मलेशियन ऐअरलाईन्सच्या MH 370 च्या गायब होण्याचे गूढ वाढत चालले आहे. तेरा देशांच्या चाळीस नौका, पन्नास विमाने, अत्याधुनीक उपग्रह ईमेजरीचा वापर करुनही या विमानाचा कोणताही मागमुस लागलेला नाही..
नवीन माहीतीनुसार ह्या विमानाने मार्ग बदलून पश्चिमैकडे प्रवास सुरु केला होता ,या विमानात अत्याधुनिक संपर्क यंत्रणा होत्या /आहेत. तरीही यातल्या एकाही यंत्रणेचा वापर झाला नाही ,या यंत्रणा लागोपाठ बंद पडत गेल्या .
या बोईंग 777 विमानाच्या रोल्स राईस इंजिनमध्ये असलेल्या अत्याधुनिक ट्रान्समिटरचा संपर्क उपग्रहाशी होता, विमानाचा ग्राउंड स्टेशनशी संपर्क तुटल्यानंतरही उपग्रहाशी ईंजिनाचा संपर्क चालू होता. यातून विमान पश्चिमेकडे वळून भारताच्या दिशेने पूढे चार पाच तास प्रवास करत होते अशी नवी माहीती समोर आली आहे.
विमानाच्या बाबतीत काय घडले असेल असे आपल्याला वाटते.?
1.हा घातपाताचा प्रकार असावा, हायजॅक करुन क्रॅश घडवले असावे?
2.हा एक अपघात असावा, फक्त विमानाचे अवशेष सापडत नसावेत?
3.विमानाच्या बाबतीत ज्ञात अपघातांपेक्षा वेगळे काहीतरी घडले असावे.
१) कदाचीत अजुनही विमान
१) कदाचीत अजुनही विमान कुठेतरी सुखरुप असावं पण इतके दिवस उलटुन गेल्यावर ही आशा खुपच अंधुक झालीये.
२)किंवा लाईटनींग स्ट्राईकमुळे ट्रान्स्पाँडर्स निकामी झाले असावेत आणि अनकंट्रोल्ड डिकॉम्रेशनमुळे आतील लोक अनकॉन्सश झाली असावीत.
काहीही झाले असले तरी
काहीही झाले असले तरी विमानाअचे अवशेष तरी मिळायला हवेत ना कुठेतरी.
कदाचीत अजुनही विमान कुठेतरी
कदाचीत अजुनही विमान कुठेतरी सुखरुप असावं पण इतके दिवस उलटुन गेल्यावर ही आशा खुपच अंधुक झालीये >>>>>>१११
its a hijack
its a hijack
बर्मुडा त्रिकोण ची शक्यता ?
बर्मुडा त्रिकोण ची शक्यता ?
बर्म्युडा त्रिकोणचे तिथे
बर्म्युडा त्रिकोणचे तिथे अस्तित्व याआधी मानले जात नव्हते ,अचानक बर्म्युडा कसा तयार झाला?
आल्पस पर्वतावर पडलेल्या
आल्पस पर्वतावर पडलेल्या विमानाची आणि त्यातुन निर्माण झालेल्या सत्यकथा ( ७० दिवस ) आठवण झाली. सर्व प्रवासी सुखरुप असोत ही परमेश्वराजवळ प्रार्थना
काही तथ्ये.. १) क्वालांलपुर
काही तथ्ये..
१) क्वालांलपुर ते बिजिंग फ्लाईट चे अंतर = ५ तास ३० मिनिट
२) बिजिंग ला पोहचल्यावर उतरण्यासाठी लागणारा ट्रॅफिक वेळ = १ तास (किमान)
३) विमानात असणारे इंधन किमान ७ तासासाठी
४) विमान हवेत उंचवल्यावर १ तासाच्या आतच संपर्क तुटला या तोडण्यात आला.
५) म्हणजे त्यावेळेला ६ तास उड्डाण वेळ विमानापाशी ..
६) या ६ तासात विमान एक तर वळुन मलेशियावरुन फिलिपिन्स कडे वळल्यास मधे बरेच छोटी बेटे लागतात जसे रिईशी आयलंड इत्यादी बरेच आहेत
७) भारताकडे वळवल्यास मधे अंदमान निकोबार आयलंड आहे जी भारताच्या ताब्यात आहे आणि तिथे विमान शोधक रडार अस्तित्वात आहेत.
