लोकसभा निवडणुका २०१४

Submitted by नंदिनी on 5 March, 2014 - 00:50

आज लोकसभा २०१४ निवडणूका जाहीर झालेल्या आहेत. ७ एप्रिलपासून निवडणुका घेतल्या जातील. आचारसंहिता लागू झालेली आहे.

निवडणुकासंदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी हा धागा. या निवडणु़का नरेंद्र मोदी, राहुल गांधी आणि केजरीवाल व्यतिरीक्त अजूनही हजारो लोक लढवत असतील तेव्हा निव्वळ या तिघांनाच सर्व फुटेज देऊ नये ही विनंती.

आपपल्या शहरतील, भागातील उमेदवारांविष्यी अधिक लिहिल्यास उत्तम.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काहो, अविनाश धर्माधिकारी हे नाव कुठे दिसले नाही.
त्यांची काही भाषणे ऐकण्यात आली. एकूण बराच अभ्यास व अनुभव आहे असे त्यांनी सांगितले.
ते निवडणुका लढवत नसतील तरी कुणि मंत्री, वगैरे त्यांना खास सल्लागार म्हणून नेमतात का?

काँग्रेस या निवडणुका हरल्यात जमा आहे. त्यांच्याबद्दल बोलण्यासारखे काही नाही.

भाजपने मोदींना त्रासदायक ठरू शकतील अश्या नेत्यांना(काट्यांना) आतापासूनच दूर करायचे मनावर घेतलेले दिसते.
अडवाणींना चक्क गुजरातेत आपण निवडून येऊ शकणार नाही असे वाटू लागले.
जसवंत सिंग बारमेरमधून( की कुठूनही?) निवडून येऊ शकणार नाहीत (भाजप) म्हणे. मोदीनामाच्या
लाटेत हा एक नावाजलेला दगड तरायला काही हरकत नव्हती.
मोदींची लाट आहे तर जागा जिंकण्यासाठी काँग्रेसमधून आयात केलेले उमेदवार, एम.जे.अकबर, ज्यांच्यावरचा भ्रष्टाचाराचा डाग सुषमाबाईंनाही दिसतो असे श्रीरामुलु, बप्पी लाहिरी, हेमाम्मा, हरेन पंड्यांऐवजी परेश रावल इत्यादींची गरज का पडावी? (बाकीचे पक्षही अभिनेते, खेळाडू यांना तिकिटे देतातच पण भाजप पार्टी विथ डिफरन्स आहे असे ऐकले होते.)

वर राहुल गांधींनी दिलेल्या चुकीच्या संदर्भांचा उल्लेख झाला आहे. भाजपच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराने तर भारताचा इतिहास-भूगोल दोन्ही अनेकवार बदलले आहेत.

निवडणुकांनंतर प्रमोद मुतालिक भाजपमध्ये पुन्हा सन्मानाने प्रवेश करतीलच आणि त्यांना व त्यांच्यासारख्यांना खुले रान मिळेल याबाबत कोणतीही शंका नाही.

शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतरची महाराष्ट्रातली ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे दोन्ही सेनांमध्ये ही वारसाहक्काची लढाई ठरेल. भाजपला आपल्या एकमेव निष्ठावान मित्रपक्षाबाबत ठाम भूमिका घेता आलेली नाही. बातम्या वाचल्या तर शिवसेनेतून बाहेर पडणार्‍यांची संख्या अधिक दिसते आहे.

निकालानंतर शरद पवार भाजपबरोबर जाणारच नाहीत याची खात्री नाही.

भाजपला पराभव पचवणे जड जाते हे २००४ आणि २००९ मध्ये दिसलेच आहे. विजयोन्माद आताच शिगेला पोचलाय तर मे २०१४ च्या दुसर्‍या पंधरवड्यापासूनचे चित्र फारच मनोरंजक असेल असे वाटते. वाजपेयींसारख्या मुखवट्याची गरज आता भाजपला भासू नये.
शेवटी 'हर हर ....., घर घर..... ' यातला 'हर म्हणजे प्रत्येक' असे सांगताना अमिश त्रिपाठींना रॉयल्टी दिली का?

