१ कप तांदळाचे पीठ
१ कप रवा
१/२ कप मैदा
कोथिंबीर
मीठ
तेल
हिरवी मिरची बारीक चिरून
जीरे
आल (बारीक चिरुन. optional)
रवा+मैदा+तांदळाचे पीठ एकत्र करुन त्यात पाणि घालून घ्यावे. कन्सिस्टन्सी अगदी मठ्ठ्या प्रमाणे पातळ असायला पाहिजे. त्यात आता हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, जीरे आणि इतर जे हवे असतील ते घटक घालून घ्यावेत.
नॉनस्टीक तव्यावर थोड जास्त तेल घालून , नेहमी घालतो त्यापेक्षा थोड उंचावरून डोसे घालावेत. वरून तेल घालावे.
मोठा गॅस करून क्रिस्पी होईपर्यंत ठेवावे. उलटु नये. डोसा बाजूने सुटु लागला कि लाक्डी उलथण्याने काढून गरम गरम सर्व्ह (चटणी किंवा मेतकुट सोबत )करावा.
जस जसे डोसे घालू तस तस मिश्रन घट्ट होत जाते. पाणी घालून मिश्रणाची कन्सिस्टन्सी पातळच असण गरजेच आहे.
ओनिअन रवा डोसा करताना कांदा बारीक कापून डोसा घालून झाल्यावर पसरायचा. अगदी रेस्टॉरंट प्रमाणे डोसा तयार होतो. रवा डोसा क्रिस्पीच पाहिजे. त्यामूळ गॅस मोठाच असावा.
ही रेसीपी खूप versatile आहे. तुम्ही तुम्हाला हव्या त्या चविप्रमाणे बदल करु शकता.
बरेचजणींनी लिहिलय वेडावेकडा डोसा होतो, त्यांच्यासाठी . डोसा पुर्ण तवा भरून घालायचा. वरती मी पुर्ण चौकोनी तवा भरून घातलाय तसा.
वा वा! मस्त रेसिपी आहे..
वा वा! मस्त रेसिपी आहे..
मी पण केला हा मागच्या
मी पण केला हा मागच्या आठवड्यात. सुपर्ब झाले डोसे!! अप्रतिम रेसिपी!!
मी ही केले एकदाचे आणि चक्क
मी ही केले एकदाचे आणि चक्क जमले (आकार काही जाईने दिलेल्या फोटो इतका सुरेख नाही जमला. कधी नकाशा, कधी गोलाजवळपास जाणारा आकार असं झालं होतं) मी थोडं दही घातलं होतं त्यामुले आलेला आंबटपणाने चव अधीक चांगली लागली. धन्यवाद सीमा आणि बाकीही टिपा देणार्यांना
फोटो टाकलाय. सर्वाना धन्यवाद.
फोटो टाकलाय. सर्वाना धन्यवाद.
हायला, हा फोटो कधी टाकला ?
हायला, हा फोटो कधी टाकला ? ... कसला भारी आलाय फोटो ! म्हणजे रवाडोसा तर तोंपासु दिसतोच आहे पण फोटो सॉलिड काढला आहेस. नेहेमीप्रमाणेच
हा डोसा दाखवल्याबद्दल मंजूडीचे स्पेशल आभार
Its looking really crispy and
Its looking really crispy and yummy
जल्लां अगो, मी माझ्या फोटूची
जल्लां अगो, मी माझ्या फोटूची झाईरात केली तर तू सीमाच्या फोटूचं कवतिक करतीस??? बघून घेईन
असं झालं का ? पाहिला, पाहिला
असं झालं का ?
पाहिला, पाहिला आत्ताच. मस्त आहे तुझाही रवाडोसा
तू ते हे आहेत त्यांच्यासारख्या डायरेक्ट कमेंट्स टॅग करायला शिक बघू
होय, होय.. शिकले होते, पण
होय, होय.. शिकले होते, पण विसरले
युट्युब लिंकमध्ये
युट्युब लिंकमध्ये दाखवल्याप्रमाणे मी यापूर्वी डोसे केले होते.पण हात पीठात बुचकळून डोसे करायला कंटाळा आला होता.आता वरच्या पध्दतीने करून पाहीन. चटणीची कृती मस्त वाटतेय.
तोपासु... मस्त. डोस्या चा
तोपासु... मस्त. डोस्या चा हट्ट पोरं कधी पण करतात.. दर वेळेला पीठ असतच अस नाही...
नक्की करुन पाहिन..
आज केले होते, मस्तच झाले
आज केले होते, मस्तच झाले
मस्त रेसिपी आहे. खरोखर अगदी
मस्त रेसिपी आहे. खरोखर अगदी कमी वेळात होणारी.
इथली चर्चा वाचून मी कणीक घातली मैदा न घालता. चवीला छान झाला डोसा.
धन्यवाद सीमा!
काल हा धागा वर आला म्हणून मग
काल हा धागा वर आला म्हणून मग रात्री जेवणाला हे केले होते. पहिले १-२ दोसे लवकर काढायच्या प्रयत्नात फसले. नंतर छान झाले. मात्र "उंचावरून" चे बरेच वेगवेगळे प्रयोग झाल्याने जो काय राडा झाला तो आवरायलाच फार कष्ट पडले. ते आवरेपर्यंत मला परत भूक लागली होती.
आत्ता ब्रेकफास्टला हे दोसे
आत्ता ब्रेकफास्टला हे दोसे केले. अप्रतिम झाले. सुंदर जाळी पडली. तवा भरपूर तापवल्यावर जाळी पडायला उंचीची अट उरत नाही असं लक्षात आलंय.
मैद्याऐवजी सुजाता मल्टीग्रेन आटा वापरला.
थँक्यू सीमा!
पुन्हा एकदा रवादोसा,
पुन्हा एकदा रवादोसा, सीमाच्या पाककृतीनं.......
मस्त आहे फोटो...
मस्त आहे फोटो...
jar konala chinchechi chatani
jar konala chinchechi chatani karta yet asel tar mala sanga.
मी आधी इथे लिहील्याप्रमाणे ३
मी आधी इथे लिहील्याप्रमाणे ३ कप रवा आणि १ कप तांदळाची पिठी घेऊन करायचे. आज २ कप रवा, १ कप तांदळाची पिठी, अर्धा कप मैदा, २ टेबलस्पून आंबट दही, एक मोठा कांदा, ६ कप पाणी घालून केलं. टेक्सचर मस्त आलंय.
जबरी फोटो आहे, अंजली!!
जबरी फोटो आहे, अंजली!!
मस्त फोटो अंजु. दही घालून
मस्त फोटो अंजु. दही घालून बघते कसा लागतो ते.
अलिकडे मी हे कोरडे पीठ तयार करुन ठेवते घरात. मैत्रिणींना पण दिल. खुश झाल्या एकदम. आयत्यावेळी माल मसाला आनि पाणि घातले कि झाले.
मी पण करुन बघितला. मैदा वगळुन
मी पण करुन बघितला. मैदा वगळुन केला पण मस्त कुरकुरीत झाला होता.
धन्यवाद.
आजच बनवले..छान झाले होते!
आजच बनवले..छान झाले होते!
Pages