मी वा़कड, पुण्यात एक/ दोन महिन्यात घर विकत घ्यायचा विचार करत आहे... सध्या नेटवर आणि फोनकरुन एक नवीन सोसायटी पसंद पडली आहे,
तर ही जागा मी गुगल मॅप्सवरुन बघितली पण हे २/३ वर्षापूर्वीची वाटते... तर मला माबो - पुणेकरांकडून खाली माहिती पाहिजे.
१. पाणीपुरवठा - पिंचिमपाकडून होतो का?
२. सार्वजनिक बस सर्व्हीस आहे का?
३. चांगल्या शाळा/ लहान मुलांचे डॉक्ट्रर/ हॉस्पीटल आहे का?
४. रात्री १२ नंतर फिरु शकतो का?
५. आजुबाजूला दुकाने/ मॉल्स/ बॅक आहेत क?
अजून पुढे त्या बिल्डरचा अजून एक प्रोजेक्ट्स आहे, कल्पतरु स्प्लेडंर .. तिकडे २० लाख अजून कमी आहे... तर ती जागा कशी आहे?
मी एक महिना अजून रिर्सच करुन ३ प्रोजेक्ट्स शोधणार आहे आणि नंतर पुण्यात येऊन त्याच्यातल्या एक घेणार आहे... अजून तुम्हाला रेडी पझेशन किंवा ६ महिन्यात रेडी होणारा वाकडमध्ये चांगला प्रोजेक्ट माहीती असेल तर जरुर सांगा...
बजेट - ८० ते ११० लाख - ३ बीएचके वाकड
धन्यवाद!
अवांतर - अशीच माहिती कोणाला मुंबई/ नवी मुंबईविषयी माहिती असेल तर मला विचारा...
८६ ते ९० लाख होतील >>> बाप
८६ ते ९० लाख होतील >>> बाप रे!!! काय वाढतायेत किमती!!!
ह्य बजेट मध्ये निगडी
ह्य बजेट मध्ये निगडी प्राधिकरण मध्ये एखादा जुना बन्गलो अथवा रो हाउस मिळु शकेल. (४-६ महिन्यामगे एका ओळखीच्यांनी त्यांचे रो हाउस ७५ लाखाला विकले. नवीन बन्गलो १२० लाखाला डील झालेले.) >>> ??? झक्या एवढे स्वस्त नाहिये रे.. मित्राने २ महिन्यापूर्वी २ bhk घेतला ६८ लाखाला.. भोसरी प्राधिकरणात असेल. निगडी प्राधिकरणात बंगलो १.२ cr केवळ अशक्य आहे.
कल्पतरू हार्मोनी … प्रोजेक्ट
कल्पतरू हार्मोनी … प्रोजेक्ट चांगला आहे पण अनुभवाप्रमाणे हा बिल्डर किंमत जरा जास्त सांगतो .
बाकी तुम्ही विचारलेली महिति….
१. पाणीपुरवठा - पिंचिमपाकडून होतो का?
-> होय
२. सार्वजनिक बस सर्व्हीस आहे का?
-> आहे पण पुरेशी नाही .
-> ह्यासाठी कमीत कमी ३०० ते ४०० मीटर चालायची तयारी ठेवा . वर्किंग डेज ला हिंजवडी साठी बसेस मिळतात (वाकड - औंध रोड पर्यंत चालत यावे लागेल)…ह्या बसेस तुडुंब भरलेल्या असतात ….
३. चांगल्या शाळा/ लहान मुलांचे डॉक्ट्रर/ हॉस्पीटल आहे का?
शाळा : आहेत (उदा. युरो स्कूल )
हॉस्पिटल्स : सर्वात जवळचे (सर्व सोयी असणारे ) हॉस्पिटल : आदित्य बिर्ला (४-५ कि. मि. )
४. रात्री १२ नंतर फिरु शकतो का?
फिरू शकतो …. पण खरच तुम्ही रोज रात्री १२ नंतर फिरणार आहे का?
