Submitted by वरदा on 12 February, 2013 - 09:20
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.
इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
श्री व सौ मासिकाच्या संदिप
श्री व सौ मासिकाच्या संदिप खाडिलकरांचा मुलगा आहे सुमीत. मस्त लिहितो. एकदम फ्रेश. मायबोलीवरही आहे तो.
मला वाघरू नाही, पण 'माचीवरला
मला वाघरू नाही, पण 'माचीवरला बुधा' सापडलं, त्याच बरोबर बरीच पुस्तके जी इतके दिवस बाहेरगावच्या सामानात होती ती परत हाती लागली आहेत. आता वर्गवारी आणि वाचन यांना कधी वेळ मिळतोय कोण जाणे.... त्यातले लगोलग वाचून पुर्ण केलेले पुस्तक म्हणजे श्री. दा. पानवलकर यांनी लिहिलेले, (त्यांच्या सुर्य ह्या कथेवर आधारित बनवलेल्या 'अर्धसत्य' ह्या चित्रपटाच्या शूटींगची तपशीलवार वर्णनात्मक दैनंदिनी म्हणजेच हे पुस्तक) 'शूटींग'. हे भारतीय भाषेमधे लिहिलेले अशाप्रकारचे फिल्म मेकिंगवर लिहिलेले सगळ्यात पहिले पुस्तक असावे. श्रीदांची काही निरिक्षणे / टिप्पण्या अगदी खासमखास..
तत्त्वमसि (एकदाचं) वाचून
तत्त्वमसि (एकदाचं) वाचून पूर्ण झालं. मला तरी ठिकठिकच वाटलं.. अगदी 'वॉव' वगैरे नाही वाटलं. मधला काही भाग जरा रटाळ झालाय. कथानक पुढेच सरकत नाही असं वाटतं. शेवटची काही पानं एकदम वेग घेतात. जंगलांची, अदिवासींची वर्णनं छान आहेत पण चित्तमपल्लींची पुस्तकं किंवा एका रानवेडयाची शोधयात्रा वगैरे पुस्तकांत काही ठिकाणी ह्यापेक्षा चांगली वर्णने आहेत. अदिवासींच्या तोंडची वाक्य गुजराथीत देऊन मग पुढे कंसात त्यांचा अनुवाद दिला आहे. मला तरी ते रसभंग करणारं वाटलं. नर्मदा नदीच्या संदर्भात येणार्या गोष्टी आवडल्या.
भेट देण्यासाठी नवीन चांगली
भेट देण्यासाठी नवीन चांगली पुस्तके सुचवेल का इथे कोणी
काव्यसंग्रहही हवाय
'वास्तव रामायण' आणि 'वेदांतील
'वास्तव रामायण' आणि 'वेदांतील विज्ञान' घेतलय विकत. सुरुवातीची काही पाने क्लिष्ट वाटली, अर्थात माझा अतिउत्साहच कारणीभूत आहे म्हणा याला.
आत्ता शांतपणे आरामात वाचेन एकेक.
१०० बूक्स टू रीड इन
१०० बूक्स टू रीड इन लाईफ्टाईम.
"http://www.amazon.com/b?ie=UTF8&node=8192263011"
या वर्षी वाचलेली इंग्रजी
या वर्षी वाचलेली इंग्रजी पुस्तके:
१. अ स्पोर्ट्समन्स स्केचेसः इव्हान तुर्गेन्येव्ह
१८५२ साली प्रसिद्ध झालेला, छोट्या स्फुटांचा/व्यक्तिचित्रांचा हा संग्रह अनेक दृष्टींनी रोचक आहे. प्रामुख्याने पक्ष्यांच्या शिकारीनिमित्त भटकताना लेखकाला भेटलेल्या वल्लींचं, अनुभवांचं आणि निसर्गाचं काहीशा अलिप्त (मात्र तटस्थ नव्हे) भावनेने केलेलं वर्णन म्हणून याला 'रिअॅलिझम'च्या सदरात गणता येईल. त्याच वेळी, नेपोलियनची मोहीम (१८१२) ते रशियन राज्यक्रांती (१९१७) या कालखंडाच्या साधारण मध्यात घेतलेला तत्कालीन रशियन समाजाचा - जाचक वर्गव्यवस्था, जमीनदारी आणि छोट्या शेतकर्यांची हलाखीची स्थिती - या सार्यासह घेतलेला वेधही यात डोकावून जातो. निव्वळ साहित्यिक दृष्टीने पाहिलं तर दीर्घ पल्ल्याच्या आणि विस्तृत पटाच्या कादंबर्यांनी रशियन साहित्य व्यापण्यापूर्वी गाजलेलं हे पुस्तक, चेकॉव्हसारख्या लघुकथालेखकांना प्रेरणा देणारं ठरलं.