आता कशी निवडणूक धाग्याला साजेशी पोस्ट आली! इतका वेळ सगळं कसं गोगोड्ड सुरु होतं..
अहो मयेकर.. थांबा थोडं इतक्याच का 'प्रमुख विरोधी पक्ष' भुमिकेत शिरताय.. निवडणूका होऊ तरी द्या.. Wink

पुण्यात सध्यातरी कदम आघाडीवर रहातील असं वाटतय का?

images_3.jpg

भाजपाचा दुट्टप्पीपणा उघड.. "हरहर मोदी" ही घोषणा आमची नाही तर कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरात दिलेली आहे असे आद्य इतिहासाचार्य श्री मोदींनी जाहीर केलेले.. परंतु ही घोषणा त्यांच्या बिहार च्या पुर्णिया रॅलीत त्यांच्याच स्टेज वर भाजपातर्फे अधिकृत पणे झळकली होती.. इथुनच ही घोषणा प्रसिध्द झाली ..

कार्यकर्त्यांच्या घोषणा स्टेजवर लावायचे कधीपासुन सुरु केले ? Biggrin

तिखट

अहो इथे की करताय, चलो कल्याण-डोंबिवली!

'नवनिर्माण' कर उमेदवार आणि कॉंग्रेसची शेपटी रांका उमेदवाराने सगळ्या चाळ आणि झोपडपट्टी विभागांमध्ये थैल्या मोकळ्या करायला सुरुवात केली आहे. सकाळी गाडी मध्ये याचीच खमंग चर्चा चालू असते.

त्यातच जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे शिवसेनेला रामराम करणार अशीही कुणीतरी पुडी सोडून धमाल उडवली आहे.

म्हणजे काय…
यांच्या मर्जी शिवाय एकही बांधकाम डोंबिवली पूर्व, शिळ फाटा परिसरात उभे राहू शकत नाही.

उदयन, अरे त्यांच्या मोठ्या मोठ्या शिक्षणसंस्था वगैरे आहेत, डोंबिवलीजवळ. कॉंग्रेसने मागच्यावेळी आमदारकीचे तिकीट दिले नाही तेव्हा मनसेमध्ये गेले नाहीतर ते पूर्वीपासून कॉंग्रेसमध्ये होते.

कल्याण डोंबिवलीची जागा शिवसेना राखणार का यंदा ? सेनेनं खूप प्रतिष्ठेची केली आहे ना यंदाची निवडणूक?

काहो, अविनाश धर्माधिकारी हे नाव कुठे दिसले नाही.
त्यांची काही भाषणे ऐकण्यात आली. एकूण बराच अभ्यास व अनुभव आहे असे त्यांनी सांगितले.
ते निवडणुका लढवत नसतील तरी कुणि मंत्री, वगैरे त्यांना खास सल्लागार म्हणून नेमतात का?

>>>
ते सध्या 'गाढवही गेले अन ब्रम्हचर्यही गेले' या मोडमध्ये आहेत ! त्याना खास सल्लागार नेमायला काय राजकारण्याना वेड लागले आहे काय ? ज्याना स्वतःच कुठे जायचे आहे हे माहीत नाही अशा माणसाना रस्ता विचारल्यासारखे आहे ते . ते सध्या फुटकळ च्यानलवर एखाद्याच्या ' लीव्ह व्हेकन्सीत ' राजकीय विश्लेषण करतात चुकले - परखड राजकीय विषलेषण करतात. ते जे काही सांगतात ते परखड असते आणि अंतिम सत्यही असते असा त्यांचा ठाम विश्वास असतो. त्यांच्या डोळ्यावरचा भगवा-हिरवा चष्मा त्याना दिसत नसला तरी लोकाना दिसतो ही खरी अडचण आहे. आपला चष्मा आपल्याला दिसत नाही ना Happy

पुणे मतदार संघातून साडेपाच लाख ब्राम्हण मतदारांनी ब्राम्हण उमेदवार न दिल्याने "नोटा " चा वापर करावा असा 'फतवा' ब्राम्हण संघाने काढला आहे.

याचा परिणाम काय होउ शकतो?

विश्वजीत कदम निवदून येण्यात ?
कारण १०० मतदान झाले तर १०० मतांची विभागणी सर्व उमेदवारात होणार. त्यातले ४० रुसून बसले तर ६० मतांची विभागणी होउन त्यावर आधारित निकाल लागेल ना?
म्हनजे हे 'तेलणीवर रुसली अन अंधारात बसली ' असे होणार नाही काय?

मुंबई नॉर्थ सेन्ट्रल/ उत्तर मध्यमधून सपाने फरहान आझमीला उतरवल्याचे समजते.हा फरहान आझमी अबू आझमीचा मुलगा आणि आयेशा तकीयाचा नवरा आहे.चांगले आहे. अबू आझमीच्या या दिवट्याने मुस्लिम मते मोठ्या प्रमाणात खाल्ली तर प्रिय दत्तला नुकसान आणि भाजपच्या पुनम महाजन यांना फायदा होवून त्या निवडून येवू शकतात.