५. आजुबाजूला दुकाने/ मॉल्स/ बॅक आहेत क?
नाही … किराणा माल/ भाजीपाल्याच्या च्या दुकानासाठी कमीत कमी छत्रपती चौकात जावे लागेल . वाहन असणे गरजेचे .
बाकी …मॉल्स बद्दल म्हणाल तर … D - Mart - हिंजेवाडी (३ किमी), मोर - पिंपळे सौदागर (४-५ किमी) , मोर - जगताप डेअरी (३ किमी)…
मी ह्याच परिसरात हौसिंग लोन (SBI Home Loan ) आणि रिअल इस्टेट चा व्यवसाय करतो . तुम्हाला अजून काही माहिती लागल्यास मला कधीपण संपर्क करू शकता . सर्वसाधारण माहितीसाठी शुल्क आकारले जात नाही.
P.S. : इथे जाहिरात करण्याचा हेतू नाही .
धन्यवाद गणोबा! मी लोन
धन्यवाद गणोबा! मी लोन आयसीआयसीआय बॅकेतून घेणार आहे आणि सुखवानी सेपिया मध्ये ३ बीएचके घेणार आहे... मला नेटवर रिसेलमध्ये ७५ लाखामध्ये (सगळं धरुन) ३ बीएचके दिसला (वाकड, पिंपळी सौदागर) नाही, जर तुमच्याकडे असं डिल असेल तर मला या गुरुवारच्या अगोदर विपू करा..
Ganoba Wakad madhye, RK
Ganoba
Wakad madhye, RK Lunkad che 2 project baghitale Akshay Tower ani Aromatic wind.
Aromatic wind changla vatala..hya builder baddla aapale kay mat aahe.
.karan me punyat ghar ghyaycha vichar kartoy..ani wakad mumbaila javal mhanun pasanti aahe.
Thanks for your review..
दिपक - अक्षर टॉवर प्रोजेक्ट
दिपक - अक्षर टॉवर प्रोजेक्ट लोकेशन चांगले आहे आणि बिल्डर लोकल आहे पण प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण करतो (६ महिने वरखाली).. अजून माहिती गणोबा देतीलच..
मी अजून एक प्रोजेक्ट बघितला
मी अजून एक प्रोजेक्ट बघितला आहे... लोडींग फक्त २०%.. ८२ लाखात ३ बीएचके (Royal Entrada, वाकड) कॉर्पेट एरिया ११२५... कसा वाटतो ते सांगा? उद्या बुक करायचा आहे...
Royal Entrada,
Royal Entrada, वाकड...location chhan aahe....aikle ki tithe mall multiplex yenar aahe Sayaji chay bajula...mhanun aromatic changla vatato aahe..
Ase zale tar mastach aahe..
शेवटी व्यवहार झाला... मी
शेवटी व्यवहार झाला... मी रॉयल इनट्राड, वाकड मध्ये ३ बीएचके ८३ लाखाला (कॉर्पेट एरिया ९५९ + टेरेस १६६ स्क्वे फूट) घेतला. सगळे पैसे चेकमध्ये द्यायचे आहे.. ग्रीन हाउस प्रोजेक्ट आहे.. बिल्डरने दिलेली माहिती पिचिमपाच्या वेबसाईटवर डबलचेक केली- https://www.pcmcindia.gov.in वेबसाईट्चा फायदा झाला (जमीन मालकी/ बांधकामाचे परवानग्या/ वाकडचा डीपी प्लॅन).
धन्यवाद!
अभिनंदन… रेट काय दिला
अभिनंदन… रेट काय दिला तुम्हाला...
PCMC साईट मस्तच आहे.
दिपक - प्रत्येक बिल्टअप स्के
दिपक - प्रत्येक बिल्टअप स्के फूटला ५२०० रुपये (एकूण बिल्टअप स्के फूट १३५४) आणि ४ लाख कव्हर पार्किग आणी इतर चार्जेस, MSEB etc.
Pages