आयपीएल चे सातवे पर्व सुरू झाले आहे .... भारतात होणार, दुबईत होणार, बान्ग्लादेशात होणार की श्रीलंकेत होणार, मुंबई, राजस्थान खेळणार की नाही वगैरे चर्चांना आता पूर्णविराम मिळालाय..... पहील्या टप्प्यासाठी संघ दुबईत जाउन पोहोचायला देखील लागलेत..... मिडीयामध्ये अजुन फारशी हवा नसली (इलेक्शन इफेक्ट) तरी सेट मॅक्सवर काउंटडाऊन कधीचा सुरु झालाय... सहभागी संघ आपापले नवीन कर्णधार जाहिर करु लागलेत... खेळाडूंनी आयपीएल स्पेशल ट्वीट्सचा धडाका लावलाय....अश्यात भारतीय संघाने अनपेक्षितरीत्या २०-२० विश्वचषकाचे उपविजेतेपद पटकावल्यामुळे भारतीय चाहते जरा सुखावलेले आहेत..... सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच
माझा आवडता द्रवीड यंदा पहील्यांदाच आयपीएल खेळणार नसल्यामुळे गेल्या सहा स्पर्धेतला उत्साह आता कदाचित नसेल.... पण तरीही राजस्थानच्या डगाआउट मधली त्याची उपस्थिती सुखावणारी असेलच!
असो.... हा धागा आयपीएल-७ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया
फॅन्टसी लीग: (सौजन्य: उदयन)
नाव : aapali maayboli (english)
पासवर्ड : 12345 (english)
उदयन.. अखिल भारतीय ईशांत
उदयन.. अखिल भारतीय ईशांत शर्मा हेटर मंडळातर्फे तुम्हाला 'कारणे दाखवा' नोटीस का बजावू नये? सिनिऑरिटी प्रमाणे नेहरा खालोखाल हा मान आधी ईशांत शर्मा ला मिळायला हवा आणी मग दिंडा ला.
दिंडा, इशांत आणि नेहरा
दिंडा, इशांत आणि नेहरा करणार्यांनो मुनाफ पटेलला विसरू नका, त्याला चमकोगिरी करायची सवय नाही, आठवड्यातून एकदाच आंघोळ करतो, म्हणून कोणाच्या लक्षात येत नाही इतकेच.
तो आंघोळ करतो? बाथरूम मधे
तो आंघोळ करतो?![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
बाथरूम मधे बादली भोवती फेर्या मारून बाहेर येत असेल![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
>>कारण त्यांना सगळे नंतर
>>कारण त्यांना सगळे नंतर दिंडा म्हणायला लागले असते
आजची त्या दोघांची बॉलिंग बघता अशी वेळ बहुदा आली नसती!
<< पण मला प्रश्न असा पडलाय की
<< पण मला प्रश्न असा पडलाय की अॅरॉन आणि अॅल्बीच्या एकेक ओव्हर शिल्लक असताना दिंडाला का दिली शेवटची ओव्हर? >> स्वरुपजी, आतां तुम्ही असंही विचाराल, " दिल्लीने कोहलीचे दोन सोपे झेल कां सोडले ? ". टी-२०त असल्या अवघड प्रश्नांची उत्तरं न शोधणंच बरं !!![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
<< दिंडा, इशांत आणि नेहरा करणार्यांनो मुनाफ पटेलला विसरू नका, >>दिंडाला सहानुभूति मिळावी म्हटलं तर त्याच्या स्पर्धकांची दिंडीच निघाली कीं इथं !!!!
युवी 29 बाँल्स मधे 52
युवी 29 बाँल्स मधे 52 रन्स
आयपीएल आहे बाबानों सगळ्यांचा गेलेला फाँर्म परत येतो![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
युवी बॅक .. ज्याची आशा होतीच
युवी बॅक .. ज्याची आशा होतीच .. पाच षटकार .. २९ चेंडूत ५२ .. बँगलोर आता तर नक्कीच खतरनाक संघ .. शेवटच्या चारात यायला हरकत नाही ..
युवराजला त्याची लय सांपडणं ही
युवराजला त्याची लय सांपडणं ही खरंच आनंदाची गोष्ट; 'मॅच-विनर'ची त्याची प्रतिमाच सर्वांच्या मनात ठसून रहावी !!
