ज्योतिष्य, भविष्य, पत्रिका

Submitted by admin on 6 April, 2008 - 21:34

मंडळी, हा public forum आहे. तेव्हा इथे स्वतःच्या जन्मतारखा, जन्मवेळा, पत्रिका वगैरे पोस्ट करताना आधी विचार करा. कुणी त्याचा दुरुपयोग करणार करु शकेल ही शक्यता गृहित धरुन जे काही पोस्ट करायचं ते करा. असा दुरुपयोग झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल. मायबोली व्यवस्थापन अथवा मायबोली त्याबाबतीत काही करु शकत नाही. तेव्हा ज्याने त्याने आपापल्या जबाबदारीवर आणि योग्य ती काळजी घेऊनच पत्रिका आणि तत्सम माहिती इथे पोस्ट करावी ही सूचना वजा विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान मांडलय .पोहोचलं .
कार्यकत्व ,स्थान आणि राशिंच्या पलीकडे कधी गेलो नाही .नवमांश ,गोचरी दूरच राहिले .परंतु एकदा ते गणित वाचून फारच अचंबा वाटला .किती कष्ट घेत होते त्यावेळी .

एकदा सहज पत्रिका बनवण्याचे सॉफ्टवेर डाउनलोड न करता छोट्या मोबाईलसाठी ऑनलाईन कुंडलीच्या पंचवीसेक वेबसाईट तपासल्या .त्यात एक चांगली निघाली .
omganesh dot com नावाची .

फक्त पाच गोष्टी द्यायच्या एक मिनिटात विंशोंत्तरी नवमांशासह कुंडली हातात येते . इमेल चेकिंग ,रेजिसट्रेशन काही नाही .ढोबळ ज्योतिषही असते .
एवढं असूनही विद्यार्थी ज्योतिषवर्गाला जातात आणि सर्व आवडीने शिकतात .

Astrosage
वाले अक्षांश (०ते ६० फक्त)रेखांश मागतात परंतु ओम गणेश वर फक्त बॉम्बे
अथवा पुणे टाकले की झाले .त्या रेखावृत्तावरचे कोणतेही मोठे शहर यादीतून
निवडले की झाले .बाकीच्या सॉफ्टवेर डाऊनलोडवाल्या साईट आहेत .प्रवासात
गणेशवर पटकन काम होते .फक्त ५०केबि मध्ये .दाते पंचांगातपण (उदाहरणार्थ)
आपण पुणे ,मुंब ई सोलापूरचे रेखांश टाकणार होटगी साठीपण सोलापूरचे घेणार .

पृथ्वीच्या गोलपणामुळे ६० अंशांच्या पुढे ध्रुवाकडे दिशांना आणि
सूर्योदयाला काहीच महत्त्व राहात नाही तर सुक्ष्मातले ग्रह आणि वास्तुनियम
दूरच राहिले असा बऱ्याच वेळा मनात विचार येतो .

मानलं
.आपल्या शास्त्राशी प्रामाणिक राहाणारी माणसे विरळाच .यात तुमच्या मुळ्ये
गुरुजींचे मार्गदर्शन लाभले आणि आपण श्रध्दापुर्वक मार्गक्रमण करत आहात ते
स्तुत्य आहे .

