लहानपणातली आठवण
विसरु शकणार नाही मी तुज्यावरचं प्रेम
त्या मोहक चेहर्य़ावरती रूळलेली केसांची लड़
अनं ती पडलेली गालावरची खळी,
सांग कशी विसरु शकेन मी. आठवतय का बघ तुला,
आपण लहानपणी असताना कित्ती स्वप्ने रचायचो.
नदीकाटी असताना सोनेरी वाळूत घरे बांधायचो ,
तुला चांगलं घर बांधता आलं की,मी पाड़ायचो.
अनं तू रडत बसायचीस मग मी पोट धरून हसायचो.
पण खरं सांगू ? मला त्यावेली तूजी इतकी कीव-
यायची की ,आतुन त्याचेच उबाळे यायचे .
मी तुला घर बांधून द्यायचा प्रयन्त करायचो.
पण तू ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नसायचीस.
तोपर्यंत सांज पाण्यात कलंड़लेली असायची.
मग एकमेकाना न बोलता घरी परतायचो,
घरी परतल्यावर तू रडलेली पाहून मी एकटाच-
कोपर्यात बसून रडायचो, अन नकळत हे माझ्या
आईला कळायचं तेंव्हा मला ती खुप बडवायची अन -
मी ओरडायला सुरवात केल्यावर तुला कळायचं
यावेळेस माझी तुला कीव यायची मग तू पळत
आमच्या घरी यायचीस अन मला सोडवायचीस
मग सगळच भांड फुटायचं आपण एकमेकांवर
प्रेम करतोय हे सारं गावंभर पसरायचं.........
पांडुरंग वाघमोडे (जत जि.सांगली)
पहीलिच लिखानातल्या चुका कमी
पहीलिच लिखानातल्या चुका कमी केल्या