चहलला 'मॅन ऑफ द मॅच ' !! अभिनंदन. [ मुरलीला बसवून त्याला संघात घेतलं होतं याचा केवढा दबाव असावा त्याच्यावर ! ]
99
99
100
100
चहल ला कोणत्या हिशोबाने
चहल ला कोणत्या हिशोबाने दिले?
१ विकेट 18 रन्स
त्यापेक्षा वरूण ने चांगली टाकली
३ ओव्हर ८ रन्स १ विकेट १ मेडन ओव्हर
<< त्यापेक्षा वरूण ने चांगली
<< त्यापेक्षा वरूण ने चांगली टाकली ...३ ओव्हर ८ रन्स १ विकेट १ मेडन ओव्हर >> १] चहलच्या ४ षटकात १८-१ आहेत २] वरूणला चौथी ओव्हर टाकायला दिली असती तर ..३] वरूणला न देतां चहलला चौथं षटक द्यावसं वाटणं व ४] विजय पाय रोवून उभा होता व त्याची विकेट त्यावेळीं महत्वाची होती [ व ती ज्या सफाईने चहलने घेतली ].. ह्या सर्व घटकांमुळें तौलनिक दृष्ट्या चहल हा वरूणपेक्षां वरचढ वाटला असावा !
खेळपट्टी 'फास्ट' किंवा 'स्लो'
खेळपट्टी 'फास्ट' किंवा 'स्लो' असणं माझ्या आकलनशक्तीतलं आहे; पण काल सर्वच जण- कोहलीसकट -खेळपट्टी ' डबल पेस्ड ' [double paced] आहे म्हणत होते. खरंच काय असतो हा प्रकार [ किंवा, खरंच असतो का असा कांहीं प्रकार ? कसोटीच्या प्रत्येक दिवशीं खेळपट्टी कशी 'वागेल' याचं भाकीत करणार्यांवर डॉन ब्रॅडमननी आपल्या पुस्तकांत ओढलेले ताशेरे वाचल्यापासून मीं अशा विधानांबद्दल जरा साशंकच असतो !]
पंजाब ची बाॅलिंग आत्तापर्यंत
पंजाब ची बाॅलिंग आत्तापर्यंत तरी फार आॅर्डिनरी आहे.
जॉन्सन असुन सुध्दा काहीच फरक
जॉन्सन असुन सुध्दा काहीच फरक दिसुन येत नाही १० च्या सरासरीने धुने चालु आहे मॅक्युलम ने तर तोफखानाच उघडलेला
जाॅन्सन रैना ला शाॅर्ट बाॅल
जाॅन्सन रैना ला शाॅर्ट बाॅल टाकत नाही????
दोन दोन कॅच सोडले वर
दोन दोन कॅच सोडले वर
भाऊ, आपल्या प्रंप्रिय (चुकून
भाऊ, आपल्या प्रंप्रिय (चुकून नाही, मुद्दाम लिहिलय तसं) दिंडा साठी काहीतरी चिताराल का? anyway, he is portrayed as one of the worst bowlers, but you may portray him as something else >>
बाकी हे दिंडासारखे लोकं भारताकडून खेळू कसे शकतात?
बाकी हे दिंडासारखे लोकं
बाकी हे दिंडासारखे लोकं भारताकडून खेळू कसे शकतात? >> एव्हढे काहि सरळ नाहिये रे. टेस्ट साठी सूटेबल असणारा, बाउन्स निर्माण करणारा बॉलर आपण लिमिटेड ओव्हर्स मधे सिटर्स पिचेस वर खेसिटर्स्वगैरे गोष्टी बघायला घ्यायला हव्यात. परत जेंव्हा ते फोर्ममधे असतात तेंव्हा आपण त्यांना टीम अॅटॉमॉस्फीरची ओळख व्हावी म्हणून ड्रिंक्स नेण्यासाठी वापरतो![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
दिंडाची बाजू घेतोय असे नाही फक्त बॉलर हा एव्हढा एकमेव फॅक्टर नाही एव्हढे सांगतोय.