प्रवासात भेटलेल्या व्यक्तींच्या लकबींचं नेमकं वर्णन ["Yermolaï, as always, shot triumphantly; I— rather badly, after my custom. Sutchok looked on at us with the eyes of a man who has been the servant of others from his youth up; now and then he cried out: 'There, there, there's another little duck'; and he constantly rubbed his back, not with his hands, but by a peculiar movement of the shoulder-blades."] किंवा एका छोट्याशा गावी भेटलेल्या डॉक्टरने व्यक्त केलेलं मनोगत यासारख्या बाबी सॉमरसेट मॉमच्या लघुकथांची (विशेषतः 'इस्ट अँड वेस्ट') आठवण करून देतात.
मुद्दाम करायचं म्हणून नव्हे, तर कथेच्या ओघात येणारी निसर्गाची वर्णनंही सुरेख -
The heat forced us at last to go into the wood. I flung myself down under a high nut-bush, over which a slender young maple gracefully stretched its light branches. Kassyan sat down on the thick trunk of a felled birch-tree. I looked at him. The leaves faintly stirred overhead, and their thin greenish shadows crept softly to and fro over his feeble body, muffled in a dark coat, and over his little face. He did not lift his head. Bored by his silence, I lay on my back and began to admire the tranquil play of the tangled foliage on the background of the bright, far away sky. A marvelously sweet occupation it is to lie on one's back in a wood and gaze upwards! You may fancy you are looking into a bottomless sea; that it stretches wide below you; that the trees are not rising out of the earth, but, like the roots of gigantic weeds, are dropping—falling straight down into those glassy, limpid depths; the leaves on the trees are at one moment transparent as emeralds, the next, they condense into golden, almost black green. Somewhere, afar off, at the end of a slender twig, a single leaf hangs motionless against the blue patch of transparent sky, and beside it another trembles with the motion of a fish on the line, as though moving of its own will, not shaken by the wind. Round white clouds float calmly across, and calmly pass away like submarine islands; and suddenly, all this ocean, this shining ether, these branches and leaves steeped in sunlight—all is rippling, quivering in fleeting brilliance, and a fresh trembling whisper awakens like the tiny, incessant plash of suddenly stirred eddies. One does not move—one looks, and no word can tell what peace, what joy, what sweetness reigns in the heart. One looks: the deep, pure blue stirs on one's lips a smile, innocent as itself; like the clouds over the sky, and, as it were, with them, happy memories pass in slow procession over the soul, and still one fancies one's gaze goes deeper and deeper, and draws one with it up into that peaceful, shining immensity, and that one cannot be brought back from that height, that depth….
['प्रोजेक्ट गटेनबर्ग'वर हे पुस्तक प्रताधिकारमुक्तपणे उपलब्ध आहे.]
२. ब्लाईंडनेस - जोझ्ये सारामागो
एका गाडीचा चालक, सिग्नलला थांबला असताना अचानक आंधळा होतो. हा आंधळेपणा दोन दृष्टींनी निराळा असतो. एक म्हणजे, अंध झालेल्या व्यक्तीच्या डोळ्यासमोर काळ्याऐवजी सर्वत्र पांढरा रंग दिसतो आणि दुसरं म्हणजे हा आंधळेपणा संसर्गजन्य असतो. वेगाने पसरलेल्या ह्या रोगामुळे त्या देशात उडालेल्या हाहाकाराचं वर्णन म्हणजे या कादंबरीचं कथानक, असं म्हणणं हे अन्याय्य होईल.
