एका लग्नाची तिसरी गोष्ट!!!

Submitted by मी मधुरा on 18 September, 2013 - 01:19

'एका लग्नाची दुसरी गोष्ट....' माझी सर्वात लाडकी आणि पहिली मराठी आवडलेली मालिका, जी मी पहिली आणि शेवटपर्यंत पाहत राहिले. ती मालिका मात्र २५ ऑगस्ट २०१२ ला संपली. Sad

आणि आता त्या मालिकेतले दोन कलाकार, उमेश कामत (अबीर-एका लग्नाची दुसरी गोष्ट) आणि स्पृहा जोशी (कुहू-एका लग्नाची दुसरी गोष्ट) हे दोघे पुन्हा पडद्यावर येत आहेत, तेही एकत्र....'एका लग्नाची तिसरी गोष्ट' घेऊन!!!! Happy

ए.ल.दु.गो. नंतर मालिकांमध्ये प्रेम कथा, Joint Family दाखवण सुरु झाल, मालिकेत नवीन म्हणजे,
खास मालिकेसाठी तयार केलेली गाणी दाखवण्याची सुरवात झाली...म्हणूनच ए.ल.ती.गो. पाहण्यास मी खूप उत्सुक आहे. Happy

सध्या मिळालेली माहिती:

कथा: श्रीरंग गोडबोले
पटकथा: चिन्मय मांडलेकर (आधीचे एपिसोड), संदेश कुलकर्णी (आत्ताचे एपिसोड्स)
दिग्दर्शक: विनोद लव्हेकर
संगीत: सलील कुलकर्णी
मालिका सुरु होण्याची तारीख: १४ ऑक्टोंबर २०१३!
ekalagnachi.jpgमहत्वाचे:

इथे भांडत बसू नये.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अस्मिता म्हणुन कैतरी जाहीरात येतेय नव्या सीरेलची ९.३० ची.

>> ती "शेजारी शेजारी"च्या ऐवजी येणारे.. बुगुशु आणि श सुद्धा..

स्पृहाने काल बरे काम केले....
नाहीतर नेहेमी बिच्चार्या उमेश कामत ला म्हणावेसे वाटते, " गुणी बाळ असा 'राबसी' कां रे 'वाया'? "

आता जरा बरी चालली आहे सिरिअल.
मध्यंतरी इथे यायला वेळ झाला नाही. पण तो शोभनामावशी सोडून जात असतानाचा एपिसोड होता तो बघताना एक गंमत झाली. शोभना आजींना म्हणते, "गच्चीत कपडे काढायला जाऊ नका". माझी मुलगी जोरजोरात हसायला लागली आणि म्हणाली "why would she do that?". गच्चीत कपडे वाळत घालायची कन्सेप्ट तिला अजिबातच माहित नाही Happy

माझा फॅमिली कोर्टात प्रॅक्टिस करणारा वकील नवरा कमेंट करतोय की "कुणा फॅमिली कोर्टाच्या वकिलाने डोके लढवलेय वाटते हे आताचे भाग लिहिताना"...
म्हणजे मुद्दे बरेच टेक्निकली योग्य आहेत.

शोभना आजींना म्हणते, "गच्चीत कपडे काढायला जाऊ नका". माझी मुलगी जोरजोरात हसायला लागली आणि म्हणाली "why would she do that?". गच्चीत कपडे वाळत घालायची कन्सेप्ट तिला अजिबातच माहित नाही >>>>> Lol

कालच्या भागामधे उमेश काम्तचा बॉस म्हनतो "पॅटर्निटी टेस्टचा रीझल्ट आलाय, तो मुलगा डॉक्टर पत्कींचा नाही. नैनाचाच आहे!!!!"

मी ही सिरीयल बघायची बंद केली..>>> मीपण.. कधीच बंद केली Happy सुटले बुवा.. कसली पकाऊ आहे ती स्पृहा!

या आठवड्यात बर्‍यापैकी व्यवस्थित चालू आहे. त्या घटस्फोटाच्या केसचं प्रकरण खूप चांगलं घेतलं होतं. काल ती बाई कोर्टाबाहेर उभं राहून ओमला बोलत असते आणि तो खाली मान घालून ऐकून घेतो तो सीन आणि नंतर इशा त्याच्याशी जाऊन बोलते तो सीन दोन्ही आवडले. ओमला एकंदरीतच आलेलं डिप्रेशन आणि सगळंच हरल्याची भावना या दोन्ही गोष्टी उमेश कामतने नीट सादर केल्यात. मला त्याचा अभिनय आवडला. कोर्टामधे बोलणारी इशा पण एकदम प्रोफेशनल वाटली. एरवीसारखी हिस्टेरिक अजिबात वाटली नाही.

