MH 370चं काय झालं...

Submitted by पालथाघोरस on 15 March, 2014 - 01:41

मलेशियन ऐअरलाईन्सच्या MH 370 च्या गायब होण्याचे गूढ वाढत चालले आहे. तेरा देशांच्या चाळीस नौका, पन्नास विमाने, अत्याधुनीक उपग्रह ईमेजरीचा वापर करुनही या विमानाचा कोणताही मागमुस लागलेला नाही..
नवीन माहीतीनुसार ह्या विमानाने मार्ग बदलून पश्चिमैकडे प्रवास सुरु केला होता ,या विमानात अत्याधुनिक संपर्क यंत्रणा होत्या /आहेत. तरीही यातल्या एकाही यंत्रणेचा वापर झाला नाही ,या यंत्रणा लागोपाठ बंद पडत गेल्या .
या बोईंग 777 विमानाच्या रोल्स राईस इंजिनमध्ये असलेल्या अत्याधुनिक ट्रान्समिटरचा संपर्क उपग्रहाशी होता, विमानाचा ग्राउंड स्टेशनशी संपर्क तुटल्यानंतरही उपग्रहाशी ईंजिनाचा संपर्क चालू होता. यातून विमान पश्चिमेकडे वळून भारताच्या दिशेने पूढे चार पाच तास प्रवास करत होते अशी नवी माहीती समोर आली आहे.
विमानाच्या बाबतीत काय घडले असेल असे आपल्याला वाटते.?
1.हा घातपाताचा प्रकार असावा, हायजॅक करुन क्रॅश घडवले असावे?

2.हा एक अपघात असावा, फक्त विमानाचे अवशेष सापडत नसावेत?

3.विमानाच्या बाबतीत ज्ञात अपघातांपेक्षा वेगळे काहीतरी घडले असावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते तसेच थन्ड असतात कायम. ( आणी मग बेसावध ठेऊन शत्रुवर हल्ला करायचा, ही त्यान्ची रणनिती) धोकादायक आहेत एक नम्बरचे.

ह्या सर्व प्रकारात चीन अतिशय थंडपणे प्रतिक्रिया देत आहे >> नक्की काय सुचवायचंय?

अजून एक बातमी मटा मध्ये आलेली - http://maharashtratimes.indiatimes.com/international/Missing-Malaysian-f...

ह्या सर्व प्रकारात चीन अतिशय थंडपणे प्रतिक्रिया देत आहे
>>>

उलट चीनची प्रसारमाध्यमे खूप पहिल्यापासून मलेशियाच्या तपासाबद्दल, सादर केल्याजाणार्‍या माहितीबद्दल आरडाओरड करत आहेत. ७०% प्रवासी चीनी आहेत ह्या विमानात.

धन्यवाद योकु, मटाच्या लेखाबद्दल! मला वाटतं की तालिबान्यांद्वारे हे विमान भारतात कुठेतरी धडकवायची अमेरिकेची योजना असू शकते.

अमेरिकन सरकार सांगते की ९११ मुस्लिम अतिरेक्यांनी केले. मात्र त्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. अगदी अमेरिकेतले नागरिकही नाही. तर या दाव्याला पुष्टी मिळावी म्हणून एखादे विमान भारतावर धडकवून द्यायचे नाटक करायचे.

बहुधा एमेच ३७० च वापरायचे ठरलेही असेल कदाचित. पण ऐनवेळी काहीतरी गडबड झाल्याने कुठेतरी उतरवावे लागले असेल. कदाचित मलेशियाच्या सरकारासोबत वाटाघाटी चालूही असतील (प्रवाशांच्या संदर्भात). या मार्गात पर्याय भरमसाट आहेत. Sad

आ.न.,
-गा.पै.

अजून एक...
२३०+ फूट लांबीचे विमान त्यांनी कसं अन कुठे लपवलं असेल? लाईव्ह रडार वर काहीही क्लू नाही हे काही पटत नाही. अमेरिका + बाकी पुढारलेले देश, पुढारत असलेले देश यांना काहीही पत्ता नाही असं खरंच नाही वाटत.
पाण्याच्या आत तर शक्य नाही कारण विमान तर काही पाण्बुडी नाही!
हवेत नाही कारण त्यात तेव्हढं इंधन नव्हत.

गूढ आहे हे मात्र खरं...

बहुधा एमेच ३७० च वापरायचे ठरलेही असेल कदाचित. पण ऐनवेळी काहीतरी गडबड झाल्याने कुठेतरी उतरवावे लागले असेल. कदाचित मलेशियाच्या सरकारासोबत वाटाघाटी चालूही असतील (प्रवाशांच्या संदर्भात). या मार्गात पर्याय भरमसाट आहेत. >>> शक्यता आहे!

त्याही पुढे जाऊन -
पाकिस्तान ला हवे असेल तर पाहिस्तानात उतरवून इंडिअन मुजाहिदिन ला देऊन भारतात ९/११ सदृश हल्ला करवणे शक्य आहे.

आयला, तुम्ही पाकीस्तानी लष्कराला ही आयड्या विकत द्या, पाच पिढ्यांची सोय होईल. पण तत्पूर्वी भारत सोडून कुठेतरी पळून जा!

अगदी अमेरिकेतले नागरिकही नाही. तर या दाव्याला पुष्टी मिळावी म्हणून एखादे विमान भारतावर धडकवून द्यायचे नाटक करायचे.

हा, हा, लैच इनोदी राव तुमि!!! मंजि त्यो दादा कोंडके हुता त्याहून लै जादा!!

च्या मायला, अमेरिकेला काय इतर उद्योग नाहीयेत?
अमेरिकेतले २५ टक्के नागरिक अजूनहि सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असे समजतात. तसेच पृथ्वी गोल नसून सपाट आ।ए असे समजतात. अश्या "विद्वान" लोकांचा विश्वास नसेल तर काही फरक पडत नाही.

पुनः जर मायबोलीवर स्पिन द यार्न अशी स्पर्धा ठेवली तर तुम्हा दोघांना पहिले बक्षीस.!

Rofl

अमेरिकन सरकार सांगते की ९११ मुस्लिम अतिरेक्यांनी केले. मात्र त्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. अगदी अमेरिकेतले नागरिकही नाही. तर या दाव्याला पुष्टी मिळावी म्हणून एखादे विमान भारतावर धडकवून द्यायचे नाटक करायचे.
>>>

गापै तुम्ही काय खाता आणि काय पिता ने नक्की लिहा इथे. रिक्रिएशनल ड्रग्जची खूप मागणी आहे जगतात. मानलं तुम्हाला!!

अजून चाललेच आहे का(तारे तोडणं .. काहीच्या काही प्रतिक्रिया वाचून असेच वाटले.)

विमानाचा इंधण साठा किती होता ह्या माहितीवरून तरी विमान कसे कुठवर जाईल विचार करत नाही व बांधतात ठोकताळे... कैच्याकै... Proud

हम्म! ते विमान रात्री उडाले आणी काही विद्यार्थ्यान्नी ते दिवसा पाहिले म्हणे, मलेशियाच्या जन्गलावरुन जाताना. ते टॉमनॉड वरुन सर्च करत होते. घ्या, एवढे जवळ होते का ते? कुणी म्हणते तालिबान्यानी पळवले, कुणी म्हणते समुद्रात बदकन पडले.

पोलीस तपास करत आहेत म्हणे.

नक्की पाय प्रकार आहे हे अजून एक कोडंच आहे.. पण झाल्या प्रकारावरून अमेरिकेतील एव्हिएशन एक्स्पर्टस आणि चीनने नोंदवलेली प्रतिक्रिया रास्त आहे - 'जे मलेशियाने जगासमोर आणलंय ते पूर्ण सत्य नाही, आणि पूर्ण सत्य मलेशिया सरकार जगासमोर आणत नाही आहे'.
आधीच १० दिवस झालेत, हातात आता जेमतेम २० दिवस आहेत फ्लाईट आणि मुख्यत्वे ब्लॅक बॉक्स शोधायला, कारण त्याची बॅटरी ३० पर्यंतच चालते.. जर हे अजून २० दिवसांत मिळवणं शक्य नाही झालं तर फ्लाईटचं नक्की काय झालं होतं हे कायमच एक गूढ राहील.

अजून एक - मालदीव मध्ये बर्याच लोकांना ८ मार्चला सकाळी ६.१५ वाजता एक 'लो फाईंग जेट' दिसलं, जे पांढर्या रंगाचा आणि लाल पट्टे असलेलं होतं. मालदिव्ज मलेशियापासून साधारण २००० माईल्स दूर आहे आणि त्या परिघामध्ये आहे ज्या परीघामध्ये फ्लाईटने शिल्लक इंधनावर प्रवास केला असू शकतो. आणि मुख्य वैमानिक शाह च्या घरी जो होममेड फ्लाईट सिम्युलेटर मिळाला, त्यात हिंदि महारागराच्या आसपासच्या ५ प्रॅक्टीस रनवेचं सॉफ्टवेअर होतं. मालदिव्ज सकट.

सगळ्या शक्यता पहाता हे विमान कुठल्याही देशाच्या हद्दीवरून गेलं असेल असं नाही वाटत.

आधीच १० दिवस झालेत, हातात आता जेमतेम २० दिवस आहेत फ्लाईट आणि मुख्यत्वे ब्लॅक बॉक्स शोधायला, कारण त्याची बॅटरी ३० पर्यंतच चालते.. जर हे अजून २० दिवसांत मिळवणं शक्य नाही झालं तर फ्लाईटचं नक्की काय झालं होतं हे कायमच एक गूढ राहील. >>> ब्लॅक बॉक्स म्हणजे नक्कि काय असते?

ज्यात वैमानीक आणी इतरान्मधील बोलणे वगैरे रेकॉर्ड होते, ज्यावरुन विमानाचा पत्ता लागु शकतो.

