Submitted by वरदा on 12 February, 2013 - 09:20
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.
इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कोणीतरी सुचवले म्हणून Colin
कोणीतरी सुचवले म्हणून Colin Cotteril या लेखकाचे The Coroner's Lunch हे पुस्तक वाचायला घेतले आहे.
टोटल फिदा. काय अफलातून शैली आहे त्याची आणि अफाट विनोदबुद्धी.
लाओस मधील लाल टेकोव्हर नंतर ७२ वर्षीय डॉ सिरीला प्रमुख शवविच्छेदक (coroner ला मराठीत काय म्हणतात ?) केले जाते.
म्हणले तर मिस्ट्री/ क्राईम जॉनर पण.. अप्रतिम लिहीले आहे.
तो कधी न पाहिलेला लाओस हा देश असा काही जिवंत होतो की बस. हा माणुस व्यंग्यचित्रकार, त्याला दिसणार्या विसंगती तो शब्दातून मांडतो एवढेच. त्याची Dr Siri Paiboun सिरीज एकुणात भारी आहे म्हणतात.
http://en.wikipedia.org/wiki/Colin_Cotterill
रैना, नाव नोंदवून घेतले आहे.
रैना, नाव नोंदवून घेतले आहे. इंटरेस्टिंग वाटतंय. तसंही मर्डर मिस्ट्री म्हणजे मी वाचणारच
>>> नाव नोंदवून घेतले आहे.
>>> नाव नोंदवून घेतले आहे. इंटरेस्टिंग वाटतंय
--- तंतोतंत!
>> नाव नोंदवून घेतले आहे.
>> नाव नोंदवून घेतले आहे. इंटरेस्टिंग वाटतंय >> +१
काही दिवसांपुर्वी चंद्रकुमार
काही दिवसांपुर्वी चंद्रकुमार नलगे रांची 'रातवा' आत्मकथा वाचली, लय भारी आहे.
व्योमकेश बक्शी च्या रहस्यकथा
व्योमकेश बक्शी च्या रहस्यकथा भाग १ वाचला... मला फार काही थ्रिलिंग वाटल नाही...ना डोक्याला जास्त ताण पडला की काय असेन ,,कोण असेन गुन्हेगार ??? शेवटच्या स्पष्टीकरणात व्योमकेश च्या दृष्टीकोनातुनच सगळ येत.
थँक्स रैना, बायदवे 'हे लाओस
थँक्स रैना, बायदवे 'हे लाओस कुठे आहे हो?'!!!!
सध्या दिवसा ग्रिशमचे 'अ टाईम
सध्या दिवसा ग्रिशमचे 'अ टाईम टू किल' आणि रात्री बिल ब्रायसनचे 'द लॉस्ट काँटीनेंट' वाचतो आहे!
ग्रिशमनी लिहिलेले हे पहिले पुस्तक, त्याची फोर्ड काऊंटी आता काही नवी नाही पण त्याच्या इतर पुस्तकांपेक्षा हे जास्त रॉ, कमी क्राफ्ट्समनशिप असलेले वाटले.
मी ब्रायसनचा पंखा आहे त्यामुळे लॉस्ट काँटीनेंट मधले अनेक उल्लेख आता अमेरिकेत कालबाह्य असले तरी केवळ त्याच्या खुसखुशीत शैलीमुळे मजा येते. आणि त्यामधे सतत येणारा सांस्कृतिक सपाटीकरणाचा धागा आपल्याकडे आता प्रचंड रिलेव्हंट वाटतो.
आगाऊ, ब्रायसनच्या लहानपणीच्या
आगाऊ,
ब्रायसनच्या लहानपणीच्या आठवणी वाच. धमाल आहेत.
या पुस्तकातही त्याच्या
या पुस्तकातही त्याच्या लहानपणीचे खूप संदर्भ येतात आणि ते सॉलिड धमाल आहेत!
सध्या विश्वास पाटील यांचे,
सध्या विश्वास पाटील यांचे, 'Not gone with the wind' वाचतेय.
ह्या हितं हाय लाओस आगावा...
ह्या हितं हाय लाओस आगावा...
धन्यवाद हूड. वरदा- Gerald
धन्यवाद हूड.
वरदा- Gerald Durell साठी मनापासून धन्यवाद. मी दोन पुस्तकं आणलीत सध्या. मधुन मधुन वाचतेय. आवडली.
सुरेख आहेत.
सध्या गुगल वरील वाचन. ६ पुस्तकं आहेत. मस्त आहेत पुस्तकं. किती दिवसात जरा बुड लावून, नीट लिहून वाचन सुरु आहे. मेंदू अजून बरा चालतो हे पाहुन बरं वाटलं. मध्यंतरी कोळीष्टकं जमली का काय असे वाटत होते.
त्यांना कुठल्याही नियमांची फारशी पर्वा नाही, हे पाहुन वाचायला मज्जा येतेय खरोखर. जबराट झपाटा आहे गुगलच्या कामाचा. जग इतके पुढे गेले आणि मला पत्ता नव्ह्ता
ग्रीशॅम, मी बहुतेक झाडुन सगळी वाचलीत. नवीन 'असोसिएट' पण. ते मात्र बंडल आहे.
आगावा- धन्यवाद. जरा सविस्तर लिही ना. बिल ब्रायसन बद्द्ल.
दिलीप कुमार साहेबांची
दिलीप कुमार साहेबांची ऑटोबायोग्राफि, सब्स्टंस अँड शॅडोज, कुठे मिळेल? एमॅझान वर अजुन आलेली नाहि...
आगाऊ, पुलंच्या पुस्तकातला
आगाऊ, पुलंच्या पुस्तकातला डायलॉग मारतोय ना? खरं नाही विचारत आहे बहुतेक.
बिल ब्रायसन मला पण आवडतो.
बिल ब्रायसन मला पण आवडतो. रैना/वरदा: नोंद केली, धन्यवाद
The Accidental Prime Minister
The Accidental Prime Minister हे (मनमोहन सिंग यांच्यावरचे) व "मोदी नामा" हे ही दोन पुस्तके भारतातून आली आहेत. काहीच माहिती नाही त्यांच्याबद्दल. कोणी वाचली असतील तर कळवा.
अमोल, The Accidental Prime
अमोल, The Accidental Prime Minister बद्दल मेहतांच्या ग्रंथजगत मध्ये लिहून आले आहे, ते बरे आहे. मलाही बघायचे आहे ते पुस्तक.
थॅन्क्स शैलजा. ग्रंथजगत -
थॅन्क्स शैलजा. ग्रंथजगत - वेबसाईट आहे का छापील पब्लिकेशन?
छापील.
छापील.
A Song of Ice and Fire
A Song of Ice and Fire !
सध्या HBO वरची "Games of thrones" सिरीज बघितली नसेल तरी ऐकूनही माहित नसेल असा कोणी विरळाच असावा. काही महिन्यांपूर्वी वैद्यबुवांनी ह्या बद्दल इतकी बडबड केली होती कि त्यांना गप्प करण्यासाठी मी वैतागून पहिले पुस्तक वाचायला घेतले. पुढचा दीड महिना मी रात्रंदिवस एक करून प्रसिद्ध झालेले पाच भाग - जवळजवळ साडेपाच हजार पाने सलग वाचली. ऑफिस संपवून घरी गेल्यावर नेहमीची कामे उरकायची नि "थ्रोन्स" घेऊन बसायचे हा शिरस्ता झाला होता.
Games of Thrones हे A Song of Ice and Fire ह्या G.R.R. Martin ने लिहिलेल्या series मधले पहिले पुस्तक. मूळ सिरीज लिहिताना तीन पुस्तके असणार होती, जी नंतर पाच झाली. सध्या सहाव्याचे लिखाण सुरू आहे. सात नक्की येणार आहेत, कदाचित आठवे ही लिहिले जाईल. HBO त्यांच्या सिरीज चे alternate ending करणार आहेत कारण मार्टीनचा लिहिण्याचा वेग अतिशय संथ आहे. पाहिला भाग ९१ मधे लिहायला सुरू केला जो ९६ मधे प्रसिद्ध झाला. पाचवा भाग तो 5 वर्षे लिहित होता. ह्या ७ भागांची नावे अशी आहेत- (भलतीच lyrical आहेत)
१. A Game of Thrones
२. A Clash of Kings
३. A Storm of Swords
४. A Feast for Crows
५. A Dance with Dragons
६. The Winds of Winter
७. A Dream of Spring
जवळजवळ तीस मुख्य पात्रांचे हे कथानक westeros आणि essos ह्या दोन खंडांमधील सात राज्यांमधे (kingdom) पसरलेले आहे. westeros मधल्या सात घराण्यांमधील सत्ता संघर्ष (Games Of Thrones) ह्या ह्याचा मुख्य गाभा. त्यात westeros च्या उत्तरेकडील (North of the wall - Land of Winter) "Others" (अमानवीय अस्तित्व) ची चढाई आणि westeros च्या हत्या झालेल्या सम्राटाची Daenerys Targaryen ही परागंदा मुलगी नि मूळ सिंहासन परत मिळवण्याची तिची मह्त्वाकांक्षा अशी दोन मुख्य उपकथानके आहेत. ह्यात राजे आहेत, राण्या आहेत, राजपुत्र आहेत, राजकन्या आहेत, सरदार आहेत, खोजा आहे, पुजारी आहेत, भाट आहेत, बुटके आहेत, मुले आहेत, मुली आहेत, दर्यावर्दी आहेत, मांत्रिक आहेत, स्त्री जादूगार आहेत, चेटक्या आहेत, werewolves आहेत, भूते (पिशाच्चे - wights) आहेत, बोलती झाडे आहेत, dragons आहेत, mammoth आहेत, giants आहेत, vampires आहेत, dark magic आहे, seers आहेत, अफाट wall आहे, सात प्राची शहरे आहेत, northern forest आहे, किल्ले आहेत, ancient भाषा आहेत. तुम्ही आत्तापर्यंत वाचलेल्या, पाहिलेल्या प्रत्येक fantasy मधले जवळजवळ प्रत्येक character कुठल्या ना कुठल्या रुपात समोर येत राहते. लिखाणाचे स्वरुपही कुठल्या ना कुठल्या पात्राने सांगितलेली तत्कालीन घटनांची जंत्री (point of view) असे आहे. प्रत्येक पुस्तक काही विशिष्ट पात्रांवर नि त्यांच्या परस्परसंबंधांवर (नि अर्थातच आपापसात घडणार्या घटनांवर) गुंफलेले आहे.
पहिल्या काही पानांमधे पहिली गोष्ट तुमच्या समोर येते ती कथानकाची अवाढव्य व्याप्ती. प्रत्येक पुस्तकाच्या सुरूवातीला नि शेवटी त्या भागामधे होणार्या घटना कुठे होताहेत ते कळावे म्हणून नकाशे दिलेले आहेत. (मी सुरूवातीचे काहि दिवस हि त्यांची फोटो कॉपी बाजूला ठेवून बसत असे.) प्रत्येक भागाच्या शेवटी मुख्य राज घराणी नि त्यांची वंशावळ - Who's who नि घटनावळी दिलेली आहे. हे मध्ये मध्ये बघितल्याशिवाय सुरुवातीला संगती लागणे अतिशय कठीण आहे.
तुम्ही जर HBO वरील भाग बघितले असतील तर पटकन जाणवणार्या दोन गोष्टी म्हणजे - Sexuality and powerful collective violence. पुस्तकामधे त्यांची तीव्रता कमी जाणवते. ह्यातले Sexuality हा सिरीजचा एक अविभाज्य घटक आहे. सुरूवातीला तो चटकन जाणवतो नि अंगावर येतो. हि वर्णने चटकदार नक्कीच नाहित. हि जरुरी आहेत कि नाही ह्यावर नेटवर प्रचंड चर्चा सापडेल. पण एक मात्र नक्की कि तुम्हाला लवकरच त्यांची सवय होते. (काही जणांच्या मते ही वर्णने मार्टीनच्या सेक्सुअल fantasies आहेत.) पूर्ण कथानक हे एक socio-political saga ह्या प्रकारातले आहे त्यामूळे ह्या दोन primal instincts पात्रांमधला संघर्ष (conflict) ठळक करण्यासाठी सढळपणे मार्टीन वापरतो असे मला वाटले. जगातल्या बहुतांशी युद्धांचा इतिहास ह्या दोन उर्मींशिवाय पूर्ण होत नाही (युद्धांची कारणे/मूळ म्हणून नाही तर युद्धाचे गुणधर्म म्हणून). पूर्ण कादंबरीचे स्वरुप पुस्तकापेक्षा पटकथा म्हणून अधिक योग्य ठरेल. अतिशय बारिक सारिक गोष्टी अतिशय सविस्तर पणे लिहिलेल्या आहेत (म्हणून साडे पाच हजार पाने). त्यामूळे वाचल्यापेक्षा बघितल्याचा feel अधिक येतो. मार्टीन पटकथाकार असल्यामूळेही हे नकळत झालेले असू शकेल.
Lord of The Rings, Harry Potter, लेविस कॅरोल, Roger Zelazny, Mervyn Peake वगैरेंचे fantasy प्रकारांमधे मोडणार्या साहित्याची central theme कुठल्या ना कुठल्या स्वरुपातली Romantic Heroism असते. थ्रोन्स fanatasy प्रकारात मोडत असले तरी मार्टीन त्यातला Romantic Heroism पूर्णपणे बाजूला काढून टाकतो. fanatasy कथाप्रकाराचा कणा मोडूनही संपूर्ण मालिका dull (निरस) नि शुष्क होउ न देणे हे मार्टीनचे जबरदस्त यश मानले पाहिजे. अर्थात ते करण्यासाठी तो शॄंगारिक, बिभत्स, रौद्र, शांत, भीतीदायक, अद्भुत, वत्सल ह्या रसांचा नि क्रोध, माया, मद, मत्सर, मोह, मैथुन, प्रेम गुणांचा पुरेपूर सढळपणे वापर करतो. लिखाणाचे वाचन संपून तुम्ही त्यातली पात्रे कधी जगायला लागते ते कळत नाही. पात्रांचे स्वगत (अगदी स्वगत नाही म्हणता येणार पण त्यांचा point of view - आपापसातले संवाद नाही) तुमच्या स्वतःकडून येते आहे असे वाटायला लागते. तुम्ही ज्यांच्यांशी एकरुप (relate) व्हायला लागलेले असता अशी मुख्य पात्रे मधेच मारली जातात. मग पुढच्या घटना तुम्ही 'आता हा कोणाला मारणार?' ह्या छायेमधे वाचता.
बहुतेक fanatasy मधे कथानक एका शेवटाकडे (climax) नेलेले असते, बहुतेक घटनांची जंत्री त्यानुसार झालेली असते. इथे हा प्रकार धेडगुजरी प्रमाणात जाणवतो. कदाचित अजून दोन पुस्तके यायची असल्यामूळे असेल पण प्रत्येक पुस्तक एखाद्या cliax साठी लिहिले गेलेले आहे असे वाटत नाही. ह्याउलट पूर्ण घटनाक्रमामधे बरेच उत्कर्षबिंदू येतात. पण कथानक तिथे न थांबता पुढे सरकत राहते. अर्थात शेवटचे दोन भाग येईतो ह्याबाबत नक्की काय ते सांगणे कठीण आहे.
