Submitted by दक्षिणा on 11 January, 2011 - 23:55
अलिकडे बर्याच मैत्रिणींनी शंका उपस्थित केली की वजन कमी करताना खायचं किती आणि नक्की काय? कशात फॅट्स जास्त? कशात कमी? मग कोणता लो कॅलरी पदार्थ खाल्ला तर पोटभर होईल? याची चर्चा करता करता रमा ने सुचवलं की एक डाएट रेसिपीजचा बीबी सर्वांसाठीच उघडू.
अखेर आज मुहुर्त लागला...
या बीबी वर तुम्ही केलेली/तुम्हाला माहित असलेली लो कॅलरी, लो फॅट, लो कोलेस्ट्रॉल रेसिपी लिहा. ब्रेकफास्ट/लंच्/डिनर्/स्नॅक्स्/वन डिश मिल... काहीही चालेल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे, मी वर दिलेल्या ओटमील
अरे, मी वर दिलेल्या ओटमील रेसिपीमध्ये थोडं आलंही किसून घाला फोडणीत. मग तर एकदम ओटस-ए-बहार टाईप लागेल.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
स्नेहा करुन बघते. वेब, कधी
स्नेहा करुन बघते. वेब, कधी कधी आपल्याला बक्षिस द्यायला पाहिजे
मामी करुन बघेन.
चला बरे झाले हा धागा
चला बरे झाले हा धागा सापड्ला.... १आठवड्यापुर्विच तळ्वळ्कर चालु केलय...
रेसेपी... ब्रेकफास्ट..
ओट्स ताकातले...
ओट्स ताकात ५ मि. भिजवुन ठेवायचे... ताक बरेच लागते....
त्यात आवडीप्रमाणे भाज्या, मीठ घालुन बरुन हिंग जिरे हिरवी मिरची ची फोड्णी (एच्छीक) घालावी. फोडणीने केवळ खमंगपणा येतो.
मी हे कधी कधी डीनरला पण खाते...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आपल्याकडे देशात सहज उपलब्ध
आपल्याकडे देशात सहज उपलब्ध होणार्या आणि सॅलडसमधे घालू शकू अश्या वस्तूंची यादी करूया का?
कोशिंबीरी आणि रायत्यांची पण यादी करूया.
बाकीच्या सगळ्या जेवणाबरोबर भरपूर सॅलड किंवा कोशिंबीर खाल्ली आणि पोळी किंवा भाताची क्वांटिटी थोडी कमी केली तरी फरक पडू शकतो.
तसंच कोशिंबीरीत खाकरा, चाट मसाला घालून संध्याकाळचे स्नॅक होऊ शकते.
आपल्याकडे देशात सहज उपलब्ध
आपल्याकडे देशात सहज उपलब्ध होणार्या आणि सॅलडसमधे घालू शकू अश्या वस्तूंची यादी करूया का?
>> चालेल
मी ज्या भागात राहते तिथे भाज्यांचा अतोनात प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मला नेमक्याच भाज्या मिळतात. त्यामुळे कोशि.बीरी वगैरे करणंच होत नाही. अशी यादी असेल तर भाजीवाल्याकडून ऑर्डर करून मागवता येतील.
१. काकडी
२. टोमॅटो
३. गाजर
४. मोड आलेले मूग
५. उकडलेले चणे, छोले
६. पुदिना
७ कोथिंबीर
८. पालक
९. मेथी
१०. मका
११. शेंगदाणे
किट्टु, 'तळवलकर' - कोणती
किट्टु, 'तळवलकर' - कोणती ब्रँच?
काकडी, टोमॅटो, सफरचंद, अगदी
काकडी, टोमॅटो, सफरचंद, अगदी थोडं मीठ आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर - एक मस्त सॅलड होतं. यातच हवीतर द्राक्षंही अर्धी कापून घालू शकता.
मुळा, उकडलेला बटाटा, दुधी,
मुळा, उकडलेला बटाटा, दुधी, लाल भोपळा, सफरचंद, केळी, द्राक्षं, डाळिंब, पेरू इ.इ,
ऑलरेडी एक "सॅलड, कोशिंबीर
ऑलरेडी एक "सॅलड, कोशिंबीर रायते फॅन क्लब" आहे तिथे अशी भरपूर यादी मिळेल.
http://www.maayboli.com/node/23421
लोक्स फक्त स्~अलड जेवण म्हणून
लोक्स फक्त स्~अलड जेवण म्हणून खाणार असाल तर त्यात कुठलं तरी प्रोटीन जसं उकडलेलं अंड (चालत असल्यास पूर्ण किंवा पांढरा भाग) नाहीतर चालणारे नट्स घालायला विसरू नका. भाजलेले अक्रोड हे कुठच्याही सलाड मध्ये मस्त लागतं आणि सूप सलाड खाणार तर क्रिमी सुप्स टाळा. क्लियर सूप किंवा खूप सार्^या भाज्या घातलेली सुप्स बेस्ट.