मानवी स्वभाव, संकेत आणि नियमांवर उभा असलेला सुव्यवस्था आणि संस्कृती यांचा नाजूक डोलारा, अराजक माजल्यावर माणसांतलं उफाळून येणारं पशुत्व, नीती-अनीतीतले द्वंद्व, स्मृती आणि काळाचा प्रवाहीपणा, या सार्या गदारोळात दृष्टी शाबूत राहिलेल्या व्यक्तीला दृष्टीचा डोळा पाहोन 'तव भीतरी पालटू झाला' सारखा येणारा अनुभव - ह्या सार्या बाबी या कादंबरीत येऊन जातात.
"Magical realism is not a realism to be transfigured by the supplement of a magical perspective, but a reality which is already in and of itself magical or fantastic." या न्यायाने या कादंबरीचा समावेश डिस्टोपियन कादंबर्यांसोबतच जादुई वास्तववादातही करायला हवा.
३. अमेरिकन पास्टरल - फिलिप रॉथ
ज्यांना या वर्षीचं साहित्याचं नोबेल पारितोषिक मिळण्याची शक्यता आहे, अशा लेखकांच्या यादीत फिलिप रॉथ यांचं नाव गेली अनेक वर्षं येत राहिलं आहे. गेल्या वर्षी याच लेखकाचा 'गुडबाय, कोलंबस' हा संग्रह वाचला होता आणि तो आवडलाही होता. त्या पार्श्वभूमीवर 'अमेरिकन पास्टरल' या कादंबरीच्या सुरुवातीचा भाग अतिशय आवडला; पण काही पानांनंतर कादंबरी दुर्दैवाने चक्क रटाळ आणि तेच तेच मुद्दे पुन्हा उगाळणारी वाटू लागली.
न्यू जर्सीत स्थायिक झालेल्या ज्यू धर्मीय समाजाच्या दुसर्या आणि तिसर्या पिढ्यांची मुख्य प्रवाहात सामील व्हायची, दुसर्या महायुद्धाच्या काळातली धडपड आणि या संघर्षातलाही दोन पिढ्यांतला फरक - हे ढोबळमानाने दोन्ही पुस्तकांचं मुख्य सूत्र म्हणता येईल. 'अमेरिकन पास्टरल'मध्ये, शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य असलं तरी शालेय पातळीवरही ज्यू धर्मीय विद्यार्थी मैदानी खेळात मागे आहेत असा सामुदायिक न्यूनगंड असणार्या वस्तीत चक्क अष्टपैलू ज्यू धर्मीय खेळाडू पैदा होतो. त्याचं आयुष्य दृष्ट लागावं असं जाणार, अशी चिन्हं त्याच्या मध्यमवयापर्यंत दिसतात. मात्र व्हिएतनाम युद्धाच्या विरोधात टोकाची भूमिका घेणारी त्याची मुलगी या सार्याला सुरुंग लावते, असं हे - एका अर्थाने, तत्कालीन अमेरिकेचंच - कथानक.
एका व्यक्तीच्या जीवनातील पाच-सहा दशकांचा घेतलेला मागोवा (आणि पर्यायाने बदलत्या अमेरिकन समाजाचाही) यापूर्वी जॉन अपडाईकच्या 'रॅबिट' मालिकेत समर्थपणे येऊन गेला आहे. त्या तुलनेत 'अमेरिकन पास्टरल' बरीच थिटी पडते, हे वैयक्तिक मत.
४. केलब्स क्रॉसिंग - जेरल्डीन ब्रुक्स
स्थानिक लायब्ररी आणि पब्लिक रेडिओ स्टेशन हे दरवर्षी मिळून एक पुस्तक निवडतात. त्या वर्षी, मग त्या लेखकाची मुलाखत किंवा पुस्तकातल्या थीमवर आधारित काही कार्यक्रम अधूनमधून होत राहतात. १६६१ साली, Caleb Cheeshahteaumuck हा हार्वर्डमधून ग्रॅज्युएट झालेला पहिला नेटिव्ह अमेरिकन विद्यार्थी ठरला. त्याच्या आयुष्यावर बेतलेलं म्हणून या पुस्तकाबद्दल उत्सुकता होती.