मार्टीनच्या कथानकातील नायिका ह्या चांगल्या म्हणा किंवा वाईट म्हणा - कुठल्याही प्रकारे नायकांपेक्षा कमी नाहीत. त्यांच्यात तेव्हढेच मानवी गुणावगूण दिसतात. त्यात पाताळयंत्री राणी आहे, hopelessly romantic राजकन्या आहे, naive राजकन्या आहे, राज्यावरून विस्थापीत होऊन देशोधडीला लागलेली राजकुमारी आहे (जी एका कमकुवत दुबळ्या मुलीपासून बदलत एक कणखर स्वतंत्र व्यक्तिमत्व असलेली राणी होते), समशेर बहाद्दर स्त्री सरदार आहे, दर्यावर्दी राजकुमारी आहे, एक बहाद्दूर टीनएजर, desperate आई आहे. प्रत्येकीचा पोत वेगळा, बाज वेगळा आहे पण त्या संपूर्ण कथानकामधे कुठल्या ना कुठल्या नायकासमोर खंबीरपणे उभ्या ठाकतात. कथानकावर Medieval Europe ची छाप आहे हे लक्षात घेतल्यावर हे फारच प्रकर्षाने उठून दिसते.
सत्तासंघर्ष असूनही खुबीची गोष्ट ही की त्यात नक्की एक असा नायक/नायिका नाही किंवा एक खलनायक/खलनायिका नाही. काही पात्रांच्या वागण्यात थोडी अधिक काळी छटा जरूर आहे पण त्यांच्या परीने त्यांचे वागणे चुकीचे नसते. एखादे पात्र प्रथम कथेमधे येते तेंव्हा एकदम black shade ने सुरू झाले असेल तरी जशी जशी त्याची भूमिका नि आधीच्या-पुढच्या घटनांची जंत्री कळत जाते तसतसा त्यातली black shade कमी होत जाते. बहुतांशी पात्रांच्या grey shades च्या वागण्याने त्यातल्या प्रत्येक संघर्षाला अधिकच धार चढत जाते. प्रत्येक पात्राच्या वागण्याला त्यांच्या विचारांची ठाम बैठक आहे नि ती एकदा लक्षात येत गेली कि आपण त्यांना बरोबर/चूक अशा तागडीत न बसवता फक्त 'ते असे का वागले' हे समजून घेत जातो नि त्यामूळे होणार्या प्रत्येक संघर्षाची तीव्रता अधिक जीवघेणी वाटू लागते. बर्याचश्या पात्रांचे निर्णय त्यांच्या मर्यादा, स्वाभिमान, अहंच्या संकल्पनेच्या विरुद्ध जाणार हे लक्षात येऊनसुद्धा तो निर्णय घेतात कारण ती त्या क्षणाची गरज असते हे एकदा पचनी पडले कि, आपल्याला दैनंदिन जीवनामधे होणारा moral dilemma त्यांच्या वागण्यामधे (अर्थात त्यांच्या समस्या काल्पनिक आहेत) सहज जाणवतो नि आपण त्या समजू शकतो. त्यांच्या वागण्याचे पुरेसे स्पष्टीकरण मिळत जाते.
शेवटी मार्टीनच्याच शब्दात सांगायचे तर
Valar morghulis ! (all men must die)
Valar dohaeris ! (all men must serve)
proof read केल्याबद्दल लालूचे धन्यवाद !