कनिष्क विमानाच्या अपघातानन्तर ब्लॅक बॉक्स जेव्हा सापडली त्यावरुन पुढचे सर्व पुरावे सापडले होते.

स्नेहा_म >> ब्लॅक बॉक्स म्हणजे फ्लाईट डेटा रेकॉर्डर किंवा अॅक्सिडेंट डेटा रेकॉर्डर.. फ्लाईट च्या शेपटाकडे बसवलेलं एक इलेक्ट्राॅनिक डिवाईस.. जे फ्लाईट परफॉर्मन्स पॅरामिटर रेकॉर्ड करत असतं तसच काॅकपिट मधील संभाषण, एअर ट्रॅफिक आॅपरेटरशी झालेलं संभाषण, पायलटकडुन क्र्युला दिलेल्या सुचना, भवतालचा आवाज रेकॉर्ड होत असतो.. ह्याचा उपयोग खास करून अॅक्सिडेंटचैइ करणं शोधण्यासाठी करतात.. ह्या केस मध्ये प्रवासी हयात असायची शक्यता दुर्दैवाने कमी आहे पण निदान ८ मार्चला नक्की काय झालं होतं हे बरचस समजू शकतं जर ब्लॅक बॉक्स मिळाला तर...

सगळे माझे अंदाज

१) मलेशिया हा देश मुस्लिम देश आहे. Uighur विघरवाद्यांचा हात म्हणजेच मुस्लिम देशांचा पाठींबा असण्याची शक्यता असु शकते. चीनीसरकारने मुस्लिम लोकांचे लाड करण्याचे नाकारल्यामुळे त्यांना धडा शिकवण्याचा इरादा असावा. या सगळ्या प्रयत्नात मलेशिया सरकार सगळ्यांना एकदा साउथ चायना समुद्र आणि एकदा भारतीय उपसागर धुंडाळायला पाठवते हा प्रकार वेळकाढूपणाचा वाटतोय , म्हणजे साऱ्या जागाच लक्ष जेव्हा साउथ चायना समुद्राकडे लागून राहील होतं तेव्हा विमान भारतीय उपखंडात उतरलं असू शकत/

२) कोणत्याही विमानाला धावपट्टीसोडून इतरत्र कुठेही उतरायचे असेल तर विमानातील इंधन पूर्णपणे संपल्यावरच ते खाली उतरवणे गरजेचे असते. नाहीतर स्पोट होऊ शकतो/त्यासाठी विमानाने भरपूर फेऱ्या मारून इंधन आपोआप जाळले जाते. तसेही इथे केले असण्याची शक्यता आहे.

३) खोल समुद्रात बुडाले- , पण समुद्र आपल्या पोटात काहीच ठेवत नाही , कुठल्या तरी किनाऱ्यावर काहीतरी अवशेष येण अपेक्षित आहे .

४) पायलट ने घरी स्टीमुलेटर बसवून घेतलं होत त्यात त्याचं प्रशिक्षण करण्याचा हेतू असावा.

५) मलेशियाने २ इराणी म्हणुन ज्यांचा फोटो दाखवला त्यातील एका व्यक्तीचे पाय हे दुसऱ्या व्यक्तीलाही लावण्याचा प्रकार केला आहे. म्हणजे त्याने घेतेलेल सामान अजिबात न कळू देणा हा हेतू असवा.

६) विमानाचा त्राणस्पॉनडर बंद ठेवण्यात आला होता तसेच मलेशियन एअरवेज चा एविअशन इंजीनियरसुद्धा ह्याच विमानात आहे . तर्कास बराच वाव अहे.

एक पडलेलं कोड : ह्या इस्लामधर्मियांना जर खरच डोक ( बुद्धी) आहे तर तिचा उपयोग जगाच्या कल्याणासाठी न करता विनाशासाठी का वापरत आहेत?

टण्या,

९११ कोणी केलं ते मला माहीत नाही. काय लिहिलंय ते कृपया नीट वाचावे.

>> अमेरिकन सरकार सांगते की ९११ मुस्लिम अतिरेक्यांनी केले. मात्र त्यावर कोणी विश्वास ठेवत नाही.

मी म्हणतोय की अमेरिकन सरकारने जाहीर केलेल्या अधिकृत मतावर लोकांचा विश्वास नाहीये. कृपया इथे पहा : http://en.wikipedia.org/wiki/Opinion_polls_about_9/11_conspiracy_theories . तिथे २००८ सालच्या सर्वेक्षणानुसार जागतिक सरासरीने केवळ २५% लोक अल-कायद्याने ९११ घडवले असे मानतात.

आ.न.,
-गा.पै.

खरच यात एकतर अमेरिकेचा किंवा चीनचा हात असेल का असे वाटत आहे.

>>आणि त्याला आग आणि पाण्यापासूनही धोका नसतो
मग सगळी विमाने, जहाजे, गाड्या, आणि महत्वाच्या वस्तू या मटेरिअलपासुन का बनवत नाहीत ? Uhoh

Pages