एका लग्नाची तिसरी गोष्ट!!!

Submitted by मी मधुरा on 18 September, 2013 - 01:19

'एका लग्नाची दुसरी गोष्ट....' माझी सर्वात लाडकी आणि पहिली मराठी आवडलेली मालिका, जी मी पहिली आणि शेवटपर्यंत पाहत राहिले. ती मालिका मात्र २५ ऑगस्ट २०१२ ला संपली. Sad

आणि आता त्या मालिकेतले दोन कलाकार, उमेश कामत (अबीर-एका लग्नाची दुसरी गोष्ट) आणि स्पृहा जोशी (कुहू-एका लग्नाची दुसरी गोष्ट) हे दोघे पुन्हा पडद्यावर येत आहेत, तेही एकत्र....'एका लग्नाची तिसरी गोष्ट' घेऊन!!!! Happy

ए.ल.दु.गो. नंतर मालिकांमध्ये प्रेम कथा, Joint Family दाखवण सुरु झाल, मालिकेत नवीन म्हणजे,
खास मालिकेसाठी तयार केलेली गाणी दाखवण्याची सुरवात झाली...म्हणूनच ए.ल.ती.गो. पाहण्यास मी खूप उत्सुक आहे. Happy

सध्या मिळालेली माहिती:

कथा: श्रीरंग गोडबोले
पटकथा: चिन्मय मांडलेकर (आधीचे एपिसोड), संदेश कुलकर्णी (आत्ताचे एपिसोड्स)
दिग्दर्शक: विनोद लव्हेकर
संगीत: सलील कुलकर्णी
मालिका सुरु होण्याची तारीख: १४ ऑक्टोंबर २०१३!
ekalagnachi.jpgमहत्वाचे:

इथे भांडत बसू नये.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सध्या स्टार प्रवाह फॉर्मात आहे.>> येस. बर्‍याच बर्‍या आणि नव्या मालिका सुरू केल्या आहेत त्यांनी. आम्हीही सारेगमपच्या आधी तिथे कोणती जोडी आहे ते बघतो आणि फारशी इन्टरेस्टिंग नसेल तरच झीकडे जातो.

दक्षे, इडली ऑर्किड जोडपं होतं Proud
मी ही जोडी बघून ठरवते पूनम Wink

काल मी जोडी बघून चॅनल चेंज केलं पण झी त पण रमण्यासारखं नव्हतं काही फारसं

इला भाटे - प्रि.बा. आणि उ.का. ची मालिका होती ना शुभंकरोती त्यात उ.का. ची आई होती बहुतेक.

थान्क्स कविन. उत्सुकता वाढलेय. आत्ता बघीनच म्हणते Happy या मालिकेत उमेशची आई म्हणून कोण येतेय त्याचीही उत्सुकता आहेच. Happy

कधी कधी मला प्रश्न पडतो कि तू खरच माझ्यावर प्रेम करतेस न ? अग मी ओम आहे इशा तुझा ओम आहे.
नाही नाही नाही . हो हो हो Lol

ओमच्या घरीं पुन्हा तेंच नाटक करण्याऐवजी ईशाच्या घरच्याना कांहींसं अशाच प्रकारचं नाटक परिस्थितीमुळे त्यांच्या घरीं करावं लागलेलं दाखवणं अधिक कल्पक झालं असतं ; ओमची नाईलाजाने घेतलेली आधीची भूमिका मग आपोआपच त्याना मनापासून समजूनही आली असती.

मस्त होता आजचा भाग..

सगळ्यांत महान डायलॉग "तुझा फोन स्पीकर फोनवर नाहीये ना?" Lol

फार्सिकल अंगाने मस्त चालू आहे मालिका Happy संवादांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आजींना भारी संवाद दिलेत.
काल मला अतिशय आवडला तो इशाचा 'आई आणि काकू आल्यात' या वाक्याचा टोन Lol जसं की ओमला माहितच नाहीये!

संवादांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आजींना भारी संवाद दिलेत.<<<< "मग कुणाला इजा झाली तर मी जबाबदर नाही, खास करून या कामतांना."

आता मज्जा येतेय बघायला. काल ओम आणि इशाचे फोनवर धम्माल चालू होते.

ती काकूचे काम करणारी अभिनेत्री कोण आहे? खडूसपणा (व्हिलनगिरी न करता) कसा करायचा त्याचा वस्तुपाठ आहे. Happy

अरे! इथले अपडेट्स वाचून मी आत्ता सगळे भाग पाहिले..जामच मज्जा धमाल चालूए! सगळे संवाद लय भारी! सगळ्यांची कामं पण मस्त! स्पृहा जास्ती आवडत्येय for a change! थोडीशी बारीक पण झाल्येय का ती? छान दिसत्येय!

ती काकूचे काम करणारी चारोळी फेमस करणारे चंद्रशेखर (किंवा चंद्रकांत) गोखले यांची पत्नी आहे, तिचे नाव आत्ता आठवत नाहीये (बहुतेक चारुशीला असावे).

अरे, सगळ्यांना आवडतिये हि मालिका? मला तर आता अज्जिबात आवडत नाही. जे दाखवतात ते सगळ मूर्खपणाचच वाटू लागलंय.
एलदुगो बद्दलही मध्यंतरी चित्रीकरणात चुका होत्या. पण निदान ती पहावीशी तरी वाटायची. पण एलतीगो नकोशीच झालीये मला आता.

नवीन मालिकेची जाहिरात पाहिली. नवी कथा असेल अशी आशा आहे.

Pages