माझी घरगुती डाएट सूप
माझी घरगुती डाएट सूप रेसिपी:
भोपळ्याच्या फोडी, गाजराचे तुकडे, रंगीत भोपळी मिरच्यांचे तुकडे, टोमॅटोच्या फोडी, झुकीनीचे काप, दुधीच्या फोडी, थोडा कांदा हे सगळं कुकरला २ शिट्ट्या करुन वाफवावं. नंतर गार झाल्यावर मिक्सरला फिरवताना हवा असल्यास मिरचीचा तुकडा घालावा. कोथिंबीर घालूनही चालेल. चांगली उकळी काढून चवीपुरतं मीठ घालून गरम गरम प्यावं.
जरी बर्याच भाज्या असल्या तरी खूप पोटभरीचं होत नाही. बरोबर सॅलड वगैरे घ्यावं.
सायो, मस्त वाटतंय हे सूप.
सायो, मस्त वाटतंय हे सूप. करून बघेन.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान लिखाण आहे. रेसिपीज
छान लिखाण आहे. रेसिपीज आवड्ल्या.
डाएटिंग करणार्या कोंबडीची रेसिपी चालेल का .......
तुमची असेल तर जरूर द्या.....
तुमची असेल तर जरूर द्या.....
तुमची असेल तर जरूर
तुमची असेल तर जरूर द्या.....>> बाबु काय हवय नेमकं? कोंबडी की रेसिपी?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एकमेकींशिवाय काय उपयोग मित्रा
एकमेकींशिवाय काय उपयोग मित्रा ?
डाएट करणार्यांनी, केळी,
डाएट करणार्यांनी, केळी, द्राक्ष, आंबा, चिक्कु आशी भरपूर साखर असलेली फळं कमी खावित असे वाचले आहे.
कलिंगड सगळ्यात बेस्ट असते करण त्यात पाणीच जास्त आणि थोडे खल्ले की पोट पण भरते. शरिरातल्या पाण्याचा निचरा व्हायलाही मदत होते![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
प्रोटिन्स करता सॅल्ड्स मधे चिकनचे उकडलेले तुकडे पण घालु शकता. ठोडे कार्ब्ज जाणे ही आवश्यक त्यासाठी कुसकुस, थोडे टोस्टेड ब्रेड क्रुटॉन्स पण घालु शकता.
नेहमीच दह्यातली कोशिंबीर खायच्या ऐवजी एक दिवसाआड ऑऑ चे ड्रेसिंग घालुन सॅलॅड खावे...
बाकीच्या सगळ्या जेवणाबरोबर भरपूर सॅलड किंवा कोशिंबीर खाल्ली आणि पोळी किंवा भाताची क्वांटिटी थोडी कमी केली तरी फरक पडू शकतो << +१
जेवणाआधी २ ग्लास पाणी प्यायले तरी अपसुकच जेवण कमी जाते. जेवताना आणि जेवल्यानंतर अर्धा तास पाणी पिऊ नये.
पण ओटमील दूधा बरोबर जात नाही
पण ओटमील दूधा बरोबर जात नाही . >>> अरेरे काय हे.. मस्त शिजवलेले ओटमील, दुध, ब्राऊन शुगर, ग्रनोला, मेपल सिरप, बेदाणे आणी केळ्याचे काप.. स्वर्ग..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नात्या पाय दाखव तुझे
नात्या पाय दाखव तुझे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हा धागा पुन्हा वर काढतेय.
हा धागा पुन्हा वर काढतेय. कोणाकडेही काही नवीन रेसिपीज असतील तर प्लीज अपडेट करा.
माझ्याकडुन दोन रेस्पीज:
डायेट खाकर्यावर कापलेला टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, उकडलेले कॉर्न, तिखट आणि मीठ घालुन मसाला पापड टाईप बनवा. स्नॅक्स च्या वेळेला. अगदीच मिळमिळीत वाटत असेल त्यांनी थोडीशी शेव भुरभुरा त्यावर. माझ्याकडे ज्वारीच्या आणि बाजरीच्या लाह्या आहेत. त्याने आपोआपच कुरकुरीतपणा येतो. शेवेची गरज नाही.
