Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 11 April, 2014 - 02:40
जरी मोठा न आवाका जिवाला आव मोठा दे
( नको छोटे शहर वसण्याकरीता गाव मोठा दे )
शिकस्तीने जराशा जाहले हतबल जगज्जेते
पराभव काय असतो जाणण्या पाडाव मोठा दे
नको टोचूस वारंवार जखमाही दिसत नाहित
जगाला दावण्यासाठी तरी तू घाव मोठा दे
कसा सल काळजामधला कुण्या ओळीमधे मांडू
लिहाया वेदना सारी पुरेसा ताव मोठा दे
पुरे झालीत सारी आडवळणे जीवनामधली
सहल संपायला रस्ता जरा भरधाव मोठा दे
कधी जिंकायचा ''कैलास'' नाही,जाणतो आहे
पराभुत व्हायच्या साठी तरी तू डाव मोठा दे
-- डॉ.कैलास गायकवाड
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच!
मस्तच!
मस्तच!
मस्तच!
आवडली....!
आवडली....!
mastach
mastach
शिकस्तीने जराशा जाहले हतबल
शिकस्तीने जराशा जाहले हतबल जगज्जेते
पराभव काय असतो जाणण्या पाडाव मोठा दे<<< शेर आवडला.
(शेवटच्या शेरात पराभुत असे हवे आहे ना?)
पाडाव सर्वात जास्त आवडला ताव
पाडाव सर्वात जास्त आवडला
ताव ,,,'कागदाचे ढीग संपावे तरी उरते कधी' ..हा शेर आठवला
घाव पण छान
इतर शेरही आवडलेच (मतला जरा कमी )
छान गझल
छान गझल
मस्तच ...आवडली . भरधाव आणि
मस्तच ...आवडली .
भरधाव आणि जगज्जेत्यांचा े शेर विशेष .
मस्तच ...आवडली . भरधाव आणि
मस्तच ...आवडली .
भरधाव आणि जगज्जेत्यांचा े शेर विशेष .
धन्यवाद सर्वांचे. भूषणजी
धन्यवाद सर्वांचे. भूषणजी बदल केला आहे.
काही शब्दवापर खटकले उदा.
काही शब्दवापर खटकले उदा. करीता, जाहले
(...) च्या उद्देश्य लक्षात आला नाही.
रस्त्याचा, शिकस्तीचा शेर छान.
'पाडाव' आणि 'भरधाव' हे सर्वात
'पाडाव' आणि 'भरधाव' हे सर्वात विशेष वाटले.
आवडली !
आवडली !