शीर्षक जरी केलबबद्दल असलं तरी पुस्तक मुख्यतः बेथिया नावाच्या काल्पनिक मुलीच्या दृष्टिकोनातून लिहिलं गेलं आहे. त्यामुळे लिहिण्याची शैली उत्तम असली आणि त्या काळची भाषा, भूगोल आणि इतर ऐतिहासिक गोष्टी अचूक पुस्तकात याव्यात यासाठी घेतलेली मेहनत सतत जाणवत राहिली तरीही जेत्यांची संस्कृती स्वीकारायची ठरवली तरीही प्रसंगी होणारी त्रिशंकू अवस्था; नव्यानेच स्थापन झालेल्या वसाहतींची ऑक्सफर्ड-केंब्रिजसारखे प्रतिष्ठित विद्यापीठ नावारूपाला आणण्याची स्थानिकांची धडपड आणि नव्या जगातही मर्यादित असणारे धार्मिक स्वातंत्र्य या गोष्टी म्हणाव्यात इतक्या ठळकपणाने पुस्तकात येत नाहीत. त्या आल्या असत्या तर एक उत्तम 'हिस्टॉरिकल फिक्शन' वाचायला मिळाले असते.
नंदन, तुमची निवड
नंदन,
तुमची निवड (नेहमीप्रमाणे) प्रगल्भ दिसते आहे. खरंतर काय वाचावं आणि कसं वाचावं याची कार्यशाळा (वर्कशॉप) तुम्हाला घेता येईल. वाचनाची आवड आणि सवय कशी विकसित करावी, साहित्यिक मूल्यांचा माग (का मागोवा?) कसा घ्यावा, साहित्याबद्दल चिंतन कसे करावे, साहित्याच्या इतिहासाचं परिशीलन, इत्यादि बरेच बारकावे तुम्हाला सादर करता येतीलसं वाटतंय.
हे सगळं मी बरोबर बोललो ना?
आ.न.,
-गा.पै.
@ गा. पै - निवड प्रगल्भ वगैरे
@ गा. पै -
निवड प्रगल्भ वगैरे नाही हो. कुठे एखाद्या ब्लॉगवर वा साईटवर वाचून ती पुस्तकं वाचायला घेतली इतकंच. बाकीची माहिती नेटवर मिळतेच. तुम्ही म्हणता, तशी कार्यशाळा आयोजित करण्यास माबोवरच माझ्याहून कितीतरी अधिक पात्र सदस्य आहेत. वाचनाला काही नियम/दंडक असावेत, असं वाटत नसलं तरी अशा कार्यशाळेत हजेरी लावायला मलाही आवडेल.
सुप्रिया दिक्षित यांचे
सुप्रिया दिक्षित यांचे 'अमलताश' वाचले. आवडले. साधे, प्रांजळ वाटले आणि मनातले सल नीट मांडले आहेत. नुसतेच गुडीगुडी नाही. अशा किती बायकांनी 'घरचे सांभाळून काय ते करा' यासाठी आपले व्यावसायिक यश पणाला लावले असेल ते त्या पिढीसाठी प्रातिनिधिक वाटले. एकंदरित सांसारिक तापत्रयातून प्रतिभावंतही फारसे सुटले नाहीत.
जयवंत दळवी यांचे 'आत्मचरित्राऐवजी' वाचले. काही लेख उत्तम आहेत. विशेषतः 'त्या चौघीजणी' , 'दादरचे दिवस', भंडार्यांच्या हॉटेलांवरचा लेख इ.
अॅलिस मन्रो चे ' द प्रोग्रेस ऑफ लव्ह' वाचले. काही कथा आवडल्या. उपमांचा वापर सुरेख आहे.
Childhood - An Anthology edited by Kate Figes वाचले. संकल्पना आवडली. मराठीत असे कोणीतरी केले पाहिजे.
द प्रोग्रेस ऑफ लव्ह मला खूप
द प्रोग्रेस ऑफ लव्ह मला खूप आवडले. प्रत्येक कथा ही प्रेमाच्या प्रोगेस बद्दल आहे. त्यांचेच लव्हशिप, हेटशिप सध्या चालू आहे. अर्धेअधिक झाले आहे. ते ही आवडले.
त्यांच्या कथा विचार करायला लावतात असे मला वाटते.
नंदन- पोस्ट आवडली. पुस्तकांची
नंदन- पोस्ट आवडली. पुस्तकांची नावं नोंद करुन ठेवली आहेत. धन्यवाद.
केदार- थँक्स. मी विचार करत होते की पुढले मन्रो वाचावे का नाही एखादे. लव्हशिप इ. आता वाचेन.
नंदन - नेहमीप्रमाणेच सुरेख.
नंदन - नेहमीप्रमाणेच सुरेख. रैना म्हणते तसे पुस्तकांची नोंद केली आहे.
रैना - तू लिहिलेल्याही.
अॅलिस मुन्रो मलाही आवडते.
अॅलिस मुन्रो मलाही आवडते. तिचे सध्या 'रनअवे' वाचत आहे. द प्रोग्रेस ऑफ लव्ह वाचले नाही. वाचीन.
नंदन.. __/\__
नंदन.. __/\__
अॅलिस मुन्रोवरच आहोत तर
अॅलिस मुन्रोवरच आहोत तर त्यांचे द लव्ह ऑफ गुड वुमन पण सुंदर आहे. त्यातील टायटल कथा एकदम क्लास!
त्या वातावरण इतके मस्त उभे करतात की बास! त्या वेळेस आपण जर त्या जागी स्वतःला उभे केले तर जे मनात विचार येतील तसे पुस्तकात असतात. खूप कमी लोकं असे लिहू शकतात. इतके डिटेल्स उतरवायला पात्रांचा खूप विचार करावा लागत असणार . कथा पण वेगळ्याच असतात, मध्येच फ्लॅशबॅक, मध्येच वर्तमान.
बहुदा त्यांच्या कथा आवडायला वाचक पण काही वेगळ्या ताकदीचा लागत असावा की काय? असे वाटते कधी कधी.
'The Wolf of Wall Street' -
'The Wolf of Wall Street' - By Jordan Belfort - वाचुन संपवले. कसबसं संपवलं. अगदिच वेळ जात नसेल तर वाचा.
अॅलिस मन्रोच्या १८ कथा येथे
अॅलिस मन्रोच्या १८ कथा येथे ऑनलाईन वाचता येतील. (काही ऑडिओ फॉर्मॅटमध्ये आहेत).
तिच्या कथांबद्दल अजून निश्चित असं मत बनलेलं नाही. न्यू यॉर्करमध्ये प्रसिद्ध झालेल्या काही कथा आवडल्या होत्या. आता 'द प्रोग्रेस ऑफ लव्ह' मिळवून वाचायला हवे.
नकळत सारे घडले या नाट्कावरच
नकळत सारे घडले या नाट्कावरच पुस्तक वाचल.शेखर ढवळीकरांच आहे राजहंस प्रकाशनच्या या पुस्तकाचा विशेष म्हणजे यात संहितेबरोबर शेखर ढवळीकर,मोहन आगाशे, विक्रम गोखले,स्वाती चीटणीस यांचे निर्मिती आणि त्यानंतरचे अनुभव या वर लेख आहेत.नाटक टीनेजर समस्येवर आहे.आवश्य वाचाव अस.
स्टीव जॉब्स आणले आहे
स्टीव जॉब्स आणले आहे लायब्ररीतून. अजुन उघडायला मुहुर्त मिळालेला नाहिए. थोडस चाळले तर बरे वाटत आहे.
फिलिप रॉथचे अमेरिकन पॅस्टोरल
फिलिप रॉथचे अमेरिकन पॅस्टोरल भन्नाट आहे.
न्यू यॉर्करमध्ये प्रसिद्ध झालेल्या काही कथा आवडल्या होत्या >> त्यातिल काही त्यांच्या लव्ह ऑफ अ गुड वुमन मध्ये आहेत.
