२०५० मध्ये जगात सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या भाषा कोणत्या असतील?

Submitted by बोबो निलेश on 19 February, 2014 - 10:59

ज्ञान जालावर वाचलेला एक चित्तवेधक लेख. असं खरंच होईल का?
त्याचा सारांश अनुवादाच्या रुपात - खास माबोकरांसाठी -

एंगको नामक भाषांच्या भवितव्याविषयी अंदाज वर्तवणाऱ्या मॉडेलनुसार शतकाच्या मध्यापर्यंत(२०५०) जगात खालील पाच भाषा सर्वाधिक बोलल्या जातील.
१) चायनीज (मॅन्डरीन)
२) स्पॅनिश
३) इंग्लिश
४) हिंदी - उर्दू
५) अरेबिक

२०५० पर्यंत सर्वात जास्त स्पॅनिश बोलणारे लोक अमेरिकेत असतील.
एका मतानुसार, आज जे लोक(हे बहुदा अमेरिकन लोकांना उद्देशून आहे) प्राथमिक शाळेत आहेत, ते २०५० साली त्यांच्या करीयरच्या शिखरावर असतील. त्या जगात जगाच्या ५० टक्के जीडीपीला चीन आणि भारत कारणीभूत असतील. त्यामुळे हे लोक काम करण्याच्या आशियाई (वर्क कल्चर ) संस्कृतीशी जुळवून घेऊ शकले नाही, तर त्यांना त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल.
(हेसुद्धा बहुदा अमेरिकन लोकांना उद्देशून आहे) तर मग काय विचार आहे? तुमचं मुल प्राथमिक शाळेत शिकतंय? त्यांना भवितव्य सुकर व्हावं, यासाठी तुम्ही त्यांना कोणती भाषा शिकवाल?

मूळ लेखाची लिंक खाली आहे.
http://fairlanguages.com/what-are-the-top-5-world-languages-in-2050/

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजून लग्नच झालं नाहीये माझं आणि मुलंही पण मी माझ्या मुलांना कोणती भाषा शिकवीन हे ठरवलं नसलं तरीशक्य तितक्या जास्तित जास्त भाषा शिकवीन हे नक्की !!
धन्यवाद

दिनेश. | 19 February, 2014 - 15:54 नवीन
चायनीज अशा नावाची भाषा आहे >>>
चांगला मुद्दा..
'चायनीज' म्हणजे मूळ लेखकाला 'मॅन्डरीन' अभिप्रेत असेल हा माझा अंदाज..

मॅन्डरीन बद्दल असे आधीही वाचले आहे. एकदा एकॉनॉमिक टाईम्समधे लेख आला होता. काही भारतीय शाळांमधे आता मॅन्डरीन शिकवायला सुरुवात केली आहे असे. तसेच ज्या लोकांना मॅन्डरीन येते त्यांना वरच्या पदांमधे बढतीसाठी फायदा होईल असे म्हटले होते. त्यात असा सल्ला दिला होता की बाकी कुठल्या भाषा शिकवल्या नाही तरी चालतील पण तुमच्या मुलांना मॅन्डरीन जरूर शिकवा. इंग्लिश येइलच हे गृहीत आहे. पण मॅन्डरीनचे क्लासेस अजूनतरी बघितले नाही.

चायनीज अशी भाषा नाही ? ::अओ:

मग विन्डोज मध्ये जे भाषांचे पर्याय असतात त्यातला चायनीज हा पर्याय कशाला उद्देशून असतो?

आपल्याला बुवा चार नंबरची हिंदी भाषा येतेय आणि आमच्या मुलानाही त्या मुळे प्रश्न नाही Happy
फक्त २०५० मध्ये आम्ही जिवंत असू का ? हाच खरा प्रश्न आहे Happy

विन्डोज मध्ये जे भाषांचे पर्याय असतात त्यातला चायनीज हा पर्याय कशाला
विंडोज काय नि इतर हजारो गोष्टी काय, अमेरिकन लोकांनी जगात पसरवल्या. ते कशाला काय म्हणतील याचा भरवसा नाही. बेताची अक्कल, नि अधिक बेताची जगाबद्दलची माहिती. जे काय असेल, बरे, वाईट, सदोष इ. भराभरा प्रसिद्ध करून पैसे मिळवायला लागायचे. याचा अर्थ त्यांनी लिहीलेले सगळे खरे किंवा बरोबरच असते असे नाही.

२०५० मध्ये जगात सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या भाषा कोणत्या असतील?
किती का असेनात! "बोबडे बोल" मात्र प्रत्येक भाषेत असतील! Wink

झेड पी च्या शाळेत जी शिकवतील ती, कारण शिकवणं आताच इतकं महाग आहे की अमेरिकेत म्हणे कित्येक लोकं शिकतच नाही. जेमतेम शिक्षण घेतात, त्यामुळे फुकटात जे मिळेल ते शिकवू Happy

.... इंग्रजी शिक्षण महाग होत गेलं की त्याचे महत्व वाढत जाणार.... मागच्या पावसाळ्यात नाशकी कांदा ४० रुपये किलो होता .... तेव्हा T.V. पासुन प्रत्येक माणुस भावाच्या नावाने बोंब मारत होता... आता ४ रुपायाला आहे... शेतर्‍याला कोणी रस्ता-रोको ही करु देत नाही...

एखादी भाषा जास्त प्रमाणात बोलली जाने आणि त्या भाषेचा वैश्विक बिसनेस साठी उपयोग होणे ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. माझ्या मते वैश्विक व्यवहारांसाठी इंग्रजी हीच भाषा कायम राहील व तिचा वापर वाढतच जाईल; जरी ती जगात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा नसली तरीही.

मी इतर अनेक फोरम वर युरोपेअन व पूर्व आशियन मंडळी इंग्रजी शिकण्यासाठी येताना पहिले आहे. जवळपास सर्व देशातल्या उच्च शिक्षण घेणाऱ्या नवीन पिढीला कामापुरते तरी इंग्रजी शिकवले जाते . त्यामुळे जरी chinese व spanish बोलणाऱ्या लोकांची संख्या वाढली तरीही इंग्रजी शिकणाऱ्या नवीन लोकांची संख्या सुद्धा लक्षणीय आहे.
तसेच नवीन पिढीतील एका देशातून दुसर्या देशात कामानिम्मित जाणारे लोक बहुदा (कामचलाऊ का होईना) इंग्रजी बोलतात. त्यामुळे इंग्रजीला मरण नाही. वेल, इतक्यात-तरी नाही . Happy

केवळ ' जीडीपी' व 'वर्क कल्चर' ह्या निकषांवरच इतक्या पुढचं भाकीत करणं जरा कठीणच. शिवाय, प्रचंड पोटेन्शियल असलेलं आफ्रिका खंडही चीनसारखंच अचानक आघाडी घेवून असल्या भाकिताला सुरूंग लावूं शकतं. सध्याच्या जीवघेण्या स्पर्धात्मक व हिंसेच्या वातावरणाचा उबग येवून नविन पिढ्या कुठे आकर्षित होतील ,यावरही या बाबतीतलं भाकीत खूप अवलंबून असेल. असो, हें आपल सहज सुचलं म्हणून.

a-runout.JPG