रूबी फॉल्स...
सध्या अटलांटाला आल्यापासून दर विक एंड ला काही ना काही टाईमपास चालू आहे. मागच्या वर्षी पेक्षा ह्या वेळी कंपनी चांगली आहे त्यामूळे आठवडाभर विकएंड ला काय करायचं ह्याचे प्लॅन चालू असतात.
गेल्या विकएंड ला टेनेसी राज्यातल्या चॅटनूगा ( की शॅटनूगा ?) ला जाऊन आलो.
टिपिकल अमेरिकन टुरीस्ट स्पॉट आहे ! म्हणजे २/३ मुख्य प्रेक्षणिय स्थळं, त्याला सजवून धजवून खूप मार्केटिंग केलेलं, मग कुठल्या तरी एखाद्या निकषानुसार "world's largest" बनवलेलं, मग तिथे गिफ्ट शॉप्स.. त्यात मिळणारे मॅगनेट्स, कप, टि शर्ट, आसपासची कॅफे आणि खाण्याची दुकानं, तिकडचे अतिथय प्रेमाने बोलणारे गावातले लोक... सगळं तसच.. आणि मी पण नेहमी प्रमाणेच तिथे जाऊन माझ्या साठ्यात ठेवण्यासाठी एक मॅगनेट, पोस्ट कार्ड्स, कॉफी मग हे सगळं घेऊन आलो, तिथल्या वेगळ्या वेगळ्या गोष्टींचे एकदा नुसते, एकदा मी त्याआसमोर उभं राहून, एकदा मित्रांबरोबर ग्रुप असे फोटो पण काढले... एकूण सगळं साग्रसंगीत आणि रूटीन.. पण कदाचित हे रूटीन मी बर्याच दिवसांनी म्हणजे जवळ जवळ ८ महिन्यांनी केल्याने रूटीन न वाटता छान वाटलं.. मागच्या बर्याच ट्रिप्स आठवल्या.. !
आणि हो बर्याच दिवसांनी कॅमेरा बाहेर काढला.. (घाबरू नका.. कॅमेरा बाहेर काढला म्हणून आता प्रकाशचित्रांचा रतिब घालणार नाही )
असो.. !
तर तिथल्या रूबी फॉल्स चे हे रंगीबेर्रंगी फोटो..
रूबॉ फॉल्स बद्दल इथे माहिती मिळू शकेल. हा धबधबा मोठा नाहिये पण गुहेत आहे आणि त्यामूळे त्यावर छान लाईट शो पण करतात. ह्याचा शोध कसा लागला ह्या बद्दल तिथे एक व्हिडीओ दाखवतात तो पण रंजक आहे !
ह्या गुहेत चुनखडकाचे बरेच आकार तयार झालेले आहेत. त्यातले हे काही मला आवडलेले.
मस्त आहेत
मस्त आहेत स्नॅप्स..
सुरवातीचा पॅरा छाने!
www.bhagyashree.co.cc/
सही अडम,
सही अडम, फोटो छान. त्या केव्हजचे फोटो पाहून ऑस्ट्रेलियातल्या त्या कोणत्यातरी(?) केव्ह ची आठवण झाली मला.
'चांगली कंपनी'... हं, डिटेल्स येऊ द्या अजून.
त्या
त्या केव्हजचे फोटो पाहून ऑस्ट्रेलियातल्या त्या कोणत्यातरी(?) केव्ह ची आठवण झाली मला.>>
सायो- अगं ऑस्ट्रेलियात खूप जागी आहेत अशा केव्ह्ज जिथे चुनखडक आहे. बुकॅन केव्ह्ज फेमस आहेत त्यासाठी.
बाकी 'चांगली कंपनी'.... मी पण तेच लिहिणार होते.
हो, आम्ही
हो, आम्ही कोणत्या केव्हजना गेलो होतो त्याचं नाव आठवत नाहीये.