साळीच्या लाह्यांची भेळः कोरड्या भेळेचे सर्व आयटम्स फक्त कुरमुरे आणि फरसाण (आणि तुम्ही जर शेंगदाण्यासारखे काही हाय कॅल पदार्थ घालत असाल तर ते) वगळून साळीच्या लाह्यांमध्ये घालायचे.
समहाऊ कांदा + टोमॅटो + कोथिंबीर + तिखट + मीठ हे काँबो अतीशय प्रिय असल्याने बर्याचश्या बेचव पदार्थांवर घालुन त्यांना सुसह्य बनवते.
पियू मस्तच एकदम.
पियू मस्तच एकदम.
राजगिर्याच्या लाह्या ताक +
राजगिर्याच्या लाह्या ताक + मीठ + बारीक चिरलेली हिरवी मिरची + चवीनुसार मीठ साखर + कोथिंबीर घालून छान लागतात. जरा वेळ ताकात भिजल्या की फुगतात आणि मधल्या वेळेसाठी पोटभरीच्या होतात.
नाचणीची ताकातली आंबील हाही माझा आवडता पदार्थ आहे. झटकन होणारा, चवदार व पोटभरीचा.
फुलक्याचा खाकरा : ताज्या किंवा त्या दिवशी बनविलेल्या फुलक्याला (किंवा तव्याला) किंचित तेलाचा हात लावून त्यावर फुलका गरम करायचा व जरा कडक झाला की तिखट-मीठ भुरभुरून खायचा.
राजमा सुप...
राजमा सुप...
राजगिर्याच्या लाह्या कुठे
राजगिर्याच्या लाह्या कुठे मिळतात अकु?
पियू, किराणा मालाच्या दुकानात
पियू, किराणा मालाच्या दुकानात मिळतात बर्याचदा पॅकबंद राजगिरा लाह्या. किंवा सकस, अग्रज इत्यादी तयार पीठे, लाह्या यांसारखी उत्पादने जिथे मिळतात तिथे तर हमखास मिळतील.
राजमा सुप...कसे करायचे हे??
राजमा सुप...कसे करायचे हे??
>>>फुलक्याचा खाकरा : ताज्या
>>>फुलक्याचा खाकरा : ताज्या किंवा त्या दिवशी बनविलेल्या फुलक्याला (किंवा तव्याला) किंचित तेलाचा हात लावून त्यावर फुलका गरम करायचा व जरा कडक झाला की तिखट-मीठ भुरभुरून खायचा.>> यावर लिंबूरस आणि चाट मसाला पण मस्त लागेल.
तुमच्या डाएटमध्ये पोळ्या
तुमच्या डाएटमध्ये पोळ्या खाल्लेलं चालत असेल तर कणकेत किसून बीट/ मेथी/ शेपु/ गाजर/ तिखट-मीठ-हळद (दशमी)/ श्रावणघेवडा असं घालुन पोळ्या करुन अगदी थोड्याश्या तेल/ तुपासोबत मस्त लागतात.
(जुनी रेस्पी आहे).
http://www.tarladalal.com/rec
http://www.tarladalal.com/recipes-for-low-calorie-weight-loss-383?pagein...
हि एक तरला दलाल यांचं इंडियन डाएट रेसेपीजचं पेज सापडलं पण मला खात्री नाहीये की त्यांनी सांगितलेल्या रेसेपीज लो कॅल आहेत. सुरुवातच "अंजीर बासुंदी"ने होते. "अॅपल रबडी" पण आहे.
यातला कोणताही पदार्थ कोणी ट्राय केला तर इथे लिहा प्लीज.
http://simpleindianrecipes.com/dietrecipes.aspx
इथे मोजक्याच पण छान रेसेपीज दिसताहेत.
http://www.sanjeevkapoor.com/Healthy-Recipes.aspx#
आणि इथे संजीव कपूर ने खरोखरीच खुप चांगल्या रेसेपीज दिल्या आहेत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
यात कुळथाचं सार, मोड आलेल्या मुगाची आमटी वै. पण आहे.
गंमत म्हणजे त्याने या पदार्थांची मराठी नावं जशीच्या तशीच ठेवलेली आहेत.
ओटस् चा उपमा खूपच टेस्टी
ओटस् चा उपमा खूपच टेस्टी लागतो
रवा भाजून घेतो तसे ओटस् परतून घ्या, आणि नंतर उपमा करतो तशी सेम रेसीपी करा, same ingredients
पाणी घालून 5 मिनिटे शिजवा की झाला ओटस् उपमा रेडी!!
Pages