समर कुलर - काकडी लस्सी ( खारी)

Submitted by सावली on 10 April, 2014 - 03:48
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

काकडी - १
दही - १ वाटी
मीठ - चवीपुरते
कोथिंबिरी - चवीपुरती

क्रमवार पाककृती: 

काकडीचे मोठे तुकडे करुन घ्यायचे
दही, काकडी, मीठ, कोथिंबिर आणि अर्धीवाटी पाणी हे मिक्सरमधुन अगदी बारिक वाटुन घ्यायचे.
चविप्रमाणे (साधारण अजुन एक ग्लास) थंडपाणी घालुन पुन्हा एकदा मिक्सरमधुन फिरवायचे.

काकडीची खारी लस्सी तयार.

वाढणी/प्रमाण: 
१ / २ ग्लास
माहितीचा स्रोत: 
प्रयोग
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुपरकूल!! ह्यात पुदिन्याची पाने स्वादासाठी घातली तर आणखी छान लागेल असं वाटतंय! सैंधव, जलजीरा पावडर देखील मस्त वाटेल चवीला.

पग्या, मग त्या लिक्विड कोशिंबीरीत दाण्याचं कूट आणि मिरच्या काय वरून घालून पिणार का? Wink

मागे एका मैत्रिणीने थंडगार काकडीचं सूप प्यायला दिलं होतं ते आठवलं. अर्थात दही नव्हतं त्यात.

आमचा उन्हाळा भयंकर!! आम्ही काकडीची मस्त ताज्याताज्या दह्यातली कोशिंबीर नुसतीच भल्यामोठ्या वाडग्यात घेऊन चमच्याने खुपदा हाणतो. आता ती को. मिक्सरातुन काढुन पाहु. Happy

फोटो टाकलाय आज.

धन्यवाद Happy
पण कोणी करुन बघितलीत का? Wink

काकडीची दह्यातली कोशिंबीर मिक्सरमधून काढल्यासारखं वाटतय.. >> Lol तसं समजुन प्यायलात तरी हरकत नाही. चव चांगलीच लागेल.

अकु, पुदीना वापरुन डेकोरेशन केलं बघ.

अफाट सुंदर फोटो! पुन्हा पुन्हा बघावासा वाटतो.

>>मॅगेझिनकव्हर वरचा वाटतोय अक्षरशः.
अगदी!

फोटू बगून तरी.. भारीच वाटतीये चव लश्शीची! http://www.sherv.net/cm/emoticons/drink/drinking-beer.gif
====================================
@ पराग>> हे म्हणजे काकडीची दह्यातली कोशिंबीर
मिक्सरमधून काढल्यासारखंhttp://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl.gifवाटतय.. >>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl-smiley-emoticon.gif एकिच मार्‍या..लेकिन क्या सॉल्लिड ....मार्‍या! http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl-smiley-emoticon.gif

फोटो बघुनच पोट भरलं! (इथे थंडी आहे बर्‍यापैकी Happy ) अशीच गोड मधे स्ट्रॉबेरी/मॅन्गो/ब्यु बेरी इत्यादी फळ घालुन योगर्ट स्मुदी मस्त लागते उन्हाळ्यात

Pages