Submitted by दक्षिणा on 11 January, 2011 - 23:55
अलिकडे बर्याच मैत्रिणींनी शंका उपस्थित केली की वजन कमी करताना खायचं किती आणि नक्की काय? कशात फॅट्स जास्त? कशात कमी? मग कोणता लो कॅलरी पदार्थ खाल्ला तर पोटभर होईल? याची चर्चा करता करता रमा ने सुचवलं की एक डाएट रेसिपीजचा बीबी सर्वांसाठीच उघडू.
अखेर आज मुहुर्त लागला...
या बीबी वर तुम्ही केलेली/तुम्हाला माहित असलेली लो कॅलरी, लो फॅट, लो कोलेस्ट्रॉल रेसिपी लिहा. ब्रेकफास्ट/लंच्/डिनर्/स्नॅक्स्/वन डिश मिल... काहीही चालेल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सध्या मला फार्फार गरज आहे
सध्या मला फार्फार गरज आहे याची
मस्त घागा दक्षे
लिहा इकडे पटापट.
दक्षे, तू डाएटीशिअन आहेस का??
दक्षे, तू डाएटीशिअन आहेस का?? तू बीबी उघडलास म्हणून आणि ती प्रस्तावना वाचून वाटलं...
दक्षे दक्षे वाचून आधी वाटलं
दक्षे दक्षे वाचून आधी वाटलं द्राक्षच खायला सांगताहेत कि काय..
पयली रेसिपी मीच टाकिन म्हणून
पयली रेसिपी मीच टाकिन म्हणून मघापासून प्रयत्न करतेय..
पोष्ट केलं की गायब होतंय..
आनंदयात्री मी डाएटिशियन नाही.
लोकांनो नुसती एक दोन वाक्य नको, रेसिप्या टाका पटापट...
ब्रेकफास्टः मुगाची
ब्रेकफास्टः
मुगाची धिरडी:
साहित्यः १) आख्खे मुग दळुन आणलेले.
२) ओवा: एक छोटा चमचा
३) हळद, मीठ, तिखट चवीपुरते
४) आवडत असल्यास आलं-लसुण पेस्ट घालावी
वरील सर्व साहित्य एकत्र जरा पातळसर भिजवावे. लगेच नॉन-स्टीक वर अगदी थोडे तेल चमच्याने ओतुन फिरवुन घ्यावे, आणी भाजीचा चमचाभरुन हे मिश्रण टाकावे. छान जाळीदार धिरडी तयार होतात.
नुसती खायला ही चांगली किंवा आवळ्याच्या लोणच्याबरोबर खाल्ली तर अप्रतिम लागतात.
मुग पचायला हलका असल्याने ५-६खाल्ली तरी पोट हलके रहाते, अगदी लो कॅलरी आणी पटकन होण्यासारखे. तसेच मधुमेहावर पण अत्यंत गुणकारी.
>>दक्षे दक्षे वाचून आधी वाटलं
>>दक्षे दक्षे वाचून आधी वाटलं द्राक्षच खायला सांगताहेत कि काय..>>
दक्षिणा सक्काळ्च्या पारी येवढं रागावर जाऊ नकोस.
दक्षे मस्तच आणि
दक्षे मस्तच आणि उपयुक्त
टाकते मी पण रेसिप्या , जरा सवडीने
जरा सवडीने >> सवड कशातून
जरा सवडीने >> सवड कशातून काढणार आहेस ? खाण्यातून कि कामातून
मोड आलेल्या वाटीभर मुगावर
मोड आलेल्या वाटीभर मुगावर सैंधव मीठ शिंपडुन तसेच खायचे, मस्त ब्रेकफास्ट. किंवा एक मोठा बटाटा उकडुन त्यावर सैंधव टाकुन त्याचा ब्रेकफास्ट!
सुक्या खाण्याच्या कामातून
सुक्या खाण्याच्या कामातून
बादवे तु इथे कशाला ?? नुस्ता आलास तरी अदृश्य होशील
स्मिते
स्मिते
भ्रमा, बटाटा? बटाटा तर
भ्रमा, बटाटा? बटाटा तर अॅव्हॉईड करतात ना बारीक व्हायचं असेल तर?
स्मिता व्वा.. दक्षे तुझ्याच
स्मिता
व्वा.. दक्षे तुझ्याच तोंडून सॉरी बोटातून आली पायजेल पहिली रेसिपी
चल टाक तुझे डाएट चे नुस्खे पटापट
उकडलेला बटाटा चालतो. बटाटा
उकडलेला बटाटा चालतो. बटाटा तळला गेला की कॅलरी रिच होतो.
