Submitted by गजानन on 10 April, 2014 - 04:59
मराठी पाठ्यपुस्तकातील धड्यांची चर्चा करण्यासाठी एक धागा जुन्या मायबोलीत होता.
आता इथल्या दुसर्या एका बाफावर अशी चर्चा सुरू झाली आणि त्या धाग्याची आठवण झाली, म्हणून हा धागा काढला.
जुन्या धाग्यावरही बरीच चर्चा आहे. तीही जरूर वाचा.
जुन्या धाग्याचा दुवा: http://www.maayboli.com/hitguj/messages/46/4554.html
तर ती चर्चा इथे चालू ठेवू.
इथे प्रताधिकाराचा भंग होईल असा मजकूर (कॉपी पेस्ट / चित्रे) प्रतिसादात देऊ नका.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गजानन, धागा मस्त आहे. आत्ता
गजानन, धागा मस्त आहे. आत्ता आठवून पाहिलं तर नववी आणि दहावीतलेच धडे जास्त आठवत आहेत.
रेडियोची गोष्ट ( दि.बा.मोकाशी ), लाल चिखल, स्मशानातील सोनं, दर्शनमात्रे ( सुनीता देशपांडे ), सुंदर ( श्री. दा. पानवलकर ? ), पुलंचा वजन कमी करण्यावर एक विनोदी धडा होता तसेच अपूर्वाईमधीलही काही परिच्छेद होते. अपूर्वाई वाचताना तो भाग आला की लगेच शाळेचे दिवस आठवतात
एव्हरेस्ट सर करतानाच्या अनुभवांवर एडमंड हिलरी ह्यांचा एक अनुवादित सुंदर धडा होता. कोणत्या वर्षाला होता ते आठवत नाही !
बालकवी ह्यांची 'औदुंबर' ही कविता शिकताना बरीच चर्चा झडली होती ते आठवते.
आगाऊ, त्या ना.सी. फडक्यांच्या धड्यावरुन प्रेरणा घेऊन मी ही एक लघुनिबंध लिहिला होता आणि त्यात समोरच्या पांगार्याच्या झाडाकडे तंद्री लावून बसलं की कशा नवनवीन कल्पना सुचतात असं काहीतरी होतं. आहे ती वही अजून आईकडे
आठवेल तसे लिहिते ...
पुलंचा वजन कमी करण्यावर एक
पुलंचा वजन कमी करण्यावर एक विनोदी धडा होता>>>>>>>>>>> पंत बरेच की हो रोडावलेत.....
अत्र्यांवरून आठवल..एक धडा
अत्र्यांवरून आठवल..एक धडा म्हणून 'साष्टांग नमस्कार' मधला पण काही पार्ट होता..
कोणाला औंधचा राजा आठवतोय का ? लेखक मला वाटत माडगूळकर असावेत
सुंदर नावाच्या हत्तीची एक कथा होती. तो आधी सर्कसमध्ये असतो, नंतर राज दरबारात. पण राजा त्याच्या भावना जाणतो. मस्त होता तो धडा.
@ अनिश्का तो धडा 'उपास'
@ अनिश्का
तो धडा 'उपास'
एव्हरेस्ट सर करतानाच्या
एव्हरेस्ट सर करतानाच्या अनुभवांवर एडमंड हिलरी ह्यांचा एक अनुवादित सुंदर धडा होता. कोणत्या वर्षाला होता ते आठवत नाही >>>> पाचवीत होता.
दर्शनमात्रे >>> प्रवासाच्या आरंभाला वळणवेड्या मार्गाने मरण येतं. ह्यात 'वळणवेड्या' हा गा.जा.भ. साठी यायचा
सुंदर, औंधाचा राजा मस्त होते एकदम.
शिवाय आगरकरांचा एक धडा होता अंधश्रद्धांबद्दल.. त्यात "श्वेत व धवल शुक्र सुखप्रद व बलवर्धक असावा. रक्तवर्ण मंगळाला रुधिराची प्रिती असावी.' अशी जड जड वाक्य होती !!
अगो, तुला हे सगळे धडे होते हे पाहून आश्चर्य वाटलं.. कारण माझी ह्या सिलॅबसची दुसरी बॅच.. मला वाटलं तू जुनं सिलॅबसवाली असशील..
चैत्रगंधा>>> हो मला
चैत्रगंधा>>> हो मला आठवतोय.....
हो अमित...उपास.....
हो अमित...उपास.....
