एका लग्नाची तिसरी गोष्ट!!!

Submitted by मी मधुरा on 18 September, 2013 - 01:19

'एका लग्नाची दुसरी गोष्ट....' माझी सर्वात लाडकी आणि पहिली मराठी आवडलेली मालिका, जी मी पहिली आणि शेवटपर्यंत पाहत राहिले. ती मालिका मात्र २५ ऑगस्ट २०१२ ला संपली. Sad

आणि आता त्या मालिकेतले दोन कलाकार, उमेश कामत (अबीर-एका लग्नाची दुसरी गोष्ट) आणि स्पृहा जोशी (कुहू-एका लग्नाची दुसरी गोष्ट) हे दोघे पुन्हा पडद्यावर येत आहेत, तेही एकत्र....'एका लग्नाची तिसरी गोष्ट' घेऊन!!!! Happy

ए.ल.दु.गो. नंतर मालिकांमध्ये प्रेम कथा, Joint Family दाखवण सुरु झाल, मालिकेत नवीन म्हणजे,
खास मालिकेसाठी तयार केलेली गाणी दाखवण्याची सुरवात झाली...म्हणूनच ए.ल.ती.गो. पाहण्यास मी खूप उत्सुक आहे. Happy

सध्या मिळालेली माहिती:

कथा: श्रीरंग गोडबोले
पटकथा: चिन्मय मांडलेकर (आधीचे एपिसोड), संदेश कुलकर्णी (आत्ताचे एपिसोड्स)
दिग्दर्शक: विनोद लव्हेकर
संगीत: सलील कुलकर्णी
मालिका सुरु होण्याची तारीख: १४ ऑक्टोंबर २०१३!
ekalagnachi.jpgमहत्वाचे:

इथे भांडत बसू नये.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

झकासराव, बरोबर आहे.. मग आता काय तिची आई रडणार का आम्हाला फसवलं म्हणून आणि ईशा सावरून घेत राहणार...?

हो हो हो, कोर्टाची केस आणि पॅचप प्रकरणे मस्त दाखवलीत. आणि सगळ्यात भाव खाऊन जाणारे ती आशू. तिने फार सहज साकारलीय ती भूमिका. 'निर्लज्ज' म्हणून ओम चिडवत असताना थोडं हसू आणि थोडं गिल्ट काय पर्फेक्ट दाखवलंय तिने! ईशापेक्षा आशू आवडायला लागली आहे. Happy

मग आता काय तिची आई रडणार का आम्हाला फसवलं म्हणून आणि ईशा सावरून घेत राहणार...?>> छे छे!!
आज्जीला विस्मरणाचा त्रास आहे हे जास्त सोपं खोटं बोलणं आहे जर खोट्याच्याच मार्गावर जायचं असेल तर.

मंजूडी, आपली मराठी .कॉमवर उजव्या कोपर्‍यात एक झी मराठीची लिंक आहे. तिथे झीचे बरेच प्रोग्रॅम बघता येतात. मी तिथेच बघते ही सीरीयल.

काही आश्चर्य नाही ईशा अशी आतताई आहे. सगळ तिच्या आई कडुन आलेले आहे..
किती ते अति वागण.. जाम बोअर आहे ती Sad

छे छे!!
आज्जीला विस्मरणाचा त्रास आहे हे जास्त सोपं खोटं बोलणं आहे जर खोट्याच्याच मार्गावर जायचं असेल तर >> झक्या तुझं ऐकलं शिरेल्वाल्यानी. आज्जीला डिमेन्शिया आहे आणि त्याना भास होतात असा कॉम्बो रोग माथी मारलाय त्यांच्या.

काल इशाच्या आईने तिला असा काही झापडलाय फोनवर.. बरं वाटलं मला. माझीच भडास निघाली सगळी.

हो की झकासराव, तुम्ही लिहिलं होतं तसंच झालं..
काल इशाच्या आईने तिला असा काही झापडलाय फोनवर.. बरं वाटलं मला..+१
तरी इशाच चालूच होतं, तू मला फोन न करता आलीसच का पुण्यात..?

तिची आई काही बोलत नव्हती तर बोलत नाही.
आणि आता बोलतीये तर बोलतीये.

या तो चतुर कहो या तो घोडा... :

असो.
आता सिरियलचा ट्रेक क्लीअर झाला की.
आधी ओम खोट बोलला.
आता इशाने सुरवात केली.
आता तिच्या घरच्याना पटवायच आहे.

अशी ही गाडी हळुहळु जातेय लग्नाच्या ठेसनात.

आमच्या घरात लैच अन्याय होतो मग माझ्यावर>> रिया हे त्रैराशिक उलट्या बाजुने विचार केल्यास तुझी आणि त्या इशाची कम्पेरिजन होतेय असं सुचवतेय.. Uhoh

काल परत एकदा उमेश कामतने भाग खाल्ला. इशा गोड बोलून आपल्या गळी नक्की काय उतरवणार आहे याचे एक्स्प्रेशन्स भन्नाट! किती गोऽऽऽड आहे तो Proud

आसावरी जोशी, सविता प्रभुणे, रीमा, स्वाती चिटणीस या आया इतर ठिकाणी व्यग्र असल्यामुळे त्याची आई कोण असेल याबद्दल मला फारच उत्सुकता वाटतेय. बहुदा फारचा परिचित चेहरा नसावा.

