लहानपणातली आठवण
Submitted by PANDURANG WAGHAMODE on 12 March, 2014 - 08:40
लहानपणातली आठवण
विसरु शकणार नाही मी तुज्यावरचं प्रेम
त्या मोहक चेहर्य़ावरती रूळलेली केसांची लड़
अनं ती पडलेली गालावरची खळी,
सांग कशी विसरु शकेन मी. आठवतय का बघ तुला,
आपण लहानपणी असताना कित्ती स्वप्ने रचायचो.
नदीकाटी असताना सोनेरी वाळूत घरे बांधायचो ,
तुला चांगलं घर बांधता आलं की,मी पाड़ायचो.
अनं तू रडत बसायचीस मग मी पोट धरून हसायचो.
पण खरं सांगू ? मला त्यावेली तूजी इतकी कीव-
यायची की ,आतुन त्याचेच उबाळे यायचे .
मी तुला घर बांधून द्यायचा प्रयन्त करायचो.
पण तू ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नसायचीस.
तोपर्यंत सांज पाण्यात कलंड़लेली असायची.
विषय:
शब्दखुणा: