बोलक्या रेषा - ५

Submitted by बोलक्या रेषा on 14 June, 2013 - 00:25

आता मायबोलीवर नियमीत पहा !! बोलक्या रेषा!!!

BoRe5.jpg

प्रताधिकार : श्री. घनश्याम देशमुख. श्री. घनश्याम देशमुख यांच्या परवानगीने प्रकाशीत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आई सोडून कशावरही बोललेत हे तासन्तास>> बघ ना, आपल्याकडे "तुझी आई अशी आणि माझी आई अशी" यावर एक प्रबंध झाला असता. Happy मस्त आहेत या बोलक्या रेषा.

माझ्या मते, दुसरीच कुणी बाई यांच्या घरी येऊन पाहुणचार घेत आहे. त्याला वाटते "तिची आई" , तिला वाटतंय "त्याची आई".. आणि दोघेही शांत आहेत Happy Happy

चित्र सुंदर आहे, परंतू विनोद पटण्यासारखा नाही. ओरिजिनल विनोद वेगळाच आहे.

खरे तर हा विनोद एका पाहुण्याबद्दल आहे, जो एका जोडप्याकडे जाऊन राहतो व नवरा बायको दोघांनाही वाटत राहते की हा बायकोचा/ नवर्‍याचा नातेवाईक आहे. बर्‍याच काळाने जेव्हां दोघांच्याही लक्षात येते की हा आपल्या दोघांच्याही नात्यातला नाही तेव्हां ते त्याला खडसावून विचारतात ' कायहो, तुमचा आमचा संबंध काय?' तेव्हां तो इरसाल पाहुणा उत्तर देतो- ' बादरायण (बोरीच्या माध्यमातून) संबंध आहे! तुमच्या अंगणात बोरीचे झाड आहे, व माझ्या बैलगाडीला बोरीच्या लाकडाचे चाक आहे. म्हणून आपण संबंधी आहोत.'
या गोष्टीवरून मराठीत ' बादरायण संबंध' हा वाक् प्रचार रूढ झाला आहे.

दुसरीच कुणी बाई यांच्या घरी येऊन पाहुणचार घेत आहे. त्याला वाटते "तिची आई" , असेल तिला वाटतंय "त्याची आई".. असेल. आणि दोघेही एकमेकाशी या विषयावर आपसात बोलत नाही बोलायची पद्धतच नसावी.
(मुखदुर्बल माणसं)
बबनराव तळेकर

एकविसाव्या शतकात सोळाव्या शतकातला जोक देण्यात काय हशील आहे?>>>>

विनोद कधी शिळा होत नाही.
इथे तर चक्क रेषा बोलतायत.

Back to top