माझे तुझे नाते कसे?

Submitted by मिल्या on 20 February, 2014 - 05:25

माझे तुझे नाते कसे?
शोलेतले नाणे जसे

झिडकारले त्यांनी मला
कवटाळले मी आरसे

मी सत्य साधे बोललो
धावून आली माणसे

रडलो जगासाठी जरा
झाले जगामध्ये हसे

मिळताच टाळ्यांची गुटी
धरले अहंने बाळसे

सोयरसुतक का बाळगू?
हा देह तर माझा नसे

होऊ कसा पडसाद मी?
बसले पहाडांचे घसे

अश्रूंस ओहोटी तरी
डोळ्यातले मिटले ठसे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझे तुझे नाते कसे?
शोलेतले नाणे जसे>> 'शोले' चा वापर भन्नाट आवडला

होऊ कसा पडसाद मी?
बसले पहाडांचे घसे>> वाह!

अश्रूंस ओहोटी तरी
डोळ्यातले मिटले ठसे>> खासच!

गझल आवडली

मिल्याचे नाव बर्याच दिवसांनी गझल विभागात दिसले. Happy

माझे तुझे नाते कसे?
शोलेतले नाणे जसे<<<<< आपली विकेट इथेच गेली. मार डाला, जियो,. बहोतखूब वगैरे सर्व काही....

माझे तुझे नाते कसे?
शोलेतले नाणे जसे>>>>>वा वा शोलेचा अफलातून वापर केला गेलाय.

मिळताच टाळ्यांची गुटी
धरले अहंने बाळसे >>>>>>सहीय !

होऊ कसा पडसाद मी?
बसले पहाडांचे घसे >>>>>>>क्या बात !

बरेच शेर आवडले.

धन्यवाद !

-सुप्रिया.

आपली विकेट इथेच गेली. मार डाला, जियो,. बहोतखूब वगैरे सर्व काही....<<<<<<<<
नंदिनी +१०००००००००० ....!!!

जियो मिल्याशेठ !