Submitted by स्वाती२ on 13 April, 2014 - 10:25
नमस्कार,
माझे आई-बाबा ठाण्याला एकटेच रहातात. दोन दिवसांपूर्वी बाबा अचानक आजारी पडले. सोसायटीमधील लोकांनी खूप मदत केली. मात्र या सगळ्यात नर्सिंग ब्युरोतून कुणी दादा/ताई मदतीला मिळाल्यास बरे पडेल असे जाणवले. कृपया मला ठाण्यातील चांगले नर्सिंग ब्युरो सुचवाल का? माझे आईबाबा वसंत विहारच्या जवळ रहातात.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्वाती२, खरच,
स्वाती२,
खरच,
मला ठाण्याच्या ब्युरोचा अनुभव
मला ठाण्याच्या ब्युरोचा अनुभव नाही. पण गेली तीनचार वर्षे माझ्या आईसाठी पुण्यात ब्युरोची बाई २४ तास ठेवली होती. त्यातले काही मुद्दे-
१. एखादी बाई आवडल्यास व चांगले काम करीत असल्यास- तीच हवी अस. स्पष्ट सांगावे. या बायका वर्षातून दोन आठवडे सुट्टीवर जातात. परत आल्यावर त्यांना दुसर्या घरात पाठवतात. तसे चालणार नाही हे आधीच बोलून ठेवणे. नवीन बाईला सगळे परत शिकवण्यास त्रास होतोच.
२. कधीकधी हे लोक अगदी थकलेल्या वयस्क बायापण पाठवतात. त्यांच्याकडून काहीच काम होत नाही. त्यांची दया येते पण मग घरातल्या आजारी माणसाचे कोण करणार?
३. अगदी तरुण मुली असल्या तर इतरही प्रश्न येतात. त्यांचे मित्र वगैरे घरी येणे वा त्या मित्राना आईबाबा एकटेच राहतात हे कळणे जरा धोक्याचे वाटते. या सर्व बाबींचा विचार करता मध्यमवयीन बाई नेहमीच बरी वाटते.
४. आपण भारतात जातो तेव्हा काही बाया आपल्यासमोर फार गोड वागतात पण आपल्या माघारी अपमान करायलाही कचरत नाहीत. तुम्हाला घाबरवायचा हेतू नाही पण माझा मावसभाऊ मधून मधून येऊन बघत असे त्यामुळे वचक रहायचा. तसे कोणी नातेवाईक असल्यास बरे राहील. अर्थात अशा बायांना माझी आई खंबीर असल्याने तीच तक्रार करून परत पाठवीत असे.
या सगळ्यामधूनही अगदी नम्र, विश्वासू व सेवाभावी अशाही बाया मिळाल्या आहेतच. तेव्हा सरसकट सगळ्या वाईटच नसतात.
अजून आठवेल तसे लिहिते.
घरातील किंमती वस्तू लॉकर
घरातील किंमती वस्तू लॉकर मधे ठेवाव्यात.. त्या बायका चोरी करतील असे नाही, पण आपल्या कडून काळजी घेतलेली बरी...
सुजा, पुन्हा एकदा
सुजा, पुन्हा एकदा धन्यवाद.
मधुरिमा, तुमची पोस्ट खूप मार्गदर्शक आहे.
राजसी तुझ्या साबानी
राजसी तुझ्या साबानी सांगितलेली माहिती बरोबर आहे.पुण्याच्या अथश्री मधे भाड्याने राहता येते.माझे मामेसासरे औंधच्या अथश्रीमधे भाड्याने राहात आहेत.चांगली सोय आहे.
बेलापूरला नर्मदा निकेतन आणि
बेलापूरला नर्मदा निकेतन आणि विश्रामधाम असे दोन वृद्धाश्रम शेजारी शेजारी आहेत. गूगल केल्यास नंबर मिळतील. ९८-२००६ माझी आजी तिथे राहत होती. अनुभव खूप चांगला नसला तरी बरा होता. लोणावळ्याला एक खूप चांगला वृद्धाश्रम आहे. जांभूळ्पाड्याला लोक्मान्य सेवा संघाशी संबंधित एक वृद्धाश्रम आहे.
बोरिवली पूर्वेला दौलत नगर मध्ये एक वृद्धाश्रम आहे. पण तिथे वेटिंग लिस्ट बरीच आहे.
गोव्याला श्री शांतादुर्गेच्या मंदिराजवळ एक वृद्धाश्रम आहे तोही खूप चांगला आहे. तिथे ज्या वृद्धांना चालतो आणि हवा असतो त्यांना मत्स्याहार देखील दिला जातो.
ज्या वृद्धांच्या जाणीवा संपल्या आहेत अशा वृद्धांना ठेवण्यासाठी जोगेश्वरी पूर्व - सारस्वत कॉलोनी इथे डॉ वाघ यांचे नर्सिंग होम आहे.
वृद्ध मानसिक रुग्णांना सांभाळण्यासाठी सफाळ्याला एक नर्सिंग होम आहे.
Pages