रॉबीनहूड: असले फतवे/ ठराव यांचा जास्त परिणाम होत नसतो. ब्राह्मण समाज काही यांचे ऐकेल असे नाही.या समाजाचा परंपरागत ओढ भाजपकडे राहिला आहे. पुण्यात भाजपला वातावरण तरी अनुकूल आहे.बघूया पुढे काय होतंय ते.
हातकणगले मध्ये पण महायुती आणि आघाडीने एकाच समाजाचे (जैन) उमेदवार दिल्याने बहुजन (पक्षी मराठा) समाजावर कसा अन्याय झालाय असे म्हणत मराठा आरक्षण संघर्ष समितीचे कोणी पाटील म्हणून उभे राहिले आहेत. तेव्हा हे थोडय बहुत सर्व समाजात असतेच. लोक त्याला तितके गांभीर्याने घेत नाहीत.

रॉबिनहूड ,
तुम्ही निवडणुकीच्या कामात अहात ना? मतपेट्या, शाईच्या बाटल्या, लाख, मेणबत्त्या, लिफाफे, नमुना मतपत्रिका, स्थळप्रती, ई ई ताब्यात आल्या का? ड्युटी आहे तिथे मुक्कामाची बस आहे का?

बाकी कॉंग्रेस यावेळेला हरण्याच्या तयारीनेच उतरते आहे. दहावीचा एखादा अभ्यास न झालेला विद्यार्थी आता फॉर्म भरलाच आहे तर निदान हिंदी, मराठी 'काढू' मग इंग्लीश गणीत वगैरे ऑक्टोबरला बघता येइल असे म्हणत निदान पेपर तरी देऊन येतो तसे.

नाही .सुदैवाने मी या वेळी निवडणुकीत नाही. दूर मसूरीच्या थंड हवेत दोन महीने आहे. प्रथमच एखादा लोकनाट्य तमाशा बघावा तसे खेळ दुरूनच पाहतो आहे :). एरव्ही या मूर्खांच्या भाषणाच्या व्हिडीओ पहाण्यातच वेळ जायचा Happy

निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात दाखवलेल्या संपत्तीत स्विसबँकेत ठेवलेल्या रकमा दाखवायचे राहून जाते का?

रच्याकने , पुण्यातलेच मुख्य उमेदवारांची संपत्ती (दोन्ही स्वच्छ पक्षाच्या) पहाता व त्यांचे वय पाहता हे कोणता उद्योग व्यवसाय करतात की ज्यामुळे शेकडो कोटीची संपत्ती त्यांचे कडे येते? यांनी करीअर गायडन्स क्लासेस का काढू नयेत? यांच्या बायकांच्या नावे असलेल्या अनेक लाखांच्या ५-६ आलिशान मोटारी घेण्यासाठी या बायकांचे उत्पन्न स्त्रोत काय आहेत? वॉरन बफेचे बाप असलेले हे लोक यावर पुस्तके का लिहीत नाहीत.? बंगालमध्य जमीन एका पुण्यातल्या 'सामान्य ' कार्यकर्त्याची कशी असू शकते ? मुख्य म्हनजे इन्कमट्याक्स जे की १०० रुपये ट्याक्स चुकला म्हणून कारकुनांच्या मागे लागते ते काय झोपा काढते काय ? तेरामती विद्यापीठात उत्पन्न कसे लपवावे याचा कोर्स आहे. सर्वपक्षीय विद्यार्थ्याना प्रवेश मिळेल

काँग्रेसच्या अजेंड्यात खाजगी क्षेत्रात आरक्षण आहे असं कळलंय! सत्तेवर आले तर काय होईल माहित नाही. पूर्वी आर्य लोक स्थलांतर करून भारतात आले, तसेच आता उच्चवर्णीयांनी भारत सोडून दुसरीकडे स्थलांतर करावे लागेल.

कोणीतरी ह्या गोष्टींना थांबवण्याची गरज आहे.

आता उच्चवर्णीयांनी भारत सोडून दुसरीकडे स्थलांतर करावे लागेल.
उच्चवर्णीय असे नक्की म्हणता येणार नाही, पण चांगले शिकलेले, कर्तबगार पण भारताच्या समाजाला, राजकारणाला कंटाळलेले लोक पूर्वीपासूनच भारताबाहेर जात आहेत. (तिथे काय दिवे लावतात ते विचारू नका. पण भारतात कायमचे परत जायला उत्सुक नसतात हे खरे)
आजच्या युगात त्यांनाच उच्चवर्णीय म्हणावे लागेल.
अर्थात भारताबाहेर जाणार्‍या या नवउच्चवर्णीयांपेक्षा संख्येने हजारो पट जास्त नवउच्चवर्णी लोक अजूनहि भारतात आहेत.
त्यांच्यामुळेच भारताची उत्तरोत्तर प्रगति होत आहे.

