पुढे तर मस्त मोकळे मैदान होते. तऴ्यापल्याडच्या डोंगराच्या माथ्यावर मस्तपैकी ढग जमले होते.
१)
२) तुतारीच्या फुलासोबत..
३) तिथला झेंडू पण आपल्याकडच्यापेक्षा जरा वेगळाच होता.
४) परत परत मागे वळून बघत होतो.
५) तिथेच एक रीसोर्ट पण आहे, तिथे जायची वाट.
६) पायाखाली हा सडा.. आपने फुल बिछाये, उन्हे हम ठुकराये ? अशी तौहीन-ए-मुहोब्बत माझ्याकडुन कशी होईल बरं ?
७) झाड मात्र काही ओळखीचे नव्हते... नंतरही परत भेटलेच.. तेव्हा जरा सविस्तर विचारपूस केली.
८) संपुच नयेत असे वाटणारे रस्ते.
९) विजय आणि केदार पुढे गेले तरी मी रेंगाळतच होतो.
१०) रीसॉर्टच्या रुम्स
११) परत रस्ताच
१२) या फळाला केनयात ट्री टोमॅटो म्हणतात.. फार गोड नाही साधारण टोमॅटोसारखीच चव असते.
१३) जरा जवळून बघू.. ही कच्ची आहेत पिकल्यावर छान लाल किरमीजी रंगाची होतात.
१४) टॉयलेट सुद्धा तेवढेच टापटीप.. त्यांच्या भाषेत ( बालीनीज भाषा, ती इंडोनेशियाच्या बहाषा पेक्षा थोडी वेगळी आहे ) बरेचसे ओळखीचे शब्द सापडतात. नावे तर बहुतेक आपल्याकडचीच. बायकांना उद्देशून "वनिता" असा शब्द आहे. तर समस्त पुरुषांना ( समस्त हा शब्द मी ठळक केलाय ते प्लीजच नोट करा ) "प्रिय" असा शब्द आहे. कित्ती चपखल ना !
१५ ) नव्याने फुलझाडे पण लावलेली होती.
१६ ) तिथे एक वेगळेच दुकान होते. तिथे काही देखणे पक्षी उघड्यावर ठेवले होते आणि आपल्या हातावर
वगैरे त्यांना ठेवून फोटो काढून घ्यायची सोय होती. पक्ष्यांच्या पायात साखळी होती पण त्यांची एकंदर
तब्येत बघता त्यांची उत्तम देखभाल केली जातेय हे जाणवत होते. पक्ष्यांसोबत वटवाघळे, इग्वाना, अजगर पण होते.
हे फोटोत दिसताहेत ते एकाच प्रजतीतले नरमादी आहेत. नवराबायको प्रमाणे विरुद्ध दिशेला तोंड करून
बसले आहेत म्हणून नाही म्हणतै.
त्यांनी तसे रंग निवडायचे खास कारण आहे. यातली लाल मादी झाडाच्या ढोलीत राहते तर हिरवा नर दूरदूर
जाऊन तिच्यासाठी चारा आणतो. नराचे लक्ष वेधून घेण्यासाठी ती अशी लालभडक असते. तर नराला
लांबवर प्रवास करायचा असल्याने, हिरवाईत लपण्यासाठी तसाच रंग असतो. झाडावर आल्यावर तो
पंख पसरून आपण आल्याची वर्दी देतो. त्याचे पंख आतून लाल रंगाचे असतात. ( हि माहिती इथे नाही,
यू ट्यूबवर मिळाली. )
१७) याला म्हणतात नजरेतली जरब.
१८) कसा डोळ्याला डोळा भिडवलाय बघा.
१९) आयला, घुबड सुद्धा काण्याडोळ्याने बघू शकते ? का झोपमोड झालीय ?
२०) ही बाळं कशी रांगेत बसली आहेत !
२१ ) या वटवाघळाची एक गंम्मत बघितली. एरवी उलटे टागुन घेतलेले वाघूळ, शी शू करताना मात्र सरळ म्हणजे खाली पाय वर डोके करते. ( तिथे साफसफाई पण त्वरीत केली जात होती. एरवी पक्ष्यांजवळ जशी
विष्ठेची दुर्गंधी येत असते, तशी अजिबात नव्हती. )
२३) इग्वाना
२५) आणि ही आमची लाडकी मंडळी
२६)
२७)
२८)
२९)
आता पुढच्या भागात बोटॅनिकल गार्डनला भेट देऊ..