छान. मी
छान. मी अश्याच विस्कॉन्सिन मधल्या केव्हज बघीतल्यात. बाकी इथे सगळ्याच ठिकाणांचे मार्केटींग सही केलेले असते.
अडम छान
अडम छान आहेत फोटो.
अश्या वेगळ्या फोटोज चा रतिब घातला तरी आवडिने बघतिल रे लोक.
अडम... अरे
अडम... अरे तुही फसलास ना रुबी फॉल्सच्या गवगव्याला?
फोटो मस्तच आहेत.. .. तुझ्या इथल्या मार्केटिंगच्या विधानावरुन आठवले...मी आतापर्यंत फ्लोरिडाला कॅन्सास पासुन ड्राइव्ह करुन पाच सहा वेळा तरी गेलो आहे. जाताना सेंट लुइस, नॅशव्हिल्,शॅटेनुगा,अॅट्लांटा.. असेच जावे लागते. पंधरा दिवसापुर्वीच परत एकदा याच मार्गाने ओरलँडोला जाउन आलो. रुबी फॉल्सचा तुझा लेख वाचुन रुबी फॉल्सची आठवण ताजी झाली. १९९३ ला गेलो होतो तिथे. जाणार नाही तर काय? अरे तुला सांगतो.. जसे नॅशव्हिल सोडले तेव्हापासुनच दर ५ मैलावर मोठमोठ्या पोस्टर्सवर या "वर्ल्ड फेमस" रुबी फॉल्सची जाहीरात! म्हटले बघीतलेच पाहीजे या रुबी फॉल्सला.... म्हटले आता येइल नंतर येइल.. पण तब्बल शॅटेनुगा पर्यंत या फॉल्सचा पत्ता नाही.. खुप उत्कंठा लागली होती.. त्यामुळे का माहीत नाही पण एवढासा छोटासा धबधबा पाहुन खुपच हिरमोड झाला..:(. त्यात नुकताच त्या वर्षी नायगारा फॉल्सही पाहीला होता... त्यामुळे नायगाराच्या तुलनेत(जी होउच शकत नाही!) हा फॉल पाहुन निराशा झाली.. त्यात त्याची.. १५० मैल आधीपासुन.. इंटरस्टेट हायवे २४ वरची जाहीरात पाहुनही खुप अपेक्षा वाढली होती..:)
पण फोटो मस्तच आहेत..गुहेतल्या त्या चुनखडीच्या आकारांना स्टॅलेग्माइट व स्टॅलॅक्टाइट असे म्हणतात..
आडमा, फोटो
आडमा, फोटो छान आहेत रे. रतीबाचे वाक्य वाचल्यावर माझा कॅमेरा मात्र लपवला मी.
वॉव... सहीच
वॉव... सहीच आहेत फोटो!
अडमा, तुला 'तिथे' असूनही 'बाकीच्यांची' कंपनी 'चांगली' वाटते? ऐ.ते. न!घेतल्या आयडीला तरी जाग की!
अरे बेस्टच
अरे बेस्टच धबधबा आहे अडमा. अॅटलांटात आहेस तर केंटकीतल्या मॅमॉथ केव्ह्ज बघून ये.. ते पण बेस्ट आहे.. तिथले स्टॅलेक्टाइट-स्टॅलेमाइट (का असच काहीतरी) लै भारी आहेत..
bsk, भाग्या,
bsk, भाग्या, डॅफो धन्यवाद ..
सायो आणि आशू... मी मागच्या वर्षीच्या तुलनेत कंपनी चांगली असं म्हंटलय ना.. भारतातल्या नाही..
रूनी, टण्या.. अरे अश्या केव्ह्ज आणि स्टॅलेक्टाइट-स्टॅलेमाइट बरेच ठिकाणी आहेत उसगावात... त्यामानाने इथले फॉरमेशन्स खूपच लहान होते... STL ला मेरॅमेक केव्हज आहेत.. तिथले आकार पण लई भारी आणि खूप जास्त आहेत... !