हे मला माझ्या जीम इंस्ट्रक्टर ने सांगितले होते.
गव्हाचा चीक डाएट रेसिपी होउ
गव्हाचा चीक डाएट रेसिपी होउ शकेल का?? तर त्याची कृती टाकते!!!
सकाळी साळिच्या लाह्यांचा चिवडा खावा नाश्त्याला. पचायला हलका, करायला सोपा!!!
टाकते गं वर्षु, वेळंच नाही बघ
टाकते गं वर्षु, वेळंच नाही बघ
डाएट बीबी काढ म्हणून सांगून सांगून रमा चा घसा सुकला..
आज मुहुर्त लागलाय या बीबीच्या जन्माला...
बहुतेकांच्या घरी सगळे डाएट
बहुतेकांच्या घरी सगळे डाएट करत नसणार त्यामुळे त्यांच्यासाठी स्वैपाक केल्यावर आपल्यासाठी नवीन काय करावं हा प्रश्न साहजिकच समोर येणार. माझ्याकडे हा अगदी महत्वाचा प्रश्न होता. तेव्हा डाएट करत असतांना काही ठळक जिन्नस, त्यांचे होऊ शकणारे पदार्थ आणि फ्लेवर्स मी लक्षात घेतले होते त्यामुळे कमी वेळात (माझ्याच साठी) स्वैपाक करणे सोपी होत गेले.
फ्लेवर्सः
१. हिरव्या मिरच्या, आलं, लसूण, जीरे
२. हळद, तिखट, धणेपूड, ओवा
३. नुसती मिरपूड
४. हळद, हिंग, मोहरी
५. लाल मिरच्या, लसूण यांची पेस्ट
६ कांदा+ हळद, तिखट + शिमला मिरची
ठळक जिन्नसः
१. मूग (मोड आलेले), मटकी (मोड आलेली),
२. सालाची मुगाची डा़ळ
३. कणी़क
४. दलिया (सोजी)
५. ओट्स
६. व्हीट ब्रेड
भाज्या:( बटाटे आणि इतर कंद सोडुन सगळ्या)
ब्रेकफास्ट साठी:
१. ओट्स चा उपमा (फ्लेवर : कांदा+हळद, तिखट + शिमला मिरची)
२. मुग/मटकीची उसळ ( फ्लेवरः कांदा+हळद, तिखट + शिमला मिरची + चिंचेचा कोळ )
३. सँडविच ( व्हिट ब्रेड + दहीपुदीना चटणी + टमाटर, काकडी स्लाईसेस)
४. ओट्स चे दोसे ( थोड्या डोश्याच्या पीठात दळलेले ओट्स मिसळुन डोसे)
५. दलिया चा उपमा ( फ्लेवर : कांदा+हळद, तिखट + शिमला मिरची)
६. दलिया + दुध + १ चमचा साखर शिजवून घेऊन त्यात थोडी विलायची.
७. दलिया + दही + हिरव्या मिरच्या, आलं, लसूण, जीरे याचे धिरडे किंवा इडल्या
रात्रीचं जेवणः
१. मुगाचे धिरडे ( भिजलेले मुग + हिरव्या मिरच्या, आलं, लसूण, जीरे. थोड्ं फेटुन धिरडे करायचे)
२. मुगाची खिचडी ( सालाची मुगाची डाळ + कांदा+ हळद, तिखट + शिमला मिरची. कुकरमधे शिजवणे अजिबात तांदुळ नं घालता, याला मोहरी व्यतिरिक्त खड्या मसाल्याची ( लवंग, विलायची, तेजपान, दालचिनी) फोडणी देऊ शकतो)
३. उकळलेले दुधीचे / लाल भोपळयाचे क्युब्स् + दही+हिरव्या मिरच्या+ हळद, हिंग, मोहरी यांची फोडणी. या चटणीसोबत पोळी छानच लागते..
४ पनीर भुर्जी (पनीर किसून घेऊन थोड्या तेलात फोडणी देणे आणि कांदा+ हळद, तिखट + शिमला मिरची किंवा कुठलाही आवडता फ्लेवर देणे) ही पनीर भुर्जी रोस्टेड ब्रेड वर टाकून खाणे..
५. पाव भाजी ची भाजी ( बटाटे नं टाकलेली) विथ व्हीट ब्रेड
उकळलेल्या भाज्या खायची त्याकाळात खुप सवय झाली होती..कुणाला त्याची रेसिपी हवी असल्यास प्लीज सांगा..
