Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 20 January, 2014 - 22:13
गझलेतील प्रत्येक शेर दणकेबाज किंवा उत्तम होतोच असे नाही... मात्र बर्याचदा गझलेतला एखादा किंवा दुसरा शेर मनात रुंजी घालून रहातो. असे हासिल-ए-गझल शेर त्या गझलकाराच्या नावासहित इथे शेअर करु या. किंवा कित्येकदा आपण एखादा शेर लिहून जातो..पुढे त्याची गझल होत नाही असे फुटकळ शेर इथे शेअर करु या.
सर्व शेर प्रतिसादात लिहावेत ही विनंती.
--डॉ.कैलास गायकवाड.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हात दे सोडून माझा मी कुठेही
हात दे सोडून माझा
मी कुठेही जात नाही
व्वा.
मला भेटायला आले,मला भेटून
मला भेटायला आले,मला भेटून जाताना
मला भेटायचे नाही,असे ठरवून गेलेले.
--ज्ञानेश
मला भेटायला आले,मला भेटून
मला भेटायला आले,मला भेटून जाताना
मला भेटायचे नाही,असे ठरवून गेलेले.
व्वा!
फक्त एवढ्यासाठी जातो घरी
फक्त एवढ्यासाठी जातो घरी परतुनी
उंबरठ्याशी एक निरांजन जागत असते
-शाम
व्वा. सुंदर शेर आहे.
काय अफलातून धागा काढला आहे
काय अफलातून धागा काढला आहे डॉक.
इथे हजेरी लावल्यावर प्रत्येक दिवस मस्त जाईल
धन्यवाद !
(आता एकेका शेराचा अस्वाद घ्यावा )
-सुप्रिया.
'नमस्ते' 'हाय' पेक्षा वेगळे
'नमस्ते' 'हाय' पेक्षा वेगळे बोलू
जरासा मोकळा हो मोकळे बोलू......वाह ! मस्त मस्त
हासू नकोस बघुनी रस्त्यावरील वेडा
गेला असेल त्याच्या शेतामधून रस्ता..
-तिलकधारी......कायम स्मरणात राहणारा शेर
आपल्या मतभिन्नतेमध्ये असे सातत्य आहे
आपले जमणार नाही हेच अंतिम सत्य आहे.........क्या बात !
नुसती ढिगार्यातून वरती मान केली
कोणीतरी आला फुले टाकून गेला........सहीय !
देखण्या गावास देहाची सहल ठरली
पाहतो येतात सोबत कोणत्या व्याधी......वा वा
पाट्या टाकत ये जा करतो कायम एकच रस्त्याने
पूर्वी पायी आता गाडी हेच काय ते न्यारेपण...........खरेय !
शाम यांची आख्खी गझल अफलातून
वेळ तुझी ठरलेली आहे अमकीतमकी
रोज सकाळी नवी वेदना देते धमकी.............आह !
ह्या जगण्याशी लढण्याचे भय कुणास आहे
माझ्यापेक्षा आहे माझी व्याधी खमकी...........स ला म !
=============================
आक्रंदुनी मी घेतली प्रतिभेत जास्तीची उचल
आता तुझ्यावाचूनही होते तुझ्यावरती गझल.........क्या बात !
आज इतकेच वाचणार उगाच आजिर्ण नको
मनःपुर्वक धन्यवाद !
-सुप्रिया.
यंदाच्या जनगणनेमध्ये हे ही
यंदाच्या जनगणनेमध्ये हे ही मोजून टाका की
किती अडाणी लोक शहाणे,शिकलेले बिनडोक किती
--ज्ञानेश
मस्त सगळं वाचुन एक्दम
मस्त
सगळं वाचुन एक्दम फुलपाखरा सारखे वाटतंय
नको नको आजन्म नको तुझ्याविना
नको नको आजन्म नको
तुझ्याविना हा जन्म नको
--डॉ.कैलास गायकवाड
जबरी धागा तयार
जबरी धागा तयार झालाय.....मज्जा येतेय
एक नवा शेरः वागवून दिवसाचे
एक नवा शेरः
वागवून दिवसाचे ओझे शिणून जातो
रात्रीच्या ओच्यात तोंड खुपसून रहावे
समीर चव्हाण
समीरजी नवा शेर आवडला खासकरून
समीरजी नवा शेर आवडला खासकरून ओचा हा शब्द व त्याचा वापर
मस्त शेर समीर, कैलासराव
मस्त शेर समीर, कैलासराव
डॉ. साहेब आपल्या शेर वाचून
डॉ. साहेब आपल्या शेर वाचून अजू एक सुचला
जगावेगळा मृत्यू दे
जगावेगळा जन्म नको
वा वैवकु
वा वैवकु
जगावेगळा मृत्यू दे जगावेगळा
जगावेगळा मृत्यू दे
जगावेगळा जन्म नको >>>
फक्त एवढ्यासाठी जातो घरी परतुनी
उंबरठ्याशी एक निरांजन जागत असते>>>>
मला भेटायला आले,मला भेटून जाताना
मला भेटायचे नाही,असे ठरवून गेलेले.>>>>
कागदाचे ढीग संपावे तरी उरते कधी
अन कधी आयुष्य हे ओळीत एका मावते>>>
हुंदका ऐकून माझा ते म्हणाले..
