युक्ती सुचवा युक्ती सांगा- ४

Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36

स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.

याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेकिंग ट्रेवर पेपर कप ठेवून मफिन्स बेक करता येतात का??? येत असेल तर मला १ वेळेस १० मफिन्स करता येतील. ६ चा मफिन्स ट्रे आहे. वेळ वाचवण्यासाठी उपाय शोधत आहे. प्लीज मदत करा. Happy

मी कधी केले नाहीत असे, पण बहुतेक जमायला हवेत. एखाद्या मोठ्या वाटीत पेपर कप ठेवून मग त्या वाट्या बेकिंग ट्रे वर ठेवले तर पेपर कप कलंडण्याचे चांसेस कमी होतील.
किंवा दोन पेपर कप एकावेळेस वापरले तरी थोडे स्टर्डी राहतील.

आरती येतात करता. जरा हेवी पेपरकप घ्यायचे. ट्रेत मांडायचे. आणि आईस्क्रिम स्कूपने बॅटर घालायचे. म्हणजे सांडलवंड न होता झटपट भरले जातात.

करता येतात पण बॅटरमुळे थोडे पसरट होतात. माझ्याकडे मफिन ट्रे नव्हता तेव्हा मी नुसते डबल लायनिंगवाले डिस्पोजेबल कप्स वापरायचे.

धन्यवाद, पण खूप उशिर झाला तुमच्या पोस्टी येईपर्यंत. पुढच्या वेळेस नुसते कप्स ठेवून करेन.
मी मफिन ट्रेमध्ये केले त्यात डबल लाईन्सवाले डिस्पोजेबल कप्स ठेवून. उगीच वेळ वाया नको जायला आणि खराब झाले तर या भितीने Happy . व्हाईट मफिन्स मस्त झाले.

नेलपेंट रिमुव्हरनी थोडे फिक्के होतिल बहूतेक पण जर खूप डार्क स्ट्रोक असेल तर नाही निघणार.
कालच पोरानी पांढर्‍या मोबाइल कव्हरवर त्याचं नाव अगदी डार्क निळ्या बॉलपेननी लिहिलं होतं. रिमुव्हरनी ते बर्‍यापैकी लाइट झालंय. पण पूर्ण निघालं नाही.

ओके. धन्यवाद अल्पना करून बघते आणि सांगते. चुकून फर्राटा उठलाय मुलाच्या वडिलांकडून :p कोतबो ?

स्वतःवर आणि पेनावर चिडून पण झालय :p तरी बरं मी काही बोलले नाही. फक्त एकदा फर्राट्याकडे बघितले आणि म्हणाले की महिनाभर काही झाल नाही आपल्या सोफ्याला म्हणजे बराच टिकला की :p

Etra virgin Olive Oil सलाड ड्रेसि.ग सोडुन बाकी कशात वापरता येइल ?

मला ऑफिसात एक चॉकलेटचा बॉक्स मिळालेला, घरी जाईपर्यंत ती चॉकलेटं मेल्ट होऊन राडा झाला. Sad मग त्यातला ट्रे मी उचलून जशाच्या तसा फ्रिजर मध्ये टाकला. आता त्या साच्यांमध्ये चॉकलेटचे अवशेष आहेत. जे चमच्याने काढून खाऊ शकतो. पण त्या ऐवजी ही चॉकलेटं वापरून काही वेगळं करता येईल का?

ऑलिव्ह ऑइल अस्परॅगस, झुकिनि, वांगी, बाळ बटाटे , रंगीत फुग्या मिरच्या इत्यादी ग्रिल करुन त्यावर वापरता येईल .

न्योकी + ऑलिव्ह ऑइल + पार्मेझान + फ्रेश हर्ब्ज

पेने, रोटिनी, मॅकरोनी अशा प्रकारच्या पास्ता शिजला की त्यावर शिंपडता येईल .

