स्थलांतरित कॅनडा गीज

Submitted by मानुषी on 19 March, 2014 - 10:26

घराजवळ्च्या खोलगट परिसरात येऊन जाऊन असणारे कॅनडा गीज. हिमवर्षावानंतर.....

आठवडाभराने बर्फ वितळ्ल्यावर......

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अय्या!
कित्ती मज्जा वातत असेल हे बघताना Happy
पुर्वी एक शोपिस यायचं! त्यावर दोन पक्षी असायचे आणि मध्ये एक बाऊल.आणि ते पक्षी एक एक करत आत डोकावत असतात. ते हे गीजच असायचे का?

दुरून बघायला छान वाटतात हे, १०-१२ लहान पिल्लं रांगेनी आईच्या मागे मागे चालल्येत.
पण अत्यंत कर्ण कर्कश्य आवाजात ओरडतात हे goose. डोकं उठतं आणि घाण करून ठेवतात ती वेगळीच.

मानुषी, मस्त फोटो! Happy

पण मला एक शंका आहे, ४ दिवसांत बर्फ वितळल्यावर ते ग्राउंड इतकं कोरडं झालं? तिथे बर्फ पडल्याचा मागमूस नाहीये म्हणून विचारलं.

रिया तू म्हण्तेस ते करकोचे असावेत
हो अमित....!
शांकली...एक तर मधले ३/४ दिवस छान कड्क ऊन पड्लं. तरी हे ग्राउंड ओलं कच्च आहे. पण गवतामुळे कळ्त नाहीये. आणि उतार खूप असल्याने उतारावर पाणी दिसत नाहीये. पण खोलगट भागात खूप ओल आहे.
सुजा .....सर्वांना धन्यवाद.

मस्त फोटोज मानुषीताई Happy

पण अत्यंत कर्ण कर्कश्य आवाजात ओरडतात हे goose. डोकं उठतं आणि घाण करून ठेवतात ती वेगळीच.>>>>अगदी अगदी. फिनलंडला हे पाहिलंय. Happy

ह्याना थंडि नाहि वाजत का....बघितल कि हेवा वाटतो कारण माणुस बाहेर पडायचे म्हणजे ३-४ किलो च ओझ लटकवुनच बाहेर पडायचे.

बाकि फोटो छान आहेत

खुप सुंदर !
बर्फात राहणारे बरेच प्राणी पक्षी शुभ्र रंगाचे असतात. त्यांना आपला बचाव तरी करायचा असतो किंवा सावजाच्या
नजरेपासून वाचायचे असते. या साहेबांना तशी गरज वाटत नाही असे दिसतेय.

जिप्सी प्रज्ञा गोपिका अन्जू दिनेश शशांक कांदापोहे सायली शोभा
सर्वांना धन्यवाद.
शोभा इट्स माय प्लेझर!
गोपिका इथे अजूनही तीन चार किलोचं ओझं बाळ्गावं लागतं बाहेर जाताना.
दिनेश असं वाचलं की बरेच गीज इथे ़खूप दिवस रहातात आणि जनजीवन डिस्ट्र्ब करतात म्हणून काही ठिकाणी त्यांची गॅस चेम्बर्स मधे सामुहिक हत्या करतात.
हे मात्र खूप वाईट वाट्लं.

कॅनडा गीज हा एक अत्यंत त्रासदायक उच्छाद आहे. झुंडीनी येतात. प्रचंड घाण करतात. कर्कश्य आवाजात ओरडतात. यांची पिले/ अंडी जवळ्पास असतात तेव्हा चुकुन जवळ्पास गेल पार्क मधे खेळताना तर छोट्या मुलान्च्या अन्गावर धावून जातात. मझ्या ४ वर्शा च्या मुलीला attack केल तेव्हा लक्शात आल की पन्ख पूर्ण पसरवून उन्च झालेला तो पक्शी तिच्या पेक्शा मोठा दिसत होता.
आणि सगळ्यात मोठा व्याप म्हणजे भर highway वर चालत रस्ता cross करतात. सगळ traffic थांबतं. मग आर्धा झाला कि उलटे फिरतात.यांना उड्ता येत बरका पण त्यांना कुठुन तरी कळलय की ते protected आहेत आणि कोणी त्यांच्या अंगावर गाडी घालणार नहिये तर जास्तच निर्ढावल्या सरखे चालतात.

हुशssss अता जरा बर वाट्ल.:-)

Biggrin ओक्के ...चल...बरं वाट्लं ना तुला :स्मितः
शिरीन अगदी पट्लं. अगं आम्ही इथे चार दिवसांसाठी येणार ...त्यामुळे आम्हाला त्यांचं कौतुक!

बर्फातले पहिले ४ फोटो आवडले.

शिरीन, Biggrin पोस्टी मागचा सात्त्विक वैताग पोचला. फ्लोरिडात सँडक्रेन्सचा असाच उच्छाद आहे.