Submitted by वैवकु on 21 February, 2014 - 13:47
जन्म एक मध्यरात्र वाटतो
मग तुला स्मरून मी पहाटतो
ज्यापुढे उडून दाखवायचे
तोच अपले पतग काटतो
ती मला बघून उर्दुळाळते
अन् तिला बघून मी मर्हाटतो
हा नको म्हणूस फक्त ओंडका
एक ओंडकाच जग कलाटतो
मी सडाफटिंग राहतो जगी
मी मनामधे कुटुंब थाटतो
राखली किती कसून गुप्तता
आपला विषय तरी चव्हाटतो
बांध फाटके किती शिवायचे
रोज पापण्यांत पूर दाटतो
विठ्ठला पुन्हा मला झपाट तू
आणि मी पुन्हा तुला झपाटतो
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जन्म एक मध्यरात्र वाटतो मग
जन्म एक मध्यरात्र वाटतो
मग तुला स्मरून मी पहाटतो
ज्यापुढे उडून दाखवायचे
तोच अपली पतंग काटतो
मी सडाफटिंग राहतो जगी
मी मनामधे कुटुंब थाटतो
राखली किती कसून गुप्तता
आपला विषय तरी चव्हाटतो
बांध फाटके किती शिवायचे
रोज पापण्यांत पूर दाटतो
विठ्ठला पुन्हा मला झपाट तू
आणि मी पुन्हा तुला झपाटतो
वा वा आवडले हे शेर
-सुप्रिया
व्वा. गझल सुरेख झालीय. अनेक
व्वा. गझल सुरेख झालीय. अनेक शेर आवडले.
व्वा. गझल सुरेख झालीय. अनेक
व्वा. गझल सुरेख झालीय. अनेक शेर आवडले.
हा नको म्हणूस फक्त ओंडका
एक ओंडकाच जग कलाटतो
मी सडाफटिंग राहतो जगी
मी मनामधे कुटुंब थाटतो
विट्ठलाचा शेरही फार आवडला.
ज्यापुढे उडून दाखवायचे तोच
ज्यापुढे उडून दाखवायचे
तोच अपली पतग काटतो (तोच आपला पतंग काटतो - असे एक सुचले, माझ्या माहितीत पतंग हा शब्द पुल्लिंगी आहे).
हा नको म्हणूस फक्त ओंडका
एक ओंडकाच जग कलाटतो
मी सडाफटिंग राहतो जगी
मी मनामधे कुटुंब थाटतो<<< मस्त शेर आहेत.
काही रुपेही आवडली. मर्हाटतो, चव्हाटतो अशी!
धन्यवाद!
बरेच शेर आवडले सर... तिसरा
बरेच शेर आवडले सर...
तिसरा कळला नाही..शब्द नवीन आहेत मला
धन्यवाद
ओह... आता कळले
ओह... आता कळले
मी सडाफटिंग राहतो जगी मी
मी सडाफटिंग राहतो जगी
मी मनामधे कुटुंब थाटतो << वा ! >>
गझल आवडली... क्रियापदे छान जुळवलीत
जन्म एक मध्यरात्र वाटतो मग
जन्म एक मध्यरात्र वाटतो
मग तुला स्मरून मी पहाटतो
बांध फाटके किती शिवायचे
रोज पापण्यांत पूर दाटतो
विठ्ठला पुन्हा मला झपाट तू
आणि मी पुन्हा तुला झपाटतो
>> जबरदस्त !
एकाच वेळी बरीच नवशब्दनिर्मिती केलीस की ! एकत्र इतके नवीन शब्द आल्याने त्यात अट्टाहासाचा भास होतोय मित्रा.. 'पहाटणे' ही कल्पना खूपच आकर्षक वाटली मात्र. मस्त !
जन्म एक मध्यरात्र वाटतो मग
जन्म एक मध्यरात्र वाटतो
मग तुला स्मरून मी पहाटतो
मी सडाफटिंग राहतो जगी
मी मनामधे कुटुंब थाटतो
विठ्ठला पुन्हा मला झपाट तू
आणि मी पुन्हा तुला झपाटतो
हे तीन सर्वात विशेष वाटले.