क्रमशः
अप्रतिम !!! तुमच्यामुळे मस्ट
अप्रतिम !!! तुमच्यामुळे मस्ट गो यादीतील ठिकाणं वाढतायत
हो शिल्पी, अगदी आवर्जून जावे
हो शिल्पी, अगदी आवर्जून जावे असे बेट आहे हे.
आहाहा..काय सुंदर सुंदर
आहाहा..काय सुंदर सुंदर पाहायला मिळतंय..
फुलांची तारीफ करावी कि पक्ष्यांची कि सीनरी ची... एकापेक्षाएक आलेत फोटोज..
तुझी बाली ट्रिप अगदी अविस्मरणीय झालीये ना???
बाय द वे ,' ते प्रिय' नसून ,' प्रिया' असेच प्रोनाउंसिएशन आहे..
त्या संदर्भात माझ्या एका मैत्रीणी चा भयानक गोंधळ झालेला..
तिला वॉशरूम मधे जायचे होते. दोनच मिनिटात ती प्रचंड कन्फ्यूजन मधे परत आली कारण दोन्ही दारांवर च्या आकृतीत फारसा फरक नव्हता आणी एका दारावर प्रिया तर दुसर्या दारावर वर,' वनिता' लिहिलेले होते..
प्रिया वनिता.... छान
प्रिया वनिता.... छान कॉम्बिनेशन आहे !
मी अपेक्षा ठेवली नव्हती एवढी अविस्मरणीय झाली !
दिनेशदा, मस्त फोटो. प्रचि १९
दिनेशदा, मस्त फोटो.
प्रचि १९ तर सुपर्ब.
पक्ष्यांचे फोटो सुरेख आलेत पण त्यांच्या पायाकडे बघुन वाईट वाटलं.
फार म्हणजे फारच सुंदर!! पहिले
फार म्हणजे फारच सुंदर!! पहिले हिरवळींचे सर्वात जास्त आवडले.
प्र चि २८ - Match Stick
प्र चि २८ - Match Stick Plant, Gamos Bromeliad
Botanical name: Aechmea gamosepala Family: Bromeliaceae (Pineapple family) हे आहे ....
सर्व प्र चि - एकदम खास ......
वर्षूच्या मैत्रिणीचा किस्सा खासच .....
दिनेशदा, नेहमीप्रमाणे रसाळ
दिनेशदा, नेहमीप्रमाणे रसाळ वर्णन केले आहे. एक करु शकाल का? फुलांचे फोटो टाकताना फुलझाडाचे नाव सुद्धा लिहा म्हणजे तेवढीच ज्ञानात भर होईल आमच्या. वर तुम्ही तुतारीचे नाव लिहिले आहे. कैकदा दिसतो वाटते पण आता परिचय तुम्ही करुन दिला म्हणून किती छान वाटत!!! धन्स. हेच इतर लेख लिहिताना सुद्धा कर. फुलझाडाचे नाव लिहायला विसरु नका.
दिनेशदा, फ़ोटो सुंदरच!
दिनेशदा, फ़ोटो सुंदरच!
पक्ष्यांचे फोटो सुरेख आलेत पण त्यांच्या पायाकडे बघुन वाईट वाटलं. >>>>>>>>>>> +१
बाळ घुबड आणि लाडकी मंडळी
बाळ घुबड आणि लाडकी मंडळी मस्तच!
या वटवाघळाची एक गंम्मत
या वटवाघळाची एक गंम्मत बघितली. एरवी उलटे टागुन घेतलेले वाघूळ, शी शू करताना मात्र सरळ म्हणजे खाली पाय वर डोके करते.
ही शंका कधी डोक्यात आलीच नव्हती.
गोवंडी पंजाबवाडी बसस्टॉपसमोर एक मोठे झाड आहे. त्याला खूप वटवाघळे चिकटली आहेत. त्याना बघताना अगदी छान वाटते.