योग्य प्रश्न हा आहे कि आयपीलमधे दिंडा कसा काय येतो ? बहुधा That tells us a lot about dearth of domestic pacers.
चेन्नाई २०५ ... अमेझींग इनींग
चेन्नाई २०५ ... अमेझींग इनींग
पंजाब योग्य पद्धतीत चेस करते
पंजाब योग्य पद्धतीत चेस करते आहे.. अजुन बेली बाकी आहे.. जिंकू शकतील... पंजाब वाले.. मिलर पण आहेच धोपटायला...
मॅक्सवेल ने ९५ रन्स
मॅक्सवेल ने ९५ रन्स मारले....४३ बॉल्स मधे तब्बल १५ चौकार आणि २ षटकार.......
टिम चा कॅप्टन ......
बरेच पॉईंट मिळणार
अरे या मॅक्सवेलला मुंबईने का
अरे या मॅक्सवेलला मुंबईने का सोडला
![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
आजचा एक सामना ४००+ धांवांचा
आजचा एक सामना ४००+ धांवांचा तर दुसरा अडखळतोय २६० धांवांवर, एकाच मैदानावर !!![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
राजस्थान रॉयल्सला १३४
राजस्थान रॉयल्सला १३४ धांवांसाठी २०व्या षटकापर्यंत धांपा टाकतच जावं लागलं !!!
गेल्या सामन्यातल्या निराशाजनक खेळानंतर आज मुंबई काय करते बघायचं.
>>राजस्थान रॉयल्सला १३४
>>राजस्थान रॉयल्सला १३४ धांवांसाठी २०व्या षटकापर्यंत धांपा टाकतच जावं लागलं
पण फिंच, वॉर्नर, धवन, सॅमी अश्या सॉलिड लाइनअप असणार्या संघाला १३३ धावात रोखले ही समाधानाची बाब.... आणि या १३३ धावांच्या पाठलागात रहाणे-बिन्नी या भारतीय जोडीचा मोलाचा वाटा होता.... वॉटसन, हॉज अपयशी ठरुनही राजस्थान जिंकले..... शुभेच्छा!
<< दिंडा साठी काहीतरी चिताराल
<< दिंडा साठी काहीतरी चिताराल का? >><< भाऊ, फेरफटकाने चांगलाच गुगली टाकला, त्याला तुम्ही बहुदा वेल लेफ्ट केलं. (अनुल्लेखाचा फटका मारून) >> तसं नाहीय; गुगली म्हणून सोडलेल्या साध्या ,सरळ चेंडुंवर माझी बर्याच वेळां विकेट गेलीय ! म्हणूनच, मीं खेळतोंच असले चेंडू, अर्थात जमेल तसं -
राजस्थान हा टिमवर्क जिद्द
राजस्थान हा टिमवर्क जिद्द चिकाटी वगैरे वगैरेचा उत्कृष्ट नमुना आहे. तिथे अकराच्या अकरा खेळाडूंना, आपण या सामन्यातले एक `की फॅक्टर' आहोत असे वाटते. त्यामुळे एवरेज खेळाडूंचा या आत्मविश्वासाने परफॉर्मन्स उंचावतो तर स्टार खेळाडूंना अतिआत्मविश्वास वा गर्व होत नाही. राहुल द्रविड संघात नसला तरी कालही तो द्रविडचाच संघ वाटला.
जागतिक आश्चर्य.. डिंडा ने ३
जागतिक आश्चर्य..
डिंडा ने ३ ओव्हर मधे अवघे १३ रन्स दिले आहेत आणि त्यात एक ही चौकार अथवा षटकाराचा समावेश नाही..
आजचा दिवस डिंडा सुवर्ण अक्षरांमधे लिहुन ठेवेल आणि समस्त मुंबई इंडियन्सच्या खेळाडुंना पार्टी देईल
मुंबई फलंदाजीचा अजून एक गचाळ
मुंबई फलंदाजीचा अजून एक गचाळ परफॉर्मन्स. पहिल्या सामन्यानंतर पडलेले प्रश्न सुटायच्या जागी वाढले. यंदा मुंबई शेवटच्या ४ मध्ये पोहोचणे कठीण वाटतेय. काहीतरी वेगळे करण्याची गरज.
Pages