केप्या.. रतिबाचं तू कशाला मनावर घेतोयस पण?? तुझे फोटोज येऊ देत.. ते अत्यंत भारी असतात.. !
मुकूंद.. हो तो धबधबा फारच लहान आहे.. पण त्याचं ते गुहेत असणं हे जास्त आकर्षण आहे.. पुढच्या वेळी ड्राईव्ह मारताना अटलांटात थांब.. दक्षिण-पूर्व जीटीजी करूया...
तुझ्या
तुझ्या मार्केटींग बद्दलच्या विधानाला अनुमोदन.. इतकी जाहिरात तर नायगारा किंवा ताजची पण केली नसेल.. तिथे जाताना असेच अजून एक मार्केटींग दिसले फटाक्याच्या दुकानांचे.. २ दुकानं, २०-३० मैल अंतरावर असतील पण दोन्हींच घोषवाक्य एकच 'World's Largest Fireworks Store'.
बाकी सगळ्या केव्हज आतून सारख्याच.. फक्त केव्हज ची लांबी - रूंदी बदलते..
फोटोज
फोटोज चांगले आले आहेत. मुकुंद आणि मनिषला मार्केटींग बद्दल अनुमोदन.
मी पण रुबी फॉल्सला दोनदा जाऊन आलेय. आता मात्र पाहुण्यांना नेले तरी आम्ही बाहेर बसून राहतो.
अडम, इनक्लाइन रेल्वे आणि रॉक सिटी गार्डन पाहिलेस का?
इनक्लाइन रेल्वेपण "वल्ड्स स्टीपेस्ट ..." का काहितरी आहे.
छान
छान फोटो!!!
~~~~~~~~~~~~~~~~~~
जब जब जगने कर फ़ैलाए
मैने कोष लुटाया
रंक हुआ मै नीज निधी खो कर
जगतीं ने क्या पाया!
भेंट न जिससे में कुछ खोऊं
पर तुम सब कुछ पाओ
तुम ले लो मेरा दान अमर हो जाए।
तुम गा लो मेरा गान अमर हो जाए।
अरे आडमा,
अरे आडमा, मला आधी वाटलं हे काय घरातल्या बाथरुम मध्ये लाल लाईट लावुन फोटो काढलेत
छान आलेत हां फोटो, जायला पाहिजे एकदा.
घरातल्या
घरातल्या बाथरुम मध्ये लाल लाईट लावुन फोटो काढलेत >>>> मला पण पहिल्यांदा लाईट मधे फॉल्स दिसला तेव्हा असच वाटलं होतं.
चिन्या, मनिष, MO प्रतिसादा बद्दल धन्यवाद..
MO.. हो पाहिलं दोन्ही.. इनल्काईन ट्रेन छान आहे पण.. जाताना हळूहळू कोन वाढत जातो.. सही वाटतं.. !
९८ मधे मी
९८ मधे मी पण जाऊन आले होते ह्या सगळ्या ठिकाणी. मार्केटींग अति पण तेव्हा सगळंच नवीन होतं त्यामुळे सॉल्लिड वाटलं होतं. घरापासून दूर आल्यावरची ती पहीलीच ट्रीप. आम्ही तीन मैत्रिणीच गेलो होतो त्यामुळे ही ट्रिप चांगलीच लक्षात राह्यली. अतिउत्साहात बरेच फोटो पण काढले होते. तेही आहेत. पण तेव्हा फिल्लमवाला क्यामेरा होता त्यामुळे ते फोटो स्कॅन करत बसावे लागतील. आणि झब्बू तरी कशाला द्यायचा..
नंतर सेंट लुईसच्या जवळपास पण अश्याच केव्हस पाह्यल्या होत्या. आणि त्याबरोबर कुठल्या तरी डाकूची कहाणी पण जोडलेली होती. पण तोवर सगळा उत्साह ओसरून गेला होता त्यामुळे तिकडे फोटो नाही काढले.