उकळलेले / उकळलेल्या नाही...
उकळलेले / उकळलेल्या नाही... उकडलेले / उकडलेल्या हवे ना
तेच ते गं तेच ते.
तेच ते गं तेच ते.
चटपटा दलिया: १. जाडा दलिया
चटपटा दलिया:
१. जाडा दलिया वाफेवर शिजवून घ्या (दलियात पाणी घालायचे नाही.)
२. मग त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, सिमला मिरची घाला. (हे मिश्रण शिजलेल्या दलियाच्या किमान ३/४ तरी असावे)
३. आवडीनुसार मीठ, मिरपूड, चाट मसाला घाला.
४. भरपूर कोथींबीर घाला
५. लिंबू पिळा (सढळ हस्ते)
६. सगळे एकत्र करा
कोमट (सगळे मिसळेपर्यंत गरम रहात नाही) अथवा थंडगार (फ्रीझमधून काढून) कसेही खायला मस्त लागते.
ब्रेकफास्ट : ब्राउन ब्रेड
ब्रेकफास्ट : ब्राउन ब्रेड Sandwich -
साहित्य : ब्राउन ब्रेड स्लाईसेस - २ ( बटर न लावता किंवा फारच तर डाएट मेयो लावून)
काकडी, टोमॅटो, सेलरीची पाने, चाट मसाला, उकड्लेले बीट (हवे तर)
चटणी - पालक (चिरलेला वाटीभर), कोथिंबीर ४-५ काड्या, मिरची,लसूण,
आलं (आवडत असेल तर), लिंबू रस, साखर, चिमुट्भर मीठ/सैंधव - हे
सगळं वाटून मस्त हिरवीगार चट्णी बनवावी.
कृती : ब्राउन ब्रेड स्लाईसला हिरवी चटणी लावून, त्यावर काकडी, टोमॅटो, उकड्लेले
बीटच्या स्लाईसेस ठेवायच्या. त्यावर चिमुट्भर चाट मसाला भुरभुरायचा,
पाहिजे तर ग्रिल करा किंवा नुसतेच खा. हेल्दी आणि पोट्भर नाश्ता तय्यार.
यामधे किंचित उकड्लेले मुगही टाकू शकता किंवा एखादा दिवस स्वतःचे लाड
म्हणून उकडलेल्या बटाट्याच्या स्लाईसेस ही टाकू शकता.
Imp टीप : डाएट concious असाल तर चटणी मधे नारळ्/दाणे टाकायचा मोह
आवरायचा. भरपूर Calories असल्यामुळे हे पदार्थ अज्जिबात वापरायचे नाहीत.
ब्रेकफास्ट नंतर २-३ तासाने २
ब्रेकफास्ट नंतर २-३ तासाने २ मारी बिस्किट्स किंवा एक वाटी लाह्या किंवा 'खूब खाओ' सारख्या ब्रॅन्ड्चे स्नॅक एक वाटीभर
लंच : मस्त गरम ज्वारीची भाकरी, किंचित तेलावर परतलेले हिरवी पालेभाजी (एक चमचा तेलाची
फोडणी, हिरवी मिरची आणि लसुण घालुन.) लो फॅट दुधाचे दही/ताक, एक वाटी
शिजवलेला भात, साधं वरण with गायीचं तुप किंवा कमी तेलाची आमटी. थोडक्यात भरपेट
जेवण.
लंचनंतर ४.३०/५.०० वाजता, चहा/कॉफी २ मारी बिस्किट बरोबर किंवा ज्युस किंवा एखादं फळ
डिनर : उशिरात उशिरा म्हणजे ७.३० किंवा अगदी कडेलोट म्हणजे ८ च्या आत नक्की.
या मधे K Kellogs भरपुर फळं आणि गायीचं दुध घालुन खा किंवा एक फुलका आणि भाजी. बस्स एवढंच. रात्री अगदी कमी. झोपताना एक छोटा कप गरम दूध.
मी फार व्यायाम न करताही ५ किलो कमी केले आहेत, या डाएट मुळे.
डाएट रेसिपीजच नाहि आहेत पण एक
डाएट रेसिपीजच नाहि आहेत पण एक ऊपाय माहित आहे
सकाळी १/२ चमचा दालचिनी पावडर + १/२ चमचा मध + १/२ कप उकळलेल पाणि घ्यावे मग १/२ तास तरी काही खावु नये
बापरे एवढी लिस्ट.. खायचं कधी
बापरे एवढी लिस्ट.. खायचं कधी हे सगळं?
