पॉम्पे-एर्कोलानो-व्हेसुविओ
मागच्या महिन्यात ३ आठवडे इटलीला गेलो होतो. तिथल्या भेट दिलेल्या आणि आवडलेल्या काही ठिकाणांविषयी -
रोमन काळात इटलीत पॉम्पे (Pompeii, उच्चार pom-PAY) हे व्हेसुविअस (इंग्रजीत Vesuvius, स्थानिक भाषेत Vesuvio) डोंगराच्या पायथ्याशी वसलेले एक अत्यंत प्रगत शहर (सध्याच्या Naples जवळ, स्थानिक भाषेत Napoli उच्चार NAH-po-lee) होते, २४ ऑगस्ट ००७९ ला वेसुव्हिअस या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे या शहरावर लाव्हा आणि राखेचा ९०० डीग्री तापमानाचा मोठा ढग येवुन कोसळला आणि काही क्षणात संपूर्ण गाव तिथे रहात असलेल्या माणसांसहीत लाव्हा-राखेच्या ढिगार्यात जवळ जवळ ६० फुट खाली गाडले गेले. याच बरोबर त्याच्या शेजारी असलेली Ercolano (इंग्रजीत Herculaneum), Boscoreale, Oplontis आणि Stabia ही गावे सुद्धा गाडली गेली.
त्यानंतर दर (साधारण) १०० वर्षांनी व्हेसुविअस ज्वालामुखीचा उद्रेक होतच होता. त्यातल्या १६३१ साली झालेल्या उद्रेकात ३००० लोक मारले गेले, विसाव्या शतकात म्हणजे १८ मार्च १९४४ साली झालेल्या उद्रेका नंतर अजुन तरी मोठा उद्रेक झालेला नाही.
पहिल्या शतकात गाडलेल्या पॉम्पे, एर्कोलानो आणि इतर गाडलेल्या शहरांचा शोध गाडले गेल्यावर १७०० वर्षांनी, १७४८ साली पहिल्यांदा लागला. त्यानंतर आजतागायत त्यांचे उत्खनन, त्यावर संशोधन चालु आहे.
या संबंधीच्या संशोधनातुल पुढे आलेली माहिती अशी की त्यावेळची पॉम्पेची लोकसंख्या १०,०००-२५,००० होती तर एर्कोलानोची ५०००च्या आसपास.
उत्खननात राखेत गाडले गेलेले जव्ळ जवळ ३०० लोक सापडले. आधी शास्त्रज्ञांना वाटले होते की राखेमुळे लोकांना श्वास घायला त्रास होवुन तिथल्या रहिवाश्यांचा मृत्यु झाला. नंतर सिद्ध करण्यात आले की बहुतेक लोकांचा मृत्यु राखेमुळे श्वास घ्यायला त्रास होवुन न होता त्यांना काही कळायच्या आत बसलेल्या थर्मल शॉकने झाला. थर्मल शॉकने काही कळायच्या आत मृत्यु झाल्याने सगळे लोक ज्या अवस्थेत होते त्याच अवस्थेत गाडले गेले.
उत्खनन केलेला भाग जसाच्या तसा लोकांना बघायला उपलब्ध आहे. तसेच यात सापडलेल्या काही वस्तु नेपल्सच्या Museo Archeologico Nationale मध्ये आणि जगभरातल्या वेगवेगळ्या पुरातत्व संग्रहालयात ठेवलेल्या आहेत.
वेसुव्हिअस ज्वालामुखीच्या मुखापर्यंत ट्रेक करुन जाता येते.
यातल्या पॉम्पे, एर्कोलानो या शहरांना तसच वेसुव्हिओ ज्वालामुखीला आम्ही भेट दिली. त्याची ही काही निवडक प्रकाशचित्रे.
पॉम्पे
त्या काळातले पॉम्पेची बाजारपेठ. ही गावाच्या मध्येभागी वसली होती. सगळ्या प्रकारची दुकाने, गावचा बाजार, गुलामांची खरेदी-विक्री इथे होत असे. थोडक्यात सगळे आर्थिक व्यवहार इथे होत असत.
वेळ बघण्यासाठी सनडायल
पॉम्पेमधली काही घरे. उत्खननात जशी सापडली तशीच
बेकरी. पीठासाठी वापरण्यात येणारे दगडी जाते. या जात्याला खेचर जुंपुन पीठ काढण्यात येत असे.
ब्रेड करण्याकरता वापरत असलेली भट्टी. २००० वर्षानंतर आजही ह्याच पद्धतीच्या भट्टीत ब्रेड आणि पिझ्झा बनवला जातो
पॉम्पेमध्ये दुपारचे जेवण घरी न बनवता बाहेर घेण्याची पद्धत होती. दुपारचे जेवण विकणारी छोटी दुकाने प्रत्येक चौकात आढळतात. यात भिंतीतच मातीचे माठ लिंपलेले असत, त्या माठात विकण्यासाठी वेगवेगळे पदार्थ ठेवले जात.
