पॉम्पे-एर्कोलानो-व्हेसुविओ

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

मागच्या महिन्यात ३ आठवडे इटलीला गेलो होतो. तिथल्या भेट दिलेल्या आणि आवडलेल्या काही ठिकाणांविषयी -

रोमन काळात इटलीत पॉम्पे (Pompeii, उच्चार pom-PAY) हे व्हेसुविअस (इंग्रजीत Vesuvius, स्थानिक भाषेत Vesuvio) डोंगराच्या पायथ्याशी वसलेले एक अत्यंत प्रगत शहर (सध्याच्या Naples जवळ, स्थानिक भाषेत Napoli उच्चार NAH-po-lee) होते, २४ ऑगस्ट ००७९ ला वेसुव्हिअस या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे या शहरावर लाव्हा आणि राखेचा ९०० डीग्री तापमानाचा मोठा ढग येवुन कोसळला आणि काही क्षणात संपूर्ण गाव तिथे रहात असलेल्या माणसांसहीत लाव्हा-राखेच्या ढिगार्‍यात जवळ जवळ ६० फुट खाली गाडले गेले. याच बरोबर त्याच्या शेजारी असलेली Ercolano (इंग्रजीत Herculaneum), Boscoreale, Oplontis आणि Stabia ही गावे सुद्धा गाडली गेली.
त्यानंतर दर (साधारण) १०० वर्षांनी व्हेसुविअस ज्वालामुखीचा उद्रेक होतच होता. त्यातल्या १६३१ साली झालेल्या उद्रेकात ३००० लोक मारले गेले, विसाव्या शतकात म्हणजे १८ मार्च १९४४ साली झालेल्या उद्रेका नंतर अजुन तरी मोठा उद्रेक झालेला नाही.
पहिल्या शतकात गाडलेल्या पॉम्पे, एर्कोलानो आणि इतर गाडलेल्या शहरांचा शोध गाडले गेल्यावर १७०० वर्षांनी, १७४८ साली पहिल्यांदा लागला. त्यानंतर आजतागायत त्यांचे उत्खनन, त्यावर संशोधन चालु आहे.
या संबंधीच्या संशोधनातुल पुढे आलेली माहिती अशी की त्यावेळची पॉम्पेची लोकसंख्या १०,०००-२५,००० होती तर एर्कोलानोची ५०००च्या आसपास.
उत्खननात राखेत गाडले गेलेले जव्ळ जवळ ३०० लोक सापडले. आधी शास्त्रज्ञांना वाटले होते की राखेमुळे लोकांना श्वास घायला त्रास होवुन तिथल्या रहिवाश्यांचा मृत्यु झाला. नंतर सिद्ध करण्यात आले की बहुतेक लोकांचा मृत्यु राखेमुळे श्वास घ्यायला त्रास होवुन न होता त्यांना काही कळायच्या आत बसलेल्या थर्मल शॉकने झाला. थर्मल शॉकने काही कळायच्या आत मृत्यु झाल्याने सगळे लोक ज्या अवस्थेत होते त्याच अवस्थेत गाडले गेले.
उत्खनन केलेला भाग जसाच्या तसा लोकांना बघायला उपलब्ध आहे. तसेच यात सापडलेल्या काही वस्तु नेपल्सच्या Museo Archeologico Nationale मध्ये आणि जगभरातल्या वेगवेगळ्या पुरातत्व संग्रहालयात ठेवलेल्या आहेत.
वेसुव्हिअस ज्वालामुखीच्या मुखापर्यंत ट्रेक करुन जाता येते.
यातल्या पॉम्पे, एर्कोलानो या शहरांना तसच वेसुव्हिओ ज्वालामुखीला आम्ही भेट दिली. त्याची ही काही निवडक प्रकाशचित्रे.

पॉम्पे
त्या काळातले पॉम्पेची बाजारपेठ. ही गावाच्या मध्येभागी वसली होती. सगळ्या प्रकारची दुकाने, गावचा बाजार, गुलामांची खरेदी-विक्री इथे होत असे. थोडक्यात सगळे आर्थिक व्यवहार इथे होत असत.