पण इन्क्लाइन ट्रेन ही फार मौजेची गोष्ट आहे. एकदा तरी बसावं त्यात अशी. ते लोक म्हणतात तशी वर्ल्डस बेस्ट इत्यादी नाहे पण मस्त आहे.
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!
अॅट्लांट
अॅट्लांटा मधे तीन चार वर्षं असल्यामुळे आम्ही सुद्धा तीन चार वेळेला जाऊन आलोय. सुरुवातीला स्वतः बघायला आणि नंतर इतर कोणीही अॅट्लांटा मधे नवीन आलं की त्यांच्या इकडच्या भटकंतीची सुरुवात तिथून होते. नाही म्हणायला तसं स्टोन मांउटन पार्क आहे म्हणा....पण तोही अमेरीकन अती मार्केटींगचाच नमुना आहे.
नीधपा, मी सगळ्यात पहील्यांदा गेलो होतो तेव्हा इन्क्लाइन ट्रेन मधे बसलो होतो, एवढं विशेष काही वाटलं नाही. एन्क्लाइन आहे, पण अगदीच कासवाच्या गतीने जाते ति ट्रेन. आम्हाला वाट्लं होतं की आता काय एकदम राईड वगैरे मिळणार.....
मला बाबा
मला बाबा मजा आली होती. एकुणात माहोलचा परीणाम असेल..
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!
काहीतरी
काहीतरी वेगळे म्हणून चांगली आहे ट्रेन. पण नीधप म्हटली तशी बेस्ट किंवा स्टीपेस्टही नाही :). ती सगळी इथल्या मार्केटींगची कमाल!
मी पिट्सबर्गलापण इन्क्लाइन मध्ये बसलेय पण चॅटनूगाची त्यापेक्षा नक्कीच चांगली आहे.
रॉक सिटी गार्डन मधले पण काही काही स्पॉट्स छान आहेत.
गुहेचा
गुहेचा पहिला फोटो आवडला. डाव्या बाजूला माणसाच्या चेहर्याचा (प्रोफाईल) भास होतोय.
बाथरुममधला रन्गीत शॉवर.. lol
adm, अश्या Caves व्हर्जिनियातपण आहेत. 'लुरे केव्हज'. Luray.
मी ऐकलय की
मी ऐकलय की लुरे कॅव्हर्न्स खूप मोठ्या आणि सुंदर आहेत - फ्रॉम अ फ्रेंड जिने रुबी आणि लुरे दोन्हीही पाहिल्या आहेत.
तश्या अमेरिकेत बर्याच ठिकाणी अश्या केव्हज आहेत म्हणा!
पण रुबी आमच्या परसातली असल्याने रुबी जिंदाबाद !
अॅडमा
अॅडमा फोटो खरेच मस्त आले आहेत... अरे काय हे सगळे एकटा एकटा पहात बसला आहेस तिकडे?
हो लुरे केव्हज बर्याच मोठ्ठ्या आहेत आणि एकंदर तो परिसरच मस्त असल्याने मजा येते तिकडे जायला...
फोटो सापडले माझे तर झब्बू टाकेन
-------
हे ऐकलेत का? मराठी गझल इ-मुशायरा
नीरजा,
नीरजा, लालू, मो, मिल्या धन्यवाद..
मिल्या ह्या सगळ्या टिपी गोष्टी आहेत रे.. दोघांनी पहायची वेगळी लिस्ट आहे..
आणि हो झब्बू दे नक्की..
सही रे
सही रे अडमा. रतीब नसला, तरी आणखी काही फोटो पाहायला आवडतील..
-----
असं एखादं पाखरू वेल्हाळ, त्याला सामोरं जातंया आभाळ!
सगळेच फोटो
सगळेच फोटो झक्कास आहेत.
घरातल्या बाथरुम मध्ये लाल लाईट लावुन फोटो काढलेत >>>>>>
_______________________________
"शापादपि शरादपि"
राहवून मी
राहवून मी गड्डा झब्बू देतो
न
शेवटचे दोन
शेवटचे दोन फोटो सुरेख .
गड्डा झब्बू पण छान .