>>चित्रकाराने अथवा मूर्तिकाराने हळूहळू आपली कलाकृती उभी करावी, तशी पत्रिका माझ्या हातून घडवली जायची, तो एका कलाकृतीचा जन्मच असायचा. आणि जशी जशी पत्रिका मूर्तस्वरुप घेत जायची तसे तसे पत्रिका ही नुसती कागदावर चितारलेली आकृती न राहता जणू काही एक जिती जागती व्यक्ती होऊन माझ्याशी बोलू लागायची, आपली कहाणी सांगायला लागायची, एक एक खुलासा आपण हून करून द्यायची .<<
सुहास जी छान वर्णन आहे नॉस्टल्जियाचे. सुरवातीला अप्पा बळवंत चौकात जुनी पंचागे भाड्याने मिळायची. डिपॉझिटही ४०-५० रुपये असायचे. ती घेउन मी जेव्हा स्वत:ची पत्रिका बनवली तेव्हा काय आनंद झाला होता.लग्नाचा कुठला आकडा येतोय याची उत्सुकता असायची. एकदा एका मित्राची पत्रिका बनवायची होती. त्याची आई जो वार सांगत होती तो वार आणि त्याची स्ररकार दरबारी नोंदलेली जन्मवेळ याचा काही ताळमेळ जमत नव्हता.मग त्याच्या अलि कडे पलिकडे वर्षाची अशी तीन पंचांगे मी भाड्याने आणली. एके ठिकाणी आईने सांगितलेला वार जुळत होता पाहिले तर आख्या एका वर्षाचा गफला होता. सवसांचा टाईम,राच्च्याला, कोंबडा आरवल तव्हा, जत्रा, उत्सव चतुर्थी किंवा तत्सम उपास अशा माहितीतून पत्रिका तयार करायला लागायची. असो. सुहासजी धन्यवाद मलाही नॉस्ट्ल्जियाचा आनंद दिल्याबद्द्ल. Wink

थंडीत
शेकोटीपाशी बसून गप्पा मारताना काही जुन्या सुरस गोष्टी एकेक बाहेर
पडाव्यात तसं वातावरण तयार झालंय प्रकाशराव .त्यातल्या काही पंचांगावर हात
फिरवताना त्या काळात जाऊन पोहोचला असाल .आणि हो काहीजण एक लांबलचक कागदाची
भेंडोळी आणायचे त्यात मोडीमध्ये नक्षत्र गण वगैरे लिहिलेले असायचे .

सुहास, लिंकबद्दल धन्यवाद. Happy

>>>>>यावर मी एक उपाय करतो, संगणकाने केलेली पत्रिका मी कागदावर हाताने उतरवून घेतो <<<< सहमत.
हो हे मी देखिल करतो, त्याशिवाय कुंडलीबरोबर संवादच सुरू होत नाही. कदाचित मूळात कागद पेन्सिल घेऊन शिकलेलो असल्याने असेल. अगदी गुणमेलनासाठीही साग्रसंगित दोन्ही कुंडली शेजारी लिहून काढून, तपशील भरुन .... अन ते लिहीतानाच मेंदुतील चक्रे ( विज्ञानवाद्यांच्या दृष्टीने "केमिकल लोचा") सुरु होतो, नुस्ते कॉम्प्युटरचा स्क्रिन वर कुंडली बघुन खरच काहीही उमगत /सुचत/आवडत नाही. ते रूक्षच वाटते. Happy

suhasg , blog वरचा लेख वाचला खूपच छान लिहिले आहे . मी पण वाचले होते हिरव्या शाई बद्दल पण कुठे मिळत नाही . बहुतेक हिरवा रंग बुधाचा व कुंडली सोडवताना जास्त उपयोगी म्हणून हिरवी शाई असावी असे वाटते . खरेच तुमच्या पिढीतील लोकांना स्वत: कुंडली बनवण्यापासून सुरुवात केल्याने basics एकदम पक्के झाले असणार .

आई वडील आजारी असतांना त्यांची सेवा करणाऱ्या मुलीने त्यांच्या आजारपणाबद्दल विचारायला चालेल .दुसऱ्या भावंडाने नाही ना ?

सुहास, छान माहिती! Happy

>>>>आई वडील आजारी असतांना त्यांची सेवा करणाऱ्या मुलीने त्यांच्या आजारपणाबद्दल विचारायला चालेल .दुसऱ्या भावंडाने नाही ना ? <<<<<
एसार्डी, मला वाटते की "प्रॉक्झी" प्रश्नामागिल "खरोखरीची तळमळ" व निव्वळ "गॉसिप थाटाची वा स्वार्थी उत्सुकता" यात फरक करता येणे आवश्यक आहे व त्यासाठी तशा भावभावनांची प्रश्नकर्त्यामधिल "उपस्थिती" तत्काळ जाणवणेही आवश्यक आहे. याकरता 'साधनाच' आवश्यक असते असे माझे मत.