पॉम्पेमधील रस्ते. हा गावातला मुख्य रस्ता. रस्त्याच्या सुरुवातीलाच दगड टाकुन लेन केल्या जात, ज्यामुळे एकापेक्षा जास्त घोडागाड्या एकाच वेळी जावु शकत
एकेरी वाहतुकीचा रस्ता
२००० वर्षापूर्वीचे पण अजुनही वापरात असलेले रस्ते
पॉम्पेच्या स्टेडीअमचे प्रवेशद्वार. इथे वेगवेगळ्या प्राण्यांच्या झुंजी होत असत. तसेच ग्लॅडीएटर (हे गुलाम असत) विरुद्ध प्राणी अश्याही झुंजी होत असत.
स्टेडीअम आतुन
एर्कोलानो
ज्वालामुखीमुळे गाडले गेलेले जुने एर्कोलानो नव्या शहराच्या अगदी मध्यावर आहे. गाडले गेलेल्या एकुण शहराच्या फक्त एक चतुर्थांश शहराचे उत्खनन झाले आहे.
पॉम्पेपेक्षा एर्कोलनो मधली घरे कमी पडझड झालेली सापडली. काही घरे अगदी ३ मजली आणि तरीही फारसे नुकसान न झालेली आहेत.
घरातील भिंतीवर चितारलेली चित्रे छोटे छोटे रंगीत दगड वापरुन मोझॅइक पद्धतीने केलेली आहेत. या भागातले लोक मोझॅइक पद्धतीने घराच्या भिंती, घरातील जमीन, अगदी पुढचे-मागचे आंगण सुद्धा सजवण्यासाठी प्रसिद्ध होते.
सार्वजनिक हमामखाना
हमामखान्यातली जमीनीवर काढलेले मोझॅइक
वेसुव्हिओ ज्वालामुखी
या ज्वालामुखीच्या मुखापर्यंत चढुन जाता येते. वर चढुन जायचा मार्ग
ज्वालामुखी, १९९८ सालापर्यंत इथे आत उतरु देत असत नंतर एका टुरीस्टचा तिथे अडकुन मृत्यु झाल्यावर त्यांनी लोकांना खाली जावु देणे बंद केले.
ज्वालामुखी (पॅनोरमा)
अवांतर:
१ नेपल्स रोमच्या दक्षिणेला १७७ किमी (११० मैल) आहे. रोम ते नेपल्स हा प्रवास ट्रेनने करता येतो.
२. ही ठिकाणे बघण्यासाठी नेपल्सहुन रेल्वेने जाता येते, नेपल्सच्या रेल्वेस्टेशनहुन दर अर्ध्या तासाने ट्रेन आहे. प्रत्येक ठिकाणी हवे असतील तर guided tours आहेत तसच Audio guides पण आहेत.
३. सगळ्या ठिकाणी भरपुर चालायची तयारी हवी, चांगले चालण्याचे बुट घालणे अत्यंत आवश्यक आहे.
४. २० युरोचा ३ दिवसाचा एकच पास घेवुन या Pompeii, Ercolano, Boscoreale, Oplontis आणि Stabia पाचही ठिकाणांना भेट देता येते. फक्त एकाच ठिकाणाला भेट द्यायची असेल तर वेगळे तिकीट काढून त्या ठिकाणाला भेट देता येते.
५. वेसुव्हिओ रेल्वेस्टेशनपासुन वेसुव्हिओ ज्वालामुखीच्या पायथ्यापर्यंत गाडीने जावे लागते. स्टेशनच्या बाहेरच गाड्या असतात त्या २० युरोत नेवुन परत आणतात. ज्वालामुखीच्या पायथ्यापासुन सुमारे अर्धा तास वर चढुन जावे लागते.
छान ***** गणेश
छान
*****
गणेश भुते
*********************
इंद्रधनुच्या रंगांमध्ये दंगणारी निरिक्षा दे
आभाळही भाळेल अशी नक्षत्रांची कक्षा दे
*********************
फोटो आणि
फोटो आणि वर्णन दोन्ही छान . हडप्पा/मोहंजोदारो ( मोहंजोदाडो? ) ची आठवण झाली. उत्खननात सापडलेल्या वस्तू, वास्तू पाहण्याची प्रचंड आवड आहे मला. ते बघायला मिळाल्याबद्दल धन्यवाद.
धनु.
रूनी
रूनी ,
आवडले ,आणखी अनुभव असल्यास लिहा
धन्यवाद,
अमित
रुनी, छान
रुनी, छान माहिती आहे. फोटोज तर आतीशय उत्तम काढले आहेत. अगदी एखद्या माहिती पुस्तकात असतात तसेच आहेत.