८) अंदमान आणि फुकेत यांच्या दरम्यान छोट्या बेटांचे समुह आहेत
९) अपहरण करायचे असल्यास कुठे तरी उतरावे लागणारच.. तर बेटांवर इतके मोठे विमान उतरवण्याकरीता धावपट्टी अस्तित्वात आहे का ? असल्यास ती बांधुपर्यंत इतर देशांची संरक्षण एजंसी काय करीत होते..
१०) उपग्रहावरुन धावपट्टी चे काम चालु असताना नक्कीच कळु शकते अथवा बाजुला चीन , भारत सारखे देश असताना त्यांच्या नजरेआडुन एखाद्या बेटांवर धावपट्टी अनधिकृत बांधली ???? इतके प्रगत झाले का ?
कदाचित परग्रह वासीयांनी पळवले
कदाचित परग्रह वासीयांनी पळवले असेल अन्यथा एव्हढ्या यंत्रणा असतांना एव्हढे मोठे विमान गायब होणे म्हणजे महदआश्चर्याची बाब आहे
विमान समुद्रात कोसळले
विमान समुद्रात कोसळले असण्याचीच दाट शक्यता आहे. कदाचित स्फोट न होता कोसळ्याने सरळ तळाशी (आतील भाराने) असण्याची शक्याता जास्त आहे.
no object in the space can go
no object in the space can go unidentified in advance countries. do missiles have transponders?
malaysian authorities have said it was hijacked. they must be negotiating. for some international reasons and to avoid panic, they may not disclose it. so there is hope.
मीही रोज बघतेय नेट वर. काहीच
मीही रोज बघतेय नेट वर. काहीच पुढे येत नाहीये.
पण जर खरेच हायजॅक असेल तर नासा का यात उतरलीये? आता भारताचीही रडार इन्फो मागवत आहेत पण रडार मध्ये विमान डीटेक्ट व्हायला ते विमान कोणत्या उंचीवरून जात होते ते आणि विमान सिग्नल ट्रान्समिट करत आहे कि नाही हेही महत्वाचे आहे .
रिमोट सेन्सिंग चे रडार एखाद्या उडत्या वस्तूचे लोकेशन ट्रान्समिशन - एमिशन वरूनच ठरवतात. याहून अडव्हांस काय असू शकते?
असे असु शकेल की ,विमानाचा
असे असु शकेल की ,विमानाचा संपर्क तुटला असेल व ते पुढे फ्लाय करत राहिले असेल व इंधन संपल्याने समुद्रावर अलगद फ्लोट करण्याच्या प्रयत्नात किंवा फ्लोट झाल्यानंतर फ्युसेलाजमध्ये पाणि शिरुन ते संपुर्णपणे पाण्याखाली गेले असेल, ज्यामुळे त्याचे अवशेष सापडत नसावेत. त्या दरम्यानच्या काळातच समुद्रात सेस्मिक एक्टीव्हीटी रेकाँर्ड केली गेली आहे.
ह्या विमानाबद्दल ऐकून मला
ह्या विमानाबद्दल ऐकून मला सारखी 'लॉस्ट' ह्या ड्राम्याची आठवण येते आहे.
समुद्रात कोस़ळले असल्याचीच
समुद्रात कोस़ळले असल्याचीच शक्यता आहे पण एवढ्यात उरलेल्या तेलाचा तवंग किंवा इतर तरंगू शकणार्या वस्तू दिसायला हव्या होत्या.
खुप वर्षांपूर्वी जग प्रद्क्षिणेला निघालेले एक विमानही असेच हरवले होते. त्यावर दोन चित्रपट आले होते. दुसरा मीरा नायरचा होता. पण ते विमान छोटे होते.
मला कुठेतरी वाचल्यासारखे आठवतेय कि विमानाच्या डिझाईनमूळे ते पाण्यावर तरंगू शकते. विमानातल्या सेफ्टी व्हीडीओ मधे पण तसेच दाखवतात पण तसे कधी प्रत्यक्षात घडलेले दिसत नाही.
