Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36
स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.
याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
केक, हलवा आणि पोळ्यान्ची
केक, हलवा आणि पोळ्यान्ची कल्पना छान. बघते करुन.
धन्स.
प्राचीचा उपाय सर्वात बेस्ट
प्राचीचा उपाय सर्वात बेस्ट आहे. आणि सुंदर लागतात तशा पोळ्या. फुलका किंवा तळहाताच्या आकारा इतक्या केल्य तरी मस्त.. कल्पनेनंच तोंडाला पाणी सुटलं माझ्या.
फार्मर्स मार्केट मधून
फार्मर्स मार्केट मधून ऑर्गॅनिक म्हणून विकायला ठेवलेलं बीट आणलं होतं, चिरल्यावर आत थोडा भाग पांढरा दिसतोय. असं असतं का ? सालाजवळचा थोडा भाग पूर्ण पांढरा आहे, बाकीचा भाग नेहेमीसारखाच आहे.
हो, पांढर्या रंगाचे तसेच
हो, पांढर्या रंगाचे तसेच लाल-पांढरे, गोल्डन रंगाचे सुद्धा बीट असतात.
वेगवेगळ्या रंगांचे पाहिले
वेगवेगळ्या रंगांचे पाहिले आहेत पण एकाच बीट मधे दोन रंग असतात का हे माहित नव्हते म्हणून विचारले. म्हणजे वापरायला हरकत नाही का ?
वापरायला हरकत नाही.
वापरायला हरकत नाही.
ओके , धन्यवाद.
ओके , धन्यवाद.
गुलाबजामच्या उरलेल्या पाकाचे
गुलाबजामच्या उरलेल्या पाकाचे काय करू?
१. अजून गुलाबजाम बनवा. २.
१. अजून गुलाबजाम बनवा.
२. सुधारस.
३. कणी/मैदा घालून शंकरपाळ्या
४. पाकातल्या पुर्या
रोज चमचा-दोन चमचे आमटी, भाजीत
रोज चमचा-दोन चमचे आमटी, भाजीत घालून संपवता येईल.
धन्यवाद प्राची, मंजूडी सुधारस
धन्यवाद प्राची, मंजूडी
सुधारस आणि पाकातल्या पुर्या रेसिपी plss
कवठाची बर्फी उरली आहे. त्याचे
कवठाची बर्फी उरली आहे. त्याचे काय करता येईल??
श्वेतु पाकातल्या पुर्या आहेत
श्वेतु पाकातल्या पुर्या आहेत इथेच. सुधारस म्हणजे पाक थोडा गरम करुन खाली उतरव. थन्ड झाला की त्यात लिम्बाच्या २ फोडी पिळ. हलवुन घे. आम्बट गोड अशी चव लागली पाहिजे. पाक थोडाच असेल तर एक फोड पुरेल. पाकात वेलची जायफळ पुड असेलच.
कन्व्हेन्शल ओव्हनमध्ये
कन्व्हेन्शल ओव्हनमध्ये भरीताचं वांगं (हमखास) भाजण्याची युक्ती आहे का? अॅल्युमिनियम फॉइलम्ध्ये गुंडाळायचं लक्षात आहे पण टेम्प. टाइम इ. आठवत नाहिये.
आभार्स
मी नेहेमी वांग्याला फोर्कने
मी नेहेमी वांग्याला फोर्कने टोच्या मारून घेते आणि तेलाचा हात फिरवते बाहेरून आणि ४०० डि. फॅ. वर १ तास ठेवते.
फॉईल वांग्याला गुंडाळलीच
फॉईल वांग्याला गुंडाळलीच पाहिजे असं नाही. बेकिंग ट्रे ला फॉईल लाऊन घेते. वांग्याला खाचा मारून त्यात लसणाच्या पाकळ्या खोचते.वांग्याला तेलाचा हात फिरवून घेते. ३५० ला साधारण तासभर ब्रॉईल.
वांग्याला खाचा मारून त्यात
वांग्याला खाचा मारून त्यात लसणाच्या पाकळ्या खोचते.>> ही आयडिया भारी आहे. नेक्स्ट टायमाला नक्की करणार. धन्यवाद!
वांग्याला खाचा मारून त्यात
वांग्याला खाचा मारून त्यात लसणाच्या पाकळ्या खोचते.>> ही आयडिया भारी आहे. नेक्स्ट टायमाला नक्की करणार. धन्यवाद!
लसणाच्या पाकळ्याची आयडीया
लसणाच्या पाकळ्याची आयडीया मस्त वाटतेय. पण आता म्होरल्या टायमाला. हे वाचायच्या आधी नवर्^याने नेटवर शोधून कामगिरी फत्ते केली आहे. बहुतेक चाळीस मिनिटं लागली
मला वाटतं युसायुसु भाग २ अजूनही सुरू आहे त्यामुळे मला वाटतं थोडा गोंधळ आहे...अॅडमिनने तो धागा प्रतिसादासाठी बंद करायला हवा.
