सालाबाद प्रमाणे रानडे परिवार कोकणातील दापोलीजवळील आसुद गावी असलेल्या श्री व्याघ्रेश्वराच्या दर्शन आणि अभिषेकानिमित्त जात असतो.
यंदा दि. २२ मार्च २०१४ रोजी सकाळी ४.३०वा तवेरा मधुन रानड्यांच्या दोन पिढ्या आसुद गावी निघाल्या. दर्शन, महादेवाचा अभिषेक झाल्यावर मंदिरापासुन हॉटेलवर जाईपर्यंत आपल्यात एक फोटोग्राफर दडला असल्याची जाणीव अस्मादिकांना या काजुच्या झाडावरील काजुच्या गराने आणि फळाने करुन दिली.
या दोघांना कॅमेर्यात बंदिस्त करुन हॉटेलवर पोचले, जेवण-आराम करुन संध्याकाळी समुद्राला भेट द्यायला सहकुटुंब गेलो. पाण्यात यथेच्छ डुंबुन, भाच्याला किल्ला बनवायला मदत करुन झाल्यावर साबांनी आणलेल्या भेळेचा आस्वाद घेताना भास्करपंतांनी त्यांच दुकान बंद करत असल्याची जाणिव करुन दिली, मग त्यांनाही बंदिस्त केल कॅमेर्यात..
अंधार पडल्यावर हॉटेलवर येउन फ्रेश होउन जेवलो आणि परत बीचवर गेलो चांदण्या बघायला. सुदैवाने आकाश निरभ्र असल्याने आकाशात पडलेला चांदण्यांचा खच बघता आला.. अस आकाश फक्त आणि फक्त समुद्रकिनारीच बघता येत...
दि. २३ मार्चः
सकाळी उठुन चहा पिउन ताजतवान होउन गेलो परत समुद्राला भेटायला आणि उगवत्या सुर्याला आणि त्याच्या प्रतिबिंबाला कॅमेर्यात बंद करुन टाकल.
फोटो काढुन परतीच्या वाटेवर असताना यांनी दर्शन दिल.
स्टार फिश
तिथुन निघालो आणि दापोलीजवळ माझ्या माहेरी आलो. कथा कादंबर्यांमधुन असत की नाही स्त्री पात्राच कोकणातल माहेर अगदी तस्सच हे माझ कोकणातल माहेर. गो. नि दांडेकरांच्या पडघवलीमध्ये असलेल पडघवली गाव ज्याच खर नाव आहे "गुडघे" कोकणातल माझ माहेर.
आणि आता अन्जुडे दिल थाम के बैठो क्योंकी आ रहा है तुम्हारा प्रॉमिस:
गो. नि दांडेकर उर्फ आप्पांच घर
तिथुन निघाल्यावर वाटेत भोर घाटात विश्रांतीसाठी थांबलेलो असताना दिनकररावांचे लोभसवाणे दर्शन झाले आणि त्यांना कॅमेर्यात टिपण्याचा मोह अज्जिबात टाळु शकले नाही...
हे दिवसभराच काम संपवुन घरी निघालेले दिनकरराव
गोपिका, दिनेश, अन्जु, सुचि
गोपिका, दिनेश, अन्जु, सुचि खूप खूप धन्यवाद तुम्हाला.
दिनेशदा तुम्ही सांगितलेल गाण नक्की बघेन. कोणत्या चित्रपटात आहे सांगु शकाल का?
तुम्हा सगळ्यांना आनंदाची बातमी हा धागा वाहता होता, अॅडमिनला विनंती करुन धागाच वाहण बंद केल आहे तेव्हा बिनधास्त प्रतिसाद द्या.. तुम्हाला प्रची आणि माझ तोडकमोडक प्रवास वर्णन आवडतय हे पाहुन खूप आनंद वाटला.
गोनिदांच्या घराचं मस्त
गोनिदांच्या घराचं मस्त सरप्राईज दिलंस फोटोज पण छान आलेत गं सगळे..
केशवराजाला गेली नाहीस का? वेळेचं गणित जमलेलं दिसत नाही बहुतेक.
अग हो ताई.. जाताना गाडीच मागच
अग हो ताई.. जाताना गाडीच मागच चाक पंक्चर झाल त्यामुळे १:३०-२:०० तास फुकट गेले, व्याघ्रेश्वराच दर्शन, अभिषेक हे आटपायला जवळ जवळ दुपारचे २ वाजले. त्याच्यापुढे केशवराज चढुन उतरायला बराच वेळ लागला असता, बरोबर ५ वर्ष आणि ६२ वर्ष या वयातली मंडळी होती. दुसर्या दिवशी आंजर्ल्याच्या गणपतीच दर्शन ठरवल होत. त्यामुळे यावेळेस केशवराजला दुरुनच नमस्कार
मस्तंच ट्रीप झाली वाटतं!!!
मस्तंच ट्रीप झाली वाटतं!!! आम्ही गोकर्णला गेलो होतो विकेंडला.
उद्या पाहाटे २७ गुरुवार
उद्या पाहाटे २७ गुरुवार पूर्वेस चंद्र शुक्र जवळ दिसतील फोटो काढा चांगला .
मुग्धा मस्त फोटो आहेत......
मुग्धा मस्त फोटो आहेत...... सगळेच आवडले.
खास करुन star fish चा आवडला...
मला पण परुळ्याच्या बिच वर मिळाला होता एकदा...वाळ्लेला....अजुन संग्रही आहे
धन्स जवे.
धन्स जवे.
माझा प्रतिसाद कुठे गेला ...
माझा प्रतिसाद कुठे गेला ...
असो छान झाली ट्रीप
प्राची आधी हा धागा धावता होता
प्राची आधी हा धागा धावता होता त्यात आपले पहिले प्रतिसाद वाहून गेले. तुझा पहिलाच प्रतिसाद होता आणि माझा दुसरा.
Pages