आजच अमेरिकेचे माजी मंत्री
आजच अमेरिकेचे माजी मंत्री यांनी अपहृत विमानाद्वारे भारतवर ९/११ सारख्या हल्ल्याची शक्यता ट्वीट करुन वर्तवली आहे.
हल्ला
हल्ला ????????????????????
इतके दिवस ते विमान कुठे लपवुन ठेवलेले होते मग .. ?
जर त्यात फक्त ६ तासाचेच इंधन होते मग भारतावर हल्ला करण्याकरीता लागणारे इंधन कुठुन भरले त्यांनी ?
कारण विमानासाठी लागणारे इंधन सहजासहजी उपलब्ध होत नसते..
हल्ल्ला
हल्ल्ला ???????????????????????
हे प्रश्न चिन्ह कोणासाठी ?? ईतके प्रश्न कोणासाठी ?
आता पर्यंत हल्ला केलेला नाहीना ? मग कशाला आकांत ?
हे अमेरीकनस ऊगाच काहीही ऊठवून देतात झाल ! विसराव सगळ !
बाकी आता निवडणूका आल्यात, त्यात लक्ष घालाव, कश्याला अश्या वायफळ गोष्टीकडे बघाव ??
हल्ला केल्यास मग अतिरेक्यांना "तीव्र निषेध" सारख्या तिखट श्ब्दाचा मार दिला म्हणजे झाल, ईती कर्तव्य !!
तुम्हाला विचारले नाही मी किती
तुम्हाला विचारले नाही मी किती प्रश्न चिन्हे लावावीत.......कळल ...
मी काय करावे हे मला शिकवु नका..... लक्षात ठेवा
मी तुम्हाला सांगायला लागलो तर तुम्हाला ते परवडणार नाही...
तरीही सांगाच !!
तरीही सांगाच !!
९/११ चा हल्ला २००१ मध्ये
९/११ चा हल्ला २००१ मध्ये अमेरीकेत झाला,
२६ /११ चा हल्ला २००८ मध्ये भारतात झाला.
९/११ नंतर अमेरीकेत एकही यशस्वी हल्ला झालेला नाही. भारता बद्दल न बोललेच बर !!
भारताने २६/११ नंतर काही शिकलय ? उत्तर नाही असच आहे.
कुठेही माशी शिंकली तरीही अमेरिकनस त्याचा विचार करतात, त्यामुळे जर अमेरिकन लोकांनी चेतावणी
देऊनही २६/११ चा हल्ल्याच्यावेळेला आपण बेसावध होतोच.
कुठेही माशी शिंकली तरीही
कुठेही माशी शिंकली तरीही अमेरिकनस त्याचा विचार करतात, त्यामुळे जर अमेरिकन लोकांनी चिथावणी
----- चेतावणी हवे न?
बदल केलाय !! धन्स उदय !!
बदल केलाय !! धन्स उदय !!
भारताने सर्च ऑपरेशन थांबवले
भारताने सर्च ऑपरेशन थांबवले
विमान गेले नागपूर एटीसी
विमान गेले नागपूर एटीसी कक्षेतून?
मटा मधल्या वरील बातमीनंतर पुरुलिया शस्त्रक्षेपाची आठवण झाली.
-गा.पै.
काय काय होउ शकत भारतात ?
काय काय होउ शकत भारतात ?
भारता कडे अत्याधुनीक रडार प्रणाली आहे. इंड्रा, रोहीणी शिवाय रश्मि सारखी अति-अत्याधुनीक रडार
प्रणाली जी भारताने स्वता: विकसीत केलेली आहे. ह्या प्रणालीत लघु, मध्यम आणि तिव्र लहरीच्या सहाय्याने
अवकाशात लांबवर असलेली विमाने शोधता येतात. भारतात बसुन पश्चिम कडे सौदीत ऊडालेल्या विमानांची
माहिती घेता येते.
अश्या सर्व प्रणाल्या असुन काय फायदा ?
जर अश्या प्रणालीवर काम करणारे अधिकारी वरच्या आदेशाची वाट बघत बसले तर, जे खालील बातमीत
स्पष्ट दिसत आहे. जर नागरी हवाई वाहतुक मंत्रालयाने विचारणा केल्यावर हे लोक चेक करणार !!
मग विमान गेले असल्यास तसे कळवणार !! मग काय बैल गेला आणि झोपा केला !!