IMG_5450_small.jpg

वेळ बघण्यासाठी सनडायल

IMG_5452_small.jpg

पॉम्पेमधली काही घरे. उत्खननात जशी सापडली तशीच

IMG_5454_small.jpgIMG_5459_small.jpgIMG_5462_small.jpg

बेकरी. पीठासाठी वापरण्यात येणारे दगडी जाते. या जात्याला खेचर जुंपुन पीठ काढण्यात येत असे.

IMG_5467_small.jpg

ब्रेड करण्याकरता वापरत असलेली भट्टी. २००० वर्षानंतर आजही ह्याच पद्धतीच्या भट्टीत ब्रेड आणि पिझ्झा बनवला जातो

IMG_5490_small.jpg

पॉम्पेमध्ये दुपारचे जेवण घरी न बनवता बाहेर घेण्याची पद्धत होती. दुपारचे जेवण विकणारी छोटी दुकाने प्रत्येक चौकात आढळतात. यात भिंतीतच मातीचे माठ लिंपलेले असत, त्या माठात विकण्यासाठी वेगवेगळे पदार्थ ठेवले जात.

IMG_5500_small.jpg

पॉम्पेमधील रस्ते. हा गावातला मुख्य रस्ता. रस्त्याच्या सुरुवातीलाच दगड टाकुन लेन केल्या जात, ज्यामुळे एकापेक्षा जास्त घोडागाड्या एकाच वेळी जावु शकत
IMG_5522_small.jpg

एकेरी वाहतुकीचा रस्ता
IMG_5493_small.jpg

२००० वर्षापूर्वीचे पण अजुनही वापरात असलेले रस्ते

IMG_5468_small.jpg

पॉम्पेच्या स्टेडीअमचे प्रवेशद्वार. इथे वेगवेगळ्या प्राण्यांच्या झुंजी होत असत. तसेच ग्लॅडीएटर (हे गुलाम असत) विरुद्ध प्राणी अश्याही झुंजी होत असत.

IMG_5513_small.jpg

स्टेडीअम आतुन

IMG_5519_small.jpgएर्कोलानो
ज्वालामुखीमुळे गाडले गेलेले जुने एर्कोलानो नव्या शहराच्या अगदी मध्यावर आहे. गाडले गेलेल्या एकुण शहराच्या फक्त एक चतुर्थांश शहराचे उत्खनन झाले आहे.
पॉम्पेपेक्षा एर्कोलनो मधली घरे कमी पडझड झालेली सापडली. काही घरे अगदी ३ मजली आणि तरीही फारसे नुकसान न झालेली आहेत.

IMG_5598_small.jpgIMG_5599_small.jpg

घरातील भिंतीवर चितारलेली चित्रे छोटे छोटे रंगीत दगड वापरुन मोझॅइक पद्धतीने केलेली आहेत. या भागातले लोक मोझॅइक पद्धतीने घराच्या भिंती, घरातील जमीन, अगदी पुढचे-मागचे आंगण सुद्धा सजवण्यासाठी प्रसिद्ध होते.

IMG_5589_small.jpg

सार्वजनिक हमामखाना
IMG_5577_small.jpg

हमामखान्यातली जमीनीवर काढलेले मोझॅइक

IMG_5582_small.jpgवेसुव्हिओ ज्वालामुखी

या ज्वालामुखीच्या मुखापर्यंत चढुन जाता येते. वर चढुन जायचा मार्ग

IMG_5567_small.jpgVesuvious_Panorama_small.jpg

ज्वालामुखी, १९९८ सालापर्यंत इथे आत उतरु देत असत नंतर एका टुरीस्टचा तिथे अडकुन मृत्यु झाल्यावर त्यांनी लोकांना खाली जावु देणे बंद केले.