तसेच मोदींचे पंतप्रधानपदाबाब्तच्या प्रश्नात केवळ एका व्यक्तिचे हित/अहित गुन्तलेले नसुन, असन्ख्य लोकांचा तो प्रश्न असू श्कतो तेव्हा अशा वेळेस, निव्वळ प्रश्न कुंडलीवर अवलम्बुन रहाणे उचित ठरणार नाही, मेदिनीय ज्योतिषाचा व्यासंग असल्याशिवाय अशा प्रश्नाचे उत्तर देणे धाडसी ठरेल. Happy

इलेक्षनच्या वेळेस खास करुन स्थानिक नगरपालिका वगैरे, अनेक व्यक्ति तिकीटाबाबत तसेच अन्य कुणाचे पत्ते कापले जातिल का, विरोधिपक्षियाचे काय होईल वगैरे विचारणा करत असतात. अशावेळेस ज्योतिषज्ञानापेक्षा "तारतम्यच" जास्त वापरावे लागते. सुहास याबद्दल अधिक सान्गु शकतिल.

>>कोपर्‍यावरच्या नारियल पानी वाल्याने ‘नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील का ?’ हा प्रश्न जरी पैसे देऊन विचारला तरी त्याचे उत्तर द्यायचे का? जिथे आपला काही संबंध नाही, ना घेणे ना देणे पण केवळ उत्सुकता म्हणून विचारलेले सार्वजनिक स्वरुपाचे बरेचसे प्रश्न या स्वरुपाचे असतात.<<
नरेंद्र मोदी ही सार्वजनिक जीवनातील एक मोठे नेते आहेत. पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत. नारियल वाला हा भारताचा नागरिक आहे. मतदार आहे. आपल्या राष्ट्राचे कोण नेते पंतप्रधान होणार आहेत त्यावर नागरिकांचे ,समाजाचे सार्वजनिक जीवन बर्‍यापैकी प्रभावित असते.मतदार नागरिक म्ह्णून त्याची उत्सुकता ही दुर्लक्ष करण्यासारखी नाही.कोणी ही पंतप्रधान झाले तरी तुला काय फरक पडतो? असे म्हणुन झटकून टाकणे हे लोकशाहीच्या प्रगल्भपणाचे नक्कीच लक्षण नाही.
हा आता हा प्रश्न वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या वेळी विचारले तर ज्योतिषात उत्तर एकच येणार आहे का? हा प्रश्न जरूर उपस्थित होतो. एका ज्योतिषाचे ही एक उत्तर येणार नाही व वेगवेगळ्या ज्योतिषांचे तर नाहीच नाही.

प्रकाश घाटपांडे,

>> मतदार नागरिक म्ह्णून त्याची उत्सुकता ही दुर्लक्ष करण्यासारखी नाही.

हे जरी खरे असले तरी ज्योतिषशास्त्र अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास असमर्थ आहे. प्रस्तुत उत्सुकता इतर मार्गाने शमवता येईल. हार्डवेअरच्या दुकानात जाऊन पेरू मागणारा पोपट आठवत असेलंच आपल्याला! Happy

आ.न.,
-गा.पै.

>>हार्डवेअरच्या दुकानात जाऊन पेरू मागणारा पोपट आठवत असेलंच आपल्याला! <<
आत्ता आठवत नाही हा किस्सा

घाटपांडे साहेब राग मानू नका पण एक खुलासा आवश्यक आहे म्हणून करतो : 'कोणी ही पंतप्रधान झाले तरी तुला काय फरक पडतो? " हे तुमच्या कल्पनेतून आलेले शब्द ,मी तसे काही किंवा तसा अर्थ ध्वनित होईल असे काहीही लिहीलेले नाही. ते शब्द माझे नाहीत,

मला जेव्हा असे प्रश्न विचारले जातात तेव्हा तुम्ही म्हणता तसे उत्तर माझ्याकडून कदापीही दिले जात नाही / जाणार नाही, तर माझे उत्तर बरेचसे (शास्त्रा च्या मर्याद) पैलवानसाहेबांनी लिहले आहे त्या धर्तीवरचे असते /असेल.