@ झक्की - तुम्हाला जो उच्चवर्णीयांचा अर्थ अभिप्रेत आहे तो दुर्दैवाने राजकीय पक्षांना नाही.

जिथे समाजातल्या प्रत्येकाला समान संधी मिळण्याची गरज आहे, तिथे रोज नवे आरक्षण आणून काय मिळवतात माहित नाही.

मुख्य म्हनजे इन्कमट्याक्स जे की १०० रुपये ट्याक्स चुकला म्हणून कारकुनांच्या मागे लागते ते काय झोपा काढते काय ?
Lol

असं कसं तुम्ही टॅ़क्स भरणारे सामान्य नागरिक आहात ना? मग तुमची अडवणूक करणे हे आमचे राष्ट्रीय कर्त्यव्य आहे. इतकी संपत्ती आहे हे जाहिर केल्यावरही टॅक्स वाले सोर्सेस द्या म्हणून पाठीमागे लागत नाहीत. ही खरी गंमत.

अजब तुझे सरकार !

काँग्रेसचा मसुदा वाचला का? कसला जबरी आहे. तिसरी आघाडी का काढू नये ह्याजे मजेदार विश्लेषन आहे. सगळीच गंमत. बहुदा अजेंडा काढायच्या कामी राहूल गांधी चेअरपर्सन होते.

http://www.ndtv.com/video/player/the-big-fight/battleground-uttar-prades...

ही चर्चा फार मस्त आहे. मोदींचे गुजराथ मॉडेल वरच मुख्य चर्चा पण मोदींना का मत द्यावे वा ना द्यावे मधील सगळे मुद्दे कव्हर झाले आहेत चर्चेत. सोबत थोडीफार चर्चा कास्ट पॉलिटिक्स वर (अर्थात उत्तर प्रदेश आणि बिहार प्रसिद्ध आहेच त्यात) आहे. पंडित राहूल गांधी बद्द्लही काही व्यक्तव्य आहेत.

सो कॉल्ड सेक्युलर काँग्रेसला राहुल गांधी ब्राह्मण आहेत हे सांगावे लागते ह्यातच सर्व आहे. ( ते ही नसताना! ) कीकडे सेक्युलरीझम म्हणायचे आणि जातीचे राजकारण चालूच ठेवायचे.गंमत आहे सगळी.

राज्यातील पहिल्या दोन टप्प्यातील लढतींचे चित्र आता स्पष्ट झालेय.१० एप्रिलला पहिला टप्पा आणि १७ ला दुसरा टप्पा आहे.दोन्ही टप्प्यातील निवडणुकीसाठी अर्ज मागे घ्यायची मुदत संपून गेली आहे.सांगलीमध्ये कॉंग्रेस आघाडीत तर उस्मानाबाद मध्ये महायुतीमध्ये बंडखोरी झाली आहे.आता खरी रंगत वाढली आहे. आज मोदी राज्यात आले आहेत तर उद्या ठाकरे बंधू गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रचारांच्या फैरी झाडणार आहेत.

पक्षातील ज्येष्ठ नेते असूनही उमेदवारी न मिळालेले 'जसवंत सिंह' भाजपत एकटेच नसून आपल्याला उमेदवारी न मिळाल्यामुळे अस्वस्थ असलेल्या 'नाराजां'ची संख्या वाढतेच आहे. १६ व्या लोकसभेसाठी भाजपतर्फे आतापर्यंत ४०९ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यापैकी तब्बल ५६ उमेदवार हे अन्य पक्षातून 'आयात' केलेले वा नव्याने पक्षात दाखल झालेले आहेत.
भाजपतर्फे ज्या ५६ आयारामांना उमेदवारी देण्यात आली त्यापैकी २८ उमेदवार राजकीयदृष्टय़ा 'कळीच्या' अशा उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यांमधील आहेत. बिहारमधील एकूण ३० जागांपैकी १० जागांवर तर उत्तर प्रदेशातील ७५ उमेदवारांपैकी १८ जागांवर नव्याने पक्षात आलेल्या व्यक्तींची वर्णी लागली आहे. हरयाणात तर, आठपैकी पाच जागांवर भाजपतर्फे अशा नुकत्याच पक्षप्रवेश केलेल्यांना तिकिटे देण्यात आली आहेत.>>>>

५६ आले नसते जर तर ३५० इतकेच उमेदवार होते का ? Uhoh

Pages