शिळोप्याचे थालीपीठ
काल आमच्याकडे शेपूची परतून भाजी व भाकरी आणि भात असा बेत होता. आज सकाळी त्यातील उरलेली भाकरी,भात व शेपूची परतलेली भाजी यांचा वापर करून नाश्त्याला थालीपीठ बनवावे असे ठरले. त्यामुळे कालचे सर्व शिळे अन्न संपणार होते व नाश्त्याचाही प्रश्न सोडवला जात होता. मग आम्ही जे थालीपीठ केले त्या शिळोप्याच्या थालीपिठाचाच फोटो व रेसिपी आज मी येथे देत आहे.
साहित्य : एक वाटी कालची उरलेली शेपूची भाजी,कालची उरलेली शिळी अर्धी भाकरी व अर्धी वाटी भात,दोन टेबलस्पून ज्वारीचे पीठ,एक टेबल स्पून डाळीचे (बेसन)पीठ , चवीनुसार लाल तिखट,मीठ,साखर व हळद ,एक चमचा कडकडीत तेल (मोहन)
कृती : एका मोठ्या परातीत वरील सर्व साहित्य एकत्र करून थोडे थोडे पाणी घालत भाजणीच्या थालीपीठासाठी भिजवतो तसे पीठ भिजवून घ्या व १० मिनिटे झाकून ठेवा. दहा मिनिटांनी गॅसवर तवा तापत ठेवा व त्यावर एक चमचा तेल घालून पिठाचा गोलाठेऊन थालीपीठ थापुन घ्या. चांच्याने सर्व बाजूंनी तेल सोडा व उलथन्याने उलटे करून दुसत्या बाजूने भाजून घ्या.
गरम थालीपीठ लोण्याबरोबर किंवा सायीच्या दहयाबरोबर खायला द्या. हे थालीपीठ अतिशय कुरकुरीत व खुसखुशीत झाले होते.
मस्त आहे रेसिपी.
मस्त आहे रेसिपी.
फोटो खूपच लहान झाला आहे पोट
फोटो खूपच लहान झाला आहे पोट भरले नाही
कृती मस्तच! सोप्पा आणि चवदार प्रकार.
वा एकंदरात तुमच्या जिभेचे
वा एकंदरात तुमच्या जिभेचे सर्व डोहाळे पुरवले जाताय्त हल्ली असे दिसते आहे