१) क्रुझ लायनर्सचे पण बालि आवडते स्थळ आहे. आमच्या हॉटेलच्या मागेच ही लायनर थांबली होती.
२) बेनोआ गावात पण एक फेरी मारली. आपल्या वर्सोवा सारखेच गाव पण कमालीचे सुंदर. तिथे टिपलेला हा सुर्यास्त. अगदी चित्रात असावी तशी बगळ्यांची माळ आली आहे फोटोत.
३) गावातच एक जुन्या पद्धतीचे जहाजही दिसले
४) संध्याकाळी जेवायला सहजच एका हॉटेलमधे शिरलो. मला खाण्याजोगा एकच प्रकार होता, तो म्हणजे चीज सँदविच.पण ते सुद्धा असे मस्त सजवून दिले होते.
५) रात्री परत बीचवर गेलो तर लायनर तिथेच होते. मग जरा फोटूग्राफीची हौस भागवून घेतली.
७)
८)
हे फोटो कसे काढले विचारू नका कारण ते मी नाही तर माझ्या कॅमेराने आपल्या मनाने काढलेत.
९) हॉटेलमधे जागोजाग असे निशिगंधाचे गुच्छ ठेवलेले असत. सर्व कॉरीडॉर दरवळत असे.
१०) होटेलचा व्हरांडा
११)
१२)
१३) रिसेप्शनमधे लाकडाचा भरपूर वापर केला होता.
१४)
१५)
मग आम्ही एका बेटावर गेलो. तिथे कासवांचे संवर्धन केले जाते. त्या बेटाचे प्रथमदर्शन
१६)
आपण नेहमी बघतो त्यापेक्षा वेगळी कासवे होती
१७)
१८)
१९)
२०) कासवांचे अवयव विकायला तिथल्या सरकारने बंदी घातली आहे.
२१)
२३)
तिथेच एक वेगळे झाड दिसले... आधी वाटले झाडाला चिमुकल्या छत्र्याच लागल्या आहेत.
२४) मग त्याच झाडाला एक फळही दिसले.. ( तोंडात टाकायचा मोह आवरला )
क्रमश :
सर्व फोटो मस्तच.
सर्व फोटो मस्तच.
अप्रतिम फोटो!! खरंच त्या
अप्रतिम फोटो!!
खरंच त्या उलट्या छत्र्याच वाटताहेत!
दा, त्या निशिगंधाचा फोटो मी डाऊनलोड करून घेऊ का? फार म्हणजे फारच आवडलाय! इथपर्यंत घमघमाट आला!
मस्त फोटो दा!!! निशिगंधाचा
मस्त फोटो दा!!!
निशिगंधाचा घमघमाट मला पण आला इथे.
त्या छत्र्यांखालच्या फळाचा रंग आपल्या जाम सारखा आणि आकार आवळ्यासारखाच आहे.
कासव फार गोड आहेत सगळी.
दिनेशदा सगळेच फोटो मस्त.
दिनेशदा सगळेच फोटो मस्त.
वा, मस्त फोटो आहेत सगळेच
वा, मस्त फोटो आहेत सगळेच ....
हे फोटो कसे काढले विचारू नका कारण ते मी नाही तर माझ्या कॅमेराने आपल्या मनाने काढलेत.>>>> हा काय प्रकार आहे ??? खरंखरं सांगा .......
अप्रतीम! डोळे निवले. हसलीस
अप्रतीम! डोळे निवले.:स्मित:
हसलीस एकदा भिजल्या शारद राती, बहरली फुलानी निशीगन्धाची नाती!
निशीगन्ध माझाही खूप आवडता, मोगर्यापेक्षाही जास्त. चीज सॅन्डविच आवडले. निसर्ग इतका सुन्दर असु शकतो हे तुमच्या प्रत्येक ट्रिपचे फोटो पाहिल्यावर कळते, कारण तुम्ही पण ते भाव निर्मळ मनानेच टिपता.:स्मित:
मस्तच .. रात्रिचे लायनरचे
मस्तच ..
रात्रिचे लायनरचे तर अप्रतिम..