छान आहे, पण तरी ती बात नाही...>>>>
इथे कुणीही कुरूप नाही वेडेविद्रे नाही
हे जग कसल्या सुंदरतेने बरबटलेले आहे>>>>
नव्यानवेल्या विवाहितेचे कुंकू पुसल्यावाणी
कुणीतरी ह्या तिन्हिसांजेला विस्कटलेले आहे>>>>>
माझा नि वेदनेचा,झाला असा घरोबा
तीही मजेत आहे,मीही मजेत आहे>>>>>
अपराधांची शिक्षा हे पाहुन दे तू
कितीक घडले नकळत अन मुद्दाम किती ?>>>>>
क्या बात है । !!!!!!!!!!!!!
रोज एक एक शेर स्टेटस म्हणून ठेवासा वाटतोय.
वा वा ओच्याचा शेर भन्नाट !
वा वा ओच्याचा शेर भन्नाट !
वाह समीर....मस्त
वाह समीर....मस्त शेर.
वैभवा... छान शेर ..
धन्स बेफीजी धन्स डॉ.
धन्स बेफीजी धन्स डॉ. साहेब
कृपा असूद्या
वैभवजी...... खूप आवडला
वैभवजी......
खूप आवडला शेर...
>>
नको आज आणूस डोळ्यात पाणी
मला आजही पोहता येत नाही
जयदीप
मस्त धागा आहे. भिडे काकांच्या
मस्त धागा आहे.
भिडे काकांच्या सूचनेला अनुमोदन.
इतके शेर वाचून सुचलंय काही तरी-
अर्धवटाने अर्धवटाला दिला दुजोरा
आसपास मी असंख्य बघतो असे शहाणे |
(No subject)
भिडे काकांच्या सूचनेला
भिडे काकांच्या सूचनेला अनुमोदन.
इतके शेर वाचून सुचलंय काही तरी-
अर्धवटाने अर्धवटाला दिला दुजोरा
आसपास मी असंख्य बघतो असे शहाणे | >>>>
चैतन्य, शेर मस्तच आहे.
माझ्या सूचनेला तू अनुमोदन देऊन हा शेर उद्धृत केलास .....

आपल्या दोघांना लागू होतो असं तर नाही ना !!!
असल्यास माझी काहीच हरकत नाही.
माझ्या सूचनेला तू अनुमोदन
माझ्या सूचनेला तू अनुमोदन देऊन हा शेर उद्धृत केलास .....
आपल्या दोघांना लागू होतो असं तर नाही ना !!! >>
नाही नाही....अरेच्या हे भलतेच पताकास्थान झाले
अहो जे सुचले मला ते लगेचच लिहिले
फिरस्त्यास का असतो
फिरस्त्यास का असतो पत्ता
मद्यपीस का परका गुत्ता
हळ्वे आणि माणुसघाणे
यांनी वर्ज्य करावी सत्ता
रमा..
हळ्वे आणी माणुसघाणे यांनी
हळ्वे आणी माणुसघाणे
यांनी वर्ज्य करावी सत्ता<<<
वा वा!
नवा खयाल!
परंपरा जपणारे आपण जुनी घरे
परंपरा जपणारे आपण
जुनी घरे विकणारे आपण
एकांती रुळणारे आपण
झुंडींचे हाकारे आपण
अनंत ढवळे
वा वा
वा वा
वॉव ! व्हॉट अॅन आयडिया, सरजी
वॉव ! व्हॉट अॅन आयडिया, सरजी !!
वाचायला सुरुवात केली आहे.... मजा आ रहा हैं!
धन्यवाद !
ह्या जगण्याशी लढण्याचे भय
ह्या जगण्याशी लढण्याचे भय कुणास आहे
माझ्यापेक्षा आहे माझी व्याधी खमकी
अप्रतिम शेर झालाय, भूषण.
धन्यवाद.
Pages