IMG_5550_small.jpg

ज्वालामुखी (पॅनोरमा)

Vesuvious_carater_panorama_small.jpg

अवांतर:
१ नेपल्स रोमच्या दक्षिणेला १७७ किमी (११० मैल) आहे. रोम ते नेपल्स हा प्रवास ट्रेनने करता येतो.
२. ही ठिकाणे बघण्यासाठी नेपल्सहुन रेल्वेने जाता येते, नेपल्सच्या रेल्वेस्टेशनहुन दर अर्ध्या तासाने ट्रेन आहे. प्रत्येक ठिकाणी हवे असतील तर guided tours आहेत तसच Audio guides पण आहेत.
३. सगळ्या ठिकाणी भरपुर चालायची तयारी हवी, चांगले चालण्याचे बुट घालणे अत्यंत आवश्यक आहे.
४. २० युरोचा ३ दिवसाचा एकच पास घेवुन या Pompeii, Ercolano, Boscoreale, Oplontis आणि Stabia पाचही ठिकाणांना भेट देता येते. फक्त एकाच ठिकाणाला भेट द्यायची असेल तर वेगळे तिकीट काढून त्या ठिकाणाला भेट देता येते.
५. वेसुव्हिओ रेल्वेस्टेशनपासुन वेसुव्हिओ ज्वालामुखीच्या पायथ्यापर्यंत गाडीने जावे लागते. स्टेशनच्या बाहेरच गाड्या असतात त्या २० युरोत नेवुन परत आणतात. ज्वालामुखीच्या पायथ्यापासुन सुमारे अर्धा तास वर चढुन जावे लागते.

रुनी, प्रवासवर्णन सावकाश वाचेन पण फोटो अल्टिमेट. प्रवासी पुस्तकातले वाटतायत एकदम. Wink

खूप सही फोटो अन वर्णनही Happy

रुनी सुरेख गं. आमचं नेमकं हेच राहिलं करायचं. आम्ही पालेर्मोला गेलो त्याऐवजी, कारण नवर्‍याला सारखे सारखे अवशेष बघून कंटाळा आला होता. तुझ्यामुळे मस्त सफर घडली.

रूनी.. छान माहिती. फोटो मस्त आहेत...

पॉम्पेमध्ये दुपारचे जेवण घरी न बनवता बाहेर घेण्याची पद्धत होती. दुपारचे जेवण विकणारी छोटी दुकाने प्रत्येक चौकात आढळतात.

>> सही पद्धत!!!
छान फोटो.
--------------
नंदिनी
--------------

सही माहीती..
फोटोज तर क्लास्स! कसले काल बांधल्यासारखे दिसतायत हे अवशेष!

www.bhagyashree.co.cc/

अगदी व्यवस्थित माहिती रूनी. मस्त. फोटो तर ग्रेटच. त्यांनी हे आताही ज्या सुस्थितीत ठेवले आहे, त्याचे विशेष कौतुक वाटले. छान सफर घडवलीस. धन्यवाद!
-------------------------
God knows! (I hope..)

व्वा रुनी मस्त सफर घडवून आणलिस आम्हाला घरबसल्या Happy
छान फोटो आणि वर्णनही छान. Happy

आणि हो हे बरेच वेगेवेगळे शब्द नावं लक्षात ठेउन लिहिलस म्हणून तुझे विशेष धन्यवाद. Happy

वा! फारच छान रुनी!! ह्या पॉम्पेइच्या स्टेडियममध्ये 'पिंक फ्लॉइड' ह्या इंग्लिश सायकेडेलीक रॉक ग्रूपने 'लाइव्ह अ‍ॅट पॉम्पेइ' नावाचा एक सुरेख आल्बम ध्वनिचित्रमुद्रीत केलेला आहे.

रुनी, सुरेख माहिती आणि प्रकाशचित्रे ! सुरुवातीला दगड टाकून लेन करण्याची कल्पना मसतच.

    ***
    I get mail, therefore I am.

    खुपच छान माहिती. आणि अगदी वेळेवर!
    आम्हीपण ऑगस्टमधे चाललोय. रोमला ४ दिवसच आहे पण मला पोम्पे-वेसुव्हिओ बघायचय.
    रोमहुन एका दिवसात शक्य आहे का?