सुरेख! कासवं किती नक्षीदार
सुरेख! कासवं किती नक्षीदार आहेत. मला बगळ्यांच्या माळेचा फोटो खूप आवडला.
सुंदर, अप्रतिम. अंडपण न
सुंदर, अप्रतिम.
अंडपण न खाणाऱ्या शाकाहारी लोकांचे जेवणाचे हाल होतात का अशा ठिकाणी?
मस्त फोटोज, दिनेशदा
मस्त फोटोज, दिनेशदा
मस्त फोटो !!!
मस्त फोटो !!!
आभार दोस्तांनो... शांकली माझे
आभार दोस्तांनो...
शांकली माझे सगळे फोटो प्रताधिकार मुक्त असतात.. पर्वान्गी... नाही लागत.
शशांक.. अंधार होता बीचवर.. फोकस होत नव्हता व्यवस्थित.
रश्मी... क्या बात है..! पण साधारण जिथे हवेत प्रदूषण कमी असते तिथले फोटो चांगले येतातच.
अन्जू.. तसेच काही नाही. बाहेर हॉटेलमधे नाही मिळायचे पण आमच्या हॉटेलच्या बफे मेनू मधे असायचे. तसेही सुपरमार्केटमधे पॅक केलेले पदार्थ मिळतातच. आणि फळं तर सगळीकडेच असतात.
मस्त फोटो.
मस्त फोटो.
काका...ती कासवं मार्बल
काका...ती कासवं मार्बल फिनिशिंग दिल्या सारखी वाटताहेत
हो ना ! आणि छान हेल्दी पण
हो ना ! आणि छान हेल्दी पण दिसत होती.. मी सूर ( ओमान ) मधली भली मोठी कासवं बघितली आहेत.. पण ती सगळी प्लेन पाठीची होती. अशी नक्षीदार पाठीची मी पहिल्यांदाच बघितली.
मस्त आहे हे कासवपुराण तो
मस्त आहे हे कासवपुराण तो वॉटर लिलीचा फोटो सुर्रेख (हो, शब्द बरोबरच लिहिलाय) आलाय.
बारावा फोटो बघून गोव्यातल्या / कोकणातल्या देवळांची आठवण झाली. असाच कौलारु मंडप असतो बहुतेक देवळांना.
छान आहेत फोटो. १४ नंबरचं कमळ
छान आहेत फोटो.
१४ नंबरचं कमळ खोटं वाटावं इतकं सफेद आलंय
माधव, तिथे बहुतेक वेळा
माधव, तिथे बहुतेक वेळा छपरांसाठी एक खास प्रकारचे गव्त वापरले होते. ते उन्हाळ्यात गरम होत नाही, पावसाळ्यात गळत नाही ( तिथे दोन्ही जोरदार ) आणि काही वर्षांनी सर्वच्या सर्व बदलता येते.
वेका, आमच्या हॉटेलमधेच जागोजाग अशा वॉटर लिलिज होत्या.
मस्तच. कासवं सुंदर आहेत
मस्तच. कासवं सुंदर आहेत एकदम.
बालीला शुद्ध शाकाहारी जेवण मिळणं म्हणजे चैनच म्हणायची का?
किती सुंदर डिजाईन्सची कासवं
किती सुंदर डिजाईन्सची कासवं आहेत.
त्या कमळाच्या पाकळ्याही किती रेखिव आहेत!
निशिगंधाची रचना अप्रतिम! हॉटेलचं लँडस्केपींग ही सुरेख आहे. १०व्या फोटोत हॉटेलचा व्हरांडा दाखवलाय...तिथे डाविकडे लँपशेड्ससारखं दिसतय तिथे दिवे होते का?
दिनेश, म्हणजे कौलांवर गवत
दिनेश, म्हणजे कौलांवर गवत पसरतात की नुसतेच गवताने शाकारतात छप्पर?
कासव मस्त नक्षीदार
कासव मस्त नक्षीदार आहेत.
'बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळच ती' कवीने किती यथार्थ वर्णन केलंय हे ह्या फोटोवरून लक्षात येतय.