मस्त पळतोय धागा आठवनींना घेउन
मस्त पळतोय धागा आठवनींना घेउन
ह्यात 'वळणवेड्या' हा गा.जा.भ.
ह्यात 'वळणवेड्या' हा गा.जा.भ. साठी यायचा >> अगदी पराग..
तसच औंधाचा राजा मधलं - राजाची वाणी अमोघ वक्तॄत्वासाठी प्रसिद्ध होती. त्यातलं अमोघ यायच गा.जा.भ. साठी...
फीमेल रोबोट,>>> रोहिणी की असच
फीमेल रोबोट,>>> रोहिणी की असच काहीतरी नाव....तिच्या कपाळावरील टिकलीचं बटण दाबल की ती सांगु ते काम करीत असे..आणि पार्टी चा सत्त्यानाश पण करते..... ५ वीत होता हा धडा>>>> राधिका...
हा राधीका....बरोबर
हा राधीका....बरोबर
मस्त धागा आहे! One of my Fev.
मस्त धागा आहे! One of my Fev. माझ्या ब्लोग वर मी 2 वर्षांपूर्वी एक पोस्त टाकलीय ह्या बद्दल. बरेच धडे आणि काही कविता आहेत. सगळ्या इथे देत येणार नाहीत म्हणून ब्लोग लिंकच देतोय.
http://amitmanohar-manya.blogspot.in/2011/11/blog-post.html
अगो तूला जे धडे होते ते मलाही
अगो तूला जे धडे होते ते मलाही होते
असं कसं काय?
चैत्रगंधा ने मेंशन केलेला एकुण एक धडा मल अहोता.
तुम्ही सगळे २००५ च्या आसपास १०वी झालेले आहात का?
किती नविननविन धडे वाटत्यात
किती नविननविन धडे वाटत्यात राव , तरी म्हणल म्या नापास का व्हायचो..
स्मशानातल सोन, लाल चिखल,विजयस्तंभ,प्रेमाचा गुलकंद आणि प्रेम करभिल्लासारख अस काही तरी यापेक्षा जास्त नाही आठवत.
पण व्याकरणातल्या अलंकाराची उदाहरणे आवडायची जसे
तदितर खग भेणे वेगळाले पळाले
उपवन जल केली जे कराया मिळाले
स्वजन गवसला जो त्याजपासी नसे तो
कठीण समय येता कोण कामास येतो , ( ही कविता मला नव्हती कदाचित आधी किंवा नंतर असेल)
किंवा
सरला सुकृताचा तंतू,आयुष्यतैला झाला अंतू
माझिया हाती व्यजनवातू ,भीमरुपे उदेला.
आणि दमडीचे तेल आनले वगैरे वगैरे
रिया मी १९९८ ला झाले १० वी..
रिया मी १९९८ ला झाले १० वी.. मला वाटतं ९ वी ला नवीन अभ्यासक्रम आमच्या बॅचपासून/एक बॅच आधीपासून सुरू झाला असावा..
१९९८ ला? तेंव्हा मी ५वी
१९९८ ला?
तेंव्हा मी ५वी मध्ये होते
तेंव्हा ते राधिका वगैरे धडे होते न गं?
तेंव्हापासुनच बदलला असेल अभ्यासक्रम तर हे राधिका आणि बाळ्याचा धडा मला कसा आठवतोय देव जाणे.
केंव्हा वाचला असेन मी? तिसरी चौथी मध्ये?
माझी त्या सिलॅबसची पहिली बॅच
माझी त्या सिलॅबसची पहिली बॅच हो पराग
रिया, दर आठ-नऊ वर्षांनी पोर्शन बदलतो. मी पहिल्या आणि तू शेवटच्या बॅचला असणार
बरेच अलिकडच्या काळातील आहेत
बरेच अलिकडच्या काळातील आहेत धडे.
हिंदीतला धडे १-२ आठवताय्त. ६वी की ७वीत होते तेव्हा.. "मामा की ऐनक' आणि 'मीना का सपना'!
मीना का सपना मधलं,"मै गिरी, मै गिरी' हे एकच वाक्य आठवतय.
'चिंतातुर जंतु' कुणाची कथा होती?
वळीव माझ्याही पुस्तकात
वळीव माझ्याही पुस्तकात होती.