एका परिचिताचा नुकताच म्हणजे
एका परिचिताचा नुकताच म्हणजे घटस्फोट झाला आहे. घटस्फोटातून उद्भवलेल्या मानसिक ताण व नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी त्याला एखादे पुस्तक वाचायला द्यायचा मानस आहे.
तरी आपण एखादे पुस्तक सुचवू शकाल काय?
अच्चुत गोडबोले याचं "
अच्चुत गोडबोले याचं " मुसाफिर " वाचत आहे. काही काही प्रकरण तर पुन्हा पुन्हा वाचण्यासारखी आहेत. पुस्तक भन्नाट आहे
अलीकडे वाचलेली काही
अलीकडे वाचलेली काही पुस्तकं:
१. 'गो टेल इट ऑन द माऊंटन' आणि 'जोवान्नीज् रूम'
न्यू यॉर्कच्या हार्लेम या कृष्णवर्णीय-बहुल वस्तीत जेम्स बॉल्डविन वाढला. त्याचे सावत्र वडील धर्मोपदेशक होते. घरची हलाखीची परिस्थिती आणि धार्मिक वातावरण (हे थोडंफार सॉमरसेट मॉमच्या 'ऑफ ह्युमन बॉन्डेज'ची आठवण करून देणारं), १९५० च्या दशकात उत्तरेत जरी उघड अन्याय कमी प्रमाणात असला तरीही वर्णभेदाचे सतत जाणवणारे अस्तित्व, सावत्र वडिलांचा सोसावा लागलेला जाच, चौदा-पंधरा वर्षांचं अडनिडं वय आणि त्याचवेळी आपला स्वभाव आणि लैंगिक कल बहुसंख्यांहून निराळा असल्याची झालेली पुसट जाणीव - अशा निरनिराळ्या 'मायनॉरिटी विदिन मायनॉरिटी' जाणीवा 'गो टेल इट ऑन द माऊंटन' ह्या पहिल्या, आत्मचरित्रात्मक कादंबरीत एकमेकांत गुंतून सामोर्या येतात. एखाद्या व्यक्तीच्या अस्मितेला जसे भाषिक, जातीय, धार्मिक, लैंगिक, राजकीय पदर असतात; तशीच वेगळेपणाची, बहुसंख्यांहून निराळं असण्याची भावनादेखील व्यामिश्र असते - याचा पडताळा देणारी ही कादंबरी आहे. छोटेखानी, पण लगेच पकड घेणारी. वाचनीय.
२. झेलट आणि 'नो गॉड बट गॉड'
प्रेषित, त्यांचा उदय झाला तेव्हाची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती, ती बदलण्यासाठी प्रेषिताने केलेले प्रयत्न आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या म्हणण्याचा झालेला विपर्यास - असा साधारण रेझा अस्लनच्या या दोन पुस्तकांचा ढाचा आहे. यातले येशू ख्रिस्तावरचे 'झेलट' अधिक रोचक वाटले.
इसवी सनाच्या पहिल्या शतकात रोमन साम्राज्य आणि त्या साम्राज्याशी हातमिळवणी केलेल्या ज्यू धर्मीय पुजारी वर्ग यांच्याविरुद्ध सामान्य ज्यू जनतेत खदखदणारा असंतोष - परिणामी येशूच्या आधी आणि नंतरही उदयास आलेले अनेक धर्मसुधारक/प्रेषित आणि त्या सार्यांचा क्रूसावर झालेला अंत - इ.स. ६६ साली ज्यूंनी केलेला उठाव आणि पराभवानंतर जेरुसलेमची झालेली वाताहत - परिणामी येशूच्या अनुयायांनी ज्युईश परंपरेपासून जाणीवपूर्वक घेतलेली फारकत आणि रोमन सम्राटाच्या अधिकार्यांऐवजी येशूच्या अंताचे ज्यूंवर फोडलेले खापर - गॉस्पेल्समध्ये कालानुक्रमे घडत गेलेले बदल (उदा. जॉन द बाप्टिस्ट ह्या येशूच्या मार्गदर्शकाचे घटवत नेलेले महत्त्व) - पीटर आणि पॉलमधल्या मतभेदांमुळे ख्रिश्चॅनिटीवर पडलेला ग्रीको-रोमन प्रभाव - या गोष्टी मुळातून वाचण्यासारख्या आहेत. 'नो गॉड बट गॉड' हे इस्लामवरचे पुस्तक 'झेलट'च्या आठ-एक वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेलं. झेलटच्या तुलनेत हे जरा विस्कळीत आहे.