ईशाच्या आईने ईशाला झापडलं>>>> चला 'देर आए दुरुस्त आए'.... ईशा मधले काही एपिसोड ( चांगली भूमिका वठवल्याने) बरी वाटली, पण आता पुन्हा 'इरिटेटिंग' ईशा मोड 'ऑन' झालाय....बिच्चार्या ओम्या चौधरीचा खरंच बळीचा बकरा होणार लग्न झाल्यावर...

काल परत एकदा उमेश कामतने भाग खाल्ला. इशा गोड बोलून आपल्या गळी नक्की काय उतरवणार आहे याचे एक्स्प्रेशन्स भन्नाट >> खरच. मला पण आवडायला लागली आहे सिरीयल. स्पृहा चा अभिनय पण चांगला वाटतोय. दोघांचे ही एक्स्प्रेशन्स सहज वाटतात.

ईशाची थाप मस्त!!! उ.का.चे हावभाव पण मस्त! पण ते जयेश, दत्ताराम आणि रणजीत काका यांच्या पैकी कुणालाही शोधण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाही, हे योग्य वाटत नाही.

आसावरी जोशी, सविता प्रभुणे, रीमा, स्वाती चिटणीस या आया इतर ठिकाणी व्यग्र असल्यामुळे त्याची आई कोण असेल याबद्दल मला फारच उत्सुकता वाटतेय. बहुदा फारचा परिचित चेहरा नसावा.>>>> Proud

मेघना एरंडेबद्दल तुमच्या काय भावना आहेत? Biggrin

आतांपर्यंत लपवून ठेवलेल्या उम्याच्या आई-वडिलांवर प्रथम फोकस यावा व तो ईशाने आणावा, ही जमेचीच बाजू म्हणायला हवी. << त्याची आई कोण असेल .... बहुदा फारचा परिचित चेहरा नसावा.>> इतकी वर्षं मुलालाही न भेटतां सामाजिक कार्यात पूर्णपणे गुंतवून घेतलंय, त्याअर्थीं ती 'आप'च्या उमेदवारांच्या यादींत असण्याची शक्यताच अधिक !!! Wink
<< पण ते .....यांच्या पैकी कुणालाही शोधण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाही, हे योग्य वाटत नाही.>> त्यांच्यासाठीं - त्यांच्या रिकाम्या डेटस मिळतील तेंव्हा - प्रत्येकीं तीन-चार एपिसोड राखून ठेवले असणारच; काळजीच नको त्यांची ! Wink
अर्थात, कालचा एपिसोड अभिनय, दिग्दर्शनाच्या बाबतीत खूपच सरस होता, याच्याशीं सहमत.

आसावरी जोशी, सविता प्रभुणे, रीमा, स्वाती चिटणीस या आया इतर ठिकाणी व्यग्र असल्यामुळे त्याची आई कोण असेल याबद्दल मला फारच उत्सुकता वाटतेय. .>>>> एलदुगोतल्या घनाची आई ही ओमची आई असू शकेल काय? (इला भाटे) Happy

<< एलदुगोतल्या घनाची आई ही ओमची आई असू शकेल काय? (इला भाटे) >> राधा-सौरभच्या अतर्क्य गुंतागुंतीतून इला भाटे इतक्यांत सुटतील व सुटल्याच तरी त्याना या नविन गुंतागुतीत अडकायची हिंमत शिल्लक असेल, असं नाही वाटत ! Wink

सविता प्रभुणे नविन सुरु होणाऱ्या 'जावई विकत…" मुळे दुसरी मालिका करू शकणार नाही. आसावरी जोशी, रीमा, स्वाती चिटणीस यांपैकी कोणीही सामाजिक कार्य करणाऱ्या आईच्या भुमिकेत शोभुन दिसणार नाहीत. इला भाटे…

राधा-सौरभच्या अतर्क्य गुंतागुंतीतून इला भाटे इतक्यांत सुटतील व सुटल्याच तरी त्याना या नविन गुंतागुतीत अडकायची हिंमत शिल्लक असेल, असं नाही वाटत ! >>>>> Happy

राहिबा लवकरच (एकदाची) संपणार आहे. हुश्य. Happy त्यामुळे इला भाटे हा पर्याय शक्य आहे.

रीमाने एक सिरियल केली. तिची वाट लागली. सविता प्रभुणेंना मोह सोडवत नाहीये सिरियलींचा. रीमाला होपफुली सुटावा.
ओमच्या आईचा रोल किती मोठा आहे, काय आहे माहित नाही, पण नीना कुलकर्णी आवडतील. खूप दिवसात मराठीत दिसल्या नाहीत त्या, हिंदीत रमल्या Sad
मेघना एरंडे? अगं ती आई म्हणून लहान आहे ना अजून? Uhoh
इला भाटेंचं व्यक्तीमत्त्व मुलाला सोडून रहाणारी आई असं नाहीये. पण त्या सध्या कुठेच दिसत नाहीयेत. त्यामुळे मेकोव्हर करून येऊ शकतील Wink

वादळवाट मधे अरुण नलावडेंसोबत होत्या त्याही येऊ शकतील. सध्या दुपारी २ ला अग्निहोत्र चालू आहे स्टार प्रवाह वर. त्यात सईची आयएएस ऑफिसर आई म्हणून छान काम केलंय. सध्या स्टार प्रवाह फॉर्मात आहे. कधी नव्हे ते सारेगमप सोडून सुप्रिया सचिन शो फॉलो करतेय. Happy

Pages