फोटो आणि
फोटो आणि माहिती - दोन्ही मस्त. धन्यवाद, रुनी.
-----------------------------------------------
I was born a Hindu. Soon I converted to Narcissism!
रूनी, फोटो
रूनी, फोटो आणि माहिती, दोन्ही आवडले.
मस्तच
मस्तच रुनी! चला, आता मला इटलीला जायची जरूर नाही.
सगळ्यांचे
सगळ्यांचे प्रतिसादाबद्दल आभार.
भाग्य आम्हाला पॉम्पे बघायचच होते त्यामुळे आम्ही काप्री, पालेर्मो, सिसिली रद्द केले.
सॅम, एका दिवसात फक्त पॉम्पे करता येण्यासारखे आहे पण आणि नाही पण. पॉम्पे आणि वेसुव्हिओ ज्वालामुखी दोन्ही एका दिवसात करणे शक्य नाही. आम्ही संपूर्ण एक दिवस घालवला तरी सगळं पॉम्पे आम्हाला बघता आले नव्हते इतके मोठ आहे ते. तुम्हाला एका दिवसात करायचे असेल तर सकाळी ९-९:३० च्या आत नेपल्सला पोचता आले पाहिजे. ऑगस्ट मध्ये तर अजून जास्त उन्हाळा असेल, त्याचापण विचार करावा लागेल. कमी वेळात करायचे असेल तर गाइडेड टुर घेता येतील ते साधारण २-३ तासांचे असतात.
मुकुंद हो मी फ्लोरेन्सला गेले होते. पण इटलीला गेल्यावर जाणवले की ३ आठवडे हा कालावधी आपल्या हवे ते सगळं बघायला फार म्हणजे फारच तोकडा आहे. माझ्याकडे असलेल्या वेळात एकच म्युझियम बघता येत होते म्हणुन मी मायकेल एंजलोचा डेव्हिड जिथे ठेवलाय तिथे गेले Accademia dell'Arte del Disegno मध्ये. त्यामुळे फ्लोरेन्सला जावुनपण वेळेअभावी उफिझी/युफिजी ला गेलो नाही. आता तर जास्तच वाईट वाटतय.
टुरीनो जवळच्या आल्प्सला भोज्या करुन आलो.
केदार नाही रे सिसिली इतके खाली आम्ही दक्षिणेत उतरलोच नाही.
बो-विश फेअरवेल टू आर्म्स मी वाचलेल नाहीये.
किशोर माझ्या माहिती प्रमाणे सनडायमध्ये वेळ बघण्यासाठी वर्तुळाचे/अर्धवर्तुळाचे वेगवेगळे भाग केलेले असतात दिवसाचे तास/प्रहर या प्रमाणे आणि सूर्य जसा जसा फिरतो तशी त्या वर्तुळाच्या मध्यभागी असलेल्या खिळा/खुंटीची सावली बदल जाते. ती सावली कुठे आहे यावर दिवसाचा प्रहर/तास ठरवला जातो. चु.भू.दे.घे.
बाकी हे सगळे फोटो नवर्याने काढलेत त्याला तुम्हा सगळ्यांची पोचपावती देईन.
एकदम मस्त,
एकदम मस्त, रुनी. फोटो आणि वर्णन दोन्ही छान...
सहीच! मस्त
सहीच! मस्त लिहिलयस रुनी आवडलं.
सर्व फोटो
सर्व फोटो आवडले .
माहितीपुर
माहितीपुर्ण वर्णनासह सुरेख फोटो.
रुनी फारच
रुनी फारच सुंदर लेख अन फोटोही मस्त ! धन्यवाद सफर घडवल्याबद्दल !
रुनी फारच
रुनी फारच सुंदर लेख अन फोटोही मस्त ..Europe मधे Euro Rail countries तसेच main stations पर्यंत असेल ना..मग local travel कसे करायचे? Car rent करवि लागते कि ground transportation वापरता येते?? ground transportation कसे आहे काहि कल्पना आहे का?
सुंदर लेख आणि मस्त फोटो
सुंदर लेख आणि मस्त फोटो
पॉम्पेमध्ये दुपारचे जेवण घरी न बनवता बाहेर घेण्याची पद्धत होती. >>> हे भारीये
फोटोतली घरे आणि रस्ते इतके हजारो वर्षांपूर्वीचे वाटत नाहीत इतके छान आहेत.
रुनी, वर्णन आणि फोटो दोन्ही
रुनी, वर्णन आणि फोटो दोन्ही फारच मस्त ! वेगळ्याच जगात, काळात फिरायला मिळाले तुझ्यामुळे
Pages