३.The History of the Siege of Lisbon - José Saramago
पुस्तकाचं नाव जरी ऐतिहासिक घटनेशी संबंधित असलं, तरी ही ऐतिहासिक कादंबरी नाही. रायमुंडो सिल्व्हा नावाचा पन्नाशीतला, अविवाहित मुद्रितशोधक लिस्बनच्या वेढ्याबद्दलच्या एका पुस्तकाचं प्रूफरीडिंग करत असतो. इस्लामी सत्तेखाली असलेलं लिस्बन पुन्हा जिंकून घ्यायला पोर्तुगीजांना क्रुसेडर्सनी मदत केली, याऐवजी त्यांनी 'मदत केली नाही' असा एक छोटा, पण महत्त्वाचा बदल तो करतो आणि पुस्तक छपाईला जातं. ही चूक उघडकीला आल्यावर आणि रायमुंडोला ताकीद मिळाल्यावर, प्रकाशनसंस्थेतली एक अधिकारी व्यक्ती त्याला या बदललेल्या इतिहासाची फेरमांडणी करायला सांगते.
या मोठ्या घटनेचा इतिहास लिहिताना राहून/गाळल्या गेलेल्या वा नजरेआड केलेल्या लहान लहान घटनांबद्दल रायमुंडोच्या मनात मग खल सुरू होतो. कथानक मग बाराव्या शतकातली ऐतिहासिक घटना आणि विसाव्या शतकातलं रायमुंडोचं वैयक्तिक आयुष्य - अशा दोन रूळांवरून पुढे सरकतं. सारामागोची लेखनाची शैली निराळी आहे. विरामचिन्हांचा आणि वक्त्याच्या नामनिर्देशनाचा किमान वापर, स्ट्रीम-ऑफ-कॉन्शसनेस शैलीतलं निवेदन, पानंच्या पानं चालणारे परिच्छेद आणि भूतकाळ व वर्तमानकाळ यांच्यात विनासायास फिरणारं कथानक - यामुळे हे पुस्तक 'सहज वाचायला घेतलं नि चार पानं वाचून बाजूला ठेवून दिलं' या पद्धतीने वाचता येत नाही. पण या शैलीमुळे वाचकाचीही पुस्तकात अधिक गुंतवणूक होते.
इतिहासापेक्षाही इतिहासलेखन आणि तत्सम गोष्टी (Historiography) या पुस्तकाच्या केंद्रस्थानी आहेत. उदाहरण द्यायचं तर अॅरिस्टॉटलने माशीला चार पाय असतात असं लिहून ठेवल्याने, अनेक शतके प्रत्यक्ष पुराव्याकडे दुर्लक्ष करून जे इतिहासात लिहिलं आहे, तेच ग्राह्य धरून पुढे चालण्याची वृत्ती किंवा खुमारी वाढवण्यासाठी लेखकाने घेतलेलं स्वातंत्र्य. उदाहरणार्थ - चंद्रकोर असणारा झेंडा तुर्कांनी पंधराव्या शतकात प्रथम प्रचलित केला, पण ११४७ मध्ये घडलेल्या ह्या लढाईत असाच झेंडा पोर्तुगीज सैन्य लिस्बनच्या किल्ल्यावरून खाली उतरवतं, असा मूळ पुस्तकात उल्लेख असतो. (अगदी बाबासाहेब पुरंदर्यांनीही 'राजा शिवछत्रपती'मध्ये देवगिरीच्या पाडावाचे वर्णन करताना 'लखलखता चांदतारा असणारा हिरवा झेंडा तळपत्या तलवारींनिशी...' - असा उल्लेख केला असल्याचं आठवतं.)
