Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 20 January, 2014 - 22:13
गझलेतील प्रत्येक शेर दणकेबाज किंवा उत्तम होतोच असे नाही... मात्र बर्याचदा गझलेतला एखादा किंवा दुसरा शेर मनात रुंजी घालून रहातो. असे हासिल-ए-गझल शेर त्या गझलकाराच्या नावासहित इथे शेअर करु या. किंवा कित्येकदा आपण एखादा शेर लिहून जातो..पुढे त्याची गझल होत नाही असे फुटकळ शेर इथे शेअर करु या.
सर्व शेर प्रतिसादात लिहावेत ही विनंती.
--डॉ.कैलास गायकवाड.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तू बोलव मी आले नव्हते असे
तू बोलव मी आले नव्हते
असे कधीही झाले नव्हते
कसे प्रसवले दु:ख अचानक
अजून तर ते न्हाले नव्हते
प्रशांत पोरे
न्हाले नव्हते<< वाह पोरे
न्हाले नव्हते<< वाह पोरे वाह
माझ्या माहीतीप्रमाणे मराठी शायरीत ही कल्पना वापरून शेर ह्या आधी झाला नसावा
न्हाले न्हवते = नहाण आले नव्हते ...
भन्नाट आवडला हा शेर
सरकत गेली वाळू पायाखाली
सरकत गेली वाळू पायाखाली जेव्हा
सागरतीरी होतो जाणिव झाली तेव्हा
नेहमी शोधीत येते ते मला
नेहमी शोधीत येते ते मला माझ्याकडे
सोडले होते कितीदा एकटेपण दूर मी....
जयदीप
मागे एक मतला झाला होता . पण
मागे एक मतला झाला होता . पण नंतर कवाफी विशेष न मिळाल्याने गझल झालीच नाही . असो .
मला तर चालला असता पुजेला देव कोणीही
ह्रदय घडवीण मी त्याचे दगड तू ठेव कोणीही
-सुशांत
भेळपुरीवाला कळाला नाही विपुत
भेळपुरीवाला कळाला नाही
विपुत ज्ञानांमृत पाजणार का?
रेखीव तरी आहेस किती मोडून पहा
रेखीव तरी आहेस किती
मोडून पहा ना मूस कधी
=====================
काय तुझ्याही दारी आला तो फिरता विक्रेता
शर्टापेक्षा कपाळ ज्याचे कळकटलेले आहे
-चित्तरंजन भट
मला देवपण काहिही देत
मला देवपण काहिही देत नाही
तुझ्यासारखे मागता येत नाही
जयदीप
सारखे दोघे परंतू न्याय
सारखे दोघे परंतू न्याय त्यांना वेगळा !
बंधने सारी 'तिला' अन 'तो' सदा का मोकळा ?
पहा जरा भांडून मनाशी..गझल
पहा जरा भांडून मनाशी..गझल तुलाही लिहिता येइल
दुनियेपासुन दूर राहुनी दुनियेवरती लिहिता येइल
--सुशांत
फुलाशी गप्पांत
फुलाशी गप्पांत त्याच्या..शब्दांच्या शृंकला,
माणूस पाहुनी मात्र...तो न जाने का भुंकला!
मंदिरात मूर्तीशी हात त्याने जोडीले,
उतरताना पायऱ्या...भिकाऱ्यापाशी तो थुंकला.
नरकाचे शाप दिले...त्यासी जगाने
अन तो म्हणे, मी स्वर्ग जिंकला
-- आशिष राणे
फुलाशी गप्पांत
फुलाशी गप्पांत त्याच्या..शब्दांच्या शृंकला,
माणूस पाहुनी मात्र...तो न जाने का भुंकला!
मंदिरात मूर्तीशी हात त्याने जोडीले,
उतरताना पायऱ्या...भिकाऱ्यापाशी तो थुंकला.
नरकाचे शाप दिले...त्यासी जगाने
अन तो म्हणे, मी स्वर्ग जिंकला>>>>>>>>.
तिन्ही शेर जबरदस्त... जियो
आशिष आणि स्नेहनिल, अगोदर शेर
आशिष आणि स्नेहनिल, अगोदर शेर काय असतो ते समजून घ्यायला हवे.