अश्या विमानांनी जातान थोडे बाँब टाकले तरी काय फरक पडतोय ? आम्ही आमच्या आदेशाचे पाईक !
===या नव्या खुलाशामुळे नागपूर एटीसीची भूमिका आता समोर येत आहे. क्वालालंपूरहून बीजिंगला जाणारे मलेशियन एअरलाइन्सचे विमान ८ मार्चपासून रडारवरून बेपत्ता आहे. दक्षिण आशियातून वायव्येकडे अर्थात अफगाणिस्तान, कझाकिस्तानसह आखाती देशाकडे जाणारी बहुतेक विमाने नागपूरच्या आकाशातूनच जातात. यामुळेच नागपूरला 'इंड्रा' ही अत्याधुनिक रडार प्रणालीदेखील बसविण्यात आली आहे. या प्रणालीमुळे नागपूर हे हैदराबाद, झारसुगडा (ओडिशा), कोलकाता व भोपाळ या चार रडारसोबत एकात्मिक झाले आहे. आकाशातून जाणाऱ्या प्रत्येक विमानाची माहिती नागपूरच्या एटीसीला मिळते. अशावेळी मलेशियाच्या पंतप्रधानांनी व्यक्त केलेल्या शक्यतेचा आधार घेतल्यास 'एमएच ३७०' हे गायब झालेले विमान सुरुवातीला झारसुगडा, नागपूर व नंतर भोपाळ एटीसी कक्षेतूनच कझाकिस्तानकडे गेले असावे. या संदर्भात नागपूरच्या एटीसी अधिकाऱ्यांची चर्चा केली असता, त्यांनीदेखील अशी शक्यता नाकारता येणार नसल्याचे मत व्यक्त केले. मात्र, हे विमान खरोखरीच येथून गेले का, हे सांगता येणे कठीण आहे. या संदर्भात अद्यापही नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडूनदेखील कोणतीही विचारणा झालेली नाही,' असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे विशेषाधिकारी शफीक शाह यांनी स्पष्ट केले. =====
रेफःhttp://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha/malay...
विमानात बनावट पासपोर्ट घेऊन
विमानात बनावट पासपोर्ट घेऊन फिरणारे दोन इराणी होते असे जर म्हणताहेत तर विमान अपहरण करून इराण ला घेऊन गेले असल्याचीही शक्यता आहे.
एकदा भारत क्रॉस केला तर पाकिस्तान, अफघानिस्तान वगैरे देशांची रडार यंत्रणा यथा-तथाच असावी.
एकूण सगळ्या बातम्या वाचून हे
एकूण सगळ्या बातम्या वाचून हे अपहरण असावे, मलेशियन गवर्मेंट ला माहीत असावे आणि तरीदेखील ते सांगत नसावेत असेच वाटते आहे.
मलेशियाचे विमान ईराणने हायजॅक
मलेशियाचे विमान ईराणने हायजॅक करण्याचे कारणच काय??
पाक अफगाणची रडार यंत्रणा यथातथाच असली तरीही अमेरीकेची लष्करी तळं अफगाणिस्तानात व गल्फ मध्ये आहेत ,तिथे अडव्हान्स सॅटेलाईट्स व रडारच्या कक्षेतुन हे विमान निसटणे अशक्य आहे.
<<मलेशियाचे विमान ईराणने
<<मलेशियाचे विमान ईराणने हायजॅक करण्याचे कारणच काय??>>
खरंच, उगाचच काम धंदे सोडून लोकं का बरं विमानं हायजॅक करत असावीत?
<<पाक अफगाणची रडार यंत्रणा यथातथाच असली तरीही अमेरीकेची लष्करी तळं अफगाणिस्तानात व गल्फ मध्ये आहेत ,तिथे अडव्हान्स सॅटेलाईट्स व रडारच्या कक्षेतुन हे विमान निसटणे अशक्य आहे.
>>
अमेरिकेला हे निसटायला हवे असेल तर शक्य आहे. कझाकस्तान मार्गे गेले तर शक्य आहे.
त्याही पुढे जाऊन -
पाकिस्तान ला हवे असेल तर पाहिस्तानात उतरवून इंडिअन मुजाहिदिन ला देऊन भारतात ९/११ सदृश हल्ला करवणे शक्य आहे.
Pages