कामाची किमया हे ग. ना .सप्रे
कामाची किमया हे ग. ना .सप्रे लिखित राजहंसचे छोटुकले पुस्तक माझे खूप म्हंजी खूपच आवडीचे हय. ते मी अनेकांना भेट देत असतो. वर्क कल्चरवरील पुस्तक आहे. ते मला नेहमी विकत घ्यावे लागते. त्याच्या बर्याच आवृत्त्याही निघ्याल्यात. म्हणजे ते एक उत्तम खपाचे पुस्तक आहे. पण ते मिळताना नेहमीच अडचण येते. परवाचीच गोष्ट.. अब चौकात अनमोल प्रकाशनात गेलो आणि हे पुस्तक सर्वडिटेल सह साम्गून मागितले . एखादे झुरळ झटकावे इतक्या तत्परतेने प्रचण्ड वेगाने मान हलवीत ' नाही नाही , ते नाही ' असे म्हणत त्याने कटवले. मग शेजारच्या रसिक मध्ये गेलो . तिथे विचारले तर केवळ जिलेबी संपलेल्या चितळ्यांच्या स्टाफशी तुलना होऊ शकेल इतक्या निरिच्छपणे त्याने 'नाही' असे सुनावले....
एखाद्या मारवाड्याच्या किंवा सिंध्याच्या दुकानात एखादी वस्तू शिल्लक नाही हे सांगताना त्याच्या चेहर्यावर एक प्रचंड ओशाळवाणा भाव आणि स्वरात जी अजीजी असते त्यावरून त्याचे व्यवसायावरील प्रेमच दिसून येते. आणि मराठी पुस्तक व्यवसायात माज ! हे दोन महिन्यापूर्वी वाळिम्ब्यांच्या 'हिटलर ' बद्दल मुम्बईच्या आयडियल आणि मॅजेस्टिकच्या दुकानात दोनदा अनुभवले आहे. अजूनही ते मिळालेले नाही. आणि यांनी पुन्हा ग्रंथव्यवहारावर भाषणे ठोकायची !
श्श! मराठी पुस्तक
श्श! मराठी पुस्तक व्यावसायिकांबद्दल असं बोलायचं नाही रॉबिनहूड!
निनावी ताई तमिळ
निनावी ताई तमिळ पुस्तकव्यावसायिकाम्बद्दल बोल्ले तर चाल्लेल काय /?
चालेल, कारण त्यांना कळणार
चालेल, कारण त्यांना कळणार नाही. यांना सग्गळं सग्गळं कळतं.
अ.ब. चौकातले 'रसिक'? तेथे तर
अ.ब. चौकातले 'रसिक'? तेथे तर कायमच चांगला अनुभव आलेला आहे. काउंटरवरचेच लोक नव्हे, तर दुकानात जी काही छोटी 'आईल्स' आहेत तेथे फिरणारे एक दोन लोक असतात त्यांचाही. रसिक वाले सहसा पुस्तक नसेल तर नाव व आपला फोन नं लिहून घेतात (नंतर पुन्हा कधीही त्यांनी फॉलो अप केला नाही हे ही खरे)
डेक्कन वर इंटरनॅशनल वाले ही चांगले बोलले होते. अर्थात हे दोन्ही 'अॅनेक्डोटल' अनुभव. सर्वांचे तसेच असतील असे नाही.
पुण्यात तरी ते अत्रे हॉल समोरचे दुकान आहे तेथील लोक सर्वांत फ्रेण्डली वाटले.
छान इंट्रो लिहिलास असामी.
छान इंट्रो लिहिलास असामी. दुसरं काही बोलायची गरजच राहिली नाही. खुपच अॅडिक्टिव आहेत पुस्तकं. वाचून संपल्यावर कित्येक दिवस चुकल्यासरखं वाटत होतं.
बुवा श्रेय तुम्हाला द्यायला
बुवा श्रेय तुम्हाला द्यायला हवे, तुमच्यामूळे वाचली गेली.
अरे हो क्रेडिट दिल्याचे
अरे हो क्रेडिट दिल्याचे धन्यवाद द्यायचे रहिले.
असाम्या, इंट्रो बद्दल
असाम्या, इंट्रो बद्दल धन्यवाद. अजून पुस्तक किंवा सिरीज बघितलेली नाही. बघणार नक्कीच.
Pages