    रुपाली,

    फोटो आणि माहिती, दोन्ही मस्त!!

    रुनी, खूप सुरेख माहिती. लेख आवडला.फोटोग्राफी पण सही केलीय ! Happy

    रुपाली.. फोटो व माहीती मस्तच.. पण इटलीमधे बाकी कुठे कुठे गेलीस त्याचेही वर्णन येउ देत की.. टस्कनी मधे फ्लॉरेन्सला गेली होतीस का?रेनेसान्स आर्ट साठी प्रसिद्ध असलेली युफिझी(उच्चार?)सारखी तिथली व इटलीमधली अजुन जगप्रसिद्ध आर्ट म्युझिअम्स पाहण्याचे भाग्य लाभले का?तसेच इटालिअन आल्प्सला जायला मिळाले का? (इटालिअन आल्प्सचे एर्नेस्ट हेमिंग्वे ने फेअरवेल टु आर्म्स मधे केलेले वर्णन वाचले आहेस का?:)

    रुनी. ऑसम. हे शेअर केल्याबद्दल धन्यवाद.

    अरे वा. सहीच. आज घरी जाऊन मुलाला दाखवणार हे. त्याला मागच्या वर्षी धडा होता व्हेसुविओचा. Happy

    सुन्दर.. आवडली ही सफर...
    - अनिलभाई
    It's always fun when you connect.

    रुनी सहीच...मस्त सफर.
    केदार तेच विचारणार होतो मी पण. :). मागे कोणीतरी लिहिलं होतं इथे सिसिलीबद्दल.
    मुकुंद...फेअरवेल टू आर्म्स म्हणजे तेच ना हेमिंग्वेचे महायुद्धातले महाविलक्षण अनुभव ?

    रुनी, फोटो सुरेख. माहीती पण छान.

    मस्त फोटोज आणि माहिती रुनी!
    पुर्वीही काही मित्र मैत्रिणींकडून पाँपेचे फोटोज पाहिले आहेत पण तुझ्या फोटोज बरोबर माहितीही असल्याने मजा आली पहायला.

    रुनी, सुरेख सफर घडवलीस अगदी. प्रवासवर्णन आणि फोटो, दोन्ही आवडले. Happy

    मस्त गं रुनी. फोटो बघून छान वाटले. कारण युरपला गेल्यावर बघायला नं जमलेल्या पैकी हेही एक ठिकाण होते.
    btw, प्रभूबाईंचे रोमराज्य आले आहे बाजारात. ७०० पाने, २ भाग!! बाई त्या त्या देशात जितके दिवस जास्त राहतात तितकी पानेही जास्त लिहू लागल्यात. (पहिला भाग कंटाळवाणा आहे. मला दुसरा भाग आवडला.)

    छान माहीती व फोटो!!!
    ~~~~~~~~~~~~~~~~~~
    जब जब जगने कर फ़ैलाए
    मैने कोष लुटाया
    रंक हुआ मै नीज निधी खो कर
    जगतीं ने क्या पाया!
    भेंट न जिससे में कुछ खोऊं
    पर तुम सब कुछ पाओ
    तुम ले लो मेरा दान अमर हो जाए।
    तुम गा लो मेरा गान अमर हो जाए।

    सुंदर माहिती आणि फोटोसुद्धा...

    मस्तच रुनी. `वेळ बघण्यासाठी सनडायल' बद्दल अधिक माहिती आहे का? वेळ कशी बघायची? बाकी प्रवासवर्णन खासच.

    रुनी, खूपच सुरेख आहे. माझेही हे ठिकाण राहुन गेले बघायचे. तसे युरप आणि त्यातल्या त्यात इटली पाहणे म्हणजे आयुष्या कमी पडेल इतके काही आहे तिथे. खूप छान लिहिले आहेस.

    रुनी माहिती आणि फोटो मस्त!
    _______________________________
    "शापादपि शरादपि"

    Pages