आहेत )
(वैभवजी, यावेळी दोन(च) नाही हं ..... तीन
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
उर्दुळाळते, मर्हाटतो, कलाटतो, चव्हाटतो
अशी घडवलेली क्रीयापद-रूपे मात्र पचनी पडायला जड गेली.
कवाफींची/शब्दांची जुळवाजुळव करण्याची गरज तुम्हाला भासणे शक्य नाही असा माझा विश्वास आहे.
माझ्या अंदाजाने एक प्रयोग म्हणून तुम्ही ते केले असावे. पण प्रांजळपणे सांगावेसे वाटते की ही अशी रूपे
रसभंगाला वाव देतात का याचा विचार व्हावा.
(आता याबाबतीत असाही मतप्रवाह असू शकतो की हे असे बदल पचविण्यासाठी तशी अभिरुची असावी लागते,
जी माझ्यासारख्या सामान्य रसिकाकडे अभावानेच आढळण्याची शक्यता असते.)
सुंदर... लवकर नवा शब्दकोश
सुंदर... लवकर नवा शब्दकोश निघणार बहुधा.. सहज येत असेल तर हरकत नाही,
मतला फार छान
मतला फार छान !!
"पहाटतो".......मस्तच
सर्वांचे मनःपूर्वक आभार
सर्वांचे मनःपूर्वक आभार !
उ.काका आपली मते पटतच आहेत ! मी दोनच बाबी सांगू शकतो की
१) अशी क्रियापदे कोणी वापरत नाही म्हणून जरा अन् -यूज्युअल वाटते हे खरे लोक हे बोलणारच हेही गृहित धरलेले आहेच मी
..........पण मी कोणतीही जुळवाजुळव केलेली नाही. माझ्या मनात माझी जी भाषा आहे तिचे हे वेगळेपण असे मी म्हणू शकतो ..हा जरा प्रतिभाशक्तीचा भाग असतो ज्यामुळे असे नवे शब्द / क्रियापदे तयार होतात ही क्रियापदे आज /पूर्वीही कुणी वापरली नसली तरीही भषाशास्त्रानुसार त्यांचा असा जन्म करणे शक्य आहे असे माझे ठाम मत (वरील अन्यूजुअल क्रियापदांच्या बाबतीत म्हणतोय मी :))आहे
२) अगदी पतंगच्या बाबतीतही तेच ..सोलापूर जिल्ह्यात (माझ्या जिल्ह्यात ) खास करून सोलापूरकर असे आपली पतंग आपली पेन असे बोलतात त्यावरून आपली पतंग असा शब्द प्रयोग माझ्या हातून आला असावा
पण ही शब्दरचना बाकी इतराना महीत नसते म्हणून........
रसभंग होवू शकतो हेही मान्यच आहे मला !
तरीही मी लोकाग्रहास्तव आपली पतंग ऐवजी आपले पतंग असा बदल करत आहे
प्रांजळ चर्चेबाबत उ.काका आपले विशेष आभार

लोभ असू द्या !
(संपादित : खालून तिसर्या ओळीत बदल करत आहे ऐवजी बदक करत आहे असे झालेले
(No subject)
गझल आवडली.
गझल आवडली.
आवडलीच . ती मला बघून
आवडलीच .
ती मला बघून उर्दुळाळते
अन् तिला बघून मी मर्हाटतो<<
वाह !!
मागे कशी वाचायची राहून गेली काय माहित .
राखली किती कसून गुप्तता आपला
राखली किती कसून गुप्तता
आपला विषय तरी चव्हाटतो
बांध फाटके किती शिवायचे
रोज पापण्यांत पूर दाटतो >>> वा! खूप आवडले
कविताजी ,खुरसाले, नाहिदभाई
कविताजी ,खुरसाले, नाहिदभाई धन्यवाद
ही मिस झाली होती .. मतला खूपच
ही मिस झाली होती .. मतला खूपच हृदयस्पर्शी.अनेक शेर सुंदर .
खूप सरस खयाल झाले आहेत.
खूप सरस खयाल झाले आहेत.
शुभेच्छा.
धन्यवाद भारतीताई , धन्यवाद
धन्यवाद भारतीताई , धन्यवाद फाटक साहेब