..आभार्स मंडळी.
मी पण वांग्याला खाचा पाडून
मी पण वांग्याला खाचा पाडून त्यात लसणीच्या पाकळ्या खोचते. कधी कधी हि मिरची पण लावते १-२. भाजून मस्त चव येते त्यांची. इथली वांगी असतील तर ४० मि आणि भारतीय दुकानात मिळणारी प्रोपर भरताची असतील तर १५-२० मि पुरतात. माझ्याकडच्या ओवन मधे हाय ब्रॉईल ऑप्शन आहे. तो बहुतेक ४०० डि फॅ ला असावा. त्यावर भाजते मी वांगं.
आधी असंच अख्खं वांगं चिरा
आधी असंच अख्खं वांगं चिरा देऊन, लसूण पाकळ्या, मिर्च्या घालून, फॉइलमधे गुंडाळून 'बेक' करायचे. आता थोडी वेगळी पध्दत वापरते. ती वापरून केलेल्या भरिताची चव जास्त आवडली. वांग्याची सालं काढून इंचभर जाडीच्या चकत्या करायच्या. दोन्हीकडून तेल लावून त्यावर लसूण पाकळ्या, मिर्च्यांचे तुकडे पसरायचे. ३५० डिग्री फॅ.वर १५-२० मिनिटं आणि नंतर दोन्ही बाजुंनी ३-४ मिनिटं हाय ब्रॉइल करायचं. थोडंफार सुटलेलं पाणी आटतं. मिर्च्या-लसूण जळत नाहीत आणि वांगी खमंग लागतात. उकडून निघाल्यासारखी नाही.
पुरणपोळी किंवा गुळपोळी करताना
पुरणपोळी किंवा गुळपोळी करताना पातळ लाटली जावी म्हणून मैदा वापरतात. मला मैदा आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक वाटतो. गुलाबी रताळी उकडून मी नेहमी पिठात घालून पोळ्या करते -विशेषतः इकडे ताजे पीठ मिळत नाही आणि बर्याच चामट पोळ्या होतात म्हणून. रताळी किंवा बटरनट स्क्वाश उकडून पिठात मिसळला कि पोळ्या मउ होतात आणि भाजीपण खाल्ली जाते. या दोन्ही भाज्या इथे स्वस्त .
हेच रताळ्याचे पीठ मी पुरणपोळीला आणि गुळपोळीला वापरून बघितले, मस्त मऊ पोळ्या झाल्या आणि मैद्याची गरजही नाही पडली
कुकर मध्ये एका डब्यात ( वरच्या ) रताळी उकडून घेऊन त्यातच पीठ मिसळायचे - शक्य तेव्हडे कमी पाणी. मस्त मऊ पोळ्या होतात आणि मिश्र कार्ब पण मिळतात - मुलांच्या डब्यात अगदी उत्तम राहणारा पदार्थ
...पुरण पोळ्या आणि हयग्रीव्ह
...पुरण पोळ्या आणि हयग्रीव्ह खीर खाउन कंटाळलोय...तरी १५ पोळ्यांचं पुरण उरलय....अजुन काही बनवता येइल का???
पुरणाचे कडबू. आमच्याकडे
पुरणाचे कडबू.
आमच्याकडे नुसतेच वाटीत घेऊन खाऊन संपवले जाते पुरण.:)
कडबु कसे करतात???........ मला
कडबु कसे करतात???........ मला आणि नवर्याला तस नुसतं खाणे फारसे पसंत नाही....
अनिष्का,
अनिष्का, http://www.maayboli.com/node/36597 हे बघा.
पुरणाची दिंडं.
मी कडबु असेच करते, फक्त उकडायच्याऐवजी करंज्या करून, तळून घेते.
थांकु प्राची.....
थांकु प्राची.....
काल रात्री साधी डाळ तांदूळाची
काल रात्री साधी डाळ तांदूळाची खिचडी केली होती. मध्ये दुसरा एक पदार्थ सापडला तर तोच खाल्ला अन चांगल भांड्भर खिचडी उरलीय. त्या खिचडीचं फोडणीवाल्या खिचडीशिवाय अजून काय करता येईल? घरात बेसन, रवा, चकलीची भाजणी, काही मसाले असं सगळं आहेच. सुचवा आता प्रकार कृपयाच...
योकु, खिचडीच्या चकल्या
योकु, खिचडीच्या चकल्या
वाचली रेस्पी. तसलं मिश्रण
वाचली रेस्पी. तसलं मिश्रण करून थालीपिठही लावता येईल ना?
खि + कां + ही. मी. + भाजणी असं करून?
Pages