुरेख!

तुझ्यासारखा गाव तुझा, आहे पवित्र अन् निर्मळ
झरे सोड डबकीसुद्धा, इथली खळखळतात किती>>>> हे खूपच आवडले, सुरेख!

वाह !!

घातलेस तू माझ्यावर जगावेगळे घाव असे
खपल्या धरल्यावर सुद्धा जखमा भळभळतात किती

तुझ्यासारखा गाव तुझा, आहे पवित्र अन् निर्मळ
झरे सोड डबकीसुद्धा, इथली खळखळतात किती

एक असा क्षण येतो की, स्तब्ध किनारा होते मन
शब्दांच्या उत्कट लाटा, येउन आदळतात किती

दारावर येते जेव्हा, मोहमयी ही झुळुक तुझी
भले भले निश्चय माझे, तेव्हा डळमळतात किती?

कधी ओळ सुचतेच अशी की देजावू वाटावे
एका ओळीमध्येही कविता आढळतात किती?

तुमचे शेर हळवं करतात, इथे तुमची गझल फार वेगळी ठरते. कारण वजनदार, मार्मिक, बोचरे, भेदक, नाट्यमय असे शेर जास्त येतायत आजकाल समोर. हळवेपण विरळाच.

अप्रतिम !

प्रवासात आयुष्याच्या, पदोपदी हे जाणवते
मी सरळच चालत असतो पण रस्ते वळतात किती

दारावर येते जेव्हा, मोहमयी ही झुळुक तुझी
भले भले निश्चय माझे, तेव्हा डळमळतात किती?

या दोन द्वीपदी आवड्ल्या. बाकी प्रथमदर्शनी बहुतांशी भडक वाटल्या.

वाह !
भन्नाट !
मला जास्त आवडलेले २-३ नच शेर निवडणं आणि ते कोट करणं खूपच अवघड जातय पण मतला किनारा आणि शेवटचा शेर जास्त आवडले

रस्ते, लाटा, निश्चय, कविता क्या बात ! क्या बात !!

तुझ्यासारखा गाव तुझा, आहे पवित्र अन् निर्मळ
झरे सोड डबकीसुद्धा, इथली खळखळतात किती >>>>

गोरी तेरा गाँव बडा प्यारा आठवले Happy

पर्वत बघुनी कळते का, उन्हे त्यास छळतात किती
असंख्य डोळ्यांतुन त्याच्या अश्रू ओघळतात किती

घातलेस तू माझ्यावर जगावेगळे घाव असे
खपल्या धरल्यावर सुद्धा जखमा भळभळतात किती

दारावर येते जेव्हा, मोहमयी ही झुळुक तुझी
भले भले निश्चय माझे, तेव्हा डळमळतात किती?>>> मस्त आहेत हे शेर. गझल आवडली Happy

ही घरची दाद बघून गहिवरून आले. आम्ही एखादी गझल रचली तर 'काय फालतू वेळ घालवतोयस' अशी सुमधुर वचने कानावर पडतात आमच्या!

Light 1

ओह...

सरजी यू आर लकी.

बेफिजी, तुमच्या घरी असंच म्हणतात हा विनोद असावा.

Happy

कधी ओळ सुचतेच अशी की देजावू वाटावे
एका ओळीमध्येही कविता आढळतात किती? >>>>> क्या बात है ...

बाकी गजल सुंदरच ....

मिल्या गज़ल आवडली Happy
फक्त डबकी खळखळतात म्हणजे काय आणि त्याचा आणि पवित्रतेचा काय संबंध ते कळले नाही. डबकी प्रवाही असती तर त्याMना डबकी म्हंटलेच नसते ना.

चु. भू. द्या. घ्या.

परत एकद धन्यवाद मित्रांनो...

देवा भेट्लो की बोलूयात सविस्तर

खूप खूप आवडली....किती साधी सुन्दर आहे...

पर्वत बघुनी कळते का, उन्हे त्यास छळतात किती
असंख्य डोळ्यांतुन त्याच्या अश्रू ओघळतात किती---मस्त!!!

तुझ्यासारखा गाव तुझा, आहे पवित्र अन् निर्मळ
झरे सोड डबकीसुद्धा, इथली खळखळतात किती---:)

एक असा क्षण येतो की, स्तब्ध किनारा होते मन
शब्दांच्या उत्कट लाटा, येउन आदळतात किती... वाह वाह

कधी ओळ सुचतेच अशी की देजावू वाटावे
एका ओळीमध्येही कविता आढळतात किती?--- आवडली....

फार romantic आहे...:) कीप इट अप....

तुझ्यासारखा गाव तुझा, आहे पवित्र अन् निर्मळ
झरे सोड डबकीसुद्धा, इथली खळखळतात किती

एक असा क्षण येतो की, स्तब्ध किनारा होते मन
शब्दांच्या उत्कट लाटा, येउन आदळतात किती

कधी ओळ सुचतेच अशी की देजावू वाटावे
एका ओळीमध्येही कविता आढळतात किती?

>> सुरेख!! देजावूचा वापर अगदी आवडला...

मिल्या, तुझ्या गझलांची शैलीची स्वतःची अशी एक ओळख आहे. cant describe पण, 'मिल्याची गझल' इज डिफरंट हे जाणवतं दरवेळी! Happy

Pages