ताण (टेंशन) – एक बोधकथा
बारमाही कधीही वादळवारे, पाऊस पडणाऱ्या एका प्रदेशात एका धनिक शेकर्यााला घरकामासाठी, गोठ्यातील कामासाठी व गुरांची राखण करण्यासाठी एक नोकर हवा होता.
एका सकाळी एक मरतुकडासा मुलगा त्याच्याकडे आला व त्याने त्याच्याकडे नोकरीची याचना केली. "तू काय काय करू शकतोस?' असे मालकाने थोड्याशा टाळण्याच्या सुरातच त्याला विचारले.
मुलगा म्हणाला, "वादळीवार्यासह गडगडाटी धुवांधार पाऊस पडत असताना व वीजांचा कडकडाट होत असतांनाही मी रात्री शांतपणे गाढ झोपू शकतो !'
त्या धनिक शेतकर्यारला हे थोडेसे वेगळं वाटलं. त्याला एका महत्वाचा कामासाठी बाहेर जायची घाईसुद्धा होती. कुतुहलाने त्याने मुलाला ठेवून घेतले. काम संपवून तो रात्री उशिराने थकून परत आला .थकल्याने तो लगेच झोपायला गेला. मध्यरात्री नंतर उशिराने सोसाट्याचा वादळी वारा सुरू झाला, वीजांचा कडकडाट होत व ढगांचा मोठा गडगडाट घेऊन धुवाधार पाऊसही सुरू झाला. त्यामुले त्या धनिक शेतकर्याोची झोपमोड झाली. त्याला आठवले की, बाहेर पटांगणात गवत वाळायला टाकले होते.गोठ्यातील गुरांसाठी गव्हाणीत गवतही टाकलेले नव्हते व पाणीही ठेवलेले नव्हते.
त्याला काळजी वाटली. त्याने नोकराला जोरजोरात हाका मारल्या पण त्याचा
प्रतिसाद मिळाला नाही. घरात तो कुठेच नव्हता. शिव्या घालीतचं धनिक शेतकर्यााने रेनकोट चढवला , छत्री, विजेरी घेतली आणि तो माळावर गेला.तेथे त्याला सर्व गवत नीट आवरून, त्याचे
ढीग करून आच्छादून ठेवलेले दिसले. तसाच धावत गोठ्यात गेला. गव्हाणीत
गवत, पाण्याचा ड्रम भरून ठेवलेला दिसला,सर्व गुरे चारापाणी खाऊन समाधानाने झोपलेली होती.
त्याने कुतूहलाने पाहिले, गोठातील वरच्या पोटमाळ्यावर जागा स्वच्छ करून त्याचा नवा नोकर शरीराचे मुटकुळे करून घोरत होता! बाहेर निसर्गाचे एवढे
तांडव चालले होते पण ते त्याच्या गावीही नव्हते.
नोकर शांत झोपू शकला. कारण त्याला कसलाही ताण नव्हता. का नव्हता? झोपायला
जायच्या आधीच त्याने आपली सर्व कामे व्यवस्थित पूर्ण केली होती.
ताणाला तिथे आत शिरायला फटच ठेवली नव्हती!
ताण - तणाव (टेंशन) – एक बोधकथा
Submitted by pltambe@yahoo.co.in on 20 April, 2014 - 05:05
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ही बोधकथा मनापासुन प्रचन्ड
ही बोधकथा मनापासुन प्रचन्ड आवडली.:स्मित:
अप्रतिम बोधकथा!! जय हो!
अप्रतिम बोधकथा!!
जय हो!
आवडली.पण याअगोदर कुठेतरी
आवडली.पण याअगोदर कुठेतरी वाचली आहे.
फारच बोधप्रद गोष्ट! सर्व लहान
फारच बोधप्रद गोष्ट! सर्व लहान मुलांना परत परत सांगावी.
मागे कुणि एकदा म्हंटले होते की गीतेत जे कर्मफळाची अपेक्षा न करता आपले काम करत रहा हे सगळे मला काही कळत नाही. त्याला त्याच्या गुरुने सांगितले की आपले काम वेळच्या वेळी, मन लावून व नीट करावे की झाले. तेव्हढे जमले तर गीतेतले कळले असे समज.
मस्त. ताणाला तिथे आत शिरायला
मस्त.
ताणाला तिथे आत शिरायला फटच ठेवली नव्हती!
अप्रतिम.
येस्स वाचलेली ही अगोदर पण छान
येस्स वाचलेली ही अगोदर पण छान आहे.. माझे तर कान खेचणारी आहे, मला कधीही न जमणारा हा प्रकार.. आणि लाईफमध्ये टेंशन नाही तर मजा नाही अशी गंडलेली फिलॉसॉफी वापरून मी वेळोवेळी माझ्या हलगर्जीपणाचे आणि कामचुकारपणाचे समर्थन करतो
मस्त! आवडली बोधकथा..
मस्त! आवडली बोधकथा..
ऋन्मेष मी तुझा शिष्य ......
ऋन्मेष मी तुझा शिष्य ...... कळते पण वळत नाही.
आज करे सो कल कर, कल करे सो परसों
इतनी जल्दी क्या है यारो, जिंदगी पडी है बरसों
हे आमच्या जीवनाचे सूत्र. त्याने मग अचानक जाग येते अरे हे करायचे राहूनच गेले आता सकाळ कधी होणार?
छान लेख आणि त्यामागचा
छान लेख आणि त्यामागचा अर्थही.
ताणाला तिथे आत शिरायला फटच ठेवली नव्हती! अप्रतीम + १
.रॉबीनहूड ,तुम्ही वेळीच सावध व्हा . चुकीच्या गोष्टी कीतीही योग्य वाट्ल्या तरी त्या कधीतरी आपल्याला तोंड्घशी पाडतातच . तुम्ही मला फार मोलाचे वाक्य सांगितले होते ."सोशल साईट या केवळ एक छोटा भाग आहेत .पुर्ण आयुश्य नाही". तशीच काहीशी आहे ही ताणाची बोधकथा .