>> : 'कोणी ही पंतप्रधान झाले तरी तुला काय फरक पडतो? " हे तुमच्या कल्पनेतून आलेले शब्द ,मी तसे काही किंवा तसा अर्थ ध्वनित होईल असे काहीही लिहीलेले नाही. ते शब्द माझे नाहीत, <<
तुमचे ते शब्द नाहीतच. तुमच्या वाक्यावर केलेले मी भाष्य आहे त्यातील ते शब्द आहेत.हे कोणीही सांगेल.माझा मुख्य मुद्दा हा उदाहरणातील नारियलवाल्या ची प्रश्न विचारण्याची उत्सुकतेचा संबंध हा आहे. तसेच प्रश्न ज्योतिषातील मला वाटणारी विसंगती बद्दल आहे. म्हणुन मी वर एके ठिकाणी राजीव उपाध्यांची प्रश्न ज्योतिष संदर्भातील लिंकही दिली होती.
प्रश्नकुंडली बाबत मी यापुर्वी http://www.maayboli.com/node/45568?page=1 वर भाष्यही केले आहे. आपण या विभागातील मायबोलीवरील अगोदरचे लेखन कदाचित वाचले ही असेल

खुलाशा बद्दल धन्यवाद घाटपांडे साहेब. आपला या विषयावरचा अभ्यास सखोल आहे यात शंकाच नाही म्हणूनच आपल्या मतांचा मी आदर करतो.

घाटपांडेसाहेबांच्या अभ्यास सखोल म्हणजे काय विचारता?
त्यान्नी आख्ख एक पुस्तक लिहीलय प्रश्नज्योतिषावर.... की प्रश्न ज्योतिषात फसगत कशी होते/होऊ शकते अशा काहीशा आशयाचे आहे ते... (फसगत केली जाते असा काही आशय असेल तर माहित नाही हां, मी नै वाचलेले अजुन) !

अच्छा तुम्ही ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी....प्रश्नोत्तरातून सुसंवाद या पुस्तका विषयी बोलता आहात तर? तुमच्या कुंडलीत ते पुस्तक वाचण्याचा योग आयुष्यात कधीतरी येणार हे भाकित आम्ही इथे वर्तवतो. Happy

काय म्हणता लिंबू टिंबूजी ' प्रश्नज्योतिषावर आख्ख एक पुस्तक' ? हे नव्हते मला माहीती. पण लिंबूभौ तुम्हाला सांगतो , ब्लॉग वर चारपाच ओळी खरड्ल्या काय किंवा फोरम वर इकडेतिकडे पोस्टा टाकल्या काय मला वाटत होते 'छा गये हम पुरे इंटरनेट पे' . पण आख्खे पुस्तक म्हणजे नक्कीच खायच काम नाही ... त्याला केव्हढा अ‍भ्यास लागत असेल , किती जबरदस्त व्यासंग असेल , त्याशिवाय का असली कामे जमणारेत ... अहो मला आहेत ती पुस्तके वाचायला होइना यांनी तर चक्क ग्रंथच सिद्ध केला... मानले बुवा... घाटपांडेजी हॅट्स ऑफ टू यू ...

अरे वा! सुहासजी तुमच्या निमित्त आम्हाला पुल आठवले. प्रोफेसर येळकुंठवार म्हणजे ज्ञानाचा साक्षात सागर! Lol

मी ग्रंथ हेच माझे गुरु असे मानतो आणि ईथे तर साक्षात ग्रंथकर्ताच समोर आहे हो ! आपली तर बोलतीच बंद !
मी आजपर्यंत ‘घाटपांडेसाहेब’ , ‘घाटपांडेजी’ असे काहीसे म्हणतोच आहे पण आता ‘ग्रंथकर्ता’ म्हणुन जास्त आदर दाखवायचा म्हणजे काहीतरी जबरदस्त ‘तालेवार’ प्रत्यय हवा ना?