इशाच्या मनातला गैरसमज दूर होण्याची प्रोसेस चालू झाली, त्यात जयेश आणि धनाची काय वेगळीच भान्गड चालू आहे.

ओम केस हरतो तशी ती त्याची अशील त्याला खूप घालून-पडून बोलते. ती त्याला म्हणते,कि त्याचं आणि ईशाच काहीतरी चालू आहे म्हणूनच तो मुद्दाम केस हरला. तो तरीही काहीही प्रत्युत्तर न देता तसाच तिथून निघतो.
या प्रसंगात उ.का.ने मस्त अभिनय केलाय आणि स्पृहाने सुद्धा!

त्या वेटरची स्टोरी मस्त होती...'काळजाला चटका लाऊन जाणारी' अशी काहीशी वाटली मला.

ओमच ते वक्तव्य फारच प्रभाव टाकत होत....उद्याच्या एपिसोडमध्ये, तो आज्जींना म्हणतो,"मला खूप मोट्टी झोप आलीये...आज्जी मी उद्या सकाळी उठलोच नाही, तर काय करशील तू?" आणि आज्जी काहीतरी भन्नाट पहिल्यासारख त्याच्या निर्जीव वाटणाऱ्या, थकलेल्या चेहऱ्याकडे पाहत राहते.

आता कुठेतरी कथा मार्गावर येईल अशी आशा आहे.

Namaskar, me maaybolichi navin sadasya aahe. Sadhya hee serial changli chalali ahe. Aani vishesh mhanje kaal without interruption eshane om baddal sagala aikun ghetla.

मी पण खूप कमी मराठी सिरियल्स शेवटपर्यंत पहाते पण ही पाहीन असे वाटते. मला ओम, इशा दोघांचीही कामं आणि स्टाईल आवडतात आणि काहीकाही डॉयलॉग जरा हटके आहेत तेच तेच वाजवून वाजवून गुळगुळीत झालेले नाहीत. बघुया आता चिन्मय मांडलेकर पुढे कशी रंगवतायत कथा!

amrutas,

मायबोलीवर स्वागत....

abhishruti ,

आधी हि पटकथा चिन्मय मांडलेकर लिहित होता, पण आता हि कथा संदेश कुलकर्णी लिहित आहे.

हो, खरंच छान दाखवताहेत आता!
उका ही डिप्रेशनची पण फेज छानच रंगवतोय. फक्त नां...... ओमने लगेच इशाला माफ न करता जरा अद्दल घडवायला पाहिजे. अगदी ऐकूनच घेत नाही कोणाचेच म्हणजे काय??

मीपण बऱ्याच दिवसांनी परवाचा एपिसोड बघितला. आता उमेशने जरा ईशाला attitude दाखवायला हवा, बरंच पिड्लेय तिने उमेशला.

.

बिचारा उका रड्ताना खुप वाइट दिसतो ....
ओमने लगेच इशाला माफ न करता जरा अद्दल घडवायला पाहिजे. अगदी ऐकूनच घेत नाही कोणाचेच म्हणजे काय?? ++++२३४५६७

अहो प्रेम करतात ते. त्यात अद्दल घडवणे वगैरे नसतं Happy

रच्याकने, एवढं धडधडीत धनाचं किडनॅपिंग झालं.. आजीच्या तोंडात त्याचा एक साधा उल्लेख नाही? ते गुरुजीही गायब. एक दिवस मावळून दुसरा उगवून दुपार झाली. तरी आजी-आजोबा एक शब्दही त्याबद्दल काढत नाहीत हे अजिचबात नाही पटलं. किमान, ओमला सांगायचं तरी कसं? वगैरे उल्लेख तरी हवे होते.

ओमचे खरे आई-बाबा म्हणून कोण एन्ट्री घेईल? माहितीचा चेहरा असेल, की नवा?

पौर्णिमा, सांगितलं ना आजींनी ओमला की धनाला तिचा भाऊ घेऊन गेला म्हणून. पण तो त्याच्या दु:खात असल्यामुळे ते त्याच्या पर्यंत पोचलं नसावं. त्यानंतरच तो डायलॉग होता मी उद्या ऊठलोच नाही तर..

Pages