चांगला शेर लिहिणे सोपे काम नाही.
@समीर चव्हाण तशी मला शेर
@समीर चव्हाण
तशी मला शेर लिहायची सवय नाहीये.
शेर लिहिण्याचे काही नियम असतील तर नक्की सांगा
मी तसे लिहिण्याचा प्रयत्न करेन
दोन्ही ओळी एका वृत्तात
दोन्ही ओळी एका वृत्तात हव्यात, ही तांत्रिक बाब.
शेर समजून घेण्यासाठी काही गझल वाचल्यात तर कळू शकेल.
समीर
गच्चीवरी बसाया येऊ नकोस
गच्चीवरी बसाया येऊ नकोस चंद्रा
माझ्या इमारतीचा पाया हवेत आहे !
-सतीश दराडे .
गच्चीवरी बसाया येऊ नकोस
गच्चीवरी बसाया येऊ नकोस चंद्रा
माझ्या इमारतीचा पाया हवेत आहे <<<
क्षमस्व, शेर म्हणावा असे ह्यात काहीही नाही.
गच्चीवरी बसाया येऊ नकोस
गच्चीवरी बसाया येऊ नकोस चंद्रा
माझ्या इमारतीचा पाया हवेत आहे <<<
काय म्हणायचं तेच स्पष्ट होत नाही मलातरी.
एक नवीन शेरः बलाट माझ्या
एक नवीन शेरः
बलाट माझ्या भाळावर मी लिहून आलो
सुनावणी कोणतीच ना ऐश्या दरबारी
समीर चव्हाण
बलाट माझ्या भाळावर मी लिहून
बलाट माझ्या भाळावर मी लिहून आलो
सुनावणी कोणतीच ना ऐश्या दरबारी<<< वा वा
माझेही दोन नवीन शेरः तुला
माझेही दोन नवीन शेरः
तुला हव्या त्या क्षणी कधीही तुझ्या नशीबी नसेन मी
तुला म्हणालो नसेन मी हे मला म्हणालो असेन मी
इतके दरिद्री मन कसे आहे तुझे
फुकटातही मी परवडत नाही तुला
-'बेफिकीर'!
व्वा सर.... धन्यवाद!!! बलाट
व्वा सर.... धन्यवाद!!!
बलाट >> आळ ना?
बलांट असाही शब्द आहे का?
तुला हव्या त्या क्षणी कधीही
तुला हव्या त्या क्षणी कधीही तुझ्या नशीबी नसेन मी
तुला म्हणालो नसेन मी हे मला म्हणालो असेन मी
इतके दरिद्री मन कसे आहे तुझे
फुकटातही मी परवडत नाही तुला
व्वाह!!!!!!!!
दुसरा शेर तर...... खूपच आवडला!!!!!!!!!!!! .....धन्यवाद सर!
इतके दरिद्री मन कसे आहे
इतके दरिद्री मन कसे आहे तुझे
फुकटातही मी परवडत नाही तुला
व्वा.
जयदीपः आपले बरोबर आहे, बलाट म्हणजे (खोटा) आळ.
बलांट असाही शब्द दिसत आहे.
बेफीजींचे दोन्ही व समीरजींचा
बेफीजींचे दोन्ही व समीरजींचा एक शेर आवडले
बलांट /बलाट हे दोनही शब्द माझ्यासाठी नवे मी 'बालंट' असा शब्द ऐकला आहे
नाव न होते माहित तेव्हा इतका
नाव न होते माहित तेव्हा
इतका दुःखी नव्हतो रोगा
जयदीप
वा वा...समीर ,बेफि आणि
वा वा...समीर ,बेफि आणि जयदीप.... शेर आवडले.
निरागस बालकाच्यासारखा झोपेन
निरागस बालकाच्यासारखा झोपेन मी
कुणीही ऐकवावी एक अंगाई मला
-बेफिकीर
हासरा हा चेहरा का छान कौतुक
हासरा हा चेहरा का छान कौतुक दावितो
वेदना माझीच मी या चेहऱ्याने लपवितो . .
जाणून मीच आहे अप्रूप काय
जाणून मीच आहे अप्रूप काय तुजला
गाली गुलाब दोन्ही मी फूल काय द्यावे . .
Pages