ऑलिव्ह ऑइलमधे पार्मेझान चीझ, थोडे लाल मिरचीचे फ्लेक्स, थोडे फ्रेश हर्ब्स मिसळून ब्रेड डिप

हो. वाटून टाक लोकांना... Proud Light 1

ती मिक्स चॉकोलेट्स असावीत असं समजून...

चोकोलेट्स मेल्ट करून तो वॉर्म सॉस आईसक्रीम वर घालून खाता येईल.

चॉकोलेट सॅंड्विच करता येईल - http://www.sanjeevkapoor.com/grilled-dark-chocolate-sandwich-teenpatti-f...

तसेच खपल्या काढून खाणे

कॉफीत घालणे / हॉट चॉकलेट्सारखं

चोकोलेट्स मेल्ट करून तो वॉर्म सॉस गार केलेल्या फळांवर घालून खाणे

राजसी - बॉलपेनच्या डागांसाठी - मॅजिक इरेझर नावाचा एक स्पंज मिळतो. तो किंचीत ओला करून हलक्या हाताने डागांवर घास. मी भिंतीवरील क्रेयॉनचे, फर्निचरवरील बॉलपेनाचे आणि टबवरील नेलपेंटचे डाग याने काढले आहेत........ विशेष म्हणजे घरातल्या कुणीही हे डाग पाडले नव्हते. Happy प्ले डेट ला आलेल्या गुणी पोरांनी घर डोक्यावर घेतले होते.

उरलेल्या पाणीपुरींचे काय करायचे?

घरी कधी कधी पाणीपुरीचा बेत ठरतो. बाजारातून पाणीपुरींचे पाकिट आणले जाते. घरी खाणारे इन-मिन तीन लोक. त्यामुळे ते संपूर्ण पाकिट संपणे केवळ अशक्य. मुंबईच्या दमट हवेत, कितीही स्टेपल्स वगैरे मारले तरी पुर्‍या नरम पडतातच. आणि एकदा पाणीपुरीचा बेत केल्यावर लगेचच पुन्हा काही होत नाही. तेव्हा त्या उरलेल्या पुर्‍या नेहेमीच फुकट जातात (नरम पडल्यामुळे).

ह्या उरलेल्या पुर्‍यांचे काय करता येईल? (पुन्हा पाणीपुरी हे उत्तर नक्की नको आहे!)

(बारीक चिरलेले जिन्नस वापरून केलेली) सॅलड्स, कोशिंबिरींचे फीलिंग करून पुर्‍या फस्त करायच्या.
फ्रूट सॅलडही जाईल यासोबत.
फारच अवांतर : लोकसत्ताच्या एका पुरवणीत काही वर्षांपूर्वी एका वाचकाने सुचवले होते, "कागदी द्रोणांत सत्यनारायणाचा प्रसाद दिला जातो. प्रसादाचा काही अंश कागदाला चिकटून कचर्‍यात जातो. त्यामुळे XXXXXXX. तर पाणीपुर्‍याच्या पुर्‍यामंध्ये हा प्रसाद भरून वाटावा."

त्या पुर्‍यांचा चुरा करून कटलेट किंवा फ्राइड चिकन साठी वापरता येइल. मैदा किंवा कॉर्न स्टार्च चे पाणी करायचे त्यात कटलेट्/चिकन बुडवून चुर्‍यात घोळवून तळायचे.

सिंडरेला, धन्यवाद. क्लोरोक्स वाईप्स नाहीत घरांत.

धनश्री, धन्यवाद. मॅजिक इरेझर आहे, किती वेळ घासावे लागेल? आत्ता पांच मि. केले डाग थोडे पुसट झाले आहेत.

अल्पना, धन्यवाद. लवकरच नेलपॉलिश रिमूव्हर आणून तो पण उपाय करून बघते.

BTW, रोज ते सोफे कशाने पुसले म्हणजे नव्यासारखे दिसतील?

Pages