डाएट बरोबर कुठे तयार मिळेल हे हि सांगा.. :p
रार्नडे
रार्नडे
दिवसभरात पाणी पिताना केवळ गरम
दिवसभरात पाणी पिताना केवळ गरम पाणीच प्यायचे .. हे सुद्धा एक डाएटच आहे.
दक्षे छान धागा. सम्या..
दक्षे छान धागा.
सम्या..
डाएटः- सकाळचा आहार:- १ ग्लास
डाएटः-
सकाळचा आहार:-
१ ग्लास दुध, केळं(वेलची), १ चपाती, ( ८.००) / ओटस (एक मोठे वाडगेभरुन)
२ तासाने- १ कोणतेही फ्रुट, २ मारि/ होल ग्रैन बिस्किटे ( १०.००)
२- ३ तासाने- जेवण (२ चपात्या, सॅलड, भाजी, स्प्राउटस, ताक) (१.००-२.००)
२ - ३तासाने- चहा/ कॉफी २ बिस्किटे (४.००)
२ तासाने - नाश्ता (पोहे / उपमा / उप्पिट, साधा डोसा), बिस्किट (६.३०)
२-३ तासाने - पुर्ण जेवण (२ चपात्या, सॅलड/ कोशिंबीर, भाजी, स्प्राउटस, डाळ, भात)
२ तासाने ( झोपण्याच्या १/२ तास अगोदर) - १ ग्लास दुध
दिवस संपुर्णम...
****डीस्क्लेमर: हे मी फॉलो करत नाहि हे वेगळे सांगायला नकोच.. ****
मधात गरम पाणि घातले तर चालेल
मधात गरम पाणि घातले तर चालेल का?
खालील पदार्थ खरोखर कितपत
खालील पदार्थ खरोखर कितपत आदर्श ''डाएट'' च्या व्याख्येत बसतील ते माहित नाही. पण मी स्वतःवर त्यांचे प्रयोग अधून मधून करत असते.
डायट फूड मध्ये माझं आवडतं म्हणजे मुगाच्या डाळीची खिचडी. तांदूळ व मूगडाळ भिजवून अर्ध्या तासाने कोरडे भाजून घ्यायचे व खिचडी करायची. ह्यात तेल अगदी नाममात्र वापरूनही खिचडी करता येते. कोरडी फोडणी करायची. (मोहरी नुसतीच तडतडविणे, त्यात खडा मसाला घालणे, हळद पाण्यात कालवून, तिखट पाण्यात कालवून, गोडा/ गरम मसाला पाण्यात कालवून घालणे.) नंतर अगदी नाममात्र तेल घालून त्यात तांदूळ + मूगडाळ परतणे व नेहमीप्रमाणे खिचडी.
आठपट पाण्याचा मोकळा शिजवलेला, तूप - जिर्याची फोडणी ऐच्छिक असा भातही पचायला अतिशय हलका.
अशाच कोरड्या फोडण्या वापरून भाज्याही करता येतात.
दाल शोरबा (डाळ व उकडलेल्या भाज्यांचे एकत्र सूप) हाही आहाराचा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
तसेच फोडणी न देता, दही / लिंबाचा रस + मिरपूड / जिरेपूड + मीठ वापरून केलेल्या कोशिंबिरी. वाफवलेले मूग/ चवळी/ उकडलेले छोले इत्यादींनाही हेच मिश्रण वापरून खादडता येते.
साळीच्या लाह्या : ह्या नुसत्या/ भाजून तूप +मीठ लावून - वाटल्यास मेतकूट घालून खाता येतात.
कोंडा (ब्रॅन) घालून केलेल्या पोळ्या/ भाकर्या. जमल्यास पोळ्यांना एरंडेल तेलाचा हात.
धानशाक (धनसाक) / उंधियो / लेकुरवाळी भाजी / ऋषिपंचमीची भाजी अशा तर्हेच्या कॉम्बो भाज्या / डाळी अतिशय कमी तेल/ तुपाचा वापर करून बनविणे.
हिरव्या मोड आलेल्या मुगाची धिरडी/ डोसे, त्यासोबत दह्यातील चटणी.
कोणत्याही डाळींची आमटी / तडका डाळ इत्यादी करण्याऐवजी त्या शिजवून व्यवस्थित घोटून त्यात मीठ, तिखट, मसाला, कच्चा कांदा घालून फुलक्याबरोबर खायचे. यम्मी!
Pages