नंदन, पोस्टसाठी धन्यवाद.
नंदन, पोस्टसाठी धन्यवाद. पुस्तकांची नावं टिपून घेतली आहेत
धन्यवाद नंदन, दोन्ही पुस्तके
धन्यवाद नंदन, दोन्ही पुस्तके इंट्रेस्टींग आहेत!
'भाऊ पाध्ये यांच्या श्रेष्ठ कथा' हा कथासंग्रह वाचला. त्यातली बगिचा ही एक जबरदस्त कथा आहे. त्यांच्या टीपिकल भाषेची गंमत ओसरली की मग ते काय सांगू पहात आहेत त्याकडे लक्ष जाते.
दिपुचित्र्यांची प्रस्तावनाही बाय इट्सेल्फ एक उत्तम लेख आहे.
नंदन, त्या दोनपैकी एक पुस्तक
नंदन,
त्या दोनपैकी एक पुस्तक सापडलं. No God but God. सवडीने वाचेन. Zealot सापडत नाहीये. धन्यवाद! तुमच्या पुस्तकपरिचयाने उत्सुकता चाळवली गेली आहे.
जाताजाता : तो चंद्रकोरीचा झेंडा तुर्क-मंगोल लोकांचा आहे हे निरीक्षण अगदी भारी आहे. मुस्लिमांनी अगदी अलीकडे हा झेंडा तुर्कांकडून उचलला. मूळ अरबी इस्लाममध्ये चांदतारा नाही. अधिक माहितीसाठी : http://en.wikipedia.org/wiki/Star_and_crescent
आ.न.,
-गा.पै.
लंडन समजून घ्यायचे असेल तर हे
लंडन समजून घ्यायचे असेल तर हे पुस्तक एकदम भारी . गेल्या ५००० वर्षाचा इतिहास कादंबरीच्या रुपात दिलखुलास मांडलाय. इतिहास तर आहेच पण - लंडन शहर कसे वसले, आर्थिक भरभराट, राजकीय घडामोडी, सामाजिक अभिसरण सगळ्याच विषयावर मस्त लिहिले आहे . मुळात ज्यांना इथल्या इतिहास व संस्कृतीची ओळख नाही त्यांना ही ओळख करून घ्यायला व लंडन समजायला अगदी सोप्पं पुस्तक -- वेळ हवा भरपूर जाडजूड आहे -- पण लंडनची ज्यांना जुजबी माहिती आहे त्यांच्यासाठी एकदा हाती घेतलं कि ठेववत नाही खाली.
/London-Edward-Rutherfurd
याच लेखकाची रशिया आणि न्यू योर्क वरची पुस्तकेही छान आहेत. मला लंडन जास्त भावले. कदाचित इथे प्रत्यक्ष राहत असल्यामुळे असेल.
नंदन, काय छान लिहितोस!
नंदन, काय छान लिहितोस!
नंदन Karen ARmstrong ची या
नंदन
Karen ARmstrong ची या विषयावरची पुस्तके खूप छान आहेत. तिने तिन्ही धर्माविषयी - इस्लाम, ख्रिश्चनिटी आणि जुडाइस्म वर खूप अभ्यासपूर्ण लिहिले आहे. तिन्ही धर्मांचा तौलनिक अभ्यास करून खूपच सम्यक लिहिले आहे. History ऑफ God, इतर प्रेषिताबद्दलची पुस्तके वाचनीय आहेत. मला तिचे सगळ्यात आवडलेले पुस्तक बुद्धाचे चरित्र. इस्लामचा इतिहास आणि मोहम्मद यावर याच नावाची दोन्ही पुस्तके प्रसिध्द आहेत.
The Great Transformation हे थोडे जड आहे पण एकाच वेळेस जगात वेगवेगळे धर्म का आणि कसे उदयास आले यावर छान विवेचन आहे.
तिचे आत्मचरित्र ऑफ spinal staircase तिच्या सर्व लेखनप्रवास खूप छान मांडते. पुस्तके थोडी गंभीर आहेत पण वाचनीय आहेत.
Pages