Submitted by सावली on 10 April, 2014 - 03:48
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
काकडी - १
दही - १ वाटी
मीठ - चवीपुरते
कोथिंबिरी - चवीपुरती
क्रमवार पाककृती:
काकडीचे मोठे तुकडे करुन घ्यायचे
दही, काकडी, मीठ, कोथिंबिर आणि अर्धीवाटी पाणी हे मिक्सरमधुन अगदी बारिक वाटुन घ्यायचे.
चविप्रमाणे (साधारण अजुन एक ग्लास) थंडपाणी घालुन पुन्हा एकदा मिक्सरमधुन फिरवायचे.
काकडीची खारी लस्सी तयार.
वाढणी/प्रमाण:
१ / २ ग्लास
माहितीचा स्रोत:
प्रयोग
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाह!!
वाह!!
सावली फुल ऑन हां......... आता
सावली फुल ऑन हां......... आता समर स्पेशल रेसिपी चा धागा बनव मस्त......:)
वॉव सावली. मस्त. बाहेरचे उन
वॉव सावली. मस्त. बाहेरचे उन पाहिले व रेसिपीतली काकडी वाचली तर विचार करुनच गारगारं वाटले बघ.
वा ! काकडी आवडत असेल तर
वा !
काकडी आवडत असेल तर उन्हाळ्यात काकडीचा कायरस अवश्य करून पहा. कृति आहे इथे.
मस्त आहे एकदम.. करुन बघेन
मस्त आहे एकदम.. करुन बघेन आजच.
वा मस्तच . ताबडतोब करण्यात
वा मस्तच . ताबडतोब करण्यात येईल
दिनेश काका काकडीचा कायरस ची
दिनेश काका काकडीचा कायरस ची लिन्क द्या ना.....
अहाहा, वाचूनच कस गार गार
अहाहा, वाचूनच कस गार गार वाटलं. सावली, फोटो पण टाक ना!
व्वा! मस्तच आहे पाकृ!
व्वा! मस्तच आहे पाकृ!
सुपरकूल!! ह्यात पुदिन्याची
सुपरकूल!! ह्यात पुदिन्याची पाने स्वादासाठी घातली तर आणखी छान लागेल असं वाटतंय! सैंधव, जलजीरा पावडर देखील मस्त वाटेल चवीला.
हे म्हणजे काकडीची दह्यातली
हे म्हणजे काकडीची दह्यातली कोशिंबीर मिक्सरमधून काढल्यासारखं वाटतय..
पराग
पराग
पग्या, मग त्या लिक्विड
पग्या, मग त्या लिक्विड कोशिंबीरीत दाण्याचं कूट आणि मिरच्या काय वरून घालून पिणार का?
मागे एका मैत्रिणीने थंडगार काकडीचं सूप प्यायला दिलं होतं ते आठवलं. अर्थात दही नव्हतं त्यात.
पराग मी हे वाक्य लिहिता
पराग मी हे वाक्य लिहिता लिहिता हात आवरला
आमचा उन्हाळा भयंकर!! आम्ही
आमचा उन्हाळा भयंकर!! आम्ही काकडीची मस्त ताज्याताज्या दह्यातली कोशिंबीर नुसतीच भल्यामोठ्या वाडग्यात घेऊन चमच्याने खुपदा हाणतो. आता ती को. मिक्सरातुन काढुन पाहु.
जबरी!! वाचूनच गार वाटलं!!
जबरी!! वाचूनच गार वाटलं!!
यमी वाटतेय रेसिपी...सावली अशी
यमी वाटतेय रेसिपी...सावली अशी थंडगार रेस्पि लिहून तू तुझ्या आय डीचा अर्थ अगदी सार्थकी लावलास
पग्या आणि सायो सायो, हम
पग्या आणि सायो
सायो, हम तुम्हारे साथ है|
फोटो टाकलाय आज. धन्यवाद पण
फोटो टाकलाय आज.
धन्यवाद
पण कोणी करुन बघितलीत का?
काकडीची दह्यातली कोशिंबीर मिक्सरमधून काढल्यासारखं वाटतय.. >> तसं समजुन प्यायलात तरी हरकत नाही. चव चांगलीच लागेल.
अकु, पुदीना वापरुन डेकोरेशन केलं बघ.
गारेगार!! डेको साठी आणि
गारेगार!!
डेको साठी आणि चवीसाठी वरून चाट मसालापण मस्त लागेल.
मस्त फोटो.
मस्त फोटो.
गोड खायला जास्ती मज्जा येईल.
गोड खायला जास्ती मज्जा येईल. दिसतेय ही एकदम गार गार.
मस्तय फोटो !
मस्तय फोटो !
सावली, कसला भारी फोटो आहे.
सावली, कसला भारी फोटो आहे. मॅगेझिनकव्हर वरचा वाटतोय अक्षरशः. .
अफाट सुंदर फोटो! पुन्हा
अफाट सुंदर फोटो! पुन्हा पुन्हा बघावासा वाटतो.
>>मॅगेझिनकव्हर वरचा वाटतोय अक्षरशः.
अगदी!
जबरदस्त फोटो!
जबरदस्त फोटो!
फोटू बगून तरी.. भारीच वाटतीये
फोटू बगून तरी.. भारीच वाटतीये चव लश्शीची!
====================================
@ पराग>> हे म्हणजे काकडीची दह्यातली कोशिंबीर
मिक्सरमधून काढल्यासारखंवाटतय.. >>> एकिच मार्या..लेकिन क्या सॉल्लिड ....मार्या!
फोटो मस्त आहे .. थंडगार एकदम!
फोटो मस्त आहे .. थंडगार एकदम!
फोटो बघुनच पोट भरलं! (इथे
फोटो बघुनच पोट भरलं! (इथे थंडी आहे बर्यापैकी ) अशीच गोड मधे स्ट्रॉबेरी/मॅन्गो/ब्यु बेरी इत्यादी फळ घालुन योगर्ट स्मुदी मस्त लागते उन्हाळ्यात
फोटो कातिल... पुदिन्याचे पान
फोटो कातिल... पुदिन्याचे पान मस्त दिसते आहे.
Pages