Submitted by .. on 4 February, 2014 - 17:31
किन्वा (Quinoa) वापरुन करता येणार्या पाककृती, किन्वाचे गुणधर्म वगैरे बद्दल इथे एकत्र चर्चा करण्यासाठी हा धागा. नंतर शोधायला सोपे जाईल म्हणून वेगळा धागा काढत आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त दिसतंय वन डिश मिल.
मस्त दिसतंय वन डिश मिल.
छान आहे आयडिया ..
छान आहे आयडिया ..
मस्त दिसतंय वन डिश मिल >>> +१
मस्त दिसतंय वन डिश मिल >>> +१
धन्यवाद !!
धन्यवाद !!
किनवा मिक्सर मधे एकदाच फिरवुन
किनवा मिक्सर मधे एकदाच फिरवुन घ्यायचे .तसेच ओट्स ही.यांचे प्रमाण २:१ ठेवायचे हिरवी मिरची,कॉर्न्/मटर दाणे ,मीठ व मोहनसाठी थोडेसे तेल ,लागेल तसे पाणी व इनो घालुन फेटुन लगेचच इडली करायची.नेहमीच्या इडली इतकी पांढरीशुभ्र होत नाही थोडी पिवळसर झाक येते .छान जाळीदार हलकी होते .पण चवीला उत्तम!
सुलेखा, किन्वा आधी शिजवून
सुलेखा, किन्वा आधी शिजवून घ्यायचा की कोरडे दाणे मिक्सरमधून काढायचे? ओट्स कुठले? रोल्ड की स्टील कट?
मी हल्ली खिचडी करताना हिरवी
मी हल्ली खिचडी करताना हिरवी सालासकट मूगडाळ, पिवळी मूगडाळ, मसूर वगैरे एकत्र करून खिचडी करते. भात शक्यतो कमीच असतो. परवा भात पाव वाटीच घेऊन जास्त किन्वा घालू खिचडी केली. मसाले वगैरे नेहमीचेच. चांगली लागली.
सुलेखा, पुन्हा खात्री करत
सुलेखा,
पुन्हा खात्री करत आहे. किन्वा २ कप आणि ओट्स १ कप, असचं ना?
सिंडरेला ,सुप्रिया १९, होय
सिंडरेला ,सुप्रिया १९,
होय .किन्वा २ कप आणि ओट्स १ कप असेच.किन्वा न शिजवता फक्त एकदा मिक्सरमधुन फिरवुन घ्यायचा.रवेदार झाला पाहिजे..ओट्स कोणतेही घ्या.
किन्वाचे काही प्रकार मी वेगळ्या स्वतंत्र धाग्यावर पूर्वी लिहीले आहेत.
किन्वा बिर्याणी ">
किन्वा बिर्याणी
">
हे एकदम हेल्दी दिसत आहे ..
हे एकदम हेल्दी दिसत आहे ..
जबरी दिसतेय बिर्याणि. रेसिपी
जबरी दिसतेय बिर्याणि. रेसिपी दे ना.
सशल +१
भारी दिसतेय बिर्याणी. रेसिपी
भारी दिसतेय बिर्याणी. रेसिपी देच.
भारी फोटो.
भारी फोटो.
भारी फोटो! आज बरे फा ला
भारी फोटो! आज बरे फा ला किन्वा सा खी.
किन्वा
किन्वा भेळ
http://www.maayboli.com/node/48939
अजून आवडलेले किन्वाचे दोन
अजून आवडलेले किन्वाचे दोन प्रकार -
शेजवान किन्वा
लेमन किन्वा
किन्वा बिर्याणीची लिंक
http://www.maayboli.com/node/48764
किन्वा पुलाव किंवा किन्वा
किन्वा पुलाव किंवा किन्वा खिचडी मस्त लागते..
CPK मधलं किन्वा + अरुगुला सॅलड पण भारी
मीपू, शेजवान किन्वाची पाकृ
मीपू, शेजवान किन्वाची पाकृ द्या ना.
मनी, शेझवान किन्वा मी या
मनी, शेझवान किन्वा मी या प्रमाणे केला - किन्वा मोकळा शिजवुन व गार झाला कि फोर्क ने मोकळा करुन घ्यायचा. पॅन मधे तेल तापल कि लसूण परतून हव्या त्या चिरलेल्या भाज्या (कोबी, गाजर, सिमला मिरची, बीन्स, ई) परतून त्या क्रंची ठेवून शेझवान सॉस/चटणी, मीठ घालून त्यात शिजवलेला किन्वा घालून मिक्स करायचं झालं
कॅफेटेरियामधलं गो-टू किन्वा
कॅफेटेरियामधलं गो-टू किन्वा सॅलड. यात लाल द्राक्षं,कांद्याची पात(अगदी थोडी), हेजलनट इ.इ. आणि लाइट ड्रेसिंग(बल्सामिक व्हेनेगर, ऑऑ,मीठ, मिरीपूड) मस्त लागतंय.. पुढच्या वेळेला घरी करून पाहीन.
अरेवा , किन्वाच्या नव्या
अरेवा , किन्वाच्या नव्या रेसिपिज आल्या .. मस्तं !
इथे पहिल्याच पानावर डिज्जेनं
इथे पहिल्याच पानावर डिज्जेनं दिलेल्या टिप्स वाचून चिमूटभर गरम मसाला-तिखट-मीठ आणि कणभर हिंग घालून किन्वा शिजवला आज. अख्ख्या मसुराच्या उसळीबरोबर चांगला लागतो आहे. भात खाणे कमी करायचे आहे म्हणून हा प्रकार करून बघितला. आता करत जाइन नियमीत.
Pages