त्यांना महागुरु म्हणणार होतो पण घाटपांडे सायबांना ‘गुरु’ या शब्दाचे वावडे असणार हा माझा तर्क कारण ‘गुरु’ ग्रह आकाशात आहे तो पर्यंत ठीक पण जन्मपत्रिकेत येऊन बसला की त्यांना चालणार नाही, दुसरा विद्या देणारा हाडमासाचा ‘गुरु’ ही असतो पण मग ‘गुरुदक्षिणा ‘ आली ,’ श्रद्धा’ आली त्यापाठोपाठ तीची थोरली बहिण ‘अंधश्रद्धा’ आली , घाटपांडे सायबांना हे कितपत रुचेल , आगबबुले होतील ( कैच्या कै शब्द आहे नै ) याचाही अंदाज नाही, उगा आपण काही बोलायचे आणि ‘फट म्हणता ... हत्या व्हायची’ (जातीवाचक शब्द वगळला आहे) . हयाच धर्तीवरचा ‘महामहोपाध्याय’ शब्द पण चालणार नाही, ‘महामहिम्न’ असे कैच्या कै हिंदीत म्हणतात, ते पण नको जिभेचा तुकडा पडायचा कोठेतरी!

एक विचार आला ‘जी’ आहेच आणखी एक ‘जी’ लावून ‘जीजी’ चालेल का? पण एक जुनी आठवण निघाली एकदम दचकलो , त्याचे काय झाले माझ्या लहानपणी आमच्या शेजार्यां च्या नात्यातल्या एक आत्याबाई होत्या त्यांना ‘जीजी’ म्हणत, त्या एव्हढ्या लठ्ठ होत्या की मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा पाहीले तेव्हा हळुच स्वत:शीच पुटपूट्लो होतो ‘ अरे हया ‘जीजी’ कसल्या हा तर ‘जिंजी’ चा किल्ला आहे’ माझ्या दुर्दैवाने आत्याबाईंचे कान जिंजी च्या किल्ल्या इतकेच बळकट होते , मग पुढे काय झाले असेल ते आता लिहायला हवे का?

तेव्हा ‘जीजी’ कटाप ! दुसरे काही सुचत नाही तो पर्यंत आपले जुनेच ‘घाटपांडेसाहेब’ , ‘घाटपांडेजी’ चालू ठेवतो , तेव्हढे ‘ग्वॉड’ मानून घ्या सायबानू..

(आज अमावस्या आम्हां ज्योतिर्विदांची सुट्टी, म्हणून हे रिकामपणचे उद्योग बरे का घाटपांडे साहेब, तेव्हा जरा हलकेच घ्या..)

सुहास

Biggrin
अहो अमावस्या म्हणजे शुभ मुहुर्त की! सूर्य चंद्र यांची युती.युतीत शुभ फळे वृद्धींगत होतात ना! म्हणुनच दक्षिणेत ती शुभ मानतात. बाकी सुट्टीच शाम भट्ट व त्याचा शिष्य बटो यांचा वृत्तांत ही १८९३ सालातील चिंतामण मोरेश्वर आपटे यांची कादंबरी वाचा.मस्त टाईमपास आहे.

'दक्षिणेत ती शुभ मानतात ? ' आसल बाबा आसल आता तुम्ही म्हणताय म्हणजे आसलच, मला कुडमुड्याला काय कळतयं म्हणा त्यातलं , कोण म्हणाले आमूशा वाईट्ट तर वाईट्ट , तेव्हढेच सुट्टी मिळाल्याशी मतलब क्काय ? बाकी तुम्ही लिंका ( 'लिंका' म्हणलाय हा , नायतर चुकून 'पिंका' वाचाल आणि आमचे खळ्ळ ळ ळ खटयाक व्हायचे!) मात्र जब्री देता राव , स्मायली बियली टाकून, यकदम चकाचक अपटुडेट म्ह्यायती. लिंबूभौ वाचतायना सग्ळं ?

Pages