अजुन एक कथा होती मेकॅनो नावाची, बहुतेक विभावरी शिरुरकरांची. लग्नाळू मुलीला एक मुलगा बघायला येतो, ती खुप वेंधळेपणा करते आणि नापसंत होते. पण तिच्या मनात तोच मुलगा भरलेला असतो. पुढच्या वेळी ती आधीचाच सगळा वेंधळेपणा मुद्दाम करते पण तरी पसंत पडते. पुढे तो मुलगा त्याच्या बायकोसोबत तिला चित्रपटगृहात दिसतो अशी कथा होती काहीशी.
बहुतेक माझ्या वेळचे धडे इथल्या कोणाला नसतीलही...
तरी एक गंमत आठवली - माझ्या लेकीचे मराठी दुसरी की तिसरीचे पुस्तक चाळताना माझी आई अचानक तिला म्हणाली - अरे हे इवल्या इवल्याश्या टिकल्या टिकल्यांचे देवाचे घर... कविता तुलाही आहे? मलाही शाळेत होती. मी लगेच म्हणाले, मलाही होती गं आई... काही कवीता अमर आहेत.
रिया, अग मी ९वी/१०वी बद्दल
रिया, अग मी ९वी/१०वी बद्दल बोलले.. तेंव्हा नुकताच नवीन अभ्यासक्रम होता.
अगो म्ह्णते तसं झालं असेल..
@चैत्रगंधा तुला फुईभाऊ हा
@चैत्रगंधा
तुला फुईभाऊ हा शब्द अपेक्शित आहे का? खान्देशात आत्याला अहिराणी भाषेत फुई म्हणतात.
ह्म्म्म असेल असेल
ह्म्म्म असेल असेल
किती नविननविन धडे वाटत्यात
किती नविननविन धडे वाटत्यात राव , तरी म्हणल म्या नापास का व्हायचो.. स्मित
स्मशानातल सोन, लाल चिखल,विजयस्तंभ,प्रेमाचा गुलकंद आणि प्रेम करभिल्लासारख अस काही तरी यापेक्षा जास्त नाही आठवत.>>>
अगदी अगदी मला पण हे सोडुन जास्त काही आठवत नाही
ते 'राधिका' आणि पुलंच 'उपास' हे धडे पण आठवतायेत..
दर वर्षी syllabus बदलायचा माझ्या वेळी.. पण म्हणून नविन पुस्तकं भेटायची, तो सुवास अजुन पण आठवतो.
पुस्तकं आण्ली की पहिले मराठीचं पुस्तक वाचुन काढायचं..नंतर परिक्षेसाठी वाचायचा फार कंटाळा यायचा पण.
काय बिन्डोक प्रश्न असायचे अरारा..
प्रवासाच्या आरंभाला वळणवेड्या
प्रवासाच्या आरंभाला वळणवेड्या मार्गाने मरण येतं. >>> हे वाक्य 'दर्शनमात्रे' मध्ये कुठेय ? दर्शनमात्रे म्हणजे बाबा आमटे पुल आणि सुनीताबाईंना ताडोबाच्या जंगलात वाघ दाखवायला घेऊन जातात तो धडा. 'सोयरे सकळ' ह्या पुस्तकात आहे.
पिन्कि८०, हो बरोबर.. फुईभाऊ
पिन्कि८०, हो बरोबर.. फुईभाऊ
अमित M, तुमचा ब्लॉग चाळला..
अमित M, तुमचा ब्लॉग चाळला.. तपशिलात खुप चुका आहेत.
अगो.. त्यातच होतं ना.. ते
अगो.. त्यातच होतं ना.. ते जातात जंगलात पण बराच वेळ वाघ दिसत नाही.. त्या संदर्भात होतं ते..
<<पण म्हणून नविन पुस्तकं
<<पण म्हणून नविन पुस्तकं भेटायची, तो सुवास अजुन पण आठवतो<<
हो हो . नव्या आणि फक्त बालभारतीच्याच पुस्तकांना असा वेगळा वास असतो. आजकालच्या सोकॉल्ड चकचकीत कव्हर असलेल्या बालपुस्तकांना अजिबात तसा वास येत नाही.
पराग,चेक करुन सांगते.
पराग,चेक करुन सांगते.
७ वीत हिंदी मधे.....डबलु एक
७ वीत हिंदी मधे.....डबलु एक सुबह घुमने निकला तो रस्ते पे एक भिखमंगा सर्दी मे ठिठुर रहा था....अस वाक्य होत एका धड्यात.....आम्ही खुप हसायचो....भिखमंगा ऐकुन......
आणि इंग्लिश मधे how to make idli , pin hole camera , who n wht ची गोष्ट
Pages