व्वा मस्तच.
व्वा मस्तच.
दिनेशदा, फ़ोटो
दिनेशदा, फ़ोटो सुंदरच..............
सह्ही वर्णन आणि
सह्ही वर्णन आणि नेहेमीप्रमाणेच अप्रतिम फोटोज!! एकसे एक आलेत फोटो...........ती घुबड बाळं कित्ती क्यूट आहेत!! अगदी हातात घ्याविशी वाटताहेत!
त्या पक्ष्यांना पायातल्या
त्या पक्ष्यांना पायातल्या साखळ्यांचा त्रास होत नसावा. शिवाय पिंजर्यातले पक्षी आपल्याला इतक्या जवळून बघता येत नाहीत कि त्यांचे नीट फोटोही काढता येत नाहीत. हे सर्व फोटो मी अगदी जवळून काढलेले आहेत.
( मग बर्ड पार्कमधे पण जायचेय आपल्याला )
शशांक, ते झाड खुपच सुंदर होते. आपल्याकडे बघितल्याचे आठवत नाही.
लक्ष्मी... उलट्या अवस्थेत ते केले तर त्यांच्याच अंगावर पडणार ना ? मी पण आधी कधी विचारही केला नव्हता.
बी, ज्यांची माहीत आहे त्यांची टाकेनच. पण खुपदा आपली झाडे पण तिथे वेगळ्या रुपात दिसतात. म्हणजे वेगळीच प्रजाती असणार.
फोटो अप्रतिम. मलापण
फोटो अप्रतिम. मलापण पक्षांच्या पायाकडे बघून वाईट वाटले.
मस्त! दिनेश .....स्पॅनिशमधे
मस्त!
दिनेश .....स्पॅनिशमधे बोनिता म्हणजे सुंदर स्त्री.
इथेही वनिताचा अर्थ स्त्री असाच आहे का?
घुबडा ची रांगेतली बाळं फारच गोड!
खूप खूप मस्त फोटो आणि
खूप खूप मस्त फोटो आणि माहिति.....
पक्ष्यांच्या पायातल्या
पक्ष्यांच्या पायातल्या साखळ्या पाहून फार फार त्रास झाला!
ते वगळता सर्वच छायाचित्रे सुंदर!
मस्त आहेत फोटो....आत्ताच सगळे
मस्त आहेत फोटो....आत्ताच सगळे भाग पाहिले....अप्रतीम सुंदर ठिकाण !!
नॅशनल जिओग्राफीची एक मस्त डॉक्यूमेंटरी आहे Bali: Masterpiece of the Gods जरा जूनी आहे..पण बघायला छान वातटं.
तन्मय, छान आहे ती
तन्मय, छान आहे ती डॉक्यूमेंटरी.
मानुषी, पोर्तूगीज मधे बोनितो म्हणजे सुंदर. पण तो स्त्री आणि पुरुष दोघांनाही उद्देशून वापरतात.
तिथे वनिता, विजय वगैरे नावाचे स्पेलिंग व्ही च्या जागी डब्ल्यू वापरून करतात.
अप्रतिम फोटो आणि
अप्रतिम फोटो आणि त्याचबरोबरीने तुमचे खास मिश्कील शैलीतील वर्णन. ... अगदि दुग्ध्-शर्करा योग.
दिनेश,फोटो,comments अगदी मस्त
दिनेश,फोटो,comments अगदी मस्त मूड सेट करणारे.
पक्ष्यांच्या पायातल्या साखळ्या बघून त्रास झाला. सहमत.
इग्वानाचे फोटो ज्ञानात भर घालणारे. विक्रम सेठच्या The Golden Gate मध्ये अगदी मानवी पात्रांच्या बरोबरीने जी पेट्स वावरतात त्यात हे हिरवं इग्वाना होतं..
फोटो अणि वर्णन दोन्ही मस्त!
फोटो अणि वर्णन दोन्ही मस्त!
आभार शोभनाताई.. या मालिकेतले
आभार शोभनाताई.. या मालिकेतले बाकीचे फोटो पण नक्कीच आवडतील.
दिनेशदा, सर